Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/15

Shri Nandanram Kawdu Nimbone - Complainant(s)

Versus

Asstt. Engineer, M.S. Electricity Distrubution Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Bhedre , Chichbankar

15 Sep 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/15
 
1. Shri Nandanram Kawdu Nimbone
Nayakund, Parseoni
Nagpur
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. Asstt. Engineer, M.S. Electricity Distrubution Co. Ltd.
Parseoni Office, Parseoni
Nagpur
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rohini Kundle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Alka Patel MEMBER
 HON'ABLE MS. Geeta Badwaik MEMBER
 
PRESENT:Adv. Bhedre , Chichbankar, Advocate for the Complainant 1
 Adv. Shilpa Dave, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

 ( आदेश पारित द्वारा- श्रीमती अलका पटेल , मा.सदस्‍या )       


 

                  आदेश  


 

 (पारीत दिनांक –15 सप्‍टेंबर,  2012 )


 

 


 

      तक्रारकर्त्‍याची प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत विरुध्‍द पक्षाचे सेवेतील त्रृटी बाबत या मंचासमारे दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे.


 

      तक्रारदाराच्‍या मालकीचे मौजा-नयाकुंड, पटवारी हलका नंबर-21, भु.मा.क्रं. 149, 1 हेक्‍टर 42 आर ही शेतजमीन असुन शेतात विहीर देखिल आहे. तक्रारदाराने विहीरीवर मोटरपंप बसविण्‍याकरिता विज पुरवठयाची आवश्‍यकता असल्‍याने दिनांक 23/2/2009 रोजी विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात रुपये 5,550/- डिमांड ड्राफ्टद्वारे भरल्‍यानतंर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कोटेशन व दिनांक 25/3/2009 रोजी कंपलीशन आणि टेस्‍ट रिपोर्ट दिला. परंतु त्‍यांनतर तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही व बरेचवेळा संपर्क करुनही तक्रारदाराचे विहिरीवर विज पुरवठा दिला नाही. म्‍हणुन तक्रारकर्त्‍याने दिनांक 15/3/2011 व 6/4/2011  रोजी विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात नुकसान भरपाई मिळण्‍याबाबत अर्ज सादर केले परंतु विरुध्‍द पक्षाने विज पुरवठा दिला नाही म्‍हणुन तक्रारकर्त्‍याने ही तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे विहीरीवर विज पुरवठा करुन द्यावा मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा अशी मागणी केली. 


 

तक्रारकर्त्‍याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्‍तऐवजयादीनुसार एकुण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्‍यात 7/12 ची प्रत, गाव नमुना, पैसे भरल्‍याची पावती, कंपलीशन व टेस्‍ट रिपोर्ट, विरुध्‍द पक्षांना पाठविलेल्‍या पत्राची प्रत इतर कागदपत्रे दाखल केले. लेखी युक्तिवाद दाखल केला.


 

सदर दाखल झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त होऊन विरुध्‍द पक्ष हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.


 

विरुध्‍द पक्ष आपले लेखी जवाबात तक्रारकर्त्‍याची वीज पुरवठा व रक्‍कम जमा केल्‍याची बाब मान्‍य करतात व तक्रारकर्त्‍यास चाचणी पत्र दिल्‍याची बाब देखिल मान्‍य केली आहे परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍यासोबत मीटन लावून वीज पुरवठा करण्‍याकरिता मीटर बॉक्‍स/ पेटी मधील मेन स्विच किटकॅट कॅपॅसीटर्स व अर्थीग लावले आहे असे पत्रात नमुद केले असले तरी प्रत्‍यक्षात तक्रारकर्त्‍याने हे साहित्‍य लावलेच नव्‍हते.


 

विरुध्‍द पक्ष पुढे नमुद करतात की, तक्रारकर्त्‍याचे दिनांक 15/3/2011 चे पत्रानुसार विरुध्‍द पक्षाने पोल उभे केले व ते खाली कोसळले असे नमुद केले आहे व त्‍यावरील तार चोरीस जात असल्‍याचे ही कळविले आहे. परंतु त्‍याबाबत कोणताही पोलीस रिपोर्ट दिेलेला नाही. पुढे तक्रारदाराचे दिनांक 6/4/2012 रोजीचे पत्रात देखिल खांब उभे केल्‍याचे कबुल केले आहे. तक्रारदाराचे 5/5/2009 चे पत्रात लाईन टाकल्‍याचे नमुद केले आहे. परंतु 8 ते 10 दिवसांत लाईन तुटली परंतु तक्रारदाराने याबाबत कुठलीही लेखी अथवा तोंडी तक्रार विरुध्‍द पक्षाकडे केलेली नाही. तक्रारदाराने आपले विहिरीवर असे कोणते ही साहित्‍य लावलेले नाही की विरुध्‍द पक्ष विज पुरवठा करु शकेल. विरुध्‍द पक्षाचे लाईमन तक्रारकर्त्‍यास भेटले असता दिवाळीपर्यत विज पुरवठयाची गरज नसल्‍याचे मीटर पेटी लावत नाही असे तक्रारकर्त्‍याने कळविले होते. तसा रिपोर्ट तक्रारीत दाखल आहे. म्‍हणुन तक्रार खर्चासहित खारीज करण्‍याची विनंती करतात.


 

गैरअर्जदाराने आपले लेखी उत्‍तरासोबत 3 दस्‍तऐवज दाखल केले व लेखी युक्तिवाद दाखल केला.


 

तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर. गैरअर्जदाराचे वकील हजर. त्‍यांच्‍या तोडी युक्तिवाद ऐकला.


 

                #0#-   कारणमिमांसा   -#0#


 

तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व दस्‍तऐवजांवरुन तक्रारदार शेतकरी आहे व त्‍यांनी शेतातील विहीरीवर मोटारपंप बसविण्‍याकरिता विज पुरवठयाची मागणी केल्‍याची बाब सिध्‍द होते. तसेच तक्रारदाराने विज पुरवठयाकरिता लागणारी आवश्‍यक रक्‍कम देखिल विरुध्‍द पक्षाकडे जमा केल्‍याचे स्‍पष्‍ट आहे. तसेच विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम जमा केल्‍यावर विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास कोटेशन सुध्‍दा दिले त्‍यानुसार तक्रारदाराने कंपलीशन व टेस्‍ट रिपोर्ट दिला. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास विज पुरवठा दिला नाही.


 

विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे शेतात विज पुरवठयाकरिता खांब उभे केले परंतु ते 15 दिवसांत तुटुन पडल्‍याचे तक्रारदाराने गैरअर्जदारास लेखी कळविल्‍याचे स्‍पष्‍ट होते. (कागदपत्र क्रं.15) परंतु तक्रारदाराने आवश्‍यक ती लेखी सुचना देऊनही त्‍यांची दखल न घेणे, तक्रारदारास विज पुरवठा न देणे ही विरुध्‍द पक्षाचे सेवेतील त्रुटी आहे. परंतु तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाने विज पुरवठा देण्‍याकरिता आवश्‍यक असणारी साधने मीटर बॉक्‍स,मने स्विच किटकॅट कॅपॅसीटर्स व अर्थीग लावले नाही. ते लावल्‍याबाबत प्रकरणात कुठलाही पुरावा दाखल केला नाही.  


 

तक्रारदाराने लेखी तक्रार दिल्‍यावर विरुध्‍द पक्षाने विज पुरवठा दिला नाही. तक्रारींची दखल घेतली नाही. तक्रारदाने अनेक वेळा लेखी तक्रारी देऊन त्‍याची दखल न घेणे ही विरुध्‍द पक्षाचे सेवेतील कमतरता आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब आदेश


 

         -// अं ति म आ दे श //-


 

1.     तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.


 

2.    तक्रारदाराने आदेश प्राप्‍त होताच 30 दिवसाचे आत विज पुरवठया


 

करिता आवश्‍यक साधने मीटर बॉक्‍स, मेन स्विच किटकॅट कॅपॅसीटर्स व अर्थीग लावावे व त्‍याची लेखी सुचना विरुध्‍द पक्षास द्यावी. विरुध्‍द पक्षाने सुचना मिळताच 8 दिवसाचे आत विज पुरवठा द्यावा.


 

      3.    तक्रारदाराच्‍या अन्‍य मागण्‍या अमान्‍य करण्‍यात येतात.


 

 


 

 


 

(
 
 
[HON'ABLE MRS. Rohini Kundle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Alka Patel]
MEMBER
 
[HON'ABLE MS. Geeta Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.