Maharashtra

Jalgaon

CC/11/231

Ramchand Mohan Mali - Complainant(s)

Versus

Asst Engginear,M.S.E.B ltd - Opp.Party(s)

Self

19 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/231
 
1. Ramchand Mohan Mali
nashirabad,jalgaon
jalgaon
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Asst Engginear,M.S.E.B ltd
Jalgaon
jalgaon
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:Self, Advocate for the Complainant 1
 
ORDER

ग्राहक तक्रार अर्ज क्र.  231/2011                           
      दाखल दिनांक. 15/04/2011  
अंतीम आदेश दि.  19/12 /2013
कालावधी 02 वर्ष,08 महिने,04दिवस
                                                                                  नि.11

अतिरीक्त  जिल्हा  ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव


रामचंद्र मोहन माळी,                         तक्रारदार
उ.व.सज्ञान, वर्षे धंदा-शेती,                          (अॅड.मिलींद पी. पाटील) रा.वरची आळी, नशिराबाद,  ता व जि. जळगांव.
 
  विरुध्दी

कार्यकारी अभियंता, महाराष्ट्रअ राज्यव वीज वितरण कं.मर्या. जुने पावर हाऊस, मटन मार्केट जवळ, सामनेवाला   जळगांव, ता. व जि. जळगांव.                        (एकतर्फा)
   

         (निकालपत्र अध्य क्ष, मिलींद.सा.सोनवणे यांनी पारीत केले)
                           नि का ल प त्र
प्रस्तु त तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्व‍ये दाखल करण्याकत आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हदणणे थोडक्या‍त असे की, तो वर नमूद ठिकाणी राहतो.  दुधाच्या. उत्पेन्नाणवर त्यााचा उदारनिर्वाह चालतो.  त्याहच्यान कडे चार म्हकशी आहेत.  दि. 06/08/2010 रोजी, सकाळी 09.00 वाजेच्याच सुमारास त्या च्यान चार म्ह शी नशिराबाद शिवारात काझी पेट्रोल पंम्पारच्याव समोर राष्ट्री य महामार्ग क्र. 6 च्याा बाजूस चरत होत्यात.  त्यार ठिकाणावरुन सामनेवाला कंपनीची विजेची उच्च् दाब वाहिनी गेलेली आहे. वीज वाहिनीची तार तुटून गवतात पडलेली होती.  वीजेच्याा उच्चव दाब वाहिनीचा स्प्र्श त्या च्याा म्हनशीना झाला व त्याहच्याच तीन म्हाशी जागीच मेल्या . 03. तक्रारदाराचे असेही म्ह‍णणे आहे की, पोस्टयमॉर्टेम  रिपोर्ट नुसार त्यादच्याम तीन म्ह्शींची किंमत अनुक्रमे रु. 34,000/-, रु. 38,000/-, रु. 32,000/-, अशी एकूण रु. 1,04,000/- इतकी दर्शविण्याकत आलेली आहे.  मात्र सामनेवाल्यांॉनी दि. 16/11/2010 रोजी दिलेल्याश पत्रान्व्ये त्याआस नुकसान भरपाई पोटी रु. 26,250/- देऊ केलेली आहे.  तक्रारदाराने असाही दावा केला की, वरील घटनेस सामनेवाल्यांीचा निष्का2ळजीपणा जबाबदार आहे.  त्या मुळे त्यााचे नुकसान झालेले आहे.  त्याषस रु. 1,04,000/- दि. 06/08/2010, पासुन द.सा.द.शे. 9 टक्केु व्या0जाने मिळावेत. तसेच, मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्ज खर्च रु. 5,000/- मिळावेत अशा मागण्यात तक्रारदाराने मंचाकडे केलेल्या. आहेत.   
04. तक्रारदाराने यादी नि. 03 अन्वसये, पोलिसांनी नोंदविलेली गुन्हणयाची नोंद, पंचनामा, तीन म्हदशींचे पोस्टामॉर्टेम  रिपोर्ट, त्यालने तहसिलदारांकडे नुकसान भरपाई मिळणेसाठी केलेला अर्ज, तसेच सामनेवाल्यांननी दि. 16/11/2010 रोजी रु. 26,250/- इतकी नुकसान भरपाई मंजूर केल्यााचे पत्र, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 
05. सामनेवाल्यामस तक्रार अर्जाची नोटीस बजावण्यानत आली.  मात्र, त्या नंतरही सामनेवाला मंचात हजर झाले नाहीत.  त्याजमुळे प्रस्तृदत अर्ज सामनेवाल्यांा विरुध्दा एकतर्फा चालविण्याजत यावा, असा आदेश करण्याुत आला.
06. निष्कजर्षासाठींचे मुद्दे व त्याेवरील आमचे निष्कार्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.      
मुद्दे                                            निष्कृर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ?             -- होय 
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
      कमतरता केली काय ?   -- होय
3. आदेशाबाबत काय?                           --अंतीम आदेशाप्रमाणे.

                        का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः   07. ग्रा.सं.कायदा 1986 कलम 2 (1) ड नुसार जो व्याक्तीो पैसे मोजून वस्तु  अथवा सेवा घेतो तो ग्राहक समजला जातो.  प्रस्तृ त तक्रारीत तक्रारदाराच्याप म्ह शी सार्वजनिक ठिकाणी चरत असतांना तुटून पडलेल्या  उच्च  दाब वीज वाहिनीचा धक्का‍ लागून मयत झालेल्यार आहेत.  त्यायमुळे उच्चज दाब वाहिनीतुन वीज पुरवठा करण्याोची सेवा तक्रारदारासाठी होती किंवा नाही, या प्रश्नामच्या् उत्तारावर तक्रारदार सामनेवाल्यादचा ग्राहक आहे किंवा नाही या प्रश्नारचे उत्तार अवलंबून आहे.  या दोन्हीव प्रश्नां ची उत्त्रे शोधण्याासाठी वीजेचे दर कसे आकारले जातात व त्याे दरात वीज वाहून नेण्यानच्याक खर्चाचा समावेश असतो किंवा नाही या बाबतीत भारतीय विदयुत कायदा व नियम यात काय तरतुदी आहेत,  हे तपासून बघावे लागेल.
08. वीज ग्राहक वीज निर्मिती केंद्रापासुन ते त्यााच्याआ वीज मिटर पावेतो पोहचणा-या वीजेपोटी शुल्क् भरतो किंवा हे वरील कायदयाच्याग तरतूदीच्याज अनुषंगाने तपासुन बघावे लागेल.  वीज ग्राहकास वीज बिलाची आकारणी कायदयानुसार कशी होते, व त्याेत कोणकोणत्याज बाबींचा व घटकांचा समावेश होतो, हे या ठिकाणी पाहाणे गरजेचे आहे.  भारतीय वीज कायदा 2003 कलम 61 व 62 या संदर्भात तरतूदी करतात ते खालीलप्रमाणे आहेत. 
Section 61. (Tariff regulations):
The Appropriate Commission shall, subject to the provisions of this Act,
specify the terms and conditions for the determination of tariff, and in doing
so, shall be guided by the following, namely:-
(a) the principles and methodologies specified by the Central Commission
for determination of the tariff applicable to generating companies and
transmission licensees;
(b) the generation, transmission, distribution and supply of electricity
are conducted on commercial principles;
(c) the factors which would encourage competition, efficiency, economical
use of the resources, good performance and optimum investments;
(d) safeguarding of consumers' interest and at the same time, recovery of the
cost of electricity in a reasonable manner;
(e) the principles rewarding efficiency in performance;
(f) multi year tariff principles;
(g) that the tariff progressively reflects the cost of supply of electricity
and also, reduces cross-subsidies in the manner specified by the Appropriate
Commission;
(h) the promotion of co-generation and generation of electricity from
renewable sources of energy;
(i) the National Electricity Policy and tariff policy:
Provided that the terms and conditions for determination of tariff under
the Electricity (Supply) Act, 1948, the Electricity Regulatory Commission
Act, 1998 and the enactments specified in the Schedule as they stood
immediately before the appointed date, shall continue to apply for a period
of one year or until the terms and conditions for tariff are specified under
this section whichever is earlier.
Section 62. (Determination of tariff):
(1) The Appropriate Commission shall determine the tariff in accordance
with the provisions of this Act for –
(a) supply of electricity by a generating company to a distribution
licensee:
Provided that the Appropriate Commission may, in case of shortage of
supply of electricity, fix the minimum and maximum ceiling of tariff for sale
or purchase of electricity in pursuance of an agreement, entered into between
a generating company and a licensee or between licensees, for a period not
exceeding one year to ensure reasonable prices of electricity;
(b) transmission of electricity ;
(c) wheeling of electricity;
(d) retail sale of electricity:
Provided that in case of distribution of electricity in the same area by two
or more distribution licensees, the Appropriate Commission may, for
promoting competition among distribution licensees, fix only maximum
ceiling of tariff for retail sale of electricity.
(2) The Appropriate Commission may require a licensee or a generating
company to furnish separate details, as may be specified in respect of
generation, transmission and distribution for determination of tariff.
(3) The Appropriate Commission shall not, while determining the tariff
under this Act, show undue preference to any consumer of electricity but
may differentiate according to the consumer's load factor, power factor,
voltage, total consumption of electricity during any specified period or the
time at which the supply is required or the geographical position of any area,
the nature of supply and the purpose for which the supply is required.
(4) No tariff or part of any tariff may ordinarily be amended, more
frequently than once in any financial year, except in respect of any changes
expressly permitted under the terms of any fuel surcharge formula as may be
specified.
(5) The Commission may require a licensee or a generating company to
comply with such procedures as may be specified for calculating the
expected revenues from the tariff and charges which he or it is permitted to
recover.
(6) If any licensee or a generating company recovers a price or charge
exceeding the tariff determined under this section, the excess amount shall
be recoverable by the person who has paid such price or charge along with
interest equivalent to the bank rate without prejudice to any other liability
incurred by the licensee.
09. वरील कलम  61 व 62 स्पtष्टत करतात की वीजेचा टेरीफ (वीजदर) कोण निश्चित करेल व वीज दर निश्चित करतांना कोणकोणते घटक विचारात घ्याtवे लागतील.  वरिल तरतूदी नुसार वीजेचे दर प्रत्येरक घटक राज्याात या कायदयाने गठीत करण्यालत आलेले वीज नियामक आयोग, या कायदयाने घालुन दिलेल्याe मार्गदर्शक तत्वांाच्याि आधारे निश्चित करेल. तसे करतांना त्यांानी वीज वाहून नेणे या खर्चाचाही विचार करणे आवश्यंक आहे.  त्यालमुळे वीज बिल भरणारा प्रत्येाक ग्राहक वीज वितरण करण्याकसाठी टाकण्याचत आलेल्याु लघू दाब व उच्चत दाब वीज वाहिन्याा च्याव संदर्भात देखील त्या च्या् वीज बिलातून शुल्कय भरीत असतो.  भारतीय विदयुत नियम,1956 कलम 29 व 30 नुसार सार्वजनिक ठिकाणावरुन अथवा ग्राहकांच्याी आवारातून वीज वाहिनी टाकतांना त्या् सुरक्षित रित्यास टाकण्याकत याव्याचत.  तसेच, वीज वाहिन्या  टाकतांना त्यानमध्येस वापरण्याात येणारी सामुग्री ही दर्जेदार व भारतीय मानद ब्यु्रो यांनी प्रमाणीत केलेली असणे आवश्यरक आहे.  त्याामुळे वरील तरतूदी विचार घेता असे म्हरणता येईल की, वीज बिल भरणारा कोणताही ग्राहक उच्चय अथवा लघू दाब वाहिनीच्याह संदर्भात देखील वीज वितरण करणा-या कंपनीचा ग्राहक असतो.
10. वरील कामी आम्हीा खाली नमूद करण्याीत आलेल्याा मा. राष्ट्री य आयोगाच्यान न्यादयनिर्णयांचा आधार घेत आहोत.   
1. C.G.M.P. And N.P.D.C.L. Versus Koppu Duddarajam CPJ 2008-4-139
2. Sajjan Sachdeva and Another Versus Punjab State Electricity Board and others  First Appeal No. 371of 2007
वरील न्या.यनिर्णयापैकी अनु.क्र.1 ला नमूद केलेल्या- केस मध्येh ग्रामपंचायत कार्यालयाच्याa व-यांडयात बसलेल्याo शेतक-याचा वीजेची उच्च‍ दाब वाहीनी अंगावर पडून मृत्यु‍ झाल्याा प्रकरणी मा. राष्ट्री य आयोगाने, वीज वितरण कंपनीला जबाबदार धरत नुकसान भरपाई मंजुर केली.  त्यााचप्रमाणे अनु.क्र. 2 च्याप केस मध्येर बाजार समितीच्याच कॉम्लेमंज क्स् मध्येप एका दुकानदाराचा मुलगा त्या् दुकानाच्या  छतावरील वीज वाहीनीच्याक धक्कजयाने मृत्युस पावल्याम प्रकरणी मा. राष्ट्री य आयोगाने वीज मंडळाला जबाबदार धरत नुकसान भरपाई मंजुर केलेली आहे.  यास्ताव मुद्दा क्र.1 चा निष्कलर्ष आम्हीक होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
11. सामनेवाल्याधने सेवा पुरवितांना कमतरता केली काय याचा विचार करतांना वीज पुरवठादाराची ग्राहकांच्याा तसेच, सार्वजनिक आवारातून वीज पुरवठा करतांना काय जबाबदारी आहे, हे भारतीय विदयुत नियम, 1956 नियम क्र. 29(1) व 30 नमूद करण्याबत आलेले आहे.  ते नियम खालील प्रमाणे आहेत.
Rule 29. Construction, installation, protection, operation and
maintenance of electric supply lines and apparatus-
1. All electric supply lines and apparatus shall be of sufficient ratings for
power, insulation and estimated fault current and of sufficient
mechanical strength for the duty which they may be required to perform
under the environmental conditions of installation, and shall be
constructed, installed, protected, worked and maintained in such a
manner as to ensure safety of human beings, animals and property
नियम 30 खालील प्रमाणे
Rule 30. Service lines and apparatus on consumer’s premises-
1. The supplier shall ensure that all electric supply lines, wires, fittings and
apparatus belonging to him or under his control, which are on a
consumer’s premises, are in a safe condition and in all respects fit for
supplying energy and the supplier shall take due precautions to avoid
danger arising on such premises from such supply lines, wires, fittings
and apparatus.
2. Service-lines placed by the supplier on the premises of a consumer
which are underground or which are accessible shall be so insulated and
protected by the supplier as to be secured under all ordinary conditions
against electrical, mechanical, chemical or other injury to the insulation.
3. The consumer shall, as far as circumstances permit, take precautions for
the safe custody of the equipment on his premises belonging to the supplier
4. The consumer shall also ensure that the installation under his control is
maintained in a safe condition.
12. वरील तरतुदी स्पiष्टh करतात की, पुरवठादाराने ग्राहकांच्याr आवारातुन तसेच सार्वजनिक ठिकाणावरुन वीज पुरवठा करतांना ग्राहकाच्यात जिविताची तसेच, त्या‍च्यान मालमत्तेकची सुरक्षा कशी होर्इल, याची तजवीज करावयाची आहे.  त्यांचप्रमाणे ग्राहकाच्याि आवारातुन जाणारी वीज पुरवठा वाहिनी, वायर्स इ. असे असावेत की, ते तेथील वातावरणात तग धरु शकतील व सुरक्षित असतील. त्याीचप्रमाणे तेथे जी उपकरणे बसविण्या त येतील ती तेथील वातावरणात सुरक्षित आहे, असे भारतीय मानक ब्युवरो यांनी प्रमाणित केलेले असलेले आवश्यकक आहे.  अशा परिस्थीकतीत उच्चन दाब वाहीनी तुटून ती गवतात किंवा रस्याे अ वर पडल्यामस व त्याामुळे काही वित्तच अथवा प्राणहाणी झाल्यावस वीज पुरवठा करतांना कमतरता झाली, असेच म्हयणावे लागेल.  13. प्रस्तृ त केस मध्येा उच्चआ दाब वाहीनी पडून तुटून गवतात पडलेली होती व त्या्तील वीज पुरवठयामुळे तक्रारदाराच्या  म्हचशींना विजेचा धक्काू लागून त्याे मृत्युा पावलेल्या  आहेत, असा दावा तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र नि. 2 मध्येत  शपथेवर केलेले आहे.  तक्रारदाराने नि. 3/2 ला दाखल केलेला पंचनामा त्याूस पृष्ठीय देतो.  सामनेवाल्यााने सदर पुरावा हजर होवून आव्हा्नीत केलेला नाही.  त्याममुळे सदर बाबी तक्रारदाराने शाबीत केलेल्याा आहेत, ही बाब समोर येते.  परिणामी उच्चम दाब वाहिनी  तुटून गवतात पडल्याकने व त्याआतील वीज प्रवाह चालुच राहिल्याेने सदर घटना घडलेली आहे, हे स्पकष्ट  होते.  सदर बाब सेवेतील कमतरता आहेत,  असे आमचे मत आहे. यास्तरव मुद्दा क्र. 2 चा निष्कसर्ष आम्हीद होकारार्थी देत आहोत. 
मुद्दा क्र.3 बाबतः 14. तुटून गवतात पडलेल्याः वीजेच्याच उच्च  दाब वाहीनीतुन वीज प्रवाहाचा धक्काि लागून तक्रारदाराच्यात तीन म्हरशी मेलेल्याच आहेत,  ही बाब वर केलेल्याज चर्चेवरुन स्पूष्टच झालेली आहे.  तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र नि. 02 मध्येा शपथेवर दावा केला की,  त्यानच्याय तीन म्हहशींची किंमत अनुक्रमे  रु. 34,000/-, रु. 38,000/-, रु. 32,000/-, अशी एकूण रु. 1,04,000/- इतकी आहे.  तक्रारदाराने त्या0 म्ह शींचे पशुविकास अधिकारी, जळगांव यांनी केलेले विच्छेनदन अहवाल नि. 3/3 ला दाखल केलेले आहेत.  त्याात त्याज म्हेशींच्याव मृत्यु पुर्व किंमती तक्रारदार म्हलणतो त्यातप्रमाणे दर्शविण्या/त आलेल्याण आहेत.  हा पुरावा देखील सामनेवाल्यामने हजर होवून नाकारलेला नाही.  उलटपक्षी सामनेवाल्यााने तक्रारदारास दि. 16/11/2010 रोजी पत्र लिहून त्यांेची म्ह शी मेल्याष बाबतची एकूण जबाबदारी रु. 26,250/- या मर्यादेपर्यत मान्यू केलेली आहे.  वरील पार्श्वयभुमीवर सामनेवाल्याबच्याम निष्का0ळजीपणामुळे व सेवेतील कमतरते मुळे तक्रारदारास एकूण रु. 1,04,000/- इतके नुकसान झालेले आहे,  ही बाब शाबीत होते, असे आमचे मत आहे.  त्या,मुळे तक्रारदार सामनेवाल्याझकडून रु. 1,04,000/- नुकसान भरपाई म्हअणुन मिळण्या.स पात्र आहे.  सदर नुकसान भरपाई सामनेवाल्यांतनी आजता गायत दिलेली नाही.  म्हहणुन त्याुवर म्हनशी मेल्यांच्या  दिनांकापासुन म्ह णजेच दि. 06/08/2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्केा व्यादज मिळण्या स देखील तक्रारदार पात्र आहे, असे आमचे मत आहे.  सामनेवाल्याुच्या् निष्काेळजीपणामुळे तक्रारदाराच्याश चार पैकी तीन म्हाशी मयत झाल्याी.   साहजिकच त्यायस मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. त्याहमुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 3,000/- मिळण्या स देखील पात्र ठरतो. यास्त व मुद्दा क्र.3 चा निष्क र्ष पोटी आम्हीळ खालील आदेश देत आहोत.
                               आ दे श 1. सामनेवाल्या स आदेशीत करण्या त येते की, त्यारने तक्रारदारास
रु.1,04,000/- दि.06/08/2010 रोजीपासून ते प्रत्याक्ष रक्कआम हाती
मिळेपावेतो द.सा.द.शे. 9%व्या/जाने अदा करावेत.

2. सामनेवाल्या स आदेशीत करण्याित येते की, त्या2ने तक्रारदारास शारिरीक,
मानसिक व आर्थीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हशणून रु.5,000/- अदा
करावेत.

3. सामनेवाल्याोस आदेशीत करण्याहत येते की, त्या2ने तक्रारदारास अर्ज
खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.

4. उभय पक्षांना निकालपत्राच्या  प्रती विनामुल्या देण्या त याव्याात.

जळगाव दिनांक - 19/12/2013
                                                  (मिलिंद सा.सोनवणे)                                                        अध्यंक्ष


                                                  (चंद्रकांत एम.येशीराव)                                                         सदस्यं
 

 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.