नि. २४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३५३/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २१/०७/२०१०
तक्रार दाखल तारीख : २२/०७/२०१०
निकाल तारीख : ३१/१०/२०११
---------------------------------------------------------------
सौ सीमा रामचंद्र रानडे
वय वर्षे – ५२, व्यवसाय – घरकाम व वस्तु विक्री
रा.काळे वाडा, हरभट रोड, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
सह अभियंता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,
(शहर विभाग सांगली) रिसाला रोड
सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.राहुल पाटील
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री एस.ए.मोहिते
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या विद्युत देयकातील दोषाबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे पिकोफॉल व शालेय स्टेशनरी मालाचे विक्री करण्याचे दुकान मौजे सांगली येथे आहे. सदर दुकानामध्ये तक्रारदार यांनी १९९४-९५ मध्ये जाबदार कंपनीकडून वीज घेतली आहे. जाबदार कंपनीकडून वीज घेतल्यापासून तक्रारदार यास जानेवारी २०१० पर्यंत व्यवस्थितरित्या विद्युत पुरवठा केला आहे. तक्रारदार यांचा वीजवापर गेले १५ ते १६ वर्षांपासून सरासरी ५० ते ६० युनिट इतका आहे. तक्रारदारांना दि.१४/२/२०१० ते १४/३/२०१० या कालावधीचे बिल हे नेहमी येणा-या बिलापेक्षा चारपट एवढे आले. तक्रारदार यांनी आलेले बिल हे चुकीचे आहे हे लक्षात येताच मीटरचे रिडींग पाहिले तेव्हा मीटर रिडींग ५४९९ असे होते. दि.१४/३/१० ते ५/४/१० या कालावधीचे सुध्दा बिल चुकीचे देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.६/४/२०१० रोजी जाबदार कंपनीकडे तक्रार करुन सदरचा मीटर नादुरुस्त झाल्याचे व ते बदलून मिळणेकरीता तसेच फेब्रुवारी मार्च महिन्याचे आलेले बिल दुरुस्त होवून मिळणेसाठी अर्ज केला. जाबदार यांनी दि.७/४/१० रोजी तक्रारदार यांचे दुकानात नवीन मीटर बसविला. नवीन मीटर बसविला त्यादिवशी त्यावरील रिडींग पहिल्या दिवशी २ युनिट असे होते व दुस-या दिवशीचे २२ युनिट तर तिस-या दिवशी ५४ रिडींग मीटर दाखवू लागला. सदरचा मीटरही नादुरुस्त असलेचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे तक्रार केली. तेव्हा जाबदार यांचे कर्मचा-यांनी दि.१०/४/२०१० रोजी तक्रारदाराच्या खोक्यातील मीटरची पाहणी केली. त्यानंतर दि.१०/४/२०१० पासून तक्रारदार यांचे एप्रिल मे महिन्याचे बिल बरोबर आले. त्यानंतर वाढीव बिल येवू लागले. त्यानंतर पुन्हा मीटरची तपासणी करुन मागितली तेव्हा जाबदारांनी मीटर रिडींग योग्य आहे, अगोदर पूर्ण बिल भरा तर तुमचे कनेक्शन तोडू असे सांगितले. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज चुकीची बिले दुरुस्त करुन मिळणेसाठी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.१४ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचे पिकोफॉल व स्टेशनरी मालाचे दुकान आहे हे कथन जाबदार यांनी नाकारले आहे. तक्रारदार यांचे दुकानामध्ये झेरॉक्स मशीन, कॉप्युटर, टायपिंग, फॅन, इन्व्हर्टर, बल्ब असा तक्रारदार यांचा वीजवापर आहे. तक्रारदार यांचे विद्युत कनेक्शन हे व्यापारी स्वरुपाचे आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना दिलेली बिले सर्व नियमाप्रमाणे व विद्युत वापराप्रमाणे बरोबर आहेत. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे दि.५/४/१० रोजी मिटर तपासणी केली व त्याच दिवशी नवीन मीटर बसविण्यात आला. सदरच्या तपासणीमध्ये मीटरमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. तक्रारदार यांचे दुकानातील वीज मीटर दि.५/४/२०१० रोजी बदलला व त्याचदिवशी नवीन मीटर बसविण्यात आला. दि.१४/२/१० ते १४/३/१० म्हणजे मार्च महिन्याच्या बिलानंतर मीटर बदलला असल्याने दि.१४/३/१० ते ५/४/१० या २३ दिवसांचे तक्रारदार यांचा वीजवापर ४८० युनिट झाला. तेथून पुढे दि.५/४/१० ते १४/४/१० या ९ दिवसांचे तक्रारदार यांचा वीजवापर ९४ युनिट इतका झाला. त्यामुळे माहे एप्रिलचे बिल ५७४ युनिट तक्रारदारास दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.१०/७/२०१० रोजी नवीन बसविलेला मीटर फॉल्टी असल्याबाबत तक्रार केली. सदर तक्रारीबाबत जाबदार यांनी तपासणी केली. परंतु मीटरमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. तक्रारदार यांना जाबदार यांनी कोणतेही चुकीचे विद्युत देयक दिलेले नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१० च्या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१७ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तसेच तक्रारदारांचे दुकानामध्ये झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, इन्व्हरटर या वस्तू नसल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी नि.१९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२३ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, प्रतिउत्तर, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तसेच दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये आपल्या विद्युत देयकाबाबत वाद उपस्थित केला आहे. तक्रारदार यांनी दि.१४/२/२०१० ते १४/०३/२०१० तसेच १४/३/२०१० ते १४/४/२०१० व १४/५/२०१० ते १४/६/२०१० या कालावधीची विद्युत देयके चुकीची आली अशी तक्रार केली आहे. सदर विद्युत देयके तक्रारदार यांनी नि.५ चे यादीने दाखल केली आहेत. सदर कालावधीमध्ये तक्रारदार यांना अनुक्रमे २३२, ५७४ व ८४ इतके युनिट वीज बिल आले आहे. सदरचे युनिट चुकीचे आहे अशी तक्रार प्रामुख्याने तक्रारदार यांनी केली आहे. सदरची चुकीची देयके ही मीटर चुकीचे रिडींग दाखवत असल्याने आली असल्याचे तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार तक्रारदार यांचा मीटर दि.६/४/२०१० रोजी जाबदार यांनी बदलून दिला आहे. बदलून दिलेल्या मीटरबाबतही तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर नवीन मीटर तपासण्यात आला. त्याचा रिपोर्ट तसेच जुन्या मीटरचा टेस्ट रिपोर्ट याकामी जाबदार यांनी नि.१० च्या यादीने दाखल केला आहे. सदर दोन्ही रिपोर्ट हे ओ.के. असे आहेत. अशा परिस्थितीत केवळ विद्युत देयके जास्त आली, म्हणून मीटरमध्ये दोष आहे असे दर्शविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. मीटरला ज्या खांबावरुन सर्व्हिस वायर टाकण्यात आली, ती सर्व्हिस वायर शॉर्ट झाल्यामुळे बिल जास्त येते, असे तक्रारदार यांना जाबदार कंपनीच्या वायरमनने सांगितले असे तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये नमूद केले आहे. परंतु तक्रारदार यांच्या सदरच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही. सर्व्हिस वायर मधून कनेक्शन घेताना सदरचे कनेक्शन मीटरला जोडले जाते व तेथून पुढे होणा-या वापराचे बिल येते असे जाबदार यांचे विधिज्ञांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. जाबदार यांचे विधिज्ञांनी केलेला सदरचा युक्तिवाद संयुक्तिक आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी आपला पिको फॉल व शालेय स्टेशनरी विक्रीचा व्यवसाय आहे असे नमूद केले आहे. जाबदार यांनी दि.२४/५/२०१० रोजी तक्रारदार यांच्या मीटरबाबतचा अहवाल नि.१०/१ वर दाखल केला आहे. त्यामध्ये तक्रारदार यांच्या दुकानामध्ये झेरॉक्स मशिन, कॉम्प्यूटर, टयूबलाईट, इन्व्हर्टर, फॅन इ. वापर असल्याचे नमूद केले आहे. जाबदार यांनी याकामी जुन्या व नवीन मीटरचे टेस्ट रिपोर्ट दाखल केले आहेत. सदर मीटर ओ.के.आहेत असे रिपोर्टमध्ये नमूद आहे. नि.१०/२ वरील टेस्ट रिपोर्टमधील मीटर क्रमांकाबाबत तक्रारदार यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु सदर टेस्ट रिपोर्टमध्ये असणारा ग्राहक क्रमांक तक्रारदार यांच्याच मीटरचा आहे ही बाब विचारात घेता सदरचा आक्षेप तथ्यहीन ठरतो असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांचा असलेला विद्युत वापर व मीटरबाबतचे दाखल टेस्ट रिपोर्ट विचारात घेता, मीटरमध्ये दोष आहे, त्याकारणे विद्युत देयके चुकीची आली ही बाब तक्रारदार यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळण्यास पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ३१/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११