Maharashtra

Nanded

CC/08/196

Md Atikh Md. Khaja - Complainant(s)

Versus

Asst. Engineer, MSED, Co Ltd - Opp.Party(s)

Adv. Abhijeet Choudhary

05 Aug 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/196
1. Md Atikh Md. Khaja R/o Railway Station Road, Mudkhed, Tq MudkhedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Asst. Engineer, MSED, Co Ltd Rural Sub Division, MudkhedNandedMaharastra2. Exe. Egineer , MSED Co LtdNandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 05 Aug 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  196/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 30/05/2008
                           प्रकरण निकाल तारीख - 05/08/2008
 
समक्ष -   मा.श्री.विजयसिंह राणे.               - अध्‍यक्ष.
         मा.श्रीमती.सुजाता पाटणकर           - सदस्‍या.
                  मा.श्री.सतीश सामते              - सदस्‍य.
 
म.अतखि म. खाजा                                 अर्जदार.
वय वर्षे 28, धंदा चिकन विक्रेता,
रा. मूदखेउ ता. मुदखेड जि. नांदेड.
     विरुध्‍द.
 
1.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित
     मुदखेड सहायक अभिंयता, ग्रामीण उपविभाग,
     मुदखेड.                                    गैरअर्जदार
2.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित
     तर्फे कार्यकारी अभिंयता, नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील            - अड.अभिजीत चौधरी
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर
                          निकालपञ
             (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्‍य )
              गैरअर्जदार महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी यांच्‍या सेवेच्‍या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे.
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून ग्राहक क्र.550050011020  याद्वारे त्‍यांच्‍या चिकन व्‍यवसायाठी विज पूरवठा घेतला होता. यानंतर त्‍यांनी तो व्‍यवसाय बंद झाल्‍या कारणाने व्‍यावसायीक विज पूरवठा रदद करुन तो बदलून घरगूती असा करुन घेतला. अर्जदाराने नियमितपणे बिलाची रक्‍कम भरली आहे. त्‍यांनी मिटरमध्‍ये कूठल्‍याही प्रकारची छेडाछेड केलेली नाही. मागील तिन महिन्‍यापासून अर्जदाराचे मिटर फॉल्‍टी म्‍हणून विज देयकात येत आहे. अर्जदार यांनी तोंडी तक्रार केली आहे. दि.15.5.2008 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदार घरी नसताना जूने मिटर काढून नवीन मिटर बसविले. त्‍यांचा नंबर 092261 असा आहे. त्‍यावेळेस त्‍यांनी कूठल्‍याही प्रकारचा पंचनामा केलेला नाही. मिटर बदलताना अर्ज करावा लागतो. या सबबी खाली को-या कागदपञावर अर्जदाराच्‍या वडिलाची सही घेतली व अहवालावर अर्जदाराने बेकायदेशीररित्‍या विज पूरवठा दूस-यास दिला व जूने मिटर फॉल्‍टी होते असा उल्‍लेख केला आहे. गैरअर्जदार यांचे सर्व आरोप खोटे असून त्‍यांनी दूस-यास पूरवठा केलेल्‍या जागेच्‍या अथवा व्‍यक्‍तीचे बयाण घेतले नाही किंवा पंचनामाही केलेला नाही. यानंतर गैरअर्जदाराने दि.15.5.2008 रोजी रु.10,000/- चे बिल व दि.26.5.2008 रोजी रु.23,779/-विद्यूत देयक दिले. जे की बेकायदेशीर असून चूकीचे आहे. दि.27.5.2008 रोजी कूठलीही पूर्वसूचना न देता विजेची चोरी केली नसताना विज पूरवठा खंडीत करण्‍यात आला. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या कूटूंबाला जीवन जगणे कठीण झाले आहे. अर्जदार हे वापरलेल्‍या विजे संबंधी सरासरी विज बिल पध्‍दतीने बिल भरण्‍यास तयार आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदार यांनी  दिलेले दोन्‍ही विज देयके रु.10,000/- व रु.23,779/- रदद करण्‍यात यावेत व अर्जदाराचा विज पूरवठा पूर्ववत सूरु करण्‍यात यावा. झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.5,000/- देण्‍यात यावेत.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले, त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराचा पहिला आक्षेप असा आहे की, तक्रारीमध्‍ये क्‍लेम क्‍लॉज नाही. दि.15.5.2008 रोजी अर्जदाराच्‍या इमारतीत जेव्‍हा गैरअर्जदाराच्‍या सक्षम अधिका-याने भेट दिली तीथे विजेचा अनाधिकृत वापर आढळला. अर्जदाराने घरगूती कारणासाठी विजेची जोडणी घेऊन त्‍या जोडणीत देण्‍यात आलेले सर्व्‍हीस वायरला मध्‍येच कापून दोन दूकानदारांना व तिन घरांना विज पूरवठा दिला. हा विजेचा वापर व्‍यावसायीक कारणासाठी होता. अर्जदारांनी दि.15.5.2008 रोजी पञ देऊन असे कबूल केले आहे. सदरचा अर्ज अर्जदाराने स्‍वतःहून दिलेला आहे. विजेचा वापर हा व्‍यावसायीक कारणासाठी असल्‍यामुळे अर्जदार  कलम 2(12)(ड) नुसार ग्राहक होऊ शकत नाहीत. अर्जदारास विज कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे विज चोरीचे देयक देण्‍यात आलेले आहे. तिन महिन्‍यापासून गैरअर्जदारांनी मिटर फॉल्‍टी असे देयकात दिलेले आहे हे म्‍हणणे खोटे आहे. अर्जदाराच्‍या घरी 1 के.व्‍ही. क्षमतेचे विजेचे उपकरण आढळले. एक तासाला एक यूनिट विज खपते, दिवसाचे 24 तास व महिन्‍याचे 30 दिवस असे जर केले तर अर्जदाराचा विज वापर हा 30 ते 35 यूनिट आहे हे म्‍हणणे खोटे वाटते. दि.15.5.2008 रोजी गैरअर्जदाराने नवीन मिटर बसविले व नोटीस दिली नाही हे म्‍हणणे देखील चूक आहे. मिटर बदलणे हा गैरअर्जदाराचा हक्‍क आहे. दि.15.5.2008 रोजी रु.10,000/- व रु.23,779/- जी विज देयक दिली ही बरोबर आहेत. अर्जदार हा अनाधिकृतरित्‍या विज विकत होता म्‍हणून विज कायदा 2003 कलम 135 नुसार त्‍यांला विज चोरीचे बिल दिलेले आहे. अर्जदाराचा अर्ज खोटा असल्‍याकारणने तो खर्चासह फेटाळावा अशी मागणी केली आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी देखील पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेला दस्‍ताऐवज बारकाईने तपासून आणि वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                     उत्‍तर
1.   अर्जदार हे ग्राहक आहे काय ?                     होय
2.   गैरअर्जदाराच्‍या सेवेती ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे
                        कारणे
मूददा क्र.1 ः-
          अर्जदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जात सूरुवातीस म्‍हटले आहे की, त्‍यांनी घेतलेला विज पूरवठा हा आधी व्‍यावसायीक होता नंतर व्‍यवसाय बंद झाल्‍याकारणाने त्‍यांने तो बदलून घरगूती करुन घेतला व हे गैरअर्जदार यांनी देखील मान्‍य केले आहे. चिकन सदर व्‍यवसाय जरी चालू असला तरी असा व्‍यवसाय हा उपजिवीकेसाठी असतो म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1)(ड)  नुसार अर्जदार हा ग्राहक होईल.
 
मूददा क्र.2 ः-
          अर्जदार यांनी दि.15.5.2008 त्‍यांचे जूने मिटर काढून नवीन मिटर बददल मिटर रिप्‍लेसमेंट रिपोर्ट दाखल केलेला आहे. यात मिटर फॉल्‍टी व इलीगल एक्‍सटेंशन असा रिमार्क आहे. गैरअर्जदार यांना मिटर बदलले कबूलच केलेले आहे परंतु यासाठी त्‍यांनी असा आक्षेप घेतला की,  मिटर फॉल्‍टी असल्‍या कारणाने ते त्‍यांनी बदलले. व अर्जदार यांनी सर्व्‍हीस वायरला मध्‍येच कापून दोन दूकाने व तिन घरांना अनाधिकृत विज पूरवठा केलेला आहे. या बाबत त्‍यांनी दि.15.5.2008 रोजी अर्जदाराच्‍या वडिलांच्‍या सहीचे पञ जोडलेले आहे परंतु अर्जदारानी अशा प्रकारचे पञ त्‍यांनी स्‍वतः दिलेच नाही व इतरही कोणी दिले नाही असे म्‍हटले आहे. शिवाय तक्रार अर्जात व्‍यावसायीक विज पूरवठा बदलून तो घरगूती करुन घेतले म्‍हणून व्‍यावसायीक विज पूरवठा होत नाही. व मिटर बदलतांना मिटरचे सिल चांगले होते व सर्व्‍हीस वायर कापून त्‍यांने दूकाने व घरास विज पूरवठा दिला नाही व अशा प्रकारचे कारण असेल तर गैरअर्जदारांनी मिटरचा पंचनामा केला नाही किंवा जागेवर अनाधिकृत विज पूरवठा केला असेही पंचनामा केला नाही. आम्‍ही सर्व कागदपञ तपासून पाहिले असता अर्जदाराच्‍या आक्षेपाप्रमाणे गैरअर्जदाराने जो स्‍पॉट इन्‍स्‍पेक्‍शन रिपोर्ट दाखल केलेला आहे त्‍यावर जरीमंजूर भारापेक्षा जास्‍त कनेक्‍ट लोड आहे व सर्व्‍हीस वायर कापून अनाधिकृत सर्व्‍हीस पूरवठा दिला आहे असा जरी उल्‍लेख असला तरी अशा प्रकारचा अनाधिकृत विज पूरवठा अर्जदार करीत होता अशा बददलचे स्‍पॉट वर पंचासमक्ष पंचनामा करणे आवश्‍यक होते तो गैरअर्जदाराने केलेला नाही. शिवाय अर्जदारावर जे आरोप ठेवलेले आहे त्‍या बाबत त्‍यांच्‍या अधिका-याचे शपथपञही दाखल केलेले नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या आक्षेपाला पूष्‍ठी मिळते. अर्जदार यांनी त्‍यांचा विज पूरवठा हा व्‍यावसायीक नाही व त्‍यांचे मिटर फॉल्‍टी नव्‍हते किंवा चोरी केली नाही. को-या कागदपञावर गैरअर्जदारांनी सहया घेतल्‍या होत्‍या त्‍यामुळे त्‍यांनी त्‍यांचे मर्जीप्रमाणे काय लिहून घेतले हे त्‍यांना माहीत नाही. या बददल पूरावा म्‍हणून मालाबाई रामसिंग टाक, गणेश सोंळूके, मोहंमद खाजा या तिघाचे शपथपञ दाखल केलेले आहे व गैरअर्जदाराचे म्‍हणणे खोटे आहे असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांनी मिटर फॉल्‍टी असल्‍याबददलचा मिटर टेस्‍टींग लॅब रिपोर्ट, घटनास्‍थळाचा पंचनामा, व साक्षीदाराचे शपथपञ, इत्‍यादी महत्‍वाचे कागदपञ या प्रकरणात दाखल केलेले नाहीत. म्‍हणून अर्जदार यांच्‍यावरील चोरीचा आरोप खरा आहे की खोटा याबददल संदेह निर्माण होतो. चोरीच्‍या आरोपा बददल गैरअर्जदार यांनी फौजदारी न्‍यायालयात अर्जदारांचे विरुध्‍द तक्रार दाखल करुन विज चोरी सिध्‍द झाल्‍याचेनंतरच कंपाऊडीची रक्‍कम वसूल करता येईल. यावरुन केस लॉ सी.पी.जे. जून 2008 भाग 2 पान क्र.357 यामध्‍ये
Theft—Compounding charges can be recovered only if theft proved—Complainant liable to pay for alleged theft of energy only.
Consumer Protection Act, 1986 –section 17—Indian Electricity Act, 2003 Section 135—Electricity—Theft –Disconnection due to non-payment of bill—Restoration  of supply directed by Forum on deposit of 1/3rd pf disputed bill—Compounding charges added in bill—Compounding charges can be recovered only if theft proved—Order of Forum modified in revision –Complainant liable to pay amount for alleged theft of energy only.
 
यांचा आधार घेता येईल. गैरअर्जदार यांनी दिलेले विज देयक हे त्‍यांनी दिलेल्‍या असेंसमेंट बिलाप्रमाणे दोन वर्षाचे आहे. गैरअर्जदारांना असे करता येणार नाही. विज कायदा 2003 कलम 126 (सूधारीत)  याप्रमाणे गैरअर्जदारांनी असेंसमेंट बिलामध्‍ये जी सरासरी दाखवलेली आहे त्‍याप्रमाणे त्‍यांना  मिटर बदलल्‍यापासूनचा मागील 12 महिन्‍यापर्यतचा विज देयक देता येईल. विज पूरवठा हा व्‍यावसायीक कारणासाठी वापरला हे देखील पूर्णतः सिध्‍द होऊ शकला नाही. त्‍यामुळे विज आकार घरगूतीच आकाराप्रमाणे लावावा लागेल. म्‍हणून दि.26.5.2008 रोजीचे रु.23,779/- चे विज देयक रदद करुन ते विज कायदा 2003 या दूरुस्‍ती कलम 126 प्रमाणे सूधारित विज देयक देणे योग्‍य राहील. दूसरे एक विद्यूत देयक कंपाऊडींगचे आहे यावीषयी त्‍यांना फौजदारी न्‍यायालयात दावा दाखल करुन त्‍यांच्‍या आदेशानंतर झाले तरच कंपाऊडींगची रक्‍कम वसूल करता येईल. त्‍यामुळे ते बिल रद्य करण्‍यात येते. तडजोड ही अर्जदारांच्‍या संमती शिवाय होणार नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
           1.        अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात .                   येतो.
           2.        गैरअर्जदार यांनी दिलेले दि.26.3.2008 चे रु.23,779/-
          चे विज देयक रदद करण्‍यात येते व दि.15.5.2008
          रोजीचे कंपाऊडींग बददलचे रु.10,000/- चे देयक ही रद्य
          करण्‍यात येते.
3.        गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे
          आंत त्‍यांचे असेंसमेंट शिटप्रमाणे केलेली सरासरी विजेचा
          वापर ग्रहीत धरुन दि.15.5.2008 पासून मागील 12
          महिन्‍यासाठीचे दूरुस्‍त विज देयक अर्जदार यांना दयावे.
4.        अर्जदार यांनी दूरुस्‍त देयक मिळाल्‍यानंतर 15 दिवसांचे
         आंत ते विज देयक गैरअर्जदार यांचे कार्यालयात जमा
         करावे व ही रक्‍कम भरल्‍यानंतर 48 तासांचे आंत
         गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा ग्राहक क्र.550050011020  
         चा विज पूरवठा पूर्ववत सूरु करुन दयावा.
5.       गैरअर्जदार यांनी दूरुस्‍त बिल व यानंतर विज पूरवठा
         सूरु केल्‍याबददलचा अहवाल या मंचात दाखल करावा.
6.        मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्‍हणून
          रु.1,000/- अर्जदारास दयावेत किंवा सदरील रक्‍कम
          त्‍यांच्‍या विज देयकात समायोजित करावी.
7.                                         पक्षकाराना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.विजयसिंह राणे       श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
 अध्‍यक्ष                                   सदस्‍या                           सदस्‍य 
 
 
             
जे. यु. पारवेकर
लघूलेखक.