Maharashtra

Nanded

CC/09/280

Parbhawati Vinayak Jatal - Complainant(s)

Versus

Asst.Engineer,MSED.Lit - Opp.Party(s)

ADV.A.V.Choundhary

08 Sep 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/280
1. Parbhawati Vinayak Jatal R/o.Sahyog Nager, NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Asst.Engineer,MSED.Lit NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :ADV.A.V.Choundhary , Advocate for Complainant

Dated : 08 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/280
                          प्रकरण दाखल तारीख - 19/12/2009
                          प्रकरण निकाल तारीख 08/09/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
प्रभावती भ्र.विनायक जटाळ
वय 58 वर्षे, धंदा घरकाम                                  अर्जदार
रा.सहयोग नगर, नांदेड
     विरुध्‍द.
1. सहायक अभिंयता
     महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत कंपनी लि.                      गैरअर्जदार
     शाखा आनंद नगर, नांदेड.
2.   कार्यकारी अभिंयता
महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत कंपनी लि.
     विद्यूत भवन, अण्‍णाभाऊ साठे चौक,
नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.चौधरी ऐ.व्‍ही.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील     -  अड.विवेक नांदेडकर.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
             गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,अर्जदार ही स्‍वतच्‍या पतीपासून वीभक्‍त राहत असून वरील घर हे तिच्‍या पती मार्फत तिला मिळालेले आहे व सदर घरात असलेले मिटर हे तिच्‍या पतीचे नांवाने आहे. तसेच अर्जदार ही या घरात गेली 20 वर्षापासून राहत आहे. न्‍यायालयातून अर्जदार ही तिच्‍या पती विरुध्‍द पोटगी मार्फत उदरनिर्वाह चालवित आहे.    नोव्‍हेंबर  2008  नंतर चूकीची बिले मिळाल्‍यामूळे तिने
 
गैरअर्जदार यांना वारंवार सदरील बिले दूरुस्‍त करावी अशी मागणी केली. अर्जदार यांना माहे सप्‍टेंबर 2008 ते जून 2008 महिन्‍यातील बिले मिळाली त्‍या बीलाची अर्जदार हिने पूर्तता केली आहे.  गैरअर्जदार यांचे अधिका-याकडे तक्रार केली त्‍यानंतर तिला दूरुस्‍ती करुन ताबडतोब रु.7630/- चे बिले दिले. हे बिल अर्जदाराने दि.24.9.2009 रोजी सोन्‍याची अंगठी मोडून व इतर पैसे जमा करुन पूर्तता केली आहे. सदर मिटरच्‍या बाजूला दूसरे मिटर बसवून मिटरची तपासणी करावी व बिल कमी करुन देण्‍यात यावे असे म्‍हटले आहे. त्‍यानंतर 0 पासून म्‍हणजेच वरील बिल भरणा केल्‍यानंतर निल झाल्‍यानंतर नवीन बिल दूरुस्‍त होऊन न येता रु.1599/- बिल आले तसेच त्‍यावर रु.13,140/- बाकी बिल दाखविण्‍यात आले आहे जे की चूकचे व निरर्थक आहे. अर्जदार हिच्‍या मिटरवरील वापर कमी असल्‍यामूळै तिला एवढे मोठे बिल येणे शक्‍य नाही. गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे रितसर तक्रार केली. नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये अर्जदार यांना रु.17040/- चे बाकी असलेले बिल मिळाले अशा प्रकारची अवाजवी व अंदाजित बिले मिटर रिंडीग यांचा कूठलाही ताळमेळ न लागता दिलेली आहेत. म्‍हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, नोव्‍हेंबर 2008 पासून मिळालेले रु.17,040/- ते आजपर्यत मिळालेली सर्व बिले दूरुस्‍त करुन देण्‍याचे आदेश करावेत, गैरअर्जदार यांनी दि.18.12.2009 रोजी चूकीच्‍या दीशेने खंडीत केलेला विज पूरवठा पूर्ववत लवकर चालू करुन देण्‍याचे आदेश करावेत,मानसिक ञासापोटी रु.25,000/-व दावा खर्च रु.2000/- मिळावेत.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराचा गैरअर्जदार यांचेशी ग्राहक व सेवा पूरवीणारी व्‍यक्‍ती असा कोणताही संबंध नाही. गैरअर्जदार यांचे रेकार्ड प्रमाणे या ग्राहक क्रमांकाची विज जोडणी ही व्‍ही.व्‍ही. जटाळे यांच्‍या नांवे देण्‍यात आलेली आहे.त्‍यांचे नांवे विज जोडणी नसताना सूध्‍दा त्‍यांनी हे प्रकरण दाखल केलेले आहे.सदर प्रकरणामध्‍ये अर्जदाराने ते स्‍वतः ग्राहक आहेत व गैरअर्जदार हे विज पूरवठा करणारे व्‍यक्‍ती आहेत असा नामोल्‍लेख केलेला नाही. त्‍या पतीपासून वीभक्‍त राहतात व त्‍यांना पतीपासून पोटगी मिळते व त्‍या 20वर्षापासून त्‍या घरात राहतात या बददल गैरअर्जदार यांना काहीही माहीती नाही. त्‍यांच्‍या घरात तीनचार रुम असून त्‍यात विज पूरवठा चालू आहे. नोव्‍हेंबर 2008नंतर चूकीची बिले दिले हे त्‍यांना मान्‍य नाही. जून 2008 चे बिले मिळाली व सदरील बिलाची पूर्तता केली हे म्‍हणणे खोटे आहे. राठोड साहेब व नवले साहेब यांनी त्‍यांना रु.7630/- चे बिल दूरुस्‍त करुन दिले आहे. गैरअर्जदाराच्‍या अधिका-यानी
 
 
जी सहानूभूती दाखविली त्‍यांचा गैरफायदा प्रस्‍तूतचे प्रकरण दाखल करण्‍यासाठी घेत आहेत. अर्जदारास रु.1599/- बिले आहे तसेच त्‍यावर रु.13140/- बाकी बिल दाखविण्‍यात आलेले आहे ते बरोबर आहे. अर्जदार हे ज्‍या विजेची जोडणी बाबत सदरचे प्रकरण दाखल करीत आहेत त्‍या जोडणीसाठी मूळ ग्राहकाला विजेचे बिल दूरुस्‍त करुनही देण्‍यात आलेले होते.जेव्‍हा नवीन मिटरची नोंद करण्‍यात आली तेव्‍हा जून्‍या मिटरवरील शेवटचे बिल 426 यूनिटस आणि नवीन मिटरवरील बिल 432 यूनिटस असे एकून 858 यूनिटसचे बिल डीसेंबर 2008 मध्‍ये देण्‍यात आले होते.अर्जदार यांनी दि.24.09.2008 नंतर या विज जोडणी बाबत रक्‍कम भरण्‍यात आलेली नव्‍हती हे स्‍पष्‍ट आहे. जेव्‍हा की विज पूरवठा व विजेचा वापर चालू होता.अर्जदाराने या प्रकरणात जे रु.17,040/- विजेचे बिल दूरुस्‍त करण्‍याची विनंती केली आहे ते बिल रु.3398.70 रदद करण्‍यात आलेले असून त्‍यानंतरचे हे बिल देण्‍यात आलेले आहे. अर्जदाराला त्‍यामूळे या प्रकरणामध्‍ये विजेच्‍या जोडणी बाबत दूरुस्‍त बिल अगोदरच देण्‍यात आलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही खोटी असून ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   अर्जदार हया ग्राहक होतात काय ?              लाभार्थी ग्राहक.
2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?        होय .
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
 
                  अर्जदार ही गेल्‍या 20 वर्षापासून तिच्‍या पतीच्‍या घरात राहते जे की त्‍यांना मिळालेले आहे, सहयोग नगर येथे राहतात. न्‍यायालयाकडून अर्जदार हिने तिच्‍या पती विरुध्‍द दावा करुन आता पोटगीवर उदरनिर्वाह करतात. यासंबंधी अर्जदाराने आरसीएस नंबर 679/1993 Jt.Civil Judge S.D. यांचा दि.05.02.1994 चा आदेश दाखल केला आहे. तसेच Jt.Civil Judge S.D.  यांचेही दि.20.09.1997 चा आदेश दाखल केला असून
 
 
यात the husband Vinayak is directed to cohabit with wife Prabha and discharge the matrimonial obligations.  असे म्‍हटले आहे. तेव्‍हा गैरअर्जदार यांनी आक्षेप घेतल्‍याप्रमाणे विज मिटर हे व्‍ही.व्‍ही.जटाळ यांचे नांवे जरी असले तरी त्‍यांची पत्‍नी म्‍हणून अर्जदार हिला लाभार्थी ग्राहक म्‍हणून संबोधता येईल.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार हिने सप्‍टेंबर 2008 ची बिले मिळाली व त्‍यांची पूर्तता केली असे म्‍हटले आहे व योग्‍य ती दूरुस्‍त करुन गैरअर्जदराने रु.7630/- चे बिले दिले व अर्जदाराने दि.,24.09.2009 रोजी भरले असे आपल्‍या तक्रार अर्जात म्‍हटले आहे. परंतु गैरअर्जदार यांनी हे चूकीचे असून अर्जदाराने विज बिल हे शेवटचे दि.24.09.2008 रोजी रु.7630/- भरले आहेत यानंतर त्‍यांनी बिलच भरले नाही असे म्‍हटले आहे. अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जात दि.24.09.2009 ही चूकीची दिनांक लिहील्‍याचे दिसते. यानंतर जवळपास 12 महिन्‍यानंतर अर्जदाराच्‍या तक्रारीवरुन गैरअर्जदार यांनी दि.29.09.2009 रोजी रिव्‍हाईज बिल  सप्‍टेंबर 2009 चे रु.12,680/- चे बिल दिलेले आहे हे बिल भरल्‍याचे अर्जदार म्‍हणत नाहीत. तेव्‍हा एवढी बाकी त्‍यांचेकडे शिल्‍लक आहे असे दिसून येते. वर्ष 2008 चे नंतर सप्‍टेंबर 2009 चे देयक रु.1315,40 चे आलेले आहे, ऑक्‍टोबर 2009 चे रु.905,87, नोव्‍हेंबर 2009चे रु.899,18 डिसेंबर 2009चे रु.722,59 इतपर्यतचे बिल अर्जदाराने दाखल केलेले आहेत. ही सर्व बिले मिटर रिंडीग प्रमाणे यूनिट घेतलेले असून त्‍याप्रमाणेच ही बिले अर्जदाराना देण्‍यात आलेले आहेत. मिटरमध्‍ये कोणताही फॉल्‍ट आहे अशी तक्रार नाही. इतके बिल येणे स्‍वाभाविक आहे. त्‍यामूळे ही सर्व बिले बरोबर आहेत. यानंतर जानेवारी 2010पासून ते ऑगस्‍ट 2010 पर्यतची बिले रेकार्ड वर दाखल केलेले नाहीत ती नियमित बिले आलेली गृहीत धरुन व त्‍यात रु.12,680/- दूरुस्‍त बिल जे की सप्‍टेंबर 2009 रोजी देण्‍यात आलेले आहे हे धरुन जी काही थकबाकी येईल ती ऑगस्‍ट 2010 च्‍या नियमित बिलाशिवाय थकबाकीत दाखवून एकूण येणारी रक्‍कम असे एकूण दूरुस्‍तीचे बिल अर्जदार यांना देण्‍यात यावे. अर्जदाराने या मंचात त्‍यांचा विज पूरवठा खंडीत झाल्‍यामूळे विज पूरवठा पूर्ववत सूरु करण्‍यासाठी अर्ज दिला असता त्‍यावर अंतरिम आदेश दि.19.12.2009 रोजी  होऊन बिलाची रक्‍कम रु.15,280/- यापैकी 50 टक्‍के रक्‍कम गैरअर्जदार  यांचेकडे जमा करण्‍याचे आदेश दिल्‍या गेलेले होते. ती रक्‍कम भरल्‍या बाबत अर्जदार किंवा गैरअर्जदार यांचेकडून कोणताही पूरावा
 
रेकार्ड वर आलेले नाही. तेव्‍हा अशी 50 टक्‍के रक्‍कम जर भरली असेल तर एकूण येणारी रक्‍कम दूरुस्‍त बिलातून कमी करण्‍यात यावी. अंतरिम आदेशाच्‍या अनुंषगाने गैरअर्जदाराने विज पूरवठा सुरु केला या बाबत देखील स्‍पष्‍ट असे दोन्‍ही पक्षाकडून काहीही सांगण्‍यात आलेले नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
          1.        अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात 
                    येतो.
2.                                         अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सप्‍टेंबर 2008 पासून 
          ते सप्‍टेंबर 2009 पर्यतचे सुधारित बिलाप्रमाणे थकबाकी  
          रु.12,680/- व सप्‍टेंबर 2009 चे रु.1315.40, ऑक्‍टोंबर 
          2009 चे रु.905.87, नोव्‍हेबर 2009चे रु.899.18 व  
          डिसेंबर 2009 चे रु.799.59 असे एकूण रु.16,523.04    
          तिस दिवसांचे आंत भरावेत,यानंतर ताबडतोब विज पूरवठा 
          चालू नसेल तर ताबडतोब सुरु करावा, तसेच उर्वरित
          जानेवारी 2010 पासून ते ऑगस्‍ब्‍ट,2010 पासूनची
          नियमीत बिले यानंतर 30 दिवसांचे आंत भरावीत,
          अर्जदार यांनी वरील कालावधीतील काही रक्‍कम भरली
          असेल तर ती एकूण बिलाच्‍या येणा-या रक्‍कमेतून     
          गैरअर्जदार यांनी कमी करावी.
3.        मानसिक ञासाबददल आदेश नाही.
4.             दावा खर्च ज्‍यांचा त्‍यांनी आपआपला सोसावा.
5.             पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                    श्रीमती सुवर्णा देशमूख                             श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                      सदस्‍या                                                   सदस्‍य.
 
 
 
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER