Maharashtra

Dhule

CC/13/93

Jijabai Asram Wagh - Complainant(s)

Versus

Asst. Executive Engineer. - Opp.Party(s)

Sachin Shimpi

17 Jun 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/13/93
 
1. Jijabai Asram Wagh
72 Vitabhatti, Agra Road, Deopur Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Asst. Executive Engineer.
Rural Division, MSEDCL,Plot No.10, Sahyadri Building, Anand Nagar, Near Indira Garden Deopur, Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
हजर
 
For the Opp. Party:
गैरहजर
 
ORDER

निशाणी नं.१ वरील आदेश

 

(१)       सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे नमूद करुन, त्‍यांचेकडून दुरुस्‍त वीज बिल मिळावे, थकीत रक्‍कम पुढील बिलातून वजावट होऊन मिळावी, नवीन मिटर बसवून मिळावे, तसेच वीज पुरवठा खंडीत करु नये आणि नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये या मंचात दाखल केली आहे. 

 

(२)       सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.१७-०६-२०१४ रोजी तक्रारदार यांनी नि.नं. १८ वर पुरसीस दाखल केली आहे.  त्‍यात त्‍यांनी “सदर कामी तक्रारदार व जा.देणार यांच्‍यात आपसात समझोता झाल्‍याने सदरची तक्रार काढून टाकण्‍यात यावी हि विनंती” असे नमूद केले आहे व त्‍यावर तक्रारदारांच्‍या विद्वान वकीलांची स्‍वाक्षरी आहे.

 

(३)       तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पुरसीसचे अवलोकन करता, तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात मंचाबाहेर आपसात तडजोड झाली असून, उभयतात कोणताही वाद शिल्‍लक राहिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निवारण झाले असल्‍याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.  सबब तक्रारदारांची पुरसीस मंजूर करण्‍यात आली असून, खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.   

 

आदेश

 (अ)  तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. 

      (ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 

 

 

धुळे.

दिनांक : १७-०६-२०१४          

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.