Maharashtra

Kolhapur

CC/17/125

Mahesh Harpaldas Nirankari - Complainant(s)

Versus

Asus Company Through Manager - Opp.Party(s)

Nitesh Hinduja

11 May 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/125
( Date of Filing : 18 Mar 2017 )
 
1. Mahesh Harpaldas Nirankari
38/1,Gandhinagar,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Asus Company Through Manager
102,4th floor,Supreme Chembers/17/18,Shaha Industrial Istate,Vira Desai Road,, Andheri West,
Mumbai
2. Asus Care,Compad System
476-E Ward,Shahu Road,Dkkhan Hotel,Vinous Corner,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv.N.P.Hinduja, Present
 
For the Opp. Party:
O.P.No.1-Adv.R.G.Shelake, Present
O.P.No.2-Ex-parte Order Passed.
 
Dated : 11 May 2018
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

द्वारा – मा. सौ सविता प्रकाश भोसले, अध्‍यक्षा

 

1.          प्रस्तुत अर्ज तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे दाखल केला आहे.

 

2.          तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे:-

            तक्रारदार हे गांधीनगर, कोल्‍हापूर येथील रहिवाशी आहेत. त्‍यांनी दि.23.04.2016 रोजी वि.प.यांच्‍या कंपनीचा मोबाईल संच खरेदी केला होता.  सदरच्‍या मोबाईलमध्‍ये Low Sound of Receiver  चा फॉल्‍ट येत होता.  तदनंतर प्रस्‍तुत मोबाईल दि.13.06.2016 रोजी तक्रारदाराने वि.प.क्र.2 यांचेकडे दरुस्‍तीसाठी दिला. वि.प.क्र.2 ने वरच्‍यावर दुरुस्‍त करुन तक्रारदाराला परत दिला.  तदनंतर तक्रारदाराने दि.04.10.2016 रोजी सदर मोबाईल पुन्‍हा खराब झालेने वि.प.क्र.2 यांचेकडे दुरुस्‍तीस दिला.  परंतु वि.प.क्र.2 यांनी प्रस्‍तुत मोबाईल वरच्‍यावर दुरुस्‍त केला.  परंतु तदनंतर सदर मोबाईलमध्‍ये पुन्‍हा तोच दोष येऊ लागल्‍याने तक्रारदार पुन्‍हा वि.प.क्र.2 कडे मोबाईल घेऊन गेले. परंतु वि.प.क्र.2 ने तक्रारदाराला सांगितले की, सदरचा फॉल्‍ट हा कंपनी फॉल्‍ट आहे आणि दुरुस्‍त होणार नाही. त्‍यानंतर तक्रारदाराने वि.प.क्र.1 यांना फोनवरुन तक्रार केली असता, त्‍यांनी मोबाईल वॉरंटी कालावधीत नसलेचे सांगितले व फोन दुरुस्‍त करुन दिला नाही.  सबब, वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेने तक्रारदाराने वि.प.कडून मोबार्इलची किंमत व नुकसानभरपाई परत मिळणेसाठी प्रस्‍तुत तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.

 

3.ोबाईल्‍मध्‍ये ोबाईल वरच्‍रूावर           तक्रारदार यांनी सदर कामी वि.प. यांचेकडून मोबाईल संचाची किंमत रक्‍कम रु.9,999/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-, तक्रारदाराचे गैरसोयीसाठी रक्‍कम रु.10,000/-, तक्रारदाराला दुरुस्‍तीस जाणेयेणेसाठी झाले खर्चाबाबात रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.10,000/- अशी एकूण रक्‍कम रु.49,999/- वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वसुल होऊन मिहावी. प्रस्‍तुत रक्‍कमेवर द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याज रक्‍कम वसुल होईपर्यंत वि.प.कडून मिळावे अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.

 

4.          तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी अॅफीडेव्‍हीट, निशाणी क्र.5 चे कागद यादीसोबत अ.क्र.1 ते 8 कडे अनुक्रमे मोबाईल खरेदीचे बील, मोबाईल दुरुस्‍तीचे जॉबकाड्र, तक्रारदाराने वि.प.क्र.1 ला पाठवले नोटीसची प्रत, नोटीसची पावती, वि.प.क्र.2 ला पाठवलेली नोटसची पावती, वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस पोहोचल्‍याच्‍या पोहोच पावत्‍या, पुराव्‍याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, लेखी युक्‍तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत. 

 

5.          प्रस्‍तुत कामी वि.प.क्र.1 यांनी पुरावा नाही आदेश रद्द करणेसाठी अर्ज, म्‍हणणे, वि.प.क्र.1 ने दाखल केलेले म्‍हणणे हाच वि.प.क्र.1 चा पुरावा शपथपत्र समजणेत यावा म्‍हणून पुरशिस, लेखी युक्‍तीवाद, वगैरे कागदपत्रे वि.प.क्र.1 यांनी दाखल केले आहेत. तर वि.प.क्र.2 विरुध्‍द या कामी एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.

 

6.          वि.प.क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्‍यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत. 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील कथने मान्‍य व कबूल नाहीत.
  2. तक्रारदाराचा तक्रार अर्ज या मंचात चालणेस पात्र नाही.
  3. तक्रारदाराचा मोबाईल सुस्थितीत असलेबाबत खात्री देऊन वि.प.क्र.2 ने त्‍यांचे समाधान करुन ही तक्रारदाराने पुरेसे कारण नसताना निव्‍वळ गोंधळ निर्माण करुन वि.प.क्र.2 ला बदनाम करणेचा दुष्‍ट हेतूने तक्रारदार वि.प.ची बदनामी करुन निघून गेले.
  4. वि.प.यांनी तक्रारदाराला काहीही प्रत्‍यक्ष अथवा फोनवरुन फटकारले, नाही परंतु तक्रारदाराचे मोबाईलमध्‍ये कोणताही दोष/बिघाड नसतानाही तक्रारदारचा मोबाईल्‍ दुरुस्‍त करुन त्‍यांचा मोबाईल सुस्थितीत असलेची खात्री करुन व्यवस्थित चालत असलेची खात्री करुन दिला होता.
  5. वि.प.यांनी तक्रारदाराला कधीही सदोष मोबाईल, निष्‍कृष्‍ठ दर्जाचा मोबाईल विक्री केलेला नव्‍हता किंवा दुरुस्‍तीस अथवा सेवा देणेस नकार दिला नव्‍हता व नाही. त्‍यामुळे वि.प.यांनी तक्रारदाराला कोणत्‍याही प्रकारची सेवात्रुटी दिलेली नाही.

 सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.       सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प.क्र.1 ने या कामी नोंदविलेले आहेत.

 

7.          वर नमुद तक्रारदार वि.प.ने दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प.हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय

2

वि.प.यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ?

होय

3

तक्रारदार वि.प.यांचेकडून मोबाईलची किंमत परत मिळणेस तसेच नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहत काय ?

होय

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमुद आदेशाप्रमाणे

 

 

विवेचन:-

8.     मुद्दा क्र.1 ते 4:- वर नमुद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍हीं होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने वि.प.यांचेकडून मोबार्इल संच खरेदी केला होता. प्रस्‍तुत मोबाईल संच खरेदी केलेचे बील दाखल केले आहे. तसेच सदर मोबाईल संच वि.प.यांचेकडून खरेदी केलेची बाब तक्रारदाराने नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत हे निर्वीवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आमहीं होकारार्थी दिले आहे.

 

9.          वर नमुद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍हीं होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराने दाखल केले मोबाईल दुरुस्‍तीचे जॉब कार्डवरुन तक्रारदारचा मोबाईल हो 23 एप्रिल, 2016 रोजी खरेदी केलेचे स्‍पष्‍ट होते. तसेच सदर मोबाईलला एक वर्षाची म्‍हणजेच दि.22.04.2017 पर्यंत वॉरंटी असलेचे स्‍पष्‍ट होते.  परंतु तक्रारदारचा मोबाईल संच हा दि.13.06.2016 रोजी व दि.04.10.2016 रोजी म्‍हणजेच वॉरंट कालावधीतच वि.प.क्र.2 कडे दुरुस्‍तीसाठी दिला होता ही बाब तक्रारदाराने दाखल केले जॉब कार्डवरुन स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारदाराने या कामी पुराव्‍याचे शपथपत्र ही दाखल केले आहे.  सबब, तक्रारदारचा नमुद मोबाईल संच हा वॉरंटी कालावधीतच वारंवार बिघडलेचे तसेच मोबाईल दोष पुर्ण असलेची बाब निर्वीवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द होत आहे.

 

10.         तसेच वि.प.यांनी तक्रारदाराला मोबाईल संच व्यवस्थित व काळजीपुर्वक दुरुस्‍त करुन दिला किंवा तो दोषपुर्ण नव्‍हताच हे सिध्‍द करणेसाठी वि.प.ने कोणताही कागदोपत्री अथवा तोंडी पुरावा दाखल केलेला नाही.

           

11.         सबब, या कामी तक्रारदार हे वि.प.यांचेकडून प्रस्‍तुत मोबाईलची किंमत रु.9,999/- तसेच मानसिक त्रास रक्‍कम रु.5,000/-, अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.3,000/- गैरसोय व इतर नुकसान म्‍हणून रक्‍कम रु.2,000/- वि.प.कडून वसुल होऊन मिळणेस तसेच रक्‍कम रु.9,999/- वर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्याजदराने वुसल होऊन मिळणेस वि.प. पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 

 

12.         सबब, प्रस्‍तुत कामी, आम्‍हीं पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहेत.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत आला.
  2. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदाराला वादातील मोबाईल संचाची किंमत रक्‍कम रु.9,999/- (अक्षरी रक्‍कम रुपये नऊ हजार नऊशे नव्‍यानऊ मात्र) अदा करावेत. प्रस्‍तुत रक्‍कमेवर वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज अदा करावे.
  3. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) तसेच अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये तीन हजार मात्र) व गैरसोयीपोटी रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन हजार मात्र) वि.प.क्र.1 व 2 वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या ने तक्रारदाराला अदा करावेत.
  4. वर नमुद आदेशाची पुर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झालेपासून 45 दिवसांत करावी.
  5. विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
  6. आदेशाच्‍या सत्‍यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.
 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.