Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/39

MR. VILASH MAHADEO RAUT - Complainant(s)

Versus

AU SMALL FINANCE BANK LIMITED, THE MANAGER - Opp.Party(s)

VIJAY SHINDE

18 Jun 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/39
( Date of Filing : 04 Feb 2019 )
 
1. MR. VILASH MAHADEO RAUT
HAVING RESIDING AT- EKNATH KOH HOUSE, AT-DIWALEGAON, SECTOR-14, CBD BELAPUR NAVI MUMBAI 400614
...........Complainant(s)
Versus
1. AU SMALL FINANCE BANK LIMITED, THE MANAGER
OFFICE NO. 603, 6TH FLOOR, MAYURESH CHAMBERS, PLOT NO. 60, SECTOR-11, CBD BELAPUR, NAVI MUMBAI 400614
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MR. Tryambak A. Thool MEMBER
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Jun 2019
Final Order / Judgement

सदरची तक्रार स्‍वीकृतीसाठी होती. त्‍याबाबतीत तक्रारदाराच्‍या वकीलांचा तक्रार दाखलपूर्व  युक्‍तीवाद ऐकला. तक्रारीतील कथन, त्‍याच प्रमाणे कागदपत्रांचे अवलोकन केले. वरीलप्रमाणे अवलोकन केल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले होते. ते कर्ज 48 मासिक हप्‍त्‍यात दरमहा रुपये 8,200/- प्रमाणे, पहिला हप्‍ता रुपये 4,179/- चा होता. सबब वरीलप्रमाणे वाहन कर्जाच्या हप्‍त्‍याची   रक्‍कम नियमित न भरल्‍याने तक्रारदारास सामनेवाले यांनी दिनांक १८/१२/२०१८ रोजी लेखी नोटीस देऊन थकित रक्‍कम रुपये 2,18,599/- भरण्‍याबाबत सूचित केले होते. तसे न केल्‍यास वाहनाचा ताबा घेऊन ते विक्रीस काढले जाईल असे सूचित केले होते. त्‍यानतंरही तक्रारदाराने नोटीसीची पूर्तता केली नाही म्‍हणून शेवटची नोटीस दिनांक 11/01/2019 रोजी दिली होती. सदर नोटीसीप्रमाणे 7 दिवसात थकित रक्‍कम रुपये 2,32,039/- जमा करुन वाहनाचा ताबा घ्‍यावा असे कळविले होते. तसेच, तसे न केल्‍यास वाहन क्रमांक एमएच-43-एएल-6112, मारुती इको जशी आहे तशा स्थितीत (As is where is basis) विकून टाकण्‍यात येईल असे तक्रारदारास कळविले होते. सदर दोन्‍ही नोटीसा तक्रारदाराने तक्रारीमध्‍ये दाखल केलेल्‍या आहेत. सबब तक्रारदाराने वाहन कर्जाचा हप्‍ता नियमितपणे भरला नसल्‍याची बाब वरील नोटीसीवरुन सिध्‍द होते. त्‍यामुळे वाहन कर्जाचा करारनामा या मंचापासून तक्रारदाराने दडवून ठेवलेला दिसतो. अशा परिस्थितीत सदर वाहनाचा कर्जाचा करार तक्रारीतील कथना विरुध्‍द जाईल म्‍हणूनच तो मंचापुढे दाखल केलेला नाही असे स्‍पष्‍ट अनुमान निघते. सबब सामनेवाले यांनी वाहन ताब्‍यात घेणे, त्‍यानंतर ते विक्रीपूर्वी तक्रारदाराकडून येणे असलेली रक्‍कम भरण्‍याबाबत नोटीसा देणे, तसे न केल्‍यास वाहन विकून टाकले जाईल याची नोटीस देणे, इत्‍यादी कर्तव्‍य पार पाडले असल्‍याने त्‍यांनी तक्रारदारास कोणत्‍याही प्रकारची सेवा सुविधा देणेकामी निष्काळजीपणा किंवा कुचराई केल्‍याचे अनुमान काढता येत नाही. सबब तक्रार निरर्थक असल्‍याने ती स्‍वीकारण्‍यापूर्वीच रद्द करण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही, म्‍हणून ती रद्द करण्‍यात आली.

 

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Tryambak A. Thool]
MEMBER
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.