आदेश:- (दि.18.08.2010)(द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) उपरोक्त कामातील मूळ तक्रार क्र.549/2000 मध्ये या मंचाने सामनेवाला यांनी तक्रारदारांची रक्कम व्याजासह द्यावी असे दि.11.10.2000 रोजी आदेश पारीत केले आहेत. सदरच्या आदेशित रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेली नसल्याने तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 खाली सदरचे वसुली अर्ज या मंचासमोर दाखल केलेले आहेत. या मंचाने सामनेवाला संस्थेच्या मिळकतीद्वारे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 खाली वसुली करणेचे आदेश पारीत करावेत अशी विनंती तक्रारदारांनी केलेली आहे. सदर मुद्दयावर तक्रारदार यांचे वकिलांचे युक्तिवाद या मंचाने ऐकून घेतलेले आहेत. तक्रारदारांनी खालीलप्रमाणे उल्लेख केलेली मिळकतीबाबत वसुली दाखला जिल्हाधिकारी, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग यांचेकडे पाठविणेची तक्रारदारांनी विनंती केली आहे. 1. मौजे आंबोली, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग येथील भुमापन नं.84इ/1/2 2. मौजे आंबोली, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग येथील भुमापन नं.84ब/3 3. मौजे सावंतवाडी येथील भुमापन नं.115अ/19अ/1 (2) उपरोक्त वर्णन केलेल्या मिळकतीची बाजारभावाने होणारी किंमत ही प्रस्तुत वसुली अर्जातील तक्रारदारांना एकूण देय असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रस्तुत वसुली अर्जाकरिता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 25 अन्वये वसुलीची कार्यवाही करणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. उपरोक्त वसुली अर्जातील अर्जदारांना सामनेवाला यांचेकडून देय असलेल्या रक्कमा मिळणेसाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग यांचेकडे वसुलीचा दाखला पाठविणेत येतो.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |