जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 119/2008. प्रकरण दाखल तारीख - 15/03/2008 प्रकरण निकाल तारीख - 03/12/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य दत्ताञय किशनराव देशमुख वय, 61 वर्षे धंदा शेती, रा. कामारी ता. हिमायतनगर जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. मा.उप अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. कार्यालय हदगांव ता. हदगांव जि. नांदेड गैरअर्जदार 2. मा. अधिक्षक अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. कार्यालय अण्णाभाउ साठे चौक, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.बालाजी शिरफुले गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांची तक्रार आहे. प्रकरणातील हकीकत खालील प्रमाणे, अर्जदार हे कामारी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील रहीवासी असून तेथे ते शेती करतात. त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून ग्राहक क्र.559590001381 याद्वारे विज पूरवठा घेतला आहे. ते नियमितपणे विजेचे देयके भरतात. अर्जदार यांचे शेत सर्व्हे नंबर 269 मध्ये विज कंपनीचा डिपी आहे. सदरील डिपी मध्ये केबल फयूज चांगल्या प्रतिचा नाही. तेथे अनेक वेळा शॉर्ट सर्किट होत असते व आगीचे गोळे शेतात पडत असतात. अशा प्रकारची सूचना वारंवार कनिष्ठ अभिंयता विज वितरण कंपनी यांचे कार्यालयात दिलेली आहे. त्यांनी निष्काळजीपणा केला व डिपी दूरुस्त केला नाही. दि.23.11.2007 रोजी डिपीमधील केबल फयूज चांगल्या प्रतिच्या नसल्यामूळे शॉर्टसर्कीट झाला व आगीचा गोळा उसावर पडला. अर्जदार यांचे एक हेक्टर उभा ऊस जळून खाक झाला, गैरअर्जदार यांना त्यांची सूचना दिली. नंतर यांचा पंचनामा करण्यात आला. त्याप्रमाणे नूकसान रु.1,35,000/- चे झालेले आहे व त्यांस लागवडीसाठी लागलेला खर्च रु.40,000/-, मानसिक ञास रु.5,000/- असे एकूण रु.1,80,000/- चे नूकसान झाले ते गैरअर्जदाराने भरुन दयावे म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपला जवाब दाखल केला आहे. अर्जदाराला कोणतीही सेवेत कमतरता दिलेली नाही. जाणूनबूजून खोटी फिर्याद दाखल केलेली आहे. तक्रार ही कार्यालयीन पदनामाने दाखल केलेली आहे. विज कायदा कलम 138 मध्ये वैयक्तीक पदनामाने कारवाई होऊ शकत नाही. अर्जदारानी तक्रारीत नोंदविल्याप्रमाणे डिपी मधून केबल फयूल चांगलया प्रतिचा नसल्यामूळे अनेकवेळा तेथे शॉटसर्किट होत असते हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. कनिष्ठ अभिंयता यांचेकडे तक्रार केली व त्यांने निष्काळजीपणा केला हे ही म्हणणे खोटे आहे. दि.23.11.2007 रोजी डिपीमध्ये शॉर्टसर्किट मूळे आग लागली व तो गोळा उसावर पडला हे म्हणणे गैरअर्जदार यांनी अमान्य केले आहे. अर्जदाराचे रु.1,35,000/- चे नूकसान झाले हे ही म्हणणे अमान्य केले आहे. अर्जदाराने पूढे असे मान्य केले आहे की, महापूरामूळे त्यांचे पिकाचे नूकसान होत असते. सततच्या नापीकीमूळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली अशा प्रकारचे कोणतेही नूकसान झाले नाही. अर्जदाराच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा ऊस जळाला परंतु जळीत ऊस हा कारखान्या विक्री केलेला आहे त्यांना त्याबददल मावेजा सूध्दा मिळालेला आहे म्हणजे संपूर्ण ऊस जळालेला नाही. विज कंपनीकडून रक्कम उकळावी म्हणून एक बनावट प्रकरण दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराने कोणतीही सेवेत कमतरता केलेली नाही म्हणून तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय होय. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी ते शेतकरी असल्याबददल व सर्व्हे नंबर 269 मध्ये कामारी येथे त्यांची शेती असल्याबददल गांव नमूना 7 दाखल केला आहे. याप्रमाणे ते शेतकरी असल्याबददल संशय नाही. अर्जदाराच्या शेतीमध्ये डिपीची सत्य परिस्थिती समोर येण्यासाठी अर्जदाराने त्यांचे फोटो दाखल केलेले आहेत. या फोटोप्रमाणे फयूज किटकॅट काढलेले व वायर वरुन उघडे दिसतात. शेतामध्ये ऊस लावला याबददल सहकारी साखर कारखाना यांचे ऊस लागवडी बददल रिपोर्ट तसेच शासनास महसूल दिल्यासंबंधीची पावती अर्जदाराने दाखल केली आहे. अर्जदार ग्राहक असल्याबददलचा पूरावा म्हणून त्यांनी विज देयक दाखल केलेले आहे. अर्जदाराच्या शेतात ऊस होता यांची नोंद रेकॉर्डप्रमाणे अहवाल दिनांक 12.2.2008 यामध्ये क्षेञ 1 हेक्टर वर्ष 2007-08 ऊसाची लागवड असल्याबददलचे प्रमाणपञ व ऊस जळाला असल्यामूळे अयोग्य म्हणून कारखान्याने ऊस गाळपासाठी नेला नाही यासाठी दि.25.10.2008 रोजी प्रमाणपञ दिले ते अर्जदाराने दाखल केले आहे. अर्जदाराच्या शेतामध्ये ऊस होता हे कारखान्याने दिलेल्या पञावरुन दिसून येते व तो जळाला होता हे सिध्द होते. दि.23.11.2007 रोजी अर्जदाराचा ऊस जळाला याबददलचा घटनास्थळ पंचनामा दि.6.2.2008 रोजी करण्यात आला तो पंचनामा दि.18.2.2008 रोजी पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन हिमायतनगर यांचे नांवाने दिलेला अर्ज दाखल केला आहे. विद्यूत निरिक्षकाच्या पञावरुन हे स्पष्ट होते की अर्जदाराच्या शेतामध्ये ऊस होता व तो शॉर्टसर्किट मूळे जळाला होता हे स्पष्ट होते. डि.पी.चे LT Cable इन्सुलेशन जुने कूजून झाले व शार्टसर्कीट झाले, आगीचे ठीणग्या पडुन वाळलेला ऊसाचा पाचोरा ते पेट घेतला व आग लागली असे निरक्षण केले. त्याआधी दि.27.11.2007 रोजी तहसिलदार यांना ऊस जळाल्याबददल अर्जदार यांनी अर्ज दिलेला आहे व त्यांनी दि.27.11.2007 रोजी तलाठी सज्जा यांचे मार्फत पंचनामा केलेला आहे. दि.23.11.2007 रोजी गैरअर्जदार यांचेकडे शॉर्टसर्किटने आग लागून ऊस जळून खाक झाला असे सूचना अर्ज दिलेला आहे. दि.23.11.2007 रोजी तलाठयाने पंचनामा करुन दि.23.11.2007 रोजी तहसिलदार यांना अर्जदाराच्या कामारी येथील शेत सर्व्हे नंबर 269 मधील ऊस विज वितरण कंपनीच्या स्पॉर्किगने एक हेक्टर जळून नूकसान झाले असा अहवाल दिलेला आहे. या पंचनाम्यावर पाच पंचाच्या सहया आहेत.यामध्ये अर्जदाराचा 150 टन ऊस जळाला असून त्यांचे अंदाजे रु.1,35,000/- चे नूकसान झाले आहे असे म्हटले आहे.वरील सर्व कागदपञावरुन व पूराव्यावरुन अर्जदाराचा ऊस गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी मूळे जळाल्याचे सिध्द होते. जळालेला ऊस कारखान्याने घेतला नाही. साधारण एक एकरात 35 ते 40 टन ऊस होतो व त्यांस साधारणपणे रु.800/- चा प्रति टन भाव असावयास पाहिजे. एक हेक्टर म्हणजे 2.50 एकर (2.50 35 म्हणजे जवळपास 87 टन ऊस अंदाजे झाला असता. प्रति टन रु.800/- प्रमाणे म्हणजे रु.70,000/-चे उत्पन्न अर्जदारास झाले असते. म्हणजे रु.70,000/- चे अर्जदाराचे नूकसान झालेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत ऊसाच्या नूकसानीबददल रु.70,000/- व त्यावर ऊस जळाल्याच्या तारखेपासून म्हणजे 23.11.2007 पासून 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत दयावे. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/-व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |