जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/87. प्रकरण दाखल तारीख - 17/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 05/08/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमुख - सदस्या सौ.मंगला एकनाथराव भिंगोलीकर वय, 35 वर्षे, धंदा घरकाम रा. गोकूंदा ता.किनवट जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. सहायक कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादित, किनवट ता.किनवट जि. नांदेड गैरअर्जदार 2. अधिक्षक अभिंयता, महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादित, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.उपासे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचे सेवेतील अनूचित प्रकारा बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार सौ. मंगलाबाई भींगोलीकर रा. गोकूंदा ता.किनवट येथील त्यांचे निवासस्थानी गैरअर्जदार यांनी ग्राहक क्र.565060136669 व 565060312530 याद्वारे दोन विज जोडण्या दिलेल्या आहेत. जूने मिटर बदलून नवीन इलेक्ट्रानिक पध्दतीचे मिटर बसविण्याच्या धोरणाचा भाग म्हणून दि.4.7.2009 रोजी गैरअर्जदार यांनी मिटर बदलले. अर्जदार यांचेकडे कोणतीही थकबाकी नाही. दोन्ही मिटर बदलताना ते सूस्थितीत काढण्यात आले. यांचे कोणतेही सिल तूटलेली नव्हते परंतु यानंतर गैरअर्जदारांनी मासिक उर्जा वापराचे बिल देणेसाठी गेले तेव्हा गैरअर्जदार यांचे संपर्क साधला असता त्यांनी ग्राहक क्र.669 साठी रु.11,000/- व ग्राहक क्र.2530 साठी रु.8,000/- एवढा दंड भरा त्याशिवाय तूम्हाला मासिक बिल देण्यात येणार नाही असे सांगितले. शेवटी अर्जदाराने नाईलाजाने अंडर प्रोटेस्ट ग्राहक क्र.2530 साठी रु.9820/- दि.15.10.2009 रोजी भरले आहेत. त्यांची पावती नंबर 2623265 आहे. तसेच ग्राहक क्र.669 यासाठी दि.01.12.2009 रोजी पावती क्र.9237101 द्वारे रु.11,340/- भरले आहेत. वरील रक्कम दबावाने व विजेचा पूरवठा खंडीत होईल या धमकीला घाबरुन भरण्यात आले. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदारांनी घेतलेले नियमबाहय रक्कमेचे रु.21,160/- 12 टक्के व्याजाने गैरअर्जदाराकडून वापस मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. प्रस्तूत प्रकरणात अर्जदार यांचा ग्राहक व सेवा पूरवाणारी व्यक्ती असा कोणताही संबंध नाही. ग्राहक क्र.669 ही विज जोडणी श्री.गूलशरखान दिलदारखान यांचे नांवे देण्यात आलेली आहे.यांचा अर्थ अर्जदार यांचा त्यांचेशी काहीही संबंध नाही. अर्जदाराने ते स्वतः ग्राहक आहेत व गैरअर्जदार हे विजपूरवठा करणारी व्यक्ती आहेत असा नामोल्लेख केलेला नाही. त्यामूळे ते ग्राहक होत नाहीत. प्रस्तूत प्रकरणात ज्या व्यक्तीचे मिटर जोडणी मध्ये ञूटी आढळल्याकारणाने त्यांना विज कायदा 2003 कलम126 नुसार विजेच्या अतिनयमित वापराचे देयक देण्यात आलेले आहे व ही रक्कम त्या व्यक्तीने भरलेली आहे व ती भरताना कोणतीही तक्रार केलेली नाही. अशा प्रकारे त्यांना आता कोणताही अधिकार पोहचत नाही. यात कलम 127 प्रमाणे गैरअर्जदाराची कृती मान्य नसेल तर सक्षम अधिका-याकडे अपील करता येते. यात अपील झाले नाही व बील अंतीम झालेले आहे. ग्राहक क्र.669 यांचे नांवे मिटर बसवले आहे हे म्हणणे खोटे आहे. दि.4.7.2009 रोजी जूनी यंञे बदलून नवीन इलेक्ट्रानिक मिटर बदलण्याचा भाग म्हणून मिटर बदलण्यात आले. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे मिटर बदलताना लेखीअहवालाशिवाय व अन्य कोणतीही वीधी द्वारे आवश्यक पंचनामा करण्यात आलेला नाही हे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे. अर्जदारांना मासिक उर्जा वापराची बिले देणे बंद करण्यात आले हे ही म्हणणे खोटे व चूकीचे आहे. पहिल्या विज जोडणीसाठी दिलेले सरासरी देयक रु.11340/- हा दंड नव्हे विजेचा अधिकृत वापरा बददलचे देयक आहे व दूसरे मिटर पाहता रु.8010/- चेदेयक आहे. अर्जदाराचा विज पूरवठा बंद करण्याची धमकी दिली हे अर्जदाराचे म्हणणे गैरअर्जदार अमान्य करतात. विज नियामक आयोगाद्वारे दिलेले आदेश हे गैरअर्जदार यांचे वर बंधनकारक आहे. अर्जदाराने अंडर प्रोटेस्ट रक्कम भरली हे म्हणणे खोटे आहे ग्राहक क्र.आर 939 हा मगंल एकनाथ यांचे नांवे आहे. जोडलेला विज पूरवठा हा .20 केव्ही असताना तो प्रत्यक्षात जोडलेला विज पूरवठा 1.4 किलो वॅट आहे म्हणजे तो मंजूर भारापेक्षा जास्त होता. ग्राहक क्र.669यांची पाहणी केली असता गूलशरखान दिलदारखान यांचे नांवे असलेला जो मंजूर आधीभार 0.30 कीलोवॅट पेक्षा जास्त आहे म्हणजे 2किलोवॅट एवढी होती. म्हणून गैरअर्जदाराने जे काही केले ती कृती कायदेशीर असून अर्जदाराचा अर्ज खोटा आहे. म्हणून तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदारानी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार अर्जदार सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः– ग्राहक क्र.565060136669 यांचा दि.30.06.2009 रोजी घटनास्थळ पंचनामा रिपोर्ट अर्जदाराने दाखल केलेला आहे. या प्रमाणे ही विज जोडणी गूलशरखान यांचे नांवे आहे. मंजूर भार .30 किलोवॅट असताना घटनास्थळ पंचनाम्याचे दिवशी कनेक्टेड लोड हा 2 किलोवॅट असल्याचे म्हटले आहे. मिटर स्टॉप असे लिहीलेले आहे, सिल बददल काही उल्लेख नाही. यात त्यांनी बेरीज करुन अनाधिकृत वापरासाठी सेक्शन 126 प्रमाणे 12 महिन्याचे बिल एकूण रु.11340/- चे बिल दिलेले आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीत दि.01.12.2009 रोजी पावती क्र.9237101 द्वारे ही रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेली आहे. हयावीषयी अधीक बारकाईने पाहिले असता एक तर हा ग्राहक क्रमांक अर्जदाराच्या नांवे नसून तो गूलशरखान यांचे नांवे आहे. त्यामूळे ग्राहक या नात्याने तक्रारअर्जा प्रमाणे अर्जदाराने ही जोडणी त्यांचे नांवे का नाही ? व कोणत्या अधिका-याने ते फिर्याद दाखल करुन शकतात? याबददलचा उल्लेख नाही. उलट गैरअर्जदाराने यावर आक्षेप घेऊन विज कायदा 2003 कलम126 नुसार विजेचा अनाधिकृत वापर म्हणून 12 महिन्याचे बिल दिलेले आहे व ते संबंधीत व्यक्तीने भरले आहे. त्यामूळे परत आता अर्जदारांना ही रक्कम वापस मागण्याचा अधिकार राहीला नाही. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात दूसरा ग्राहक क्रमांक 2530 असे म्हटले आहे. या बददल अर्जदाराने विजेचे बिल दाखल केलेले नाही परंतु दि.30.06.2009 रोजी घटनास्थळ रिपोर्ट मध्ये अर्जदाराच्या नांवाचा उल्लेख आहे व ग्राहक क्र.939 असा आहे. यांचाही उल्लेख तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात केलेला नाही? घटनास्थळ रिपोर्ट पाहिला असता मंजूर भार 0.20 किलोवॅट असताना अर्जदाराकडे कनेक्टेड लोड 1.4 किलोवॅट असा आहे म्हणून गैरअर्जदाराने 12 महिन्याचे कलम 126 प्रमाणे रु.8010/- चे बिल दिलेले आहे व हे असेंसमेट बिल अर्जदाराने दि.15.10.2009 रोजी पावती नंबर 26232650 रु.9820/- द्वारे भरलेले आहे. एकदा का ही रक्कम भरली यांचा अर्थ असेंसमेट बिल त्यांनी मान्य केले असा होता.शेवटी तक्रार अर्जात ज्या ग्राहक नंबरचा उल्लेख केलेला आहे त्या ग्राहक क्रंमाकांचे बिल का नाही यांचा ही उल्लेख केलेला नाही. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात दि.30.06.2009 रोजी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला या बाबतचा उल्लेख न करता ही बाब का लपविली यांचे कारण दिलेले नाही. या बाबीचा उल्लेख करुन गैरअर्जदाराची कृती चूक होती कारण मिटरचे सिल तूटलेले नव्हते अशी तक्रार त्यांने करायची होती परंतु यात अर्जदाराचे म्हणणे खरे जरी धरलेतरी सिल तूटलेले नव्हते ही गोष्ट खरी आहे परंतु मंजूर भारापेक्षा जास्त कनेक्टेड लोड होता ही गोष्ट खरी आहे. ही दोन्ही देयके जी संबंधीतानी भरलेली आहेत. त्यामूळे त्यांना आता ही रक्कम वापस मागता येणार नाही. वरील सर्व बाबीचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांचे सेवेत कोणताही अनूचित प्रकार आहे हे अर्जदार सिध्द करु शकले नाहीत. म्हणून वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य |