(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने गैरअर्जदार यांच्यामार्फत शेअर बाजारात रक्कम गुंतविली. गैरअर्जदार यांनी पूर्व परवानगी न घेता केलेल्या व्यवहारामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याची अर्जदाराची मागणी गैरअर्जदार यांनी मान्य न केल्यामुळे (2) त.क्र.655/09 त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्यामार्फत शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार केला आहे. गैरअर्जदार हे शेअर खरेदी विक्री करणारे अधिकृत दलाल आहेत. दि.14.03.2007 रोजी अर्जदाराने लिओ प्लॅनमध्ये गैरअर्जदार यांच्याकडे खाते उघडले, यावेळी अर्जदाराने लेखी स्वरुपात शेअर्स खरेदी विक्री करण्याचे अधिकार गैरअर्जदार यांना दिले होते. या व्यवहारात अर्जदारास आर्थिक लाभ झाल्यामुळे त्यांनी दि.04.04.2007 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे इक्विटी ब्रोकींग खाते उघडले. या खात्यातील नियमानुसार लेखी/तोंडी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार करता येत नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराने दि.04.04.2007 ते 24.08.2007 या काळात राजेश छगन बारी यांना खरेदी विक्री करण्याचे अधिकार दिले व ही माहिती गैरअर्जदार यांना कळविली. त्यामुळे या काळात झालेल्या नफा/नुकसान यास ते स्वतः जवाबदार असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराच्या मुलास झालेल्या अपघातामुळे दि.25.08.2007 ते 20.01.2008 या काळात त्यांनी शेअर खरेदी विक्री करण्याबाबत गैरअर्जदार यांना कोणतेही लेखी किंवा तोंडी अधिकार दिलेले नाहीत. गैरअर्जदार यांनी या काळात केलेल्या व्यवहारामुळे त्यांना 3.50 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. ट्रॅन्झॅक्शन स्टेटमेंट व कॉन्ट्रॅक्ट नोट देणे बंधनकारक असतानाही गैरअर्जदार यांनी, त्यांना दि.25.05.2007 ते 31.03.2008 या काळात ते दिले नाहीत. अर्जदाराने भविष्यात खाते चालू ठेवण्यासाठील 4.37 लाख रुपये गैरअर्जदार यांना तीन चेकद्वारे दिले. दि.25.08.2007 ते 01.03.2008 या काळात कोणतीही लेखी किंवा तोंडी पूर्व परवानगी नसताना गैरअर्जदार यांनी केलेल्या व्यवहारामुळे झालेल्या 3.50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी गैरअर्जदार यांनी मान्य न केल्यामुळे त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे, व व्याजासह नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या संयुक्त जवाबानुसार अर्जदार हे ग्राहक नसल्याचे सांगून ग्राहक संरक्षण कायद्यात दिलेल्या ‘ग्राहक’ या व्याखेत ते येत नसल्याचे म्हटले आहे. नियमानुसार शेअर खरेदी विक्री व्यवहारासंबंधित तक्रारी आर्बिट्रेशन व कॉन्सिलिंग कायद्याअंतर्गत सोडविणे आवश्यक असल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरची असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराबरोबर शेअर्स खरेदी विक्री करार हा मेंबर-क्लायंट असा आहे. अर्जदाराने स्वतः त्यांच्याकडे खाते उघडले असून, त्यांच्यातर्फे अर्जदारास देण्यात येणा-या पत्रात राजेश (3) त.क्र.655/09 छगन बारी हे त्यांचे डिलर आहेत. त्यामुळे शेअर व्यवहाराबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हटले आहे. राजेश बारी यांनी अर्जदाराच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी विक्री व्यवहार करु नये असे नमूद केलेले नाही. अर्जदार अनेकवेळेस तोंडी किंवा मोबाईलवर संपर्क साधून शेअर्स खरेदी विक्री व्यवहार करीत आलेले आहेत. दि.25.05.2007 ते 20.01.2008 या काळात त्यांनी गैरअर्जदार क्र.3 यांच्याबरोबर संपर्क साधून व्यवहार केलेले आहेत. अर्जदारास स्वतःच्या खात्याची पूर्णपणे माहिती असून, त्यांच्यातर्फे वेळोवेळी कॉन्ट्रॅक्ट स्टेटमेंट पाठविण्यात आलेली आहेत. त्यांच्यातर्फे अर्जदारास 4.37 लाख रुपये रक्कम भरण्याची मागणी करण्यात आलेली नाही. अर्जदाराने स्वतः पुढील व्यवहार करण्यासाठी खात्यात पैसे जमा केले आहेत. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांना नोटीस प्राप्त होऊनही मंचात उपस्थित राहिले नाहीत. म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदार यांनी शेअर्स खरेदी विक्री व्यवहारासाठी गैरअर्जदार यांच्याकडे खाते उघडून त्यात रक्कम गुंतविली आहे, व गैरअर्जदार हे शेअर्स खरेदी विक्री करणारे अधिकृत दलाल आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत शेअर्सचे व्यवहार येत नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |