जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 322/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 07/03/2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 20/06/2013
सौ. पुनम रमेशचंद्र शुक्ला
उ.व. 30 वर्ष, धंदा – घरकाम,
रा. सौम्य अपार्टमेंट, 7, साने गुरुजी, शिवराम नगर,
जळगांव, ता.जि. जळगांव. ...... तक्रारदार.
विरुध्द
1. आस्था महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि..
कार्यालय 186, पहिला माळा, गोलाणी मार्केट, जळगांव.
स्नेहसदन, ब्लॉक नं. 1, महाबळ रिक्षा स्टॉप जवळ,
जळगांव, ता.जि. जळगांव.
इच्छा सदन प्लॉट नं. 77, म्युन्सीपल कॉलनी समोर,
रामानंद नगर, जळगांव, ता.जि. जळगांव
(समन्स अध्यक्ष / चेअरमन सौ.सुवर्णा योगेश मोरे
यांचे वर बजावण्यात यावे)
2. सौ. सुवर्णा योगेश मोरे, चेअरमन
उ.व. सज्ञान, धंदा – नोकरी,
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 4, ब्लॉक नं. 1
एलआयसी कॉलनी, जळगांव, ता.जि. जळगांव
3. सौ. सरीता वसंतराव मोरे, व्हाईस चेअरमन
उ.व. सज्ञान, धंदा – नोकरी,
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 4, ब्लॉक नं. 1,
एलआयसी कॉलनी, जळगांव, ता.जि. जळगांव
4. सौ. कमल पितांबर खडके, संचालिका
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. एस.एम.आय.टी. कॉलेज रोड,
प्लॉट नं. 4 ब, जळगांव, ता.जि. जळगांव
5. सौ. कांचन शरद पाटील, संचालिका
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 3, ब्लॉक नं. 4,
एलआयसी कॉलनी, जळगांव ता.जि. जळगांव
6. सौ. सुनिता अरुण महाजन, संचालिका,
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम
रा.मु.पो. आसोदा, ता.जि. जळगांव
7. सौ. कांचन संजय अहिरराव, संचालिका,
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 5,
एलआयसी कॉलनी, जळगांव ता.जि. जळगांव
8. सौ. सुलोचना बाळु पाटील, संचालिका, (वगळले)
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. दौलत नगर, मोहाडी रोड, पाण्याचे टाकी
जवळ, प्लॉट नं. 149/2, जळगांव
9. सौ. पुष्पा ज्ञानदेव पाटील, संचालिका,
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 3, ब्लॉक नं. 2,
एलआयसी कॉलनी, जळगांव ता.जि. जळगांव
10. सौ. आरती नरेंद्र देशमुख, संचालिका
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 5,
एलआयसी कॉलनी, जळगांव ता.जि. जळगांव
11. सौ. मालीनी रविंद्र तायडे, संचालिका,
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 3,
एलआयसी कॉलनी, जळगांव ता.जि. जळगांव
12. सौ. नंदा शाम पवार, संचालिका,
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम
रा. मधुबन अपार्टमेंट, बिल्डींग नंबर 5, ब्लॉक नं. 2,
एलआयसी कॉलनी, जळगांव ता.जि. जळगांव. ..... विरुध्द पक्ष
कोरम –
श्री. विश्वास दौ. ढवळे अध्यक्ष.
श्रीमती. पुनम मलिक सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.देवप्रसाद एस.पाटील.
सामनेवाला तर्फे एकतर्फा .
नि का ल प त्र
श्री. विश्वास दौ. ढवळे अध्यक्ष ः - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव मध्ये गुंतवलेली रक्कम मागणी करुन ही परत दिली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष आस्था महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. जळगांव. (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
पावती/बचत खाते क्रमांक | ठेव रक्कम | ठेव दिनांक | देय रक्कम | देय दिनांक |
794 | 15,000 | 24/01/07 | 17,112 | 24/02/08 |
793 | 15,000 | 24/01/07 | 17,112 | 24/02/08 |
177 | 17,000 | 15/02/07 | 19,486 | 15/03/08 |
178 | 17,000 | 15/02/07 | 19,486 | 15/03/08 |
113 | 15,000 | 04/02/06 | 17,112 | 04/03/07 |
114 | 15,000 | 04/02/06 | 17,112 | 04/03/07 |
3. तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्कमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता रक्कमा देण्यास त्यांनी नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन मुदतठेव व बचत खात्यातील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 07 व 09 ते 12 यांना नोटीसची बजावणी झालेली आहे. त्यांनी हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी आमच्या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
2 आदेश काय? खालीलप्रमाणे.
विवेचन
6. मुद्या क्र.1 – प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावती/बचत खात्यातील रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 –– तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेव/बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम आस्था महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. जळगांव व संचालक मंडळ यांचेकडुन वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
8. वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष आस्था महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. जळगांव यांचेकडुन पतसंस्थेत जमा असलेली व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. पतसंस्थेच्या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
9. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरुध्द पक्ष आस्था महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. जळगांव यांनी तक्रारदार यांना वरील निकालपत्राच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमेवर देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
(3) विरुध्द पक्ष आस्था महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. जळगांव यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व दावा खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
(4) वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्कमेपैकी दिलेल्या रक्कमा वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(श्री. विश्वास दौ. ढवळे) (श्रीमती. पुनम मलिक)
अध्यक्ष सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव