Maharashtra

Aurangabad

CC/14/412

Balvant S/o Gangadhar Talegaonkar - Complainant(s)

Versus

Asst Executive Engineer MSEDCl - Opp.Party(s)

Adv

28 Jan 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

________________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-412/2014          

तक्रार दाखल तारीख :-04/09/2014

 निकाल तारीख :- 28/01/2015

________________________________________________________________________________________________

                           श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                        श्री.के.आर.ठोले,सदस्‍य.

________________________________________________________________________________________________                                    

 

बळवंत गंगाधर तळेगांवकर,

आर.एम.50/4, सावरकर कॉलनी, बजाजनगर,

औरंगाबाद 431 116                                ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

सहारूयक अभियंता,

म.रा.वि.वि.कं.मर्या. उपविभाग ग्रामीण, औरंगाबाद

गरवारे स्‍टेडीयम समारे, नारेगांवरोड, औरंगाबाद             ........ गैरअर्जदार 

________________________________________________________________________________________________

गैरअर्जदारातर्फे  – अॅड. एकतर्फा​


निकाल

 (घोषित द्वारा श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

          तक्रारदाराने वडगाव कोल्हाटी येथे घर विकत घेतले. त्याने दि.13/12/13 रोजी रु.12600/- इतके वीज  बिल भरले. त्या वीज बिलामध्ये मिटरचे रीडिंग दाखवलेले नव्हते. त्याने  दि. 25/4/14 रोजी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून वाढीव बिलाबाबत चौकशी केली. परंतु त्याचे उत्तर आले नाही. मीटर तक्रारदाराच्या नावावर करताना दि.12/6/14 रोजी रु. 2610/- इतकी वीज बिलाची रक्कम त्याने  भरली. दि.12/6/14 रोजी मिटरचे inspection करून रिपोर्ट दिला. त्यात 2153 यूनिट वीज वापर दाखवलेला आहे. दि.2/7/14 रोजी मीटर बदलण्यात आले. त्यादिवशी मिटरचे रीडिंग 2197 इतके होते. परंतु मीटर मधील जोडणी उलट सुलट केल्यामुळे सर्विस वायर जळाले. दि.9/7/14 रोजी तक्रारदाराने  पुन्हा माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली पण  ती मिळाली नाही. तक्रारदाराने चुकीच्या वायरिंग मुळे सर्विस वायर जळाले.  त्यामुळे त्याला  नवीन सर्विस वायरचा खर्च करावा लागला त्याबाबत  नुकसान भरपाईची मागणी केली आहे व दर महिन्याला नियमानुसार वीज बिल मिळण्याची मागणी आहे.

 

          गैरअर्जदारास नोटिस देऊन देखील ते गैरहजर राहिले त्यामुळे त्यांच्या विरूद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.

 

          आम्ही तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार आणि दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले.

 

          तक्रारदाराने दाखल केलेले घराचे खरेदी खत दि.4/4/14 चे आहे. परंतु प्रत्यक्षात तो  केंव्हापासून त्या ठिकाणी राहता आणि विजेचा वापर करतो याचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही. त्यांनी दि.13/12/13 रोजी रु.12600/- इतके वीज बिल भरलेले आहे.  तक्रारदारास दर महिन्याला नियामानुसार वीज बिल मिळत नाही अशी त्याची तक्रार आहे. दि.12/6/14 रोजी मिटरचे inspection केले त्या वेळेस मिटरचे रीडिंग 2153 इतके होते. दि.2/7/14 रोजी नवीन मीटर बसवले. त्यादिवशी मिटरचे रीडिंग 2197 इतके होते म्हणजे तक्रारदाराचा वीज वापर   2197-2153= 44 यूनिट इतका  आहे. तक्रारदाराने जानेवारी 2014 ते जून 2014 पर्यंतचे वीज बिल रु.2610/- इतके भरले आहे. गैर अर्जदाराने दर महिन्याला नियमानुसार मीटरचे रीडिंग घेऊन वीज बिल देणे बंधनकारक असताना त्यांनी  6 महिन्याचे एकत्रित वीज बिल देऊन  सेवेमध्ये त्रुटी दिली आहे. तसेच त्या वीज बिलावर मीटरचे रीडिंग देखील उपलब्ध नाही.

 

          वरील निरीक्षणावरून, तक्रारदारास जानेवारी 2014 ते जानेवारी 2015 पर्यन्त प्रति महिना 44 यूनिट इतक्या वीज वापराचे वीज बिल देणे योग्य राहील. तक्रारदाराने आजपर्यंत  भरलेली रक्कम वजा करावी व यापुढील कालावधीकरिता  दर महिन्याला मिटरचे रीडिंग घेऊन नियमांनुसार वीज बिल द्यावे, असे आमचे मत आहे. 

 

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.

 

आदेश

 

  1. गैरअर्जदारास आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत, तक्रारदारास जानेवारी 2014 ते जानेवारी 2015 पर्यन्तच्या कालावधीकरिता वीज वापर प्रति महिना 44 यूनिट प्रमाणे गृहीत धरून वीज बिल द्यावे. तक्रारदाराने जानेवारी 2014 ते जानेवारी 2015 पर्यन्त भरलेली रक्कम एकूण वीज बिलाच्या रकमेतून वजा करावी. तसेच त्या वीज बिलावर कोणतेही व्याज अथवा दंड आकारण्यात येऊ नये. 
  2. गैरअर्जदारास आदेश देण्यात येतो की, त्यांनी या पुढील कालावधीकरिता मिटरचे रीडिंग घेऊन नियमानुसार वीज बिल द्यावे.
  3. गैरअर्जदारास आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.500/- व ह्या कार्यवाहीच्या खर्चाचे रु.300/- बँक DD च्या स्वरुपात द्यावे.           

 

         

 

(श्रीमती संध्‍या बारलिंगे)        (श्री.किरण.आर.ठोले)       (श्री.के.एन.तुंगार)

सदस्‍या                           सदस्‍य                               अध्‍यक्ष

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.