निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 23/11/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 05/12/2012
तक्रार निकाल दिनांकः- 06/09/2013
कालावधी 09 महिने. 01 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
विनोद पिता किशनराव पोतदार. अर्जदार
वय 31 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.जे.बी.गिरी.
रा.ग्रामसेवक कॉलनी,सेलू ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द
1 सहाय्यक अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
उपविभाग, सेलू ता.सेलू जि.परभणी.
2 उपअभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.
जिंतूर रोड, परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदाराने दिलेल्या जास्तीच्या व चुकीच्या बिल देवुन अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्या बद्दल आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार हा ग्रामसेवक कॉलनी, सेलू जि.परभणी येथील रहिवासी असून तो गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 532530042890 असा आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मीटर हे त्याच्या वडीलांच्या नांवे असून ते मयत झाले आहेत.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा नियमित बिल भरतो, पण गैरअर्जदाराने मीटर फॉल्टी दर्शवून वेळोवेळी अंदाजे व चुकीचे बील दिलेली आहेत. दिनांक 01 फेब्रुवारी 2012 मध्ये अर्जदारास 99,000/- रुपयाचे चुकीचे देयक दिले होते व नंतर अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदारांकडे तक्रार दिल्यानंतर गैरअर्जदाराने 46,479/- रुपये कमी करुन 52,740/- रुपये बाकी दाखवून दिनांक 02/03/2012 रोजी परत चुकीचे बील दिले.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने मीटर बदलून मिळावे यासाठी वेळोवेळी अर्ज केल्यावर दिनांक 18/06/2011 रोजी नवीन मिटर बसवून दिले, परंतु पुढे देखील गैरअर्जदाराने नवीन मिटरच्या रिडींग प्रमाणे बिल न देता सरासरी वरुन जास्तीचे बील दिलेली आहेत.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने वेळोवेळी तक्रार देवुनही गैरअर्जदार उपभोगलेल्या युनिट नुसार बिल देण्यास तयार नाही व वेळोवेळी चुकीची सरासरी युनीटची उपभोगीता दर्शवुन जास्तीच्या रक्कमेची बिल देत आहेत, व सदरील बिलाची रक्कम भरण्यास भाग पाडत आहे, व न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी देत आहेंत व म्हणून अर्जदाराने दिनांक 29/03/2012 रोजी 3000/- रुपये व दिनांक 26/07/2012 रोजी रुपये 5000/- भरलेले आहेत.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास डिमांड नोटीस दिली व दिनांक 02/11/2012 रोजी दिलेले बील बरोबर आहे असे दाखवून विद्युत पुरवठ ही खंडीत केला जाईल असे सुचविले.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने दिनांक 07/12/2011 रोजी पूर्वीच्या मिटरचा टेस्ट रिपोर्ट तयार केला आहे, तो चुकीचा आहे. कारण रिपोर्टची तारीख 07/12/2011 अशी आहे व टेस्टींग दिनांक 29/11/2012 रोजीची आहे.
अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने मीटर बदलल्या नंतर देखील अर्जदारास मीटर प्रमाणे बील दिलेले नाही म्हणून मंचास विनंती केली आहे की, दिनांक 01/10/2012 रोजी दिलीले बिल 55,130/- रुपये रद्द करावे व अर्जदाराने उपभोगलेल्या युनीट नुसार नियमा प्रमाणे बील देण्यात यावे व तसेच अर्जदाराने भरलेले रुपये 8000/- परत अथवा समायोजित करण्यात यावे.
अर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व तसेच नि.क्रमांक 7 वर 16 कागदपत्रांच्या यादीसह 16 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यात विद्युत देयक, भरणा केलेल्या पावत्या, मीटर रिडींग दुरुस्ती बाबतचा अर्ज, मीटर टेस्टींग फि भरल्याची पावती, मीटर बदली/ पाहणी अहवाल, मिटर टेस्टींग रिपोर्ट, विज पुरवठा खंडी करणे संबंधी नोटीस, विज देयकाचे हप्ते पाडून देणे संबंधी अर्ज, मीटर दुरुस्ती करणे संबंधी अर्ज नविन मीटर प्रमाणे बिल देणे संबंधी अर्ज, मीटर बील अचुक असल्या संबंधीचा एम.एस.ई बी.चा अर्ज, पत्र ई.चा समावेश आहे.
गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठवल्यानंतर गैरअर्जदार आपल्या वकिला मार्फत हजर पण त्यास अनेक संधी देवुनही मुदतीत आपला लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला. व तक्रार मेरीटवर निकाली काढण्याचे ठरविण्यात आले.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे बील देवुन सेवेत
त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे त्याने दाखल केलेल्या विज बिलावरुन सिध्द होते.
अर्जदारास 99,090/- रुपयाचे बील दिनांक 01/02/2012 रोजी दिले होते हे नि.क्रमांक 7/2 वर दाखल केलेल्या बीला वरुन सिध्द होते व तसेच अर्जदारास दिनांक 01/10/2012 रोजी 55,110/- रुपयाचे बील दिले होते हे त्याने दाखल केलेल्या नि.क्रमांक 7/1 वरील बिला वरुन सिध्द होते. दिनांक 01/02/2012 रोजी दिलेल्या बिलांत चालु रिडींगच्या रकान्यात मीटर चेंज असे लिहिले आहे व मागील रिडींग 6154 असे लिहिलेले आहे व 778 युनिटचे Consumption दाखवलेले आहे.तसेच जुन 2011 ते डिसेंबर 2011 पर्यंत प्रतीमहा 778 चे Consumption दाखवलेले आहे या वरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने नवीन मीटर बसवल्यानंतर देखील मीटरची रिडींग न घेताच बीले दिलेली आहेत. जे की, बेकायदेशिर व चुकीचे आहे. तसेच दिनांक 01/10/2012 रोजी दिलेल्या बिला मध्ये देखील थकबाकी रु.41925.44 पैसे दाखवुन तसेच व्याज रु. 11604.65 पैसे दाखवुन 55130/- रुपयांचे बील दिलेले आहे. त्यात मार्च 2012 ते जून 2012 पर्यंत प्रतीमहा 1 युनीटचे Consumption दाखवलेले आहे जे की, चुकीचे आहे. तसेच जुलै 2012 मध्ये 2292 युनिटचे Consumption दाखवलेले आहे या वरुन हे सिध्द होते की, मीटर रिडींग न घेताच बीले दिलेली आहेत. व तसे करुन गैरअर्जदाराने निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, जास्तीचे चुकीचे दिलेले बील रद्द करावे व मीटरच्या रिडींग प्रमाणे बिल देण्यात यावीत हे त्याचे म्हणणे रास्त व कायदेशिर वाटते, व गैरअर्जदाराची विना मिटर रिडींग न घेता बिले देण्याची पध्दत अत्यंत चुकीची व मानसिकत्रास देणारी आहे. असे मंचास वाटते.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले दिनांक 01/10/2012 रोजीचे रुपये 55,130/- चे
विद्युत देयक रद्द करण्यात येत आहे.
3 गैरअर्जदारास असा आदेश देण्यात येतो की, आदेश तारखेनंतर तीन महिन्या
पर्यंत प्रतीमहा मिटर रिडींग घेण्यांत यावी, व त्याची प्रतिमहा सरासरी काढून जे
युनीट येतांत त्याचे बील प्रतीमहा जुलै 2011 पासून ते रिडींग घेतल्या महिन्या
पर्यंत काढण्यात यावे. ( Calculate करण्यात यावे ) अर्जदाराने या काळांत
भरलेली सर्व रक्कम त्यातून वजा करण्यांत यावी. व जर अर्जदाराने जास्तीचा
भरणा केलेला असल्यास ते त्याच्या पूढील बिलामध्ये समायोजित करण्यांत यावे.
4 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- फक्त ( अक्षरी
रु. तीनहजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त ( अक्षरी
रु. दोनहजार फक्त ) आदेश तारखे पासून 1 महिन्याच्या आत द्यावे.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.