(घोषित दि. 22.09.2011 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या) अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांना आकारण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिला विरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारी नुसार ते वीज महावितरण कंपनीचे ग्राहक असून त्यांचा मीटर क्रमांक 9000021636 असा आहे. अर्जदाराने वीज बिलाचा नियमितपणे भरणा केला असून ऑक्टोबर 2010 मध्ये त्यांना 1,39,945/- रुपयाचे वीज बिल आले जे रिडींग प्रमाणे नाही. जून 2010 मध्ये 50 युनिट वीज वापर असतानाही 9,680/- रुपयाचे बिल आले. ज्याचा भरणा त्यांनी केला. ऑक्टोबर 2010 मध्ये त्यांना एकूण 15650 युनिट वीज वापराचे 1,39,940/- रुपये वीज बिल आकारण्यात आले. याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल घेतली नाही. अर्जदाराने या बिला विरुध्द कायदेशीर नोटीस पाठवूनही गैरअर्जदार यांनी दखल घेतली नाही व वीज बिल दुरुस्त करुन दिले नाही. म्हणून त्यांनी मंचात तक्रार दाखल केली असून वीज बिल दुरुस्त करुन देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिल भरणा केल्याच्या पावत्या, महावितरण कंपनीस दिलेली नोटीस जोडली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदाराच्या बिलाची पाहणी करुन 1,39,940/- रुपयाचे वीज बिल कमी करुन अर्जदारास 56,804/- रुपयाचे बिल ऑक्टोबर 2010 मध्ये दिले आहे. अर्जदारास मार्च 2011 मध्ये योग्य ती आकरणी करुन बिल दिले आहे. अर्जदारास देण्यात आलेली वीज बिले योग्य असल्याचे सांगून त्यांना देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी नसून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून अर्जदार हे त्यांचे ग्राहक आहेत. अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 524080011490 असा असून गैरअर्जदार यांनी बसविलेल्या मीटरचा क्रमांक 9000021636 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जानेवारी 2008 ते जून 2011 या कलावधीचे सी.पी.एल. मंचात दाखल केले आहे. या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्यावर अर्जदाराचा सरासरी वीज वापर खालील प्रमाणे दिसून येतो. जानेवारी 2008 ते डिसेंबर 2008 - 7200 – 6715/12 = 485/12 = 40 युनिट प्रति महिना | जानेवारी 2009 ते डिसेंबर 2009 - 7740 – 7200/12 = 540/12 = 45 युनिट प्रति महिना | ऑक्टोबर 2010 15650 युनिट | नोव्हेंबर 2010 41 युनिट | डिसेंबर 2010 (सरासरीवर अधारित) 2643 युनिट | जानेवारी 2011 (सरासरीवर अधारित) 2643 युनिट | फेब्रूवारी 2011 1111 युनिट | मार्च 2011 135 युनिट |
अर्जदाराच्या वरील वीज वापरावरुन त्याचे जानेवारी 2008 ते सप्टेबर 2010 या काळात सरासरी वीज वापर 40 ते 45 युनिट प्रति महिना असल्याचे दिसून येते. अर्जदाराच्या वीज बिलावर मंजूर तसेच जोडलेला भार हा 20 किलो वॅट (200 वॅट) असा दर्शविला आहे. यावरुन सप्टेंबर 2010 मध्ये गैरअर्जदार यांनी आकारलेले 15650 युनिट वीज वापराचे बिल व त्यापुढील काळातील वीज वापराचे बिल चुकीचे असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात या बाबतीत कोणताही योग्य खुलासा केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे स्थळ पाहणी तसेच मीटर तपासणी देखील केलेली दिसून येत नाही. अर्जदाराने सप्टेबर 2010 मध्ये चुकीचे बिल मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविली पण गैरअर्जदार यांनी यावर देखील कोणताही खुलासा केलेला नाही व नोटीसचे उत्तरही दिलेले नाही. वरील सर्व निरीक्षणावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास सप्टेबर 2010 पासून चुकीच्या वीज बिलाची आकारणी केल्याचे स्पष्ट होते. सप्टेंबर 2000 नंतरच्या कळासाठी अर्जदारास मागील वीज वापराच्या सरासरीवर बिल आकारणी करणे योग्य राहील असे मंचाचे मत आहे. आदेश - अर्जदारास 45 युनिट प्रति महिना या सरासरीच्या आधारावर सप्टेंबर 2010 पासून वीज बिल आकारणी करुन 30 दिवसाच्या आत सुधारीत वीज बिल द्यावे.
- वरील प्रमाणे बिल देताना अर्जदाराने भरलेल्या रकमेची वजावट त्यातून करावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी 500 /- व खर्चाबद्दल रुपये 1,000/- 30 दिवसात द्यावे.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |