निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 22/10/2013
कालावधी 01 वर्ष. 26 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
केशव पिता सटवाजी दहीफळे. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.शेती. अॅड.डि.यु.दराडे.
रा.झोला (पिंपरी) ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
सहाय्यक अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
2330 ओ.अँड एम.डिव्हीजन.
गंगाखेड जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन व अर्जदारास नविन मिटर बसवुन न दिल्याबद्दल गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे झोला (पिंपरी) तालुका गंगाखेड जि. परभणी येथील रहिवासी असून त्याने गैरअर्जदाराकडून घर वापरासाठी विद्युत कनेक्शन घेतला त्याचा ग्राहक क्रमांक 535020216951 असा आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा चालु केल्यानंतर 1993 पर्यंत विद्युत पुरवठा व मिटर सुरळीत चालू होते, परंतु 1993 मध्ये सदरचे मिटर जळाले व लाईट बंद पडले, त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावुन नविन मिटर विद्युत पुरवठा पुर्ववत करण्या विषयी अनेक वेळा विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास नविन मिटर बसवुन दिले नाही, दिनांक 26/09/2007 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटरची तपासणी केली मिटर जळालेले आढळले, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने नविन मिटर बसवुन न देता तसेच विद्युत पुरवठा पुर्ववत करुन न देता मिटर मध्ये बिघाड झाल्याचे दर्शवुन अर्जदारास देण्यात आले होते. व अर्जदार नविन मिटर देवुन विद्युत पुरवठा पुर्ववत करतील या अपेक्षेने विद्युत बिले भरत आला, परंतु आजपर्यंत गैरअर्जदाराने बिघडलेले मिटर दुरुस्त करुन दिले नाही व विद्युत पुरवठा पुर्ववत केला नाही. गैरअर्जदाराच्या सांगण्यावरुन अर्जदार सन 2003 पर्यंत दिलेले बिले भरत आलेला आहे व गैरअर्जदाराकडे खंडीत झालेला विद्युत पुरवठा पुर्ववत करुन देण्यासाठी व नविन चांगले मिटर बसवुन देण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली. शेवटी जुन 2012 मध्ये गैरअर्जदाराने जळालेले मिटर चालू दाखवुन बिल दिले. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्यास भाग पडले. व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, ग्राहक क्रमांक 535020296951 अन्वये अर्जदारास नविन मिटर बसवुन देण्याचा आदेश व्हावा व तसेच गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा खंडीत करुन अर्जदारास वेळोवेळी विद्युत पुरवठा बाबत दिलेले बिल जुन 2012 चे रद्द करावे व अर्जदारास दिलेल्या सेवेत त्रुटी बद्दल रु. 5,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु. 1,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अशी विनंती केली आहे.
नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर 3 कागदपत्रांच्या यादीसह 3 कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदारास चौकशी करुन आगाऊ रक्कम परत मिळणे बाबतचा केलेला अर्ज, मिटर बदलुन मिळावे यासाठी अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेला अर्ज, बिल तक्रार झोला इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 11 वर 2 कागदपत्रांच्या यादीसह 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत, ज्यामध्ये जुन 2012 चे बिल व दिनांक 30/08/2012 चे अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेल विद्युत तोडणीसाठी दिलेले पत्र.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा जारी करण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी जबाब सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास ग्राहक क्रमांक 535020216951 अन्वये
विद्युत मिटर बदलुन न देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास जुन 2012 चे चुकीचे विद्युत देयक
देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होता ही बाब नि.क्रमांक 12/1 वरील दाखल केलेल्या जुन 2012 च्या लाईट बिलावरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 535020296951 असा होता ही बाब देखील नि.क्रमांक 12/1 वरील दाखल केलेल्या बिलावरुन सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 12/01/2007 रोजी सदरील ग्राहक क्रमांक अन्वये त्याचे नादुरुस्त मिटरमुळे चुकीचे रिडींग बिले दिल्यामुळे सदरील मिटर बदलुन मिळावे व बिलातील रिडींग दुरुस्त करुन द्यावे याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे अर्ज केला होता ही बाब नि.क्रमांक 4/2 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचे नादुरुस्त मिटर बदलुन न देवुन अर्जदारास गैरअर्जदाराने निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे, परंतु अर्जदाराचे म्हणणे की, जुन 2012 मध्ये गैरअर्जदाराने त्यास दिलेल्या लाईट बिल चुकीचे होते व रद्द करा हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही, व अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/3 व 12/2 वरील कागदपत्रावरुन गैरअर्जदाराच्या कार्यालयाचा शिक्का नाही, व संबंधीत अभियंताचे सहया नाहीत.त्यामुळे सदरचे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राहय धरणे योग्य नाही, अर्जदारास गैरअर्जदाराने त्याचे मिटर वेळेत बदलुन न देवुन निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. व अर्जदार त्याचे मिटर बदलुन घेण्यास पात्र आहे. असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर आणि मुद्दा क्रमांक 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास ग्राहक क्रमांक 535020296951 अन्वये त्याचे नादुरुस्त
मिटर बदलुन द्यावे.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.