Maharashtra

Jalna

CC/105/2013

Anjanabai Balasaheb Deshmukh - Complainant(s)

Versus

Asst.Engineer.(M.S.E.B) - Opp.Party(s)

02 Jul 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/105/2013
 
1. Anjanabai Balasaheb Deshmukh
R/o Paradh Bu.
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Asst.Engineer.(M.S.E.B)
Main Office ,Mastgad,Jalna
Jalna
Maharashtra
2. Sub Engineer Of M.S.E.B
Paradh Bu.
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Adv.G.R.Kad
 
ORDER

(घोषित दि. 02.07.2014 व्‍दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्‍या)

 

      अर्जदार हे गैरअर्जदार वीज कंपनीचे ग्राहक असून, त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे वाढीव वीज बिलाबाबत केलेल्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.

      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे व त्‍यांचा ग्राहक क्रमांक 515560596291 असा आहे. अर्जदाराच्‍या तक्रारीनुसार त्‍यांचा वीज वापर कमी असताना देखील गैरअर्जदार यांनी सप्‍टेंबर 2013 मध्‍ये त्‍यांना 5,060/- रुपयाचे वीज बिल दिले. या वाढीव वीज बिलाबाबत त्‍यांनी सहाय्यक अभियंता, भोकरदन जि.जालना यांच्‍याकडे तक्रार केली. परंतु या तक्रारीची दखल न घेता गैरअर्जदार यांनी त्‍यांचे मीटर काढून नेले व नवीन मीटर बसविले नाही. गैरअर्जदार यांनी मीटर लावण्‍याची व योग्‍य बिल देण्‍याची मागणी अर्जदाराने केली आहे.

      गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदारास नोव्‍हेंबर 2012 ते नोव्‍हेंबर 2013 या काळात 5 ते 12 युनिट प्रतिमाह या प्रमाणे वीज बिल देण्‍यात आले आहे. अर्जदार हे नियमितपणे वीज बिलाचा भरणा करीत नसल्‍यामुळे त्‍यांना वीज पुरवठा खंडित करण्‍याची नोटीस देण्‍यात आली आहे. वीज बिल भरणा टाळण्‍याच्‍या हेतूने अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.

      अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की,

 

  1. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांचा ग्राहक क्रमांक व मीटर क्रमांक अनुक्रमे 515580596291 व 76/01998956 असा आहे.

  2. गैरअर्जदार यांनी मंचामध्‍ये अर्जदाराचे नोव्‍हेंबर 2012 ते नोव्‍हेंबर 2013 या कालावधीचे सी.पी.एल दाखल केले आहे. या सी.पी.एल चे अवलोकन केल्‍यावर अर्जदाराने दिनांक 20.12.2009 रोजी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून दिनांक 28.04.2011 रोजी शेवटचा वीज बिल भरणा केला आहे.

  3. सी.पी.एल वरुन अर्जदाराचा मीटर क्रमांक 76/01998956 असा असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार यांनी अनेक वेळेस वीज मीटरचे रिडींग न घेता सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी केली असल्‍याचे दिसून येते. त्‍याच प्रमाणे अर्जदार हे दरिद्य रेषेखाली (BPL) असताना देखील त्‍यांना वाढीव दराने वीज बिल आकरणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

  4. मंचात दाखल केलेल्‍या सी.पी.एल वरुन नोव्‍हेंबर 2013 मध्‍ये मीटर वरील रिडींग 755 असल्‍याचे दिसून येते. यावरुन वीज जोडणी घेतल्‍या पासून म्‍हणजेच दिनांक 20.12.2009 ते नोव्‍हेंबर 2013 पर्यंत (47 महिने) अर्जदाराचा सरासरी वीज वापर 755 – 47 = 16 युनिट प्रतिमाह असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

  5. अर्जदाराने वाढीव वीज बिलाबाबत तक्रार केल्‍यानंतरही गैरअर्जदार यांनी सरासरीवर अधारीत वीज बिल रद्द करुन मीटर वरील रिडींग प्रमाणे व (BPL) च्‍या टॅरीफ नुसार वीज बिल आकारणी करणे अपक्षित होते व ते न भरल्‍यास वीज कायद्यातील तरतुदी नुसार 56 (1) प्रमाणे वीज पुरवठा खंडित करण्‍याची कारवाई करणे अपेक्षित होते. पण गैरअर्जदार यांनी योग्‍य दर न लावता व वीज बिल दुरुस्‍त न करता अर्जदारास वीज पुरवठा खंडित करण्‍याची नोटीस दिलेली दिसून येते जे चुकीचे आहे.

  6. अर्जदाराने आपल्‍या तक्रारीत गैरअर्जदार यांनी मीटर काढून नेल्‍याचे म्‍हटले आहे. परंतु गैरअर्जदार यांनी शपथपत्राव्‍दारे त्‍यांचे मीटर चालू असल्‍याचे म्‍हटले आहे.

   सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.  

 

आदेश

  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सरासरी 16 युनिट प्रतिमाह या प्रमाणे वीज बिल आकारणी करावी व 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
  2. सुधारीत वीज बिल बी.पी.एल (BPL) च्‍या दरानुसार आकारण्‍यात यावे.
  3. खर्चा बद्दल आदेश नाही.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.