Maharashtra

Beed

CC/14/57

Dr Shrad Madhukar Pawar - Complainant(s)

Versus

Asst Engineer,M.S.E.D.C.Majalgaon - Opp.Party(s)

29 Oct 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/57
 
1. Dr Shrad Madhukar Pawar
R/o Pawar Hospital, Near New busstand, Main Road Majalgaon
Beed
...........Complainant(s)
Versus
1. Asst Engineer,M.S.E.D.C.Majalgaon
Majalgaon
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                      निकाल

                       दिनांक- 29.10.2014

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष )

 

           तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी दयावयाचे सेवेत  त्रूटी ठेवली आहे म्‍हणून  नुकसान भरपाई मिळणेसाठी व खंडीत केलेला विद्यूत पुरवठा पूर्ववत चालू करुन देण्‍याचा आदेश मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे आहे,तक्रारदार हे व्‍यवसायाने डॉक्‍टर आहेत. तक्रारदार यांचे माजलगांव येथे पवार हॉस्‍पीटल नांवाचे हॉस्‍पीटल आहे. तक्रारदार यांची पत्‍नी हया सूध्‍दा व्‍यवसायाने डॉक्‍टर आहेत. तक्रारदार हे बालरोग तज्ञ म्‍हणून हॉस्‍पीटल चालवतात. त्‍यांची पत्‍नी सौ.अर्चना पवार हया डोळयाचे हॉस्‍पीटल चालवतात. तक्रारदार यांनी माजलगांव नगर परिषद हददीतील सर्व्‍हे नंबर 380 मधील नवीन बस स्‍थानका शेजारी घर वैद्यकीय व्‍यवसायासाठी गिरजाबाई गणपत डाके यांचेकडून खरेदी केले. सदरील मिळकतीत तक्रारदार यांनी पवार हॉस्‍पीटल या नांवाने वैद्यकीय व्‍यवसाय सूरु केला. तक्रारदार यांनी सदरील मिळकत खरेदी करण्‍याचे अगोदर त्‍याठिकाणी गिरीजा निलायम नांवाचे रेस्‍टॉरंट व बार होते. त्‍या जागेचे मालक गणपत डाके होते. गणपत डाके यांचे थ्री फेज मिटर ज्‍यांचा ग्राहक क्र.585010068124 होता. तक्रारदार  यांनी सदरील इमारत खरेदी करते वेळस सदरहू मिटर चालू होते. तक्रारदार यांनी सदरील इमारत खरेदी करण्‍याचे अगोदर पूर्वीचे मालक गणपत डाके व सामनेवाले यांचेत मिटर रिंडींग बाबत ग्राहक मंचात तक्रार चालू होती. तक्रारदार यांनी सदरील मिळकत विकत घेतली त्‍यावेळी ते प्रकरण न्‍यायप्रविष्‍ठ होते. तक्रारदार यांनी सदरील ग्राहक नंबरच्‍या विद्यूत मिटरचे बिल वेळोवेळी दूरुस्‍त करुन भरणा केले आहे. जूलै 2008 मध्‍ये तक्रारदाराने सदरील मिटर त्‍यांचे नांवे ट्रान्‍सफर करुन दयावे असा मागणी अर्ज केला.  सामनेवाले यांनी अद्यापपावेतो मिटर तक्रारदाराचे नांवावर ट्रान्‍सफर करुन दिले नाही.  सदरील मिटर बाबत कोर्टात वादचालू असल्‍याने तो वाद मिटल्‍यानंतर मिटर ट्रान्‍सफर करुन देऊ असे सांगण्‍यात आले.

            डिसेंबर 2013 पर्यत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना विद्यूत बिलाचा भरणा केला आहे. तसेच दि.07.11.2012 ते 30.12.2013 पर्यत विद्यूत बिलाचा एकूण भरणा रक्‍कम रु.1,51,070/- भरणा केलेला आहे. डिसेंबर 2013 मध्‍ये मिटरची रिंडीग 42632 अशी विद्यूत बिलात नमूद करण्‍यात आली होती परंतु प्रत्‍यक्षात मिटर रिंडीग 41929 अशी होती जानेवारी 2014 मध्‍ये विद्यूत बिलात चालू रिंडीग 44199 दर्शवली होती परंतु प्रत्‍यक्षात मिटर रिंडीग 42513 होती. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना मिटरचे रिंडीग प्रमाणे बिल दयावे अशी विनंती केली. सामनेवाले यांचे कर्मचारी यांनी प्रत्‍यक्ष जागेवर येऊन मिटरची पाहणी करुन दि.20.03.2014 रोजी अहवाल तयार केला. अहवालानुसार बिल दूरुस्‍त करुन देण्‍याची विनंती तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे केली. सामनेवाले मिटर रिंडीग प्रमाणे बिल दिले नाही. सामनेवाले क्र.1 यांनी दूरुस्‍त बिल न देता दि.28.3.2014 रोजी तक्रारदार यांना कोणतीही पूर्व सूचना न देता वापरत असलेल्‍या मिटरचा विद्यूत पुरवठा खंडीत केला. तक्रारदार हे मिळकत खरेदी केली त्‍या दिवशीपासून मिटरचा उपभोग घेत आहेत. तक्रारदार हा विद्यूत मिटरचा उपभोक्‍ता आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही नोटीस न देता अनाधिकृतपणे विद्यूत पूरवठा खंडीत केला आहे. तक्रारदार व त्‍यांची पत्‍नी व्‍यवसायाने डॉक्‍टर असून तक्रारदार यांचे बालरुग्‍णालय आहे. तक्रारदार यांचे हॉस्‍पीटलमध्‍ये ओपीडी रुग्‍ण येतात तसेच बालरुग्‍ण हे शरीक असतात. बालरुग्‍णासाठी तापमान नियंत्रण पेटी वापरत होते. तक्रारदार यांची पत्‍नी नेत्रतज्ञ असून त्‍या संजय सोळंके नांवाने ट्रस्‍ट चालवतात. परिसरातील गरीब नेत्र रुग्‍णांची मोफत तपासणी करुन त्‍यांचे डोळयाचे ऑपरेशन मोफत करतात.  सामनेवाले हयांनी विद्यूत पूरवठा खंडीत केल्‍यामुळे तक्रारदार यांचे हॉस्‍पीटलचे कामकाजामध्‍ये फार मोटा परिणाम झाला आहे. तक्रारदार यांनी विद्यूत पूरवठा पूर्ववत चालू करावा अशी वारंवार विनंती केली. तसेच मिटर रिंडीग प्रमाणे विज बिल दयावे अशीही विनंती केली. सामनेवाले  यांनी त्‍यांस नकार दिला. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांना मिटर रिंडीग प्रमाणे विज देयके दयावीत व खंडीत केलेला विद्यूत पुरवठा त्‍वरीत चालू करुन देण्‍याचे निर्देश देण्‍यात यावेत अशी विंनती केली आहे.  तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे.

 

            सामनेवाले क्र.1 व 2 हे या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.39 वर लेखी म्‍हणणे सादर केले. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन नाकारलेले आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार हे त्‍यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी त्‍यांचे नांवे विद्यूत कनेक्‍शन करुन  दयावे या बाबत सामनेवाले यांचेकडे कधीही अर्ज दिलेला नाही. सामनेवाले यांचे कथन की, सदरील विद्यूत कनेक्‍शनवर विज चोरीची मोठया प्रमाणावर थकबाकी आहे त्‍यामुळे विज कनेक्‍शन खंडीत करण्‍यापूर्वी नोटीस देण्‍याची आवश्‍यकता नाही. तक्रारदार यांनी सदरील जागा विकत घेतली असल्‍यास पुर्वीचे थकीत विज देयक भरुन नियमाप्रमाणे सामनेवाले यांचेकडे अर्ज देऊन मिटर तक्रारदार यांचे नांवावर करणे गरजेचे होते. तसे तक्रारदार यांनी केले नाही. तक्रारदार यांचा विद्यूत पुरवठा नियमानुसार खंडीत केलेला आहे. सदरील मिटर बाबत मा. राज्‍य आयोग, ख्ंडपीठ औरंगाबाद येथे अपिल नंबर 773/2007  प्रलंबित होता. सदरील अपिल हे दि.23.11.2011 रोजी निकाली निघाला आहे.अपिल मंजूर करुन तक्रारदार यांची तक्रार रदद ठरवली आहे. सदरील निकाला विरुध्‍द अपिल दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी पूर्वीचे मालक यांचेकडून संमतीपत्र घेऊन व आवश्‍यक ते दस्‍त हजर करुन विद्यूत कनेक्‍शन स्‍वतःचे नांवे करुन घेतले नाही. तक्रारदार हा ग्राहक नसल्‍यामुळे त्‍यांस नोटीस पाठविण्‍याची आवश्‍यकता नाही. सदरील विद्यूत कनेक्‍शन हे गणपत डाके यांचे नांवावर व्‍यापारी व वाणिज्‍य तत्‍वासाठी म्‍हणजेच हॉटेल व्‍यवसायासाठी दिलेले होते. सदरील विद्यूत कनेक्‍शन हे व्‍यापारी कारणासाठी असल्‍यामुळे त्‍या बाबत तक्रार या मंचापूढे चालू शकत नाही. सदरील विद्यूत मिटरचा वापर बेकायदेशीरपणे होत असल्‍यामुळे व विज चोरी होत असल्‍यामुळे विद्यूत कायदयाचे कलम 126, 135 प्रमाणे देयक देण्‍यात आलेले आहे. भारतीय विद्यूत कायदा कलम 145 अन्‍वये तक्रार या ग्राहक मंचापूढे चालू शकत नाही. सदरील विद्यूत कनेक्‍शनवर  एकूण थकबाकी रक्‍कम रु.1,69,888/- होती. सदरील थकबाकी भरण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे. सामनेवाले हे पुर्वी सौदागर अब्‍दूल मुनीज व सौदागर अब्‍दूल बारवी यांचे जागेत जून्‍या बस स्‍टॅण्‍ड समोर हॉसपीटल चालवित होते. सदरील हॉस्‍पीटल साठी ग्राहक क्र.585010254688 हे विद्यूत कनेक्‍शन घेतले होते. सदरील विद्यूत कनेक्‍शन तक्रारदार यांनी नवीन जागेत बेकायदेशीररित्‍या हस्‍तांतरीत केले. सदरील मिटर ट्रान्‍सफर करण्‍यासाठी तक्रारदार यांनी कोणताही अर्ज दिला नाही. सदरील विद्यूत कनेक्‍शन बाबत तक्रारदार यांनी माजलगांव येथील दिवाणी न्‍यायालयात दावा दाखल केले आहे. सदरील दावा प्रलबित आहे. तक्रारदार यांनी नि.5 तूर्तातूर्त मनाई हूकूम मिळण्‍याचा अर्ज दाखल केला आहे. सदरील अर्ज न्‍यायालयाने नामंजूर केलेला आहे. तक्रारदार हे स्‍चच्‍छ हाताने या मंचापूढे आलेले नाही. सदरील विद्यूत कनेक्‍शनवर मोठया प्रमाणात थकबाकी असल्‍यामुळे विद्यूत कंपनीच्‍या आयोगाकडे तक्रार करावयास पाहिजे. तक्रारदार यांनी तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडले नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्‍यात यावी.

 

              तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्‍ताऐवज व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्‍ताचे अवलोकन केले. तक्रारदाराचे वकील श्री.देशमूख व सामनेवाले यांनी वकील श्री. पाटील यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

            मुददे                                                उत्‍तर

1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विद्यूत पुरवठा खंडीत करुन

      सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ?        नाही. 

2.    तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली दाद मिळण्‍यास पात्र आहेत

      काय ?                                                       नाही

3.    काय आदेश ?                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः-

 

            तक्रारदार व सामनेवाले यांनी या मंचासमोर आणलेल्‍या वस्‍तूस्थिती विचार करता तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये खालील बाबीविषयी वाद नाही.

 

            तक्रारदार हे व्‍यवसायाने डॉक्‍टर असून ते पवार हॉस्‍पीटल या नांवाने सर्व्‍हे नंबर 380 नवीन बस स्‍टॅण्‍ड शेजारी माजलगांव येथे दवाखाना चालवतात. तक्रारदार यांनी सदरील मिळकत गिरजाबाई गणपत डाके यांचेकडून दि.7.5.2008 रोजी खरेदी घेतली. सदरील मिळकती पूर्वी गिरजा निलायम नांवाचे रेस्‍टॉरंट व बार चालू होते.पूर्वीचे मालक गणपत डाके यांनी सामनेवाले यांचेकडून थ्रि फेज  मिटर ज्‍यांचा नंबर 585010068124 असा होता.  तक्रारदार यांनी सदरील मिळकत  खरेदी केले त्‍यावेळी विद्यूत मिटर चालू होते. तक्रारदार यांनी सदरील मिळकत विकत घेतल्‍यानंतर विद्यूत मिटर त्‍यांचे नांवे करुन देण्‍यासाठी रितसर अर्ज दिला नाही व पूढे त्‍या विद्यूत मिटरचा ते उपयोग घेत होते. जागेचे पूर्वीचे मालक गणपत डाके व सामनेवाले यांचेमध्‍ये विज बिलावरुन वाद उपस्थित झाला होता. डाके यांनी या मंचासमोर तक्रार क्र.149/2006 दाखल केली होती. जिल्‍हा ग्राहक मंचाने सदरील डाके यांची तक्रार मान्‍य केली व बिल दि.26.9.2006 रोजीचे रदद केले. सदरील निकालावर नाराज होऊन सामनेवाले यांनी महाराष्‍ट्र राज्‍य वाद निवारण आयोग,मुंबई परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचे प्रथम अपिल नंबर 523/2007 दाखल केले. सदरील अपिलाचा निर्णय दि.23.11.2011 रोजी देण्‍यात आले. सामनेवाले यांनी दाखल केलेले अपिल मंजूर करण्‍यात आले व बीड जिल्‍हा ग्राहक मंचाने तक्रार क्र.149/2006 मध्‍ये दिलेले निकाल रदद करण्‍यात आले. सदरील डाके यांची तक्रार रदद करण्‍यात आली.

 

            तक्रारदार यांचे वकील श्री.देशमूख यांनी असा यूक्‍तीवाद केला की, डाके कूटूंबियाकडून सदरील मिळकत विकत घेतली आहे. मिटर जरी उाके यांचे नांवावर असले तरी तक्रारदार हे नियमित विज देयक भरीत आलेले आहेत. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. केवळ तक्रारदार यांचे नांवे विद्यूत मिटर नाही या कारणास्‍तव तक्रार रदद करता येणार नाही. सदरील विद्यूत वापर तक्रारदार यांनी केलला आहे. तक्रारदार यांनी बिले भरलेली आहेत. त्‍यामुळे तक्रारदार हे सदरील स्‍वतःचे लाभधारक असल्‍यामुळे ते ग्राहक या संज्ञेत मोडतात. सदरील यूक्‍तीवादाचे प्रित्‍यर्थ तक्रारदार यांनी महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई यांनी प्रथम अपिल नंबर 953/2010 मध्‍ये दिलेले रिलायन्‍स एनर्जी लि.  विरुध्‍द राजन अग्रवाल  या निकालाचा हवाला दिला. सदरील तक्रारीमध्‍ये निकालाच्‍या पॅरा नंबर 7 मध्‍ये असे नमूद करण्‍यात आले आहे की,

 

                        “ Electricity connection taken in the name of builder for the benefit of complainant and the premises of f the said flat and over all, the electricity bill was paid by the complainant.  In fact, the complainant is a beneficiary for whom the said electricity connection was taken and thus the complainant is consumer ” 

 

                        तक्रारदार यांचे वकिलांनी पूढे असा यूक्‍तीवाद केला की, पूर्वीचे मालक श्री.डाके व सामनेवाले यांचे मध्‍ये  बिला बाबत जो वाद होता त्‍यांचेशी तक्रारदार यांचा कोणताही संबंध नाही. सदरील विज वापर हा श्री. डाके यांनी केला होता. ते विज बिल त्‍यांचेकडून वसूल करावयास पाहिजे. सामनेवाले यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता सदरील विद्यूत कनेक्‍शन हे दि.28.3.2014 रोजी कोणतीही नोटीस न देता खंडीत केले आहे. सदरील बाब ही बेकायदेशीर असून सेवेत त्रूटी ठेवणारी आहे.तक्रारदार हे सदरील जागेत हॉस्‍पीटल चालवतात. तक्रारदार यांना जनरेटर लावून हॉस्‍पीटीमध्‍ये विज पूरवठा करावा लागला. त्‍याकामी तक्रारदार  यांना मोठा खर्च करावा लागला. थकीत विज देयक हे पूर्वीच्‍या मालकाकडून वसूल करावयास पाहिजे, ते तक्रारदार देणे लागत नाही.

 

            तक्रारदार यांनी या मंचाचे लक्ष मे.इशा मार्बल्‍स   विरुध्‍द बिहार स्‍टेट इलेक्‍ट्रीसिटी बोर्ड   1995  एससीसी (2) 648, जेटी 1995 (2) 626   या न्‍यायनिर्णयावर वेधले.  मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने मिळकत  विकत घेणारा हा मिळकत विकत घेण्‍याचे अगोदरचे विज देयक देणे लागत नाही असे निर्देश दिले आहेत. 

            तसेच तक्रारदार यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की,तक्रारदार यांनी मिळक्‍त घेतल्‍यानंतर मिटर त्‍यांचे नांवे वर्ग करण्‍यासाठी अर्ज दिला होता पंरतु मिटर त्‍यांचे नांवे करण्‍यात आले नाही. तक्रारदार हे तक्रारीत केलेी मागणी मिळण्‍यास पात्र आहेत.

 

            सामनेवाले यांनी वकील श्री. पाटील यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे तक्रारीतील स्‍वरुप पाहता ते विद्यूत देयक या कारणासाठी आहे.  विद्यूत देयक हे नियमाप्रमाणे कमी करुन दिलेले आहेत. सदरील कनेक्‍शन हे पूर्वीचे मालक गणपत डाके यांनी बिअरबार व परमिट रुम म्‍हणजे हॉटेल बिझनेससाठी घेतले होते. सदरील मिटर हे व्‍यापारी कारणासाठी वापरले जात होते. तक्रारदार यांनी ती मिळक्‍त घेतल्‍यानंतर रितसर अर्ज देऊन मिटरच्‍या स्‍वरुपात बदल केलेला नाही. सदरील मिटर हे व्‍यापारी कारणासाठी देण्‍यात आले होते व त्‍यांचा वापर पूढे तसाच सूरु ठेवला आहे. सदरील विज पूरवठा हा व्‍यापारी कारणासाठी केलेला असल्‍यामुळे  तक्रारदार यांची तक्रार या मंचापूढे चालू शकत नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी पूढे असा यूक्‍तीवाद केला आहे की, श्री. डाके यानी या मंचासमोर तक्रार दाखल केली होती. त्‍या बाबत सामनेवाले यांनी मा.राज्‍य ग्राहक वाद निवारण्‍ आयोग, मुंबई यांचे परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे अपिल दाखल केले होते. सदरील अपिल मंजूर करण्‍यात आले व डाके यांची तक्रार रदद करण्‍यात आली. सदरील विज देयकाचा वाद हा विज चोरीच्‍या बिला बाबत आहे. त्‍यामुळे हया मंचास तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी या मंचासमोर  मिळकत  विकत घेतल्‍यापासून ते वाद उपस्थित होईपावेतो वेळोवेळी बिल भरलेले आहेत असे कथन केले आहे. त्‍यासंबंधी विज देयके दाखल केलेली नाहीत. तक्रारदार यांचे कडे निव्‍वळ थकबाकीची रक्‍कम दि.21.2.2014 पावेतो रु.2,99,890/- इतकी येते. तक्रारदार हे स्‍वतः निष्‍काळजी असल्‍यामुळे व सदरील मिटर हे व्‍यापारी कारणासाठी पूर्वीचे मालकाने घेतले असल्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.

 

            तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व सर्व दस्‍त यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले.तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या शपथपत्र व दस्‍ताचे अवलोकन केले. विद्यूत ग्राहक नंबर 585010068124 हे मिटर गणपत डाके यांचे नांवे हॉटेल गिरीजा निलायम व्‍यापारी कारणासाठी घेतले होते. सदरील डाके यांनी मिळकत तक्रारदार यांना विकली आहे व तक्रारदार यांनी त्‍याठिकाणी रुग्‍णालय सूरु केले आहे. तक्रारदार यांनी सदरील मिटर त्‍यांचे नांवे ट्रान्‍सफर करुन घेण्‍यासाठी कोणताही अर्ज सामनेवाले यांचेकडे अद्यापपावेतो दिलेला नाही व मिटर ट्रान्‍सफर करुन घेतलेले नाही. तसेच  मिटर वापराची पध्‍दतही बदलून घेतलेली नाही. सदरील मिटर व्‍यापारी कारणासाठी दिले असल्‍याने त्‍यांचे स्‍वरुप बदलून घेण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर होती. सदरील कनेक्‍शन हे मूळ मालक डाके यांना दिल्‍यामुळे  व त्‍यांचा वापर व्‍यापारी कारणासाठी होत असल्‍यामुळे सदरील सेवा ही व्‍यापारी कारणासाठी देण्‍यात आली होती त्‍या कारणास्‍तव सदरील तक्रार या मंचात चालविण्‍यास पात्र नाही.

 

            तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या बाबीच्‍या संदर्भात माजलगांव दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ठ  स्‍तर यांचे न्‍यायालयात रेग्‍यूलर दिवाणी दावा नंबर 130/2014 दाखल केला होता. त्‍या दाव्‍यामध्‍ये नि.5 चा अर्ज देऊन तूर्तातूर्त मनाई हूकूल मिळणे बाबत विनंती केली. सदरील अर्जावर सुनावणी होऊन मा.दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ठ सतर माजलगांव यांना तक्रारदार यांनी दिलेला अर्ज रदद ठरवलेला आहे. सदरील डाके यांचे नांवावर असलेले मिटरचा विज पुरवठा  हा सामनेवाले यांनी दि.28.3.2014 रोजी खंडीत केलेला आहे. सदरील डाके यांनी विद्यूत देयकाचा वाद उपस्थित करुन या मंचासमोर तक्रार क्र.149/2006 दाखल केली होती. सामनेवाले यांनी या मंचाने दिलेल्‍या न्‍यायनिर्णयाचे विरुध्‍द महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोग, मुंबई यांचे परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे प्रथम अपिल नंबर 773/2007 दाखल केले होते. सदरील अपिल मंजूर करण्‍यात आले व डाके यांनी दाखल केलेली तक्रार पूर्णतः रदद करण्‍यात आली. त्‍या निर्णयाची प्रत सामनेवाले यांनी या मंचासमोर दाखल केली आहे. सदरील न्‍यायनिर्णयाचा विचार केला असता डाके व सामनेवाले यांचेतील वाद हा विद्यूत चोरी बाबत होता. सदरील कृती ही विद्यूत कायदा कलम 136,140 व 150 अंतर्गत येते व सदरील बाब ही विशेष न्‍यायालय कि जे न्‍यायालय  कलम 153 ने  स्‍थापन केलेले आहे.

 

            वर नमुद केलेले सर्व बाबीचा विचार काता सदरील मिटर व्‍यापारी कारणासाठी घेतले आहे व त्‍यांचा वयापार हा व्‍यापारी कारणासाठी होत होता. तक्रारदार यांनी मिटर वापराचे स्‍वरुप बदलून घेतली नाही तसेच ते मिटर स्‍वतःचे नांवे करण्‍याकामी कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार हे स्‍वतः निष्‍काळजीपणे वागले. त्‍यामुळे सामनेवाले यांनी घेतलेली कृती ही तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी आहे असे म्‍हणता येणार नाही.

 

            या मंचात तक्रार दाखल झाल्‍यानंतर तक्रारदारीचे स्‍वरुप पाहता व विशेषतः तक्रारदार हे रुग्‍ण सेवा करतात व हॉस्‍पीटल चालवतात  या बाबीचा विचार करुन तक्रारदार यांना संपूर्ण विज देयक हे दोन हप्‍त्‍यामध्‍ये भरण्‍याची सवलत दिलेली आहे. त्‍यापैकी प्रथम हप्‍ता हा रु.1,00,000/- सामनेवाले यांहचेकउे भरावा व राहिलेली रक्‍कम ही 10 दिवसांचे आंत या मंचासमोर भरावी असे निर्देश दिलेले आहेत. सदरील रक्‍कम भरल्‍यानंतर तक्रारदार यांचा विज पुरवठा पूर्ववत सुरु करावा व तक्रारदार यांना मिटर रिंडीग प्रमाणे देयक दयावे असे निर्देश दिलेले आहेत.  सदरील आदेश हा तात्‍पुरत्‍या स्‍वरुपातील होता. तक्रारदार यांचा विज पुरवठा सूरु करण्‍यात आलेला आहे. तक्रारदार यांनी सर्व विज देयके भरलेली आहे व त्‍यांना विज पुरवठा सूरु करुन देण्‍यात आलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रितसर अर्ज देऊन आणि विज मिटर त्‍यांचे नांवे करुन घेणे गरजेचे आहे. तसेच विज मिटर हे व्‍यापारी कारणासाठी दिले होते त्‍यांचे स्‍वरुप ही बदलून घेणे गरजेचे आहे. त्‍यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रितसर  अर्ज देऊन व कायदेशीर बाबीची पुर्तता करुन मिटर स्‍वतःचे नांहवे करुन घ्‍यावे. तसेच तक्रारदार यांनी या मंचासमोर रु.,100,000/-  भरले आहेत ते सामनेवाले यांना काढून घेण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

 

            सबब, तक्रारदाराचा तक्रारीतील बिला संबंधीचा वाद हा रदद होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                            आदेश

 

            1)  तक्रारदाराची  तक्रार  रदद  करण्‍यात  येत  आहे.          

2)

3)

            4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

               20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

               करावेत.

 

 

 

 

   श्री.रविंद्र राठोडकर         श्रीमती मंजूषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे,

       सदस्‍य                    सदस्‍या                       अध्‍यक्ष

                     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.