Maharashtra

Beed

CC/14/90

Dr Shrad Madhukar Pawar - Complainant(s)

Versus

Asst Engineer,M.S.E.D.C.Co - Opp.Party(s)

Adv S.M.Deshpande

26 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/90
 
1. Dr Shrad Madhukar Pawar
R/o Near New Busstand Main Road Majalgaon
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Asst Engineer,M.S.E.D.C.Co
Majalgaon
Beed
Maharashtra
2. Executive Engineer,M.S.E.D.C.Co
Ambajogai ta Ambajogai
Beed
Maharashtra
3. Chief Executive Engineer M.S.E.D.C.Co Ltd
Divisional Office Latur
Latur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 26.09.2014

              (द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्‍या )

            तक्रारदार डॉ.शरद मधुकर पवार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून विद्युत पुरवठा पुर्ववत चालू करण्‍याबाबत  दाखल केली आहे.

 

      तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे व्‍यवसायाने डॉक्‍टर असून बालरोग तज्ञ आहे. तक्रारदाराची पत्‍नी देखील नेत्र रोग तज्ञ आहे. तक्रारदार व त्‍यांची पत्‍नी मिळून नविन बसस्‍थानक शेजारी माजलगाव येथे पवार हॉस्पिटल  या नावाने दवाखाना चालवतात. तक्रारदाराने सन 2004 मध्‍ये माजलगाव येथे जून्‍या बसस्‍थानकासमोर सौदागर यांचे मालकीचे जागेत हॉस्पिटल भाडयाने घेऊन वैद्यकीय व्‍यवसाय सुरु केला. सदर जागेत सन 2004 मध्‍ये सामनेवाला यांनी तक्रारदाराला ग्राहक क्रमांक 585010254688 ज्‍याचा मीटर क्रमांक 9801572451 डोमेस्‍टीक मिटरचे सिंगल फेजचे विद्युत कनेक्‍शन दिले. तक्रारदाराने सदर मिटरचे विद्युत बिल वेळोवेळी भरणा करत होते. तक्रारदाराने सन 2008 मध्‍ये नगर परिषदच्‍या हददीतील सर्वे नं.380 मधील घर क्रमांक 7 नविन बसस्‍थानका शेजारी राहते घर वैद्यकीय व्‍यवसायासाठी व निवासाकरता  गिरजाबाई गणपत डाके यांचेकडून खरेदी केले. तदनंतर तक्रारदार व त्‍यांच्‍या पत्‍नीने सदर पवार हॉस्पिटल हे खरेदी केलेल्‍या  जागेत वैद्यकीय व्‍यवसाय चालू केला. तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेले मीटर हे खरेदी केलेल्‍या जागेत स्‍थलांतर करुन द्यावे अशी विनंती सामनेवाला यांना केली. तक्रारदाराच्‍या विनंती नुसार सामनेवाला यांनी सदर मीटर हे तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या नविन जागेत बसवून दिले. सन 2008 पासून तक्रारदार हे विद्युत मिटर बिलाचा भरणा वेळोवेळी करत आहे. तक्रारीत नमुद केलेल्‍या मीटर बददल बिलाचा वाद निर्माण झाला. नंतर तक्रारदाराने विद्युत बिलाचे अवलोकन केले असता सदर मीटर हे डोमेस्‍टीक वापराचे असताना सुध्‍दा सामनेवाला यांनी सदर मीटर हे व्‍यावसायीक स्‍वरुपाचे करुन तक्रारदाराकडून वेळोवेळी त्‍याचप्रमाणे व्‍यवसायाप्रमाणे सदर मीटरवर चार्जेस आकारलेले आहे. सबब बाब ही तक्रारदाराने सामनेवाला यांच्‍या निदर्शनास आणून दिल्‍यानंतर सामनेवाला यांनी थोडया दिवसात दुरुस्‍ती  होऊन जाईल असे सांगितले. सदर मीटर हे कमर्शियल नसून डोमेस्‍टीक असल्‍याबाबतचा आदेश प्राप्‍त करणे योग्‍य आहे.

            सामनेवाला यांनी दि.15.01.2014 पासून ते 15.02.2014 पर्यंतचे विद्युत देयक क्रमांक 585010254688 चा सदर रक्‍कम रु.35,030/- दि.08.03.2014 रोजी तक्रारदाराने दिले. सामनेवाला यांनी विवादीत मिटरचे विद्युत देयक भरणा करण्‍यास झालेल्‍या विलंबामुळे दि.28.03.2014 रोजी कसल्‍याही प्रकारची नोटीस न देता, पुर्वसूचना न देता तक्रारदार यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. तदनंतर त‍क्रारदार यांनी दि.29.03.2014 रोजी विद्युत देयक रक्‍कम रु.35,030/- सामनेवाला यांच्‍याकडे भरणा करुन सदर विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून द्यावा अशी विनंती केली. परंतू अद्यापपर्यंत तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सामनेवाला यांनी जोडून दिलेला नाही. तदनंतर तक्रारदार यांनी माजलगाव येथील दिवाणी न्‍यायाधिश वरिष्‍ट स्‍तर यांच्‍या कोर्टात सामनेवाला विरुध्‍द विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून देण्‍याबाबत मनाई हुकूम आदेश करण्‍याबाबतचा दिवाणी दावा नं.130/2014 दि.01.04.2014 रोजी दाखल केली आहे. त्‍यासोबत तुर्तातूर्त मनाई हुकूमाचा अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांचा दिवाणी दावा क्रमांक 130/2014 या मधील तात्‍पुरता मनाई हुकूमाचा अर्ज दि.15.04.2014 रोजी मा.कोर्टाने नामंजूर केला आहे. सदर आदेशाबाबत तक्रारदार यांनी माजलगाव येथील जिल्‍हा न्‍यायालयात दि.16.04.2014 रोजी अपील नं.9/2014 दाखल केलेले आहे. सदर प्रकरणात दोन्‍ही पक्षाचे युक्‍तीवाद झाल्‍यानंतर प्रकरण हे आदेशासाठी ठेवण्‍यात आले होते परंतू सदर प्रकरणात वेळोवेळी तारखा देण्‍यात आल्‍या असल्‍यामुळे व प्रकरणात एवढा विलंब लागत असेल तर या कोर्टात प्रकरण चालवायचे नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारदाराचे वकील यांनी दि.27.05.2014 रोजी दिवाणी न्‍यायालयाकडे दिवाणी दावा नं.130/2014 काढून घेण्‍याबाबत पुरशिस दाखल केली होती, सदर पुरशिसवर त्‍याच दिवशी मा.कोर्टाने हुकूम केला आहे. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ही दिवाणी न्‍यायालयातील दावा काढून घेतल्‍यानंतर मा.कोर्टात मुदतीत दाखल केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे विद्युत पुरवठा पुर्ववत चालू करण्‍याची वारंवार विनंती केली आहे, तरी सुध्‍दा सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विद्युत पुरवठा चालू केला नाही. सबब तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा पुर्ववत चालू करुन देण्‍याबाबत आदेश करण्‍यात यावा. तसेच सामनेवाला यांचेकडून झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासाबददल नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रारदार यांची तक्रार मंजूर करुन विद्युत पुरवठा पुर्ववत चालू करुन देण्‍याबाबतचा आदेश व्‍हावा. तसेच सामनेवाला यांनी कमर्शियल विद्युत मीटर प्रमाणे आकारलेले जास्‍तीचे विद्युत देयके रक्‍कम प्रमाणे फरकाची रक्‍कम तक्रारदारास परत करण्‍यात यावी. तक्रारदाराचे विवादीत मीटर हे कमर्शियल नसून डोमेस्‍टीक आहे असे घोषित करण्‍यात यावे अशी विनंती केली.

 

           तक्रारदाराने सदर तक्रारीसोबत निशाणी 5 अन्‍वये तुर्तातूर्त विद्युत पुरवठा पुर्ववत चालू करण्‍याचे आदेश करणेबाबत अर्ज दाखल केलेला आहे.

 

            सामनेवाला क्र.1 हे हजर झाले. त्‍यांनी दि.03.07.2014 रोजी दाखल केलेल्‍या पुरशिस अन्‍वये सामनेवाला क्र.1 ते 3 हे विद्युत कंपनीचे कर्मचारी आहे. सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 व 3 साठी हजर होत आहे.

 

       सामनेवाला क्र.1 यांची लेखी कैफियत निशाणी क्र.16 अन्‍वये दाखल केली आहे. सामनेवाला यांचे कथनेनुसार तक्रारदारास दिलेल्‍या विद्युत कनेक्‍शनचा ग्राहक नं. 585010254688 हा सौदागर यांचे मालकीचे जागेत दिलेला आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे विद्युत देयक दिले नाही. विवादीत मीटर हे स्‍थलांतर करण्‍यासाठी कोणताही अर्ज दिलेला नाही. तक्रारदार यांनी बेकायदेशिररित्‍या  विवादीत मीटर हे स्‍थलांतरीत केलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला दिवाणी दावा क्र.130/2014 मा.न्‍यायालयाने सदर दाव्‍यातील मनाई हुकूमाचा अर्ज नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांचे अधिक कथन की, तक्रारदार यांनी बेकायदेशिरपणे विद्युत मीटर स्‍थलांतर केले आहे. पुर्वीच्‍या जागा मालकाच्‍या नावे ज्‍याचा ग्राहक क्रमांक 585010068124 या नंबरच्‍या मीटरवर थकबाकी होती, सदर थकबाकी भरल्‍याशिवाय त्‍या ठिकाणावर दुसरे कोणतीही वीज जोडणी देता येत नाही. तक्रारदार यांनी जूनी थकबाकी बुडवण्‍यासाठी बेकायदेशिरपणे वीज जोडणी स्‍थलांतर केली आहे. तक्रारदार यांचा ग्राहक क्रमांक 585010254688 हे विद्युत कनेक्‍शन तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या जागेत नाही. सदर विद्युत जोडणी ही सौदागर यांचे जागेत घेतलेले आहे. तक्रारदार यांनी बेकायदेशिररित्‍या नविन जागेत मीटर स्‍थलांतर केले आहे. सामनेवाला यांना ज्‍या जागेत विद्युत जोडणी स्‍थलांतरीत करावयाची असती त्‍या ठिकाणच्‍या  विद्युत देयकाची पूर्ण रक्‍कम भरणा झाल्‍याशिवाय तसेच सामनेवाला यांचे नियम व कायद्याप्रमाणे स्‍थलांतरीत करता येत नाही. सामनेवाला यांचे शर्ती व अटी नुसारच नियम व कायद्याप्रमाणे विद्युत कनेक्‍शन स्‍थलांतरीत करता येते. तक्रारदाराने जुन्‍या जागेतील घेतलेले मीटर बेकायदेशिर काढून गणपत मारोती डाके यांचे जागेत बसविले. तसेच सदर मीटरमध्‍ये थ्री फेज मीटर मधून वायर जोडून मीटर विचित्र जोडले आहे. विवादीत मीटर क्रमांक हे डाके यांचेकडून खरेदी केलेल्‍या जागेत घेतलेले नाही व त्‍या जागेत विद्युत पोल वरुन सर्व्हिस वायरद्वारे सामनेवाला यांनी पुरवठा दिलेला नाही. सबब तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा जोडणे व तोडणे याचा प्रश्‍न येत नाही. सामनेवाला यांनी विद्युत क्रमांक 585010068124 चा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तक्रारदार यांनी गिरजाबाई गणपत डाके यांचेकडून सदरचे तीन मजली घर 2008 मध्‍ये विकत घेतलेले आहे, सदर जागेवर मयत कर्नल गणपत मारोती डाके यांनी सामनेवाला यांचेकडून सन 1988 मध्‍ये विद्युत कनेक्‍शन घेतलेले आहे त्‍याचा ग्राहक क्रमांक 585010068124 आहे. तक्रारदार यांनी सदर जागा खरेदी केली त्‍या जागेवर डाके यांना विद्युत कनेक्‍शन दिलेले आहे. तक्रारदाराने या जागेचे खरेदी खत करुन घेतले त्‍यावेळी विद्युत देयक रक्‍कम रु.1,61,336/- बाकी होती. फेब्रुवारी 2014 मध्‍ये या विद्युत देयकाची रक्‍कम रु.3,18,940/- बाकी आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास थकबाकी भरुन तसेच खरेदी खताची कॉपी देऊन, आवश्‍यक कागदपत्र देऊन सदर मीटर आपल्‍या नावावर करुन घ्‍यावे याबाबत वेळोवेळी कल्‍पना दिलेली आहे. तक्रारदार यांनी थकबाकी बुडवण्‍यासाठी सदर तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नोटीस देऊन विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे.

 

            सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदाराने सततचा वैद्यकीय व्‍यवसाय चालू करण्‍यासाठी सौदागर यांचेकडून जागा किरायाने घेतली होती त्‍या ठिकाणी 2004 पासून सामनेवाला यांनी तक्रारदारास 585010254688 या ग्राहक क्रमांकाचे विद्युत मीटर दिलेले आहे. तक्रारदाराने नविन बसस्‍थानकाजवळची जागा खरेदी केल्‍यानंतर त्‍या जागेमध्‍ये असलेल्‍या विद्युत कनेक्‍शनचा पुरवठा डाके यांचे नावे असून सदर विद्युत पुरवठयातून मे 2008 पासून ते 2014 पर्यंत तक्रारदार यांनी वीज वापरलेली आहे. सदर कालावधी दि.20.09.2010 रोजी सामनेवाला यांच्‍या  पथकाने विद्युत जोडणीची व मीटरची तपासणी केली असता मीटर डिस्‍प्‍ले करणे, मीटर जाळणे व नविन मीटर बसवल्‍यावर 6 आठवडयात 464 युनिटचा वापर तक्रारदार यांनी केलेला दिसून येतो. त्‍यावेळेस भरारी पथकाने रक्‍कम रु.51,830/- चा दंड तक्रारदारास आकारला होता, तो तक्रारदाराने भरलेला आहे. तक्रारदाराने केलेली तक्रार ही चुकीची आहे. विद्युत पुरवठा कायदा कलम 82 प्रमाणे सामनेवाला यांचे विरुध्‍द तक्रारदेता येत नाही. तसेच विद्युत कायदा 2003 च्‍या 145 प्रमाणे सदर तक्रार ही मा.मंचात दाखल करता येत नाही. विद्युत कनेक्‍शन हे व्‍यावसायीक कारणासाठी दिले असल्‍यामुळे त्‍या बाबतची तक्रार मा.मंचात करता येत नाही. तक्रारदार हे स्‍वच्‍छ हाताने मा.मंचात आलेले नाही. विद्युत कायदा कलम 42 (5) प्रमाणे सदरची तक्रार ही ग्राहय नाही. सामनेवाला हे खाली नमुद केलेल्‍या न्‍याय निवाडयावर अवलंबून आहे.

1) एम.सी.जे.2014 (1) पान क्र.930

2) सर्वोच्‍च न्‍यायालय भारत, दि.01.07.2013 

  उत्‍तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड व इतर विरुध्‍द अनीस अहमद.

हे दोन केस लॉ दाखल केलेले आहे. सबब तक्रारदार यांचा अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावा. सामनेवाला यांनी लेखी कैफियत सोबत लक्ष्‍मण मारोती वारकरी यांचे शपथपत्र दाखल केले आहे.

 

            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र सामनेवाला यांनी लेखी कैफियत सोबत दाखल केलेले कागदपत्र शपथपत्र याचे अवलोकन केले. दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

           मुददे                                       उत्‍तर

1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा वीज पुरवठा

   पुर्ववत न जोडून तक्रारदार यास सेवा देण्‍यात

   कसूर केला आहे, ही बाब तक्रारदार यांनी

   सिध्‍द केली काय ?                                   नाही. 

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय?                                      नाही.

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे वकीलांनी युक्‍तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. सदर मीटरचे ग्राहक क्र. 585010254688 आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतीही पुर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तक्रारदार हे व्‍यवसायाने डॉक्‍टर आहे. विद्युत पुरवठा खंडीत केल्‍यामुळे त्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच दवाखान्‍यातील विशेष सुविधा हे आलेल्‍या पेशंटना देऊ शकत नाही. त्‍यामुळे व्‍यवसायाचे पण नुकसान होत आहे व लोक सेवेपासून वंचित आहे. तक्रारदार यांनी नियमितप्रमाणे वीज देयकाचा भरणा केलेला आहे. तक्रारदार यांनी वीज देयके भरुन सुध्‍दा सामनेवाला यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

            सामनेवाला यांचे वकीलांनी युक्‍तीवाद केला की, तक्रारदार याने ग्राहक क्र. 585010254688 हे सदरील मीटर चुनूम्‍मा  मैदानात जुन्‍या   बसस्‍थानकासमोर सौदागर अब्‍दूल मुजीद यांचे मालकीच्‍या घरामध्‍ये स्‍वतःच्‍या नावे विद्युत पुरवठा घेतला होता त्‍या ठिकाणी तक्रारदार हे हॉस्पिटल चालवत होते. तदनंतर तक्रारदार यांनी सदर हॉस्पिटल नविन बसस्‍थानकाच्‍या शेजारी  गणपत डाके यांच्‍याकडून खरेदी केलेल्‍या जागेत सुरु केले. सदरील जागेत गणपत डाके यांचे नावे विद्युत मीटर होते. असे असतानाही तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकउे सौदागर अब्‍दूल यांच्‍या घरात त्‍यांचे नावे बसविलेले मीटर स्‍थलांतरीत करण्‍यासाठी कोणताही अर्ज दिला नाही अग्रर ते नियमानुसार स्‍थलांतरीत केले नाही. तक्रारदार यांनी अनधिकृतपणे मीटर हे नविन जागेत स्‍थलांतरीत केले. सदरील मीटर स्‍थलांतरीत करताना तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या जागेत गणपत डाके यांचे नावे असलेल्‍या मीटरमध्‍ये छेडछाड करुन वायर घेऊन जोडणी केली आहे. अनधिकृतपणे स्‍थलांतरीत केलेल्‍या विद्युत मीटरला स्‍वतंत्रपणे सर्व्हिस वायर देऊन वीज जोडणी केली नाही. गणपत डाके यांच्‍याकडे मागील थकबाकी आहे ते  मीटर हे व्‍यावसायीक स्‍वरुपाचे आहे. तक्रारदारास मीटर नं. 585010254688 हे गणपत डाके यांच्‍या  जागेवर दिलेले नव्‍हते तेथे असलेल्‍या मीटरचा क्रमांक 585010068124 आहे. सदर मीटरवर थकबाकी भरलेली नाही. सामनेवाला यांनी नोटीस देऊन वीज पुरवठा खंडीत केला आहे.

 

            वर नमुद केलेले युक्‍तीवाद काळजीपूर्वक लक्षात घेतले. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी पुर्वी सौदागर अब्‍दूल मुजीद यांचे जागेवर स्‍वतःच्‍या नावे असलेला ग्राहक क्रमांक 585010254688 हा विद्युत पुरवठा घेतला. नंतर तक्रारदार यांनी दवाखान्‍याच्‍या जागेचे स्‍थलांतर गणपत डाके यांचेकडून खरेदी केलेल्‍या जागेत केले. स्‍थलांतर करताना तक्रारदार यांनी स्‍वतःच्‍या नावाचा अब्‍दूल मुजीद यांचे जागेवर घेतलेला वीज पुरवठा स्‍थलांतर केला नाही. तक्रारदार यांनी गणपत डाके यांचे नावावर असलेल्‍या विद्युत मीटरमधून छेडछाड करुन विचित्र पध्‍दतीने विद्युत पुरवठा मीटर क्रमांक 585010254688 घेतला आहे, त्‍याचा वापर सुरु केला. सदर बाब तक्रारदार यांनी सामनेवाला यांना कळ‍वली नाही. तक्रारदार यांनी स्‍वतःच्‍या नावे असलेले मीटर नविन जागेत स्‍थलांतर करण्‍यासाठी सामनेवाला यांच्‍याकडे अर्ज दिला नाही अगर त्‍याबाबत कार्यवाही केली नाही. सामनेवाला यांनी सदरील ग्राहक क्रमांक 585010254688 चा विद्युत पुरवठा तक्रारदार म्‍हणतात त्‍या ठिकाणी दिला नाही. तक्रारदार यांनी अनधिकृतपणे त्‍यांचे नावे असलेले मीटर नविन जागेत बसविले व नियमानुसार सामनेवाला यांच्‍याकडे अर्ज न करता दुस-याच मीटर मधून विद्युत प्रवाह घेतला. सदरील मीटर हे नियमानुसार स्‍थलांतरीत झाले नसल्‍यामुळे व बेकायदेशिररित्‍या वापरात असल्‍यामुळे गणपत डाके यांचे नावे असलेल्‍या मीटर मधील विद्युत पुरवठा बंद केला आहे. त्‍यामुळे आपोआप तक्रारदार यांचे नावे असलेले अनधिकृत मीटर याचा वापर बंद झाला आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही.

 

            तक्रारदार यांनी स्‍वतःच्‍या नावे असलेल्‍या जुन्‍या जागेतील मीटर नविन जागेत स्‍थलांतर करत असताना त्‍या बाबतीत रितसर अर्ज सामनेवाला यांच्‍याकडे देऊन व बाबींची पुर्तता करुन स्‍थलांतरीत करुन घ्‍यावे. त्‍या कामी लागणारा सर्व खर्च व आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता सामनेवालाकडे करावी, मीटर स्‍थलांतरीत करुन घ्‍यावे.

 

            तक्रारदार यांनी या मंचासमोर असलेल्‍या बाबी संदर्भात दिवाणी न्‍यायालय वरि‍ष्‍ट स्‍तर माजलगाव येथील न्‍यायालयात दिवाणी दावा नं.130/2014 मधील निशाणी क्र.5 दाखल केला आहे. दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ट स्‍तर माजलगाव यांनी तक्रारदाराचा तुर्तातूर्त मनाई हुकूमचा अर्ज कारणमिमांसा देऊन फेटाळला आहे. सदर आदेशाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सत्‍य परिस्थिती ही मा.न्‍यायालयापासून लपवून ठेवली आहे असे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी स्‍वतःच्‍या नावावर असलेले मीटर नियमानुसार स्‍थलांतरीत केले नसल्‍यामुळे व सामनेवाला यांनी तक्रारदार म्‍हणतात त्‍या जागेत विद्युत पुरवठा केला नसल्‍यामुळे सामनेवाला यांनी अनधिकृतपणे विद्युत पुरवठा खंडीत केला आहे असे म्‍हणता येणार नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात कसूर केला नाही. सबब तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र नाही. तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र

 

आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                   आदेश

      1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात येत आहे.

      2) खर्चाबददल आदेश नाही.

      3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20

                   (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

 

 

                      श्रीमती मंजूषा चितलांगे,     श्री.विनायक लोंढे,

                              सदस्‍य               अध्‍यक्ष

                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.