Maharashtra

Dhule

cc/11/213

Shri popat uttam Ahire - Complainant(s)

Versus

Aukta G P F. Nasik - Opp.Party(s)

S B Patil

23 Dec 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. cc/11/213
 
1. Shri popat uttam Ahire
At Post Navalnagar
...........Complainant(s)
Versus
1. Aukta G P F. Nasik
Satpur road Nasik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –  २१३/२०११


 

                                  तक्रार दाखल दिनांक – ०१/११/२०११


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २३/१२/२०१३


 

१) श्री पोपट उत्‍तम अहिरे


 

  वय ५५, धंदा – सेवानिवृत्‍त


 

   नवलनगर, ता.जि. धुळे.                         ................ तक्रारदार      


 

 विरुध्‍द


 

मा. सहाय्यक भविष्‍य निधी आयुक्‍त


 

एम आय डी सी सातपूर नाशिक.                      ............ जाबदेणार


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एस.बी. पाटील)


 

(जाबदेणार तर्फे – प्रतिनिधी श्री.एम.बी. राव)


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस. जैन)


 

 


 

सामनेवाला यांनी तक्रारदार यास स्‍वेच्‍छा निवृत्‍तीनंतर पेंशन रक्‍कम व आकारणी योग्‍य न करून सदोष सेवा दिली म्‍हणून तक्रारदारने प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे म.रा.वि.व.कं. धुळे विभागात वाहक म्‍हणून नोकरीला होते. तक्रारदारचा सेवेचा तपशील पुढीलप्रमाणे.


 

          (१) जन्‍म तारीख     - दि.०१-०६-१९५६


 

          (२) स्‍वेच्‍छा निवृत्‍ती   - दि.०२-०६-२००५


 

          (३) पेंशन पात्रता वय ५० वर्षे म्‍हणजे २-६-२००६ पासून     


 

          (४) भविष्‍य निधी आयुक्‍ताकडील पी.पी.ओ. क्र.६७४७५


 

 


 

२.   सामनेवाला यांनी तक्रारदारास (१) दि.०२/०६/२००६ रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्‍यावर हिशोबाने मिळणारी कमी दराची (रिडयुस) पेंशन दरमहा रू.९७७/- आकरणी करावयास हवी होती. (२) दि.०२/०६/२००६ ते दि.०२/१२/२०११ पावेतो एकूण महिने ६६ x ९७७ मासिक पेंशन एकूण रू.६४,४८२/- हिशोबाने दयावयास हवी होती.


 

    


 

३    तक्रारदार दि.०२/०६/२००६ पासून पेंशन मिळण्‍यास पात्र असल्‍याने व हा कालावधी दि.२६/०९/०८ पासून भांडवल परतावा बंद केल्‍याच्‍या परिपत्रका पुर्वीचा असल्‍याने पेंशनच्‍या १०० पट रक्‍कम भांडवल परतावा देणेबाबत तरतूद पी.पी.ओ. ६७४७५ मध्‍ये करावयास हवी होती.


 

 


 

४.   परंतु सामनेवाला यांनी पी.पी.ओ.६७४७५ नुसार तक्रारदारला दरमहा रू.१०६५/- प्रमाणे मात्र ०२/०६/२००६ पासून नव्‍हे तर दि.१६/०६/२०१० पासून एकूण फरक रू.१९,१७०/- दि.०२/१२/२०११ अखेर देत आहेत. त्‍यामुळे रू.६४,४८२/- वजा रू.१९,१७०/- = रू.४५,३१५/- सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयास हवे होते. तसेच पी.पी.ओ. ऑर्डर क्र.६७४७५ यात दुरूस्‍त करून  भांडवल परताव्‍याचा लाभ तक्रारदाराच्‍या मृत्‍युनंतर तक्रारदारचे वारसांना एकूण पेंशन रू.१०८५/- चे १०० पट म्‍हणून रू.१,०८,५००/- ची तरतूद करावयास हवी होती.


 

 


 

४.   तक्रारदारचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारने कमी दराने पेंशन मागीतली असता सामनेवाला यांनी पी.पी.ओ. पार्ट १ अनुक्रम ६ मध्‍ये सुपर अॅन्‍युएशन (५८ वर्षे पूर्ण) अशी मंजूरी दिलेली आहे. तक्रारदारने दि.१६/०६/२०१० म्‍हणजे ५४ वर्षे पूर्ण झालेनंतरची पेंशन मागीतली नसतांना सामनेवाला यांनी दि.१६/०६/२०१० पासूनची पेंशन मंजूर केली. म्‍हणून तक्रारदारने दि.२०/०६/२०११, व दि.१०/१०/२०११ रोजी त्‍याबाबत लिखीत पत्र, देवून मागणी केली तरी सामनेवाला यांनी पूर्तता केली नाही व दिशाभूल करणारे खोटे उत्‍तर दिले व सदोष सेवा दिली आहे.


 

 


 

५. शेवटी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रू.४५,३१५/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. १२% प्रमाणे व्‍याज, तसेच भांडवल परताव्‍याचा लाभात रू.१,०८,५००/- ची तरतुद पी.पी.ओ. ऑर्डर मध्‍ये करून मिळावी. आर्थिक, मानसिक व शारिरिक छळापोटी रू.५०००/- व तक्रार अर्जाचा खर्चापोटी रू.३०००/- मिळावे अशी मागणी केली आहे.


 

 


 

६. तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍टयार्थ नि.२ वर शपथपत्र व नि.४ वरील यादीसोबत नि.४/१ वर सामनेवाला यांना दिलेली नोटीस, नि.४/२ वर पेंशन फॉर्म, नि.४/३ वर पी.पी. ऑर्डर, नि.४/४ वर तक्रारदारचे पत्र, नि.४/५ वर सामनेवाला यांचे पत्र, नि.१३ वर लेखी युक्‍तीवाद, नि.१४ वर सामनेवाला यांचे पत्र तसेच इतर सभासदाचा पेंशन फॉर्म.  इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

७. सामनेवाला यांना आपले लेखी म्‍हणणे नि.७/२ वर दाखल केले आहे. त्‍यात त्‍यांनी दि.०७/०९/०७ चे परिपत्रक नं.३६१४४ नुसार Reduced Pension’ही वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर किंवा क्‍लेम फॉर्मची तारीख यापैकी जी नंतर असेल तेव्‍हा लागु होते. तक्रारदारतर्फे फॉर्म दि.१६/०६/२०१० रोजी मिळाला आहे. तक्रारदारचे फॉर्म मध्‍ये ‘option date’ (पेंशन प्रारंभ तारीख) दि.०४/०६/०५ नमुद आहे आणि त्‍याची जन्‍मतारीख दि.०१/०६/१९५६ आहे. म्‍हणजेच तो पेंशन प्रारंभ तारखेला ५० वर्षे वयापेक्षा कमी वयाचा असल्‍याने ती तारीख विचारात घेता येणार नाही. तक्रारदार भांडवल परताव्‍याच्‍या लाभासाठी पात्र नाही. कारण भांडवल परताव्‍याचा पर्याय दि.२६/०९/०८ रोजी गोठविण्‍यात आलेला आहे. तक्रारदार दि.११/११/०८ चे परिपत्रक नं.५९२५२ नुसार भांडवल परताव्‍याच्‍या लाभासाठी पात्र नाही. त्‍यामुळे तक्रारदारास लागु केलेली पेंशन रक्‍कम योग्‍य आहे.


 

 


 

८.   सामनेवाला यांनी आपले म्‍हणण्‍याचे पृष्‍टयार्थ नि.७ सोबत नि.७/३ व नि.७/४ वर नाशिक रिजनल ऑफिस यांचे पत्र, नि.७/६ वर पेंशन फॉर्म, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

     तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     सामनेवाला यांनी तक्रारदार यास दयावयाच्‍या


 

सेवेत त्रृटी केली आहे काय ?                                नाही


 

२.    आदेश काय ?                                 खालीलप्रमाणे विवेचन


 

९.   मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांची मुख्‍य तक्रार अशी आहे की, तक्रारदारने स्‍वेच्‍छा निवृत्‍ती घेतल्‍यानंतर सामनेवाला यांचेकडे कमी दराने पेंशन (Reduced Pension)मागितली असता त्‍यांनी पेंशनचा देतांना ५८ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतरची पेंशन मंजूर केली.


 

 


 

     याउलट सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे की, तक्रारदारची पेंशन फॉर्म वर जन्‍मतारीख दि.०१/०६/१९५६ नमुद आहे. त्‍यावरून तक्रारदार हे पेंशन फॉर्म भरतेवेळी ५० वर्षे वयापेक्षा कमी म्‍हणजे ४९ वर्षांचे होते म्‍हणून ते Reduced Pension’साठीपात्र नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांना ‘Superannuation Pension’ लागू करण्‍यात आलेली आहे.


 

 


 

     याबाबत आम्‍ही सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्‍यात त्‍यांनी नि.१८ सोबत  The Employees’ Pension Scheme’ चे परिपत्रक दाखल केले आहे. त्‍यातील ‘Agreement of Paragraphs’ मधील परिच्‍छेद १२(७) मध्‍ये पुढीलप्रमाणे नमुद आहे.


 

 


 

   


 

A member if he so desires, may be allowed to draw an early pension from a date earlier than 58 years of age but not earlier than 50 years of age. In such cases, the amount of pension shall be reduced at the rate of [four per cent], for every year the age falls short of 58 years.


 

 


 

     सामनेवाला यांनी वरील परिच्‍छेदाचा आधार घेवून त्‍यांना पेंशन फॉर्म दि.१६/०६/२०१० रोजी मिळालेला असल्‍याने त्‍या तारखेला तक्रारदारचे वय ५४ वर्षे असल्‍याने त्‍याने पेंशन फॉर्मवर नमुद केलेली (Reduced Pension) मंजूर न करता ‘Superannuation Pension’ तक्रारदारास लागू केल्‍याचे दिसून येते. मात्र तक्रारदारचे वकीलांनी युक्‍तीवादात व तक्रारीत असे नमूद केले आहे की त्‍यांनी सदर Pension form’ वर ‘option date’ (पेंशन प्रारंभ तारीख) दि.०४/०६/२००५ नमुद केलेली आहे. त्‍यामुळे त्‍या तारखेच्‍या हिशोबाने तक्रारदार ‘Reduce Pension’ ला पात्र आहेत. मात्र याबाबत सामनेवाला यांनी नि.७/५ वर दि.०९/११/२०११ चे पत्र दाखल केलेले आहे. सदर पत्र पाहता त्‍यावेळी तक्रारदारचे वय ४९ वर्षे असल्‍याने त्‍यांनी तक्रारदारचा फॉर्म नाकारला होता असे दिसून येते. त्‍यानंतर तक्रारदारने वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर परत अर्ज करणे आवश्‍यक होते. परंतु त्‍याने तसे न केल्‍याने सामनेवाला यांना सदर ‘Pension Form’ दि.१६/०६/२०१० रोजी प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांनी त्‍या दिवसापासून पेंशन लागु केलेली आहे. मात्र तक्रारदारने सदर फॉर्म कोणत्‍या तारखेला सामनेवाला यांचेकडे पाठवला याबाबत काहीच नमुद केलेले नसल्‍याने तसेच फॉर्मवरही पाठविल्‍याची तारीख नमुद केलेली नसल्‍याने सामनेवाला यांनी त्‍यांना फॉर्म प्राप्‍त झाल्‍याची तारीख दि.१६/०६/२०१० धरणे योग्‍य आहे.  याबाबत सामनेवाला यांनी नि.७/३ वर दिल्‍ली कार्यालयाचे पत्र दाखल केले. त्‍यात ‘In the absence of any option date, the date of receipt of claim application in Form 10-D may be taken as option date.’  असे नमूद आहे. तसेच सामनेवाला यांनी दि.११/११/२००८ रोजी तक्रारदार यास पत्र पाठवून तो भांडवल परताव्‍यास पात्र नसल्‍याचे कळविले आहे हे त्‍यांनी नि.७/४ वर दाखल केलेल्‍या पत्रावरून स्‍पष्‍ट होत आहे. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदारास ५८ वर्षे वयापासून लागू होणारी पेंशन मंजूर करून कोणतीही सेवेत कमतरता केलेली नाही, या मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

१०. मुद्दा क्र.२- वरील सर्व विवेचनावरून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२. दोन्‍ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.


 

 


 

 


 

धुळे.


 

दि.२३/१२/२०१३


 

 


 

           (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)                                                             सदस्‍य           सदस्‍या          अध्‍यक्षा                        


 

                 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.