Maharashtra

Wardha

CC/86/2012

PRABHAKAR RAJERAM VAIRAGADE - Complainant(s)

Versus

ASSTT.ENGINEER,MSEDC - Opp.Party(s)

SAU.DESHMUKH

19 Nov 2013

ORDER

DISTT.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHVANT COLLEGE
WARDHA 442001
MAHARASHTRA (PH.NO.0752-243550)
 
Complaint Case No. CC/86/2012
 
1. PRABHAKAR RAJERAM VAIRAGADE
KORA,SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ASSTT.ENGINEER,MSEDC
SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
2. EXUCUTIVE ENGINEER,MSEDC
HINGANGHAT
WARDHA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Milind B.Pawar PRESIDENT
 HONABLE MR. Shri Milind R. Kedar MEMBER
 
PRESENT:SAU.DESHMUKH, Advocate for the Complainant 1
 A.M.Purekar, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

निकालपत्र
( पारीत दिनांक :19/11/2013 )
( द्वारा अध्‍यक्ष(प्रभारी) श्री.मिलींद भि.पवार(हिरुगडे) )
01.      अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.
1.   गैरअर्जदार यांच्‍या मुळे अर्जदाराचे मृत बैलाची किंमत     
   रु.75,000/- गैरअर्जदार यांनी द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.10,000/- व प्रकरणाचा         
   खर्च रु.5,000/-
अर्जदाराच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे आहे.
 
अर्जदाराने सदर तक्रार अर्जामध्‍ये नमुद केले आहे की, त्‍याने शेती कामाकरीता 4 बैल, 1 गाय व 1 कालवड खरेदी केले होते. त्‍यांची मौजे सातघरी येथे 1 हेक्‍टर 48 आर जमीन आहे. सदर शेतावरुन गैरअर्जदार यांची डिपीची लाईन गेलेली आहे. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. दिनांक 16/11/2011 रोजी अर्जदार आपले बैलजोडी घेवुन शेतात गेले असता बैल जोडीतील एका बैलाला तुटलेल्‍या विजेच्‍या तारांचा स्‍पर्श होवुन तो घटना स्‍थळी मरण पावला. अर्जदाराने सदर घटनेची माहिती त्‍वरीत गैरअर्जदार यांना दिली. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍या कनिष्‍ठ अभियंता यांच्‍याकडे नुकसान भरपाईकरिता अर्ज दाखल केला व सदर अर्जाची एक प्रत गिरड पोलीस स्‍टेशन यांना दिली. पोलीसांनी घटनेची नोंद घेवुन घटनास्‍थळाचा पंचनामा केला तसेच पशुवैदयकीय अधिकारी यांनी बैलाचे शवविच्‍छेदन केले व त्‍यात सदर जनावरे ही विद्युत करंट लागुन मृत्‍यु पावल्‍याचे व त्‍यांची किंमत रु.40 ते 50,000/- असल्‍याचे नमुद केले.
      अर्जदाराने नमुद केले आहे की, गैरअर्जदार यांनी सदर घटनेची चौकशी करण्‍याकरीता विद्युत निरीक्षकाची नेमणुक केली व त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये सदरच्‍या चुकीकरीता गैरअर्जदारच जबाबदार असल्‍यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाई देण्‍यात यावी अशी सुचना केली व त्‍यामुळे बैलाची किंमत रु.75,000 च्‍या नुकसान भरपाईची मागणी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या सदर मागणीची दिनांक 03/07/2012 पर्यंत काहीच दखल घेतली नाही व त्‍यानंतर गैरअर्जदार यांनी फक्‍त रु.7,500/- मंजुर करण्‍यात आल्‍याचे अर्जदाराच्‍या लक्षात आले. गैरअर्जदार यांनीच अर्जदार यांना नुकसान भरपाई म्‍हणुन रु.75,000/- द्यावी अशी मागणी असतांना फक्‍त रु.7,500/- मंजुर करण्‍यात आले ही बाब म्‍हणजे अर्जदार यांची अहवेलनाच आहे. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रृटी असुन त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचामध्‍ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
सदर तक्रार पंजीबध्‍द करुन गैरअर्जदार क्र.1 व 3 यांना नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार हे आपल्‍या अधिवक्‍त्‍यामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी जवाब दाखल केला.
02. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी आपला लेखी जवाबामध्‍ये गैरअर्जदार यांनी तक्रारीतील विपरित विधाने/आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 ते 3 चे ग्राहक नाही तर ते महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित हिंगणघाट यांचे ग्राहक आहे हे कबूल केले आहे. त्‍यामुळे अर्जदाराची प्रस्‍तुतची तक्रार ही चुकीच्‍या पक्षकारांविरुध्‍द दाखल केल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी असा बचावात्‍मक पवित्रा घेतला आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी पुढे नमुद केले आहे की, अर्जदाराच्‍या शेतातुन गेलेली विद्युत वाहिनी अचानकपणे तुटल्‍यामुळे खाली पडुन तिचा संपर्क न्‍युट्रल वाहिनीशी आला व त्‍यामुळे अपघात होवुन अर्जदाराचा बैलाचा मृत्‍यु झाला. सदर बाब हि घडवुन आणली नसुन अपघात आहे तसेच अर्जदार यांनीच त्‍यांच्‍या बैलाला विज तार सांभाळुन न्‍यावयास पाहिजे होते, परंतु त्‍याने तसे केले नाही हा अर्जदार यांचाच निष्‍काळजीपणा आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यांनी नियमानुसार अर्जदाराला झालेल्‍या नुकसान भरपाईची रक्‍कम म्‍हणुन रु.7,500/- मंजुर करुन सदर रक्‍कम कायदेशीर बाबींची पुर्तता करुन अर्जदारास घेवुन जाण्‍यास कळविण्‍यात आले होते, परंतु अर्जदार यांनी सदर रक्‍कम घेण्‍यास नकार दिला आहे.     गैरअर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यांच्‍याकडुन सेवे मध्‍ये कोणतीही टाळाटाळ किंवा दिरंगाई करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे वि.मंचास केलेली आहे.
03. अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत, अर्जदाराचे नि.2 कडे नुकसान भरपाईसाठी केलेला अर्जाची प्रत, घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍ट मार्टन रिपोर्ट, गैरअर्जदार यांनी दिलेले पत्र, विद्युत निरिक्षकाचा अहवाल, गैरअर्जदार यांचे मध्‍ये झालेला पत्रव्‍यवहार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पत्र व फोटो इत्‍यादी एकुण 11 दस्‍तावेंजांच्‍या छायांकीत प्रती लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांनी नि.15 कडे त्‍यांचा लेखी जवाब शपथपत्रावर दाखल केला आहे. पुराव्‍यासाठी काहीही कागदपत्रे दाखल केलेली नाही.
      अर्जदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे तसेच गैरअर्जदार यांचा लेखी जवाब व उभयंताच्‍या वकीलांचा युक्तिवाद यावरुन वि.मंचासमक्ष खालील मुद्द (Points of Consideration) विचारार्थ निघाले
मुद्दे                                              उत्‍तर
1) अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होतो काय ?       होय.
2) अर्जदाराने सदर जनावरांचे मृत्‍यु गैरअर्जदार
    यांचे विद्युत प्रवाहाने झाला आहे हे सिध्‍द
    केले आहे काय                               होय.
3)      अर्जदार, गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे कडुन नुकसान
 भरपाई मिळण्‍यास पात्र आहे काय ?                  होय.
4) काय आदेश                             अंतिम आदेशावरुन
-: कारणे व निष्‍कर्ष :-
 
मुद्दा क्र.1 -- अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रारीत तो कास्‍तकार असुन त्‍याचे जवळ शेतातील कामाकरीता चार बैल, एक गाय व 1 कालवड होती हे नमुद केले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 ते 3 चे ग्राहक नसुन ते महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित हिंगणघाट यांचे ग्राहक आहे असे कबुल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे सदर विज वितरण कंपनीचे अधिकारी आहे. कार्यालयाचे कोणत्‍याही कृतीस कार्यालय प्रमुख जबाबदार असते हे निर्विवाद सत्‍य आहे, त्‍यामुळे तो विज कंपनीचा ग्राहक ठरतो हे मान्‍य केल्‍यामुळे पर्यायाने गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचा सुध्‍दा अर्जदार ग्राहक ठरतो. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी केवळ आपली जबाबदारी टाळण्‍यासाठी अर्जदार हा त्‍यांचा ग्राहक नाही हा बचाव तथ्‍यहीन ठरतो. त्‍यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचा ग्राहक ठरतो म्‍हणुन मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
मुद्दा क्र.2 -- अर्जदाराने प्रस्‍तुतची तक्रार ही शपथपत्रावर आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रारी सोबत दाखल केलेली कागदपत्रांचे अवलोकन केले असता, अर्जदाराचा बैल हा गैरअर्जदार यांचे विजेच्‍या तारेचा शॉक लागुन दिनांक 16/11/2011 रोजी मृत पावला आहे हे नि.2/1 वरील पोलिसांचे घटना स्‍थळ पंचानाम्‍यावरुन दिसुन येते. तसेच नि.2/2 वरील पशुवैदयकीय अधिकारी यांनी शवविच्‍छेदन अहवालात सुध्‍दा सदर जनावराचे मृत्‍युचे कारण विजेचा शॉक असे नमुद केले आहे. यावरुन विजेचे तारेच्‍या शॉकनेच अर्जदाराच्‍या बैलाचा मृत्‍यु झाला आहे हे स्‍पष्‍ट दिसुन येते.
       विद्युत निरीक्षक यांचे नि.2/6 वरील दिनांक 16/12/2011 चे पत्राचे अवलोकन केले असता सदर विजेचा शॉक हा गैरअर्जदार यांचे विज वाहक तार लुज झाल्‍यामुळे स्‍पार्कींग होवुन तार तुटून पडल्‍यामुळे अपघात झाला आहे असे स्‍पष्‍ट नमुद केले आहे व त्‍याचा संपर्क बैलाला झाला व त्‍याला जबर शॉक बसुन मरण पावला. यावरुन सदर गैरअर्जदारां विरुध्‍द विद्युत निरीक्षकांनीच सदर अनुमान काढला आहे ही बाब अत्‍यंत महत्‍वाची ठरते. कारण जर गैरअर्जदार यांचे विजवाहक तार जर लुज झाली नसती तर ती तुटली नसती व अपघात झाला नसता ही बाब सुर्यप्रकाशाईतकी स्‍पष्‍ट आहे. याचा अर्थ अपघातास गैरअर्जदार हेच पुर्णतः जबाबदार आहेत हे सिध्‍द होते. विद्युद तारांची योग्‍य देखभाल व त्‍यांची दुरुस्‍ती वेळेवर करणे, त्‍यांची योग्‍य ती खबरदारी घेणे ही गैरअर्जदार क्र.1 ते 3 ची प्रामुख्‍याने काम आहे. सदर काम सुरळीत पार पाडावे यासाठी गैरअर्जदार क्र.1 ते 3 सारखे वेगवेगळे अधिकारी व विभाग निर्माण केलेले आहेत व त्‍यांचे मुख्‍यालय हे एकच आहे. परंतु गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी आपली जबाबदारी टाळण्‍यासाठी सदर घटनेशी आपला संबंध नाही व अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे. सदर बैलाचा मृत्‍यु हा हाय होल्‍टेज विजेच्‍या शॉकने झाल्‍याचे दिसुन येते. त्‍यामुळे सदर जनावरांच्‍या मृत्‍युचे कारण हे गैरअर्जदार यांच्‍या विद्युत तारा तुटून शॉक लागल्‍याने झाला हे सिध्‍द होते, म्‍हणुन मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
मुद्दा क्र.3 -- वर नमुद मुद्दा क्र.2 मध्‍ये अर्जदाराचा बैल हे गैरअर्जदार यांचे विद्दुत तारेच्‍या शॉकने मरण पावले हे सिध्‍द होत आहे हे नमुद केले आहे. सदर जनावरांचे मृत्‍यु नंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍या कडे नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता अर्ज केला हे नि.क्र.2/3 वरील कागदपत्रावरुन दिसुन येते. त्‍यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांचे कार्यालया मार्फत याबाबत कार्यवाही सुरु करण्‍यात आली हे नि.क्र.2/4 वरुन दिसुन येते.
      सदर अपघातानंतर योग्‍य ती चौकशी पुर्ण झाल्‍यानंतर गैरअर्जदार यांचे विद्युत निरीक्षक यांनी दिनांक 16/12/2011 रोजी कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवुन सदर अपघाताची जबाबदारी स्विकारुन अर्जदार यांना नुकसान भरपाई मंजुर करावी असे कळविले व ही बाब नि.क्र.2/6 वरील पत्रावरुन दिसुन येते. त्‍यानंतर गैरअर्जदार यांनी नि.क्र.2/7 दिनांक 05/06/2012 रोजीच्‍या पत्रान्‍वये बैलाची फक्‍त रु.7,500/- एवढीच नुकसान भरपाई मंजुर केली. सदर नुकसान भरपाई कुठल्‍या आधारे काढण्‍यात आली याचा सविस्‍तर खुलासा गैरअर्जदार यांनी केला नाही. आपले लेखी जबाबतसुध्‍दा गैरअर्जदार यांनी रु.7,500/- देण्‍यास तयारी दर्शविली. मात्र सदर नुकसान भरपाईची रक्‍कम रु.7,500/- कशाचे आधारे काढली हे दर्शविणारा एकही पुरावा या कामी दाखल केला नाही व अल्‍पशी रक्‍कम देण्‍याचा प्रयत्‍न करुन आपली जबाबदारी झटकण्‍याचा व अर्जदाराची एकप्रकारे कुचेष्‍ठा करण्‍याचा प्रयत्‍न गैरअर्जदार यांनी केला आहे असे दिसुन येते.
      गैरअर्जदार यांनी एके ठिकाणी अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचा ग्राहक नाही असे कथन करतात तर एके ठिकाणी तो विज वितरण कंपनीचा ग्राहक आहे असे कबुल करतात. म्‍हणजे गैरअर्जदार हेच स्‍वतःचे म्‍हणण्‍यावर ठाम नाही असे दिसुन येते.   अर्जदार यांनी आपल्‍या मागणीच्‍या पुष्‍ठयर्थ मा.राज्‍य ग्राहक आयोग, कर्नाटक यांचा 2012(3)CPR 121, Ganga Patil……V/s………Gescom and Anr., decided on 7/12/2011. हया न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
     नि.क्र.2/2 वरील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती समुद्रपुर यांनी शवविच्‍छेदन अहवालात नमुद केले आहे की, सदर मृत बैलाची किंमत रु.40,000/- ते 50,000/- होती. यावरुन मृत बैलाची किंमत रु.40,000/- ते 50,000/- हे कागदोपत्री पुराव्‍यास‍हित सिध्‍द झाले आहे व सदर रक्‍कम मिळण्‍यास अर्जदार पात्र आहे. याबाबत नुकतेच मा.राष्‍ट्रीय आयोग नवी दिल्‍ली यांनी, III(2013)CPJ 377 (NC), Jogender………..V/s……… U.H.B.V.N.L. & ors, decided on 22/5/2013  ला आदेश पारीत केला व त्‍यान नमुद केले आहे की,
        “ Consumer Protection Act,1986 – Section 2(1)(g), 14(1)(d), 21(b)---Electrocution---Death of two buffaloes--- Old electric wires fell down—Loss suffered—Compensation---District Forum awarded compensation @ Rs.1 lakh--- State Commission reduced compensation amount to Rs.50,000/- Hence revision—Veterinary Surgeon rightly estimated cost of one buffalo @ Rs.50,000/- Order of District Forum was based on affidavit evidence of petitioner and report of Veterinary Surgeon—Impugned order modifying cost of buffaloes set aside.”
    या प्रकरणात निवाडा देतांना विजेचे ता-याच्‍या धक्‍याने जनावरांचा मृत्‍यु झाल्‍याचे उपलब्‍ध पुरावा व पशुधन विकास अधिकारी यांनी दिलेली किंमत ही योग्‍य व कायदेशीर आहे व त्‍याप्रमाणे किंमत मिळण्‍यास अर्जदार पात्र आहे असे स्‍पष्‍ट नमुद केले आहे. सदर न्‍यायनिवाडा सदर प्रकरणांशी पुर्णपणे लागु पडतो त्‍यामुळे सदर निवाडयांचा आधार घेता व प्रस्‍तुत प्रकरणातील नि.क्र.2/2 वरील पशुधन अधिकारी समुद्रपुर यांनी शव विच्‍छेदन अहवालात नमुद केले प्रमाणे मृत बैलाची किंमत रु. 50,000/- मिळण्‍यास अर्जदार पात्र आहे असे वि.मंचाचे स्‍पष्‍ट मत झाले आहे.
     गैरअर्जदार यांच्‍या विजेच्‍या तारेच्‍या शॉक मुळेच अर्जदारांचा बैल मरण पावला याची जबाबदारी स्विकारुन गैरअर्जदार यांनी फक्‍त रु.7500/- नुकसान भरपाई मंजुर केली होते. परंतु त्‍यापुर्वी केवळ गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वेळ काढुपणा केला त्‍यामुळे अर्जदाराला वारंवार गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे कडे चकरा माराव्‍या लागल्‍या, लेखी अर्ज दयावे लागले तरीही गैरअर्जदार यांनी त्‍यास दाद दिली नाही. अर्जदाराने अखिल भारतीय ग्राहक पंचायत मार्फत नोटीसही दिला तरीही गैरअर्जदार यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले एवढेच नव्‍हे तर नोटीसला साधे उत्‍तरही देण्‍याचे सौजन्‍य दाखविले नाही, यावरुन गैरअर्जदार यांचे ग्राहकाबद्दल किती नकारात्‍मक मानसिकता असते हे दिसुन येते त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणात गैरअर्जदार यांनी अर्जदाराला दुषित व त्रुटीची सेवा दिली आहे ही बाब सिध्‍द होते व त्‍यामुळे गैरअर्जदाराच्‍या दुषित व त्रुटीची सेवेमुळे अर्जदाराला झालेल्‍या मानसीक व शारीरीक त्रासापोटी रु.2500/- व तक्रारीचा खर्च म्‍हणुन रु.1500/-मिळण्‍यास अर्जदार पात्र आहे असे वि.मचाचे मत आहे.
    एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्‍कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍यात न्‍युनता केली असल्‍याचे निर्णयाप्रत वि.मंच आलेले असल्‍याने पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.            
               // अंतिम आदेश //
1)      अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.
2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्‍तीकरीत्‍या  
   अर्जदाराला त्‍याच्‍या मृत बैलाची एकुण किंमत रु.50,000/-
   (रु.पन्‍नास हजार फक्‍त) अदा करावे.
3)     अर्जदार यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल
   गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी अर्जदारास रुपये 2,500/- ( रुपये
   दोन हजार पाचशे फक्‍त) व तक्रारीचा खर्चरुपये 2000/- (रुपये
   दोन हजार फक्‍त) द्यावे.   
4)     गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झालेल्‍या दिनांकापासुन 30 दिवसांच्‍या आंत करावे. अन्‍यथा 
   उपरोक्‍त कलम 2 मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे देय रकमेवर तक्रार  
   दाखल दिनांक म्‍हणजेच 21/09/2012 पासुन ते पुर्ण रक्‍कम   
   प्राप्‍त होईपर्यंत दरसाल दरशेकडा 10 टक्‍के दराने व्‍याज द्यावे
  लागेल याची नोंद घ्‍यावी. 
5)      मा.सदस्‍यांसाठीच्‍या फाईल्‍स संबंधीतांनी परत
    घेवुन जाव्‍यात.
6)      निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्‍तव व
    उचित कार्यवाहीकरीता पाठविण्‍यात याव्‍यात. 
            
 
 
[HON'ABLE MR. Milind B.Pawar]
PRESIDENT
 
[HONABLE MR. Shri Milind R. Kedar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.