::: न्यायनिर्णय :::
मंचाचे निर्णयान्वये उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. गैरअर्जदार यांनी, अर्जदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हा सेवानिवृत्त कर्मचारी असुन दिलेल्या पत्यावर ते दिनांक १९९३ पासुन वास्तव्याला आहेत. दिनांक ११.०६.१९९३ पासुन गैरअर्जदार यांचे ग्राहक असुन त्यांचा ग्राहक क्र. ४५००१०२८३३५९ असुन ते मागील २४ वर्षापासुन ते गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे. ते विज देयकाचा नियमीत भरणा करीत असुन गैरअर्जदार यांची ग्राहकांना योग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी आहे. गैरअर्जदारांनी अर्जदाराला माहे मे २०१७ चे दिनांक १५.०६.२०१७ रोजी ३४ युनिट चे विज देयक रक्कम रु. १६,८५०/- चे विज देयक पाठविले. सदरहु विज देयकावरील रक्कम बघीतल्यानंतर अर्जदाराला आश्चर्य झाले. अर्जदारांनी गैरअर्जदार यांना तात्काळ भेटुन विज देयकाबाबत विचारणा केली व सांगीतले कि, ३४ युनिट विज वापराचे विज देयक रक्कम रु. १६,८५०/- विज देयक आले असुन ऐवढ्या रक्कमेचे बिल कसे काय देण्यात आले. या बाबत गैरअर्जदाराने सांगीतले कि, आपले विद्युत मिटर हळुवारपणे फिरत असल्यामुळे जास्त रक्कमेचे विज देयक देण्यात आले आहे. गैरअर्जदाराच्या अशा उत्तरामुळे गैरअर्जदार हे अर्जदाराची लुट करीत असल्याबाबत लक्षात आले. अर्जदार यांनी दिनांक १९.०६.२०१७ रोजी विज मिटर मधिल अचुक रिडींग घेवुन अथवा विज मिटरची तपासणी करुन योग्य विज देयक देण्याबाबत सहकार्य करावे अथवा कोर्ट कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार दिली. विशेष असे कि, दिनांक २२.०५.२०१७ ते दिनांक १८.०६.२०१७ रोजी पर्यंत अर्जदार व त्यांचे कुंटूबिय दिल्ली येथे त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते.
३. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक १९.०६.२०१७ रोजी दिलेल्या लेखी तक्रारीबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दिनांक २७.०६.२०१७ रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या कार्यालयात जावुन गैरअर्जदार क्र. १ ची भेट घेतली तेव्हा त्यांनी दिनांक २७.०४.२०१७ रोजी अर्जदाराच्या विज मिटरची तपासणी केल्यावरुन हे अॅव्हरेज विज देयक दिलेले असल्याचे अर्जदाराला सांगीतले. तेव्हा अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना सांगीतले कि, तेव्हा मी तुम्हास नविन विज मिटर बसवुन देण्याबाबत सांगीतले होते, परंतु जुने विज मिटर बदलवुन नविन मिटर बसवुन दिले नाही. गैरअर्जदारांनी अर्जदार यांना सांगीतले कि, नविन विज मिटर उपलब्ध नसल्याने बसवुन दिलेले नाही. त्यामुळे तुम्हांस देण्यात आलेल्या विज देयकाची रक्कम भरावी लागेल अन्यथा विज जोडणी बंद करण्यात येईल अशी धमकी दिली. गैरअर्जदारांनी दिनांक २७.०४.२०१७ रोजी अर्जदाराला विज मिटरची तपासणी केल्यानंतर माहे मे २०१७ च्या दिनांक १५.०५.२०१७ रोजी दिलेल्या विज देयकामध्ये एकुण २९२ युनिट चे विज देयक रक्कम रु. २०४०/- चे विज देयक दिले. सदरहु विज देयकामध्ये आगाऊ विज आकारणी का केली नाही अशी विचारणा अर्जदाराने गैरअर्जदार यांना केली असता त्यांनी अशासकीय भाषेचा वापर करुन जास्त बोलाल तर विज पुरवठा खंडीत करण्याबाबत धमकी दिली. गैरअर्जदाराच्या अरेरावीपणामुळे अर्जदार धास्तावले असुन कोणत्याही क्षणी विज पुरवठा खंडीत करणार, या भितीने अर्जदाराने प्रस्तुत तक्रार विद्यमान मंचात दाखल केली.
४. अर्जदाराची तक्रार स्विकृत होवुन गैरअर्जदार क्र. १ व २ यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सदर प्रकरणात मंचात उपस्थित राहुन लेखी म्हणने दाखल करण्यास वेळ मागीतला. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सदर प्रकरणात अर्जदार यांनी केलेले कथन नाकबुल केले असुन गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी लेखी युक्तीवादात असे सांगीतले आहे कि, अर्जदाराचे दिनांक २७.०४.२०१७ रोजी विज मिटर तपासणी केली असता असे लक्षात आले कि, अर्जदाराकडील असलेले विज मिटर हे जुने झाले असुन त्याकरणाने ३६ टक्के संथगतीने चालत आहे. त्यामुळे अर्जदारास अयोग्य विज देयक दिले जात होते. सदर मौका चौकशी अहवाल गैरअर्जदार यांनी दस्ताचे यादीनुसार ब-१ वर दाखल केलेला आहे. अर्जदाराकडील विज मिटर संथ गतीने चालल्यामुळे मिटरची गती लक्षात घेता नियमाप्रमाणे असेंसमेंट करण्यास सुचना करण्यात आली व त्यानुसार अर्जदाराकडील विज भार व ३६ टक्के संथ गती लक्षात घेवुन कलम १२६ विज कायदा २००३ चा आधार घेवुन असेंसमेंट करण्यात आले व असेंसमेंट चे दिनांक १२.०५.२०१७ रोजीचे देयक १२,६००/- चे देण्यात आले. अर्जदारांने असेसमेंटचे चे देयक भरलेले नसल्यामुळे असेसमेंट देयकाची थकबाकी जोडुन अर्जदारास जुन २०१७ दिनांक १५.०६.२०१७ रोजीचे देयक रक्कम रु. १६,८५०/- विज देयक देण्यात आले. मौका चौकशी मध्ये अर्जदाराचे विज मिटर ३६ टक्के संथ गतीने फिरत असल्यामुळे विज मिटर बदविण्यास अर्जदारास सांगीतले असता अर्जदाराने विज मिटर बदलविण्यास साफ नकार दिला. विज मिटर संथ गतीने फिरत असल्यामुळे अर्जदार त्याचा अनुचित लाभ घेत होता. अर्जदाराने आपली नैतीक जबाबदारी न स्वीकारून विज देयकामध्ये सुट मिळण्याच्या हेतुने सदर तक्रार दाखल केली असल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
५. तक्रारदाराची तक्रार दस्ताऐवज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. १ व २ यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी विज पुरवठा कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार क्र. १ व २ अर्जदारास नुकसान भरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :-
६. गैरअर्जदार यांनी दिनांक २७.०४.२०१७ रोजी अर्जदाराचे विज मिटर तपासणी केली असता असे लक्षात आले कि, अर्जदाराकडील असलेले विज मिटर हे जुने झाले असुन त्याकारणाने ३६ टक्के संथगतीने चालत आहे. त्यामुळे अर्जदारास येणारे विज देयक दिले जात होते. सदर मौका चौकशी अहवाल गैरअर्जदार दस्ताचे यादीनुसार ब-१ वर दाखल केलेले आहे. अर्जदाराकडील विज मिटर संथ गतीने चालण्यामुळे मिटरची गती लक्षात घेता नियमाप्रमाणे असेंसमेंट करण्यास सुचना करण्यात आली व त्यानुसार अर्जदाराकडील विज भार व ३६ टक्के संथ गती लक्षात घेवुन कलम १२६ विज कायदा २००३ चा आधार घेवुन असेंसमेंट करण्यात आले व असेंसमेंट चे दिनांक १२.०५.२०१७ रोजीचे देयक १२,६००/- चे देण्यात आले. अर्जदारांने असेसमेंटचे चे देयक भरलेले नसल्यामुळे असेसमेंट देयकाची थकबाकी जोडुन अर्जदारास जुन २०१७ पर्यंतचे दिनांक १५.०६.२०१७ रोजी रक्कम रु. १६,८५०/- विज देयक देण्यात आले. मौका चौकशी मध्ये अर्जदाराचे विज मिटर ३६ टक्के संथ गतीने फिरत असल्यामुळे विज मिटर बदविण्यास अर्जदारास सांगीतले असता अर्जदाराने विज मिटर बदलविण्यास साफ नकार दिला. विज मिटर संथ गतीने फिरत असल्यामुळे अर्जदार त्याचा अनुचित लाभ घेत होता ही बाब दस्तावेजावरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने जास्तीचे विज देयक दिले नसल्याने गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नसुन विज देयकाची रक्कम नियमानुसार अदा करणे अर्जदारावर बंधनकारक आहे. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराचा जुना मीटर ३६% संथगतीने चालू असून अर्जदाराने सदर कालावधीत वापरलेल्या विजेसाठीचे देयक अर्जदाराने अदा न केल्याने अर्जदाराला सुधारित विज देयक देण्यात आले होते. सदर देयक नियमानुसार योग्य असल्याचे सिध्द झाल्याने मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :-
७. मुद्दा क्र. १ च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १०२/२०१७ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती वैद्य श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)