नि.16 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 25/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.20/05/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.31/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या मे.हंसराज ज्वेलर्स करिता प्रोप्रायटर श्री.किरण शांतीलाल परमार राहणार 1990, राधाकृष्ण नाका, रत्नागिरी, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. ऍटोबॅक अक्युमलेटॉर प्रा.लि., स.नं.36/1/1, ग्रीन फील्ड हॉटेल शेजारी, वडगांव खूर्द, सिंहगड रोड, पुणे 51. 2. सुमित एंटरप्रायझेस करिता प्रोप्रायटर श्री.कमलाकर पेटकर श्री अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.मांडवकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्रीमती सरदेसाई -: नि का ल प त्र :- प्रस्तुत प्रकरण आज रोजी तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्यान तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आले होते. सदर लोकअदालतीमध्ये तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ उपस्थित होते. तक्रारदार यांनी नि.14 वर पुरशीस दाखल केली आहे. सदस्यांचा निर्णय नि.15 वर दाखल आहे. तक्रारदार यांची पुरशीस अशी की, तक्रारीचा विषय असलेल्या बॅट-या मेंटेनन्स तक्रारदार यांनी पहावायाचा व वॉरन्टी नाही या अटीवर सामनेवाला यांनी बदलून संपूर्णपणे नविन बॅट-या तक्रारदार यांस दि.22/07/2010 दिलेल्या असल्याने तक्रारदार यांस प्रस्तुत तक्रार पुढे चालविणेची नाही. येणेप्रमाणे पुरशीस आहे. सदर पुरशीसच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतो. आदेश सदर नि.14 वरील पुरशीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 31/07/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |