निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 17/08/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 18/08/2011 तक्रार निकाल दिनांकः- 06/02/2012 कालावधी 05 महिने. 19 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मोहंमद शफी मोहंमद सिद्दीकी. अर्जदार वय 40 वर्ष.धंदा.- मिरची कांडप. अड.एस.एन.वेलणकर. रा.वालूर ता.सेलू.जि.परभणी. विरुध्द अधीकृत प्रतिनिधी / संचालक. गैरअर्जदार श्रीकृष्ण माशिनरी स्टोअर्स, 8,अंबीका मार्केट,जालना (431203) ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदारांनी दिलेल्या त्रुटीच्या व निष्काळजीपणाच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार वालूर ह्या लहान गावात मिरची कांडपचा छोटा व्यवसाय करतो.अर्जदाराने दिनांक 30/10/2010 रोजी गैरअर्जदाराकडून एक 2 एच.पी.एस./ पी.मोटर 8 “ डी पी टाईप ” पल्वरायजर इ. सामान रु.16,000/- मध्ये घेतले त्यातील मोटारची 12 महिन्यांची वॉरंटी गैरअर्जदाराने दिली.अर्जदाराने सदर मोटार वालूरला आणली, ती चालू केल्यावर जेमतेम 1 तासभर चालली व बंद पडली.अर्जदाराने ती गैरअर्जदाराकडे दुरुस्तीला पाठवली दिनांक 01/05/2011 रोजी गैरअर्जदाराने मोटार मेकॅनिकसह वालूरला पाठवली पुन्हा पहिल्यासारखाच प्रॉब्लेम निर्माण झाला. मेकॅनिकने सर्व दोष मोटरचा आहे व ती लोड घेत नाही असे सांगीतले गैरअर्जदारास हे सांगीतल्यावर त्याने मोटार देण्याचे नाकारले अर्जदाराने वकिला मार्फत नोटीस पाठवल्यावरही गैरअर्जदाराने काहीही उत्तर दिले नाही. अर्जदाराने दिनांक 19/07/2011 रोजी गैरअर्जदारास पुन्हा वकिला मार्फत नोटीस पाठवली तेव्हा गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वकिलांना फोन करुन मोटर बदलून देण्यास तयार आहोत पण अर्जदाराच्या वकिलांनी मोटार नको सामान परत घेवून पैसे द्या, असे सांगीतले. त्यावर कंपनीस विचारुन उत्तर देतो असे गैरअर्जदाराने सांगीतले, परंतु गैरअर्जदाराने मोटार दुरुस्ती बाबत पुढे काहीही न केल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व सामानाची किंमत व इतर खर्च रु.20,000/- मानसिक त्रासाबाबत रु.5000/- नोटीसच्या बाबत रु.1500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3500/- असे एकुण रुपये 30,000/- द्यावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र,बील, वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसीच्या प्रती, त्याला आलेले उत्तर, नादुरुस्त मोटारीचा अहवाल, फोटोग्राफ इ.कागदपत्र दाखल केलेली आहेत. गैरअर्जदाराने मंचातर्फे पाठवलेली नोटीस स्वीकारुनही लेखी जबाब सादर न केल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्र व लेखी युक्तिवादा वरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 तक्रार या न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येते काय ? होय. 2 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराची तक्रार या न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येते का ? हा निर्णयासाठी पहिला मुद्दा आहे कारण अर्जदाराने जालना येथुन पल्वनायजर खरेदी केलेला आहे,परंतु वालूर ता. सेलू जि.परभणी येथे ते बसवण्यात आले. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 11 (2) क अन्वये वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागशः घडले असेल अशा जिल्हा मंचाकडे तक्रार दाखल करण्यात येते म्हणून सदरील तक्रार न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात येते. अर्जदाराने दिनांक 30/10/2010 रोजी गैरअर्जदाराकडून पल्वनायजर ( पूर्ण संच ) रु.16,000/- ला घेतलेला आहे हे नि.4/1 वरील पावतीवरुन सिध्द होते. अर्जदाराने नि.9/1 वर दाखल केलेला संजय कौंडीण्ये जे शासनमान्य तारतंत्री आहेत त्यांचे पल्वनायजर व मोटारच्या कार्यक्षमते बद्दलचे मत दाखल केलेले आहे.त्यानुसार मोटार कार्यक्षम होण्याकरता आवश्यकता नमुद केल्यापेक्षा दिडपटीने जास्त विद्युत घेते.तसेच मोटार 2 एच.पी.ची असली तरी गती उर्जा व शक्ती यांचे गणित बरोबर नसल्याने मोटारवर लोड येतो व ती लगेच बंद पडते.किमत कमी ठेवण्याच्या दृष्टीने मोटार, पूली,गती, शक्ती या गोष्टींचा विचार न केल्याने दोन्हीही(पल्वनायजर व मोटार ) मिरची कांडप होण्याकरता योग्य नाही व बदलून सुध्दा फायदा होणार नाही.व मोटार बंद पडण्याचा त्रास कायम राहिल. गैरअर्जदार हा मंचाची नोटीस मिळूनही नेमल्या तारखेला हजर राहिला नाही,परंतु नि.7/1 वर अर्जदाराने गैरअर्जदाराच्या वकिलांनी दाखल केलेल्या नोटीसच्या उत्तरावरुन गैरअर्जदारास अर्जदाराने त्याच्याकडून पल्वनायजर घेतलेले आहे व ते बिघडल्याचेही मान्य केलेले आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने पल्वनायजरसाठी आवश्यक ती मोटार न देवुन त्रुटीची सेवा दिल्याचे आम्हास वाटते म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 अर्जदारास गैरअर्जदाराने निकाल समजल्या पासून 30 दिवसाच्या आत मोटार व पल्वनायजर परत घेवुन रु.16,000/- द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |