Maharashtra

Parbhani

CC/11/100

Rajebhau Balasaheb Deshmukh - Complainant(s)

Versus

Assistent Engineer,MSEDC.Ltd.Jintur - Opp.Party(s)

Adv.D.U.Darade

13 Jun 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/100
 
1. Rajebhau Balasaheb Deshmukh
R/o Jintur
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Assistent Engineer,MSEDC.Ltd.Jintur
Sub Division Jintur
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  11/04/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 20/04/2011

                        तक्रार निकाल दिनांकः-  13/06/2013

                                                                               कालावधी   02 वर्ष. 01महिने. 24 दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

                                              अध्‍यक्ष                                                               श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.

                                                       सदस्‍य

श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.

------------------------------------------------------------------------------------------------------------       

    

श्री.भारतीया टेलीव्‍हेचंर लि.तर्फे आर.के.असोसियटस                              अर्जदार

अधिकृत सहि करता राजेभाउ पि.बाळासाहेब देशमुख.              अड.डी.यु.दराडे.

वय 35 वर्षे. धंदा.नौकरी.                            

रा.जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.

               विरुध्‍द

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.                                                   गैरअर्जदार.

तर्फे सहाय्यक अभियंता उपविभाग जिंतूर.                      अड.एस.एस.देशपांडे.

ता.जिंतूर.जि.परभणी.

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.पी.पी.निटूरकर.       अध्‍यक्ष.

                  2)    श्री.आर.एच.बिलोलीकर                    सदस्‍य.    

                               

             (निकालपत्र पारित व्‍दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्‍यक्ष)

 

              अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार एम.एस.इ.डी. विरुध्‍द दिलेल्‍या प्रोव्हिजनल देयक रद्द करण्‍याबाबत व भरणा केलेली रक्‍कम रु. 2,56,210/- परत करणे बाबतची आहे. अर्जदाराचे थोडक्‍यात म्‍हणणे असे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून त्‍याचा ग्राहक क्रमांक 540010496521 असा आहे. अर्जदार हा जिंतूर तालुक्‍यातील नागरीकांना भ्रमणध्‍वणीची सुविधा देण्‍यासाठी मनो-याची देखभाल करुन अर्जदार हा  नियमितपणे बिल भरणा करतो, परंतु गैरअर्जदार हे प्रत्‍यक्ष मिटर रिडींग न घेताच अंदाजे देयक देतात गैरअर्जदार यांनी दिनांक 30 नोव्‍हेंबर 2009 ते 31/12/2009 या कालावधीचे जे देयक दिले त्‍यामध्‍ये त्‍यांनी मागील रिडींग 18587 चालू रिडींग 18633 दाखवली, तसेच जानेवारी 2010 ते फेब्रुवारी 2010 या कालावधीच्‍या देयकात मागील रिडींग 18633 तर चालू रिडींग आर.एन.ए. दाखविले, तसेच मे 2010 या महिन्‍यात मागील रिडींग 1998 तर‍ चालू रिडींग 7574 असे दाखविले, यावरुन असे दिसते की, गैरअर्जदार हे मिटर रिडींग न  घेताच बिले देतात. अर्जदाराचे असे ही म्‍हणणे आहे की, जर जानेवारी 2010 मध्‍ये रिडींग 18633 असले तर जुन 2010 मध्‍ये रिडींग निश्चितच पुढे जाईल व मागे येणार नाही पण गैरअर्जदार यांनी 2010 च्‍या बिलामध्‍ये मागील रिडींग 7574 दर्शविली व चालू रिडींग कधी नॉट टेकन तर कधी 7574 दाखवली सदरच्‍या चुकीच्‍या पध्‍दतीची रिडींग मार्च 2011 च्‍या बिलापर्यंत तशीच ठेवली. अर्जदाराचे पुढे असे म्‍हणणे आहे की, सध्‍या अर्जदाराचे मिटरचे रिडींग 43191 इतकी आहे. अर्जदाराच्‍या मिटरची 7574 ही रिडींग डिसेंबर 2006 साली होती ज्‍यावेळी 7574 ही रिडींग होती, त्‍या वेळा पासूनच गैरअर्जदाराने जी बिले दिली ती सर्व अर्जदाराने भरली आहेत दिनांक 16/03/2011 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या मिटरची पाहणी केली त्‍यावेळी रिडींग 43191 इतकी दिसली त्‍याने त्‍याच दिवशी कोणत्‍याही कागदपत्राची खातरजमा न करता प्रोव्हिजनल बिल दिले ज्‍यावर मागील रिडींग 7574 चालू रिडींग 43191 इतकी दाखवली व बिलाची रक्‍कम रु.2,56,207/- दाखवली व बिल भरण्‍याच्‍या अगदी दुस-या दिवशी म्‍हणजेच 17/03/2011 रोजी दिले अर्जदाराचे पुढे असे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदाराने डिसेंबर 2009 पासून मार्च 2011 पर्यंत चुकीचे रिडींग दर्शविले जर डिसेंबर 2009 रोजी 18633 इतकी रिडींग होती आणि दिनांक 16/03/2011 रोजी 43191 इतकी रिडींग दिसली तर डिसेंबर 2009 ते मार्च 2011 या कालावधीत एकुण वापर 43191 18633 = 24554 युनिट इतका वापर झाला तसेच डिसेंबर 2009 ते मार्च 2011 पर्यंत गैरअर्जदार यांनी जे सरासरीवर आधारीत देयके दिली ती सर्व देयके भरणा केली आहेत जर वरील 24554 युनिट वापरातून भरणा केलेल्‍या 24592 हे युनिट वजा केलेतर 34 युनिटचे बिल तक्रारदाराने जादा भरणा केलेले आहे म्‍हणजेच तक्रारदाराकडे सामनेवाला यांचे कोणतेही बिल निघत नाही.व त्‍यामुळे जे प्रोव्हीजनल बिल दिले ते चुकीचे व रद्द करण्‍यास योग्‍य आहे. अर्जदाराचे पुढे असे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदाराने पूर्वी भरणा केलेल्‍या बिलाचा विचार न करता प्रोव्‍हीजनल देयके दिली व ते भरण्‍यास केवळ एका दिवसाचा कालावधी दिला व अर्जदारास कोणतीही संधी न देता 17/03/2011 रोजी विद्युत पुरवठा खंडीत केला. म्‍हणून नाईलाजास्‍तव अर्जदाराने 31/03/2011 रोजी वादग्रस्‍त बिलाची रक्‍कम नाराजीने भरणा केली आहे. अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदार हा जिंतूर तालुक्‍यातील नागरीकांना मोबाईल सेवा पुरविण्‍यासाठी मदत करतो व गैरअर्जदार यांनी चुकीच्‍या बिलासाठी विद्युत पुरवठा खंडीत केला त्‍यामुळे तालुक्‍याच्‍या नागरीकांच्‍या दळणवळणावर फार मोठा परीणाम झाला आहे.तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरीकत्रास झालेला आहे. म्‍हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार मान्‍य करावी.व गैरअर्जदारानी दिलेले प्रोव्हिजनल देयक दिनांक 13/03/2011 हे रद्द करावे व त्‍यापोटी भरलेली रक्‍कम रु. 2,56,210/- अर्जदारास परत करण्‍यासाठी गैरअर्जदारास आदेशित करावे,तसेच मानसिकत्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून 50,000/- रुपये व तक्रारीचा खर्च 10,000/- रुपये गैरअर्जदारांना अर्जदारास देण्‍याचे आदेशित करावे.

            अर्जदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे व नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्रांच्‍या यादीसह एकुण 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्‍यामध्‍ये नि.क्रमांक 4/1 वर देयक दिनांक 28/02/2011, 4/2 वर वादग्रस्‍त बिल दिनांक 16/03/2011 पैसे भरण्‍याचा दिनांक 17/03/2011, नि.4/3 वर देयक दिनांक 08/03/2011, नि.क्रमांक 4/5 वर जानेवारी 2008 ते फेब्रुवारी 2011 पर्यंतचे सी.पी.एल.इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

            तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसा पाठविण्‍यात आल्‍या व गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर होवुन नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला. गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावट स्‍वरुपाची आहे व तसेच सर्व मजकुर जोपर्यंत प्रतिवादी स्‍पष्‍टपणे मान्‍य करीत नाहीत तो पर्यंत त्‍यांना अमान्‍य आहे असे ग्राहय धरण्‍यात यावे.व तसेच त्‍यांचे हे म्‍हणणे आहे की, प्रतिवादीने तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व योग्‍य बिल दिलेले आहे व तसेच तक्रारदारास विज कनेक्‍शन हे व्‍यापारी कारणासाठी दिलेले आहे, म्‍हणून मंचास पस्‍तुतची तक्रार विचारात घेता येणार नाही. त्‍यामुळे अर्जदाराची प्रस्‍तुतची तक्रार फेटाळण्‍यात यावी. अशी विनंती केली आहे. व तसेच त्‍याचे हे म्‍हणणे आहे की, अर्जदाराने कधीही बिल भरणा वेळेत व नियमित केलेला नाही व प्रतिवादीचे असे म्‍हणणे आहे की, काही कारणास्‍तव मिटर रिडींग मिळाली नाहीतर विज कंपनीच्‍या नियमा प्रमाणे चालू रिडींग आर.एन.ए. असे दाखवून सरासरी विज वापर नुसार विज बिल दिले जाते, व मिटर रिडींग मिळाल्‍या नंतर अंदाजे लावलेले युनिट वजा करुन प्रत्‍यक्ष रिडींग प्रमाणे दिले जाते.गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदार कंपनीतर्फे मिटर तपासणी व विज चोरी रोधक अभियान अंतर्गत दिनांक 16 मार्च 2011 रोजी तक्रारदाराचे मिटर तपासले असता तक्रारदार जास्‍तीचा विद्युत भार म्‍हणजेच 13.00 के.डब्‍ल्‍यु.वापरत असल्‍याचे आढळून आले तसेच एवढा विज वापर करण्‍यासाठी 3 फेज वापरणे आवश्‍यक असतांना तक्राराराने 2 कोअरची केबल आणून सिंगल फेज व्‍दारे विज वापर केला, त्‍यामुळे मिटरवर अतिशय जास्‍त भार टाकल्‍यामुळे मिटर रिडींग अबनॉर्मल दाखवित आहे. असे तापसणीत आढळून आले म्‍हणून तक्रारदाराने जास्‍तीचा लोड वापर केल्‍यामुळे वरील विज बिल देण्‍यात आले, तसेच गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे आहे की, गैरअर्जदाराने 2,56,207 रुपये बिल दिले हे म्‍हणणे गैरअर्जदारास मान्‍य आहे, परंतु तक्रारदारास विज बिल भरण्‍यास वेळ दिला नाही हे म्‍हणणे चुकीचे आहे व तसेच तक्रारदाराने 2,56,207/- रुपये दिनांक 17 मार्च 2011 रोजी भरले आहे, त्‍यामुळे प्रस्‍तुतचे प्रकरण बंद करणे न्‍यायोचित राहिल. म्‍हणून गैरर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, प्रतिवादीने तक्रारदारास कोणत्‍याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही, म्‍हणून सदरची तक्रार खर्च आकारुन फेटाळण्‍यात यावी.

          तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ नि.क्रमांक 14 वर गैरअर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.

          दोन्‍ही बाजुंच्‍या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

    मुद्दे                                 उत्‍तर

1                    गैरअर्जदाराने प्रोव्हिजनल बिल दिनांक 13/03/2011 रोजी

      रु.2,56,210/- चे बिल अर्जदारास भरण्‍यास सांगुन सेवेत त्रुटी

      दिली आहे काय ?                                    नाही.              

2                    अर्जदाराने दिनांक 13/03/2011 रोजी प्रोव्हिजनल बिल

      व्‍दारे रु. 2,56,210/- गैरअर्जदाराकडे जमा केलेली रक्‍कम

      परत मिळण्‍यास पात्र आहे काय ?                       नाही.                                                              

3     आदेश काय ?                                अंतिम आदेशा प्रमाणे.                             

कारणे

मुद्दा क्रमांक 1 व 2

         अर्जदाराने हे सिध्‍द केले आहे की, अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे ही बाब त्‍याने दाखल केलेल्‍या नि.क्रमांक 4/1 वरील विज बिलावरुन सिध्‍द होते.नि.क्रमांक 4/5 वर दाखल केलेल्‍या सी.पी.एल. वरुन खालील वस्‍तुस्थिती सिध्‍द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास जानेवारी 2008 ते फेब्रुवारी 2009 पर्यंत जी बिले दिली आहेत त्‍या प्रत्‍येक बिलावर चालू रिडींग 13432 व मागील रिडींग 13432 अशीच आलेली आहे व बिलावर आर.एन.ए. चा रिमार्क आहे तसेच मार्च 2009 च्‍या बिलावर चालू रिडींग 14032 आणि मागील रिडींग 13432 असे दर्शविलेले आहे एप्रिल 2009 ते सप्‍टेंबर 2009 पर्यंत दिलेल्‍या प्रत्‍येक बिलावर चालू रिडींग 14032 व मागील रिंडींग 14032 अशीच दर्शविलेली आहे तसेच ऑक्‍टोबर 2009 च्‍या बिलावर चालू रिडींग 14551 व मागील रिडींग  14032 अशी दर्शविलेली आहे तसेच तसेच नोव्‍हेंबर 2009 च्‍या बिलावर चालू रिडींग 18587 व मागील रिडींग 14551 असे दर्शविलेले आहे. व मिटर फॉल्‍टी असे दाखविलेले आहे. डिसेंबर 2009 च्‍या बिलावर चालू रिडींग 18633 व मागील रिडींग 18587 असे दर्शविलेले आहे तर जानेवारी 2010 ते एप्रिल 2010 पर्यंतच्‍या बिलावर चालू रिडींग 18633 व मागील रिडींग 18633 अशीच दर्शविलेली आहे. मे 2010 चे बिलावर चालू रिडींग 1998 व मागील रिडींग 1998 असे दर्शविलेले आहे तसेच मिटर फॉल्‍टी असे दर्शविलेले आहे.जुन 2010 च्‍या बिलावर चालू रिडींग 7574 व मागील रिडींग 1998 असे दर्शविलेले आहे जुलै 2010 ते डिसेंबर 2010 व तसेच जानेवारी 2011 ते फेब्रुवारी 2011 या बिलावर देखील चालू रिडींग 7574 व मागील रिडींग 7574 दाखविलेले आहे व नॉट अक्‍सेसेबल असा रिमार्क दिला आहे. दिनांक 28/02/2011 ला दिलेल्‍या बिलावर जे की, मंचासमोर दाखल केलेले आहे त्‍या बिला मध्‍ये मिटर रिडींग 31 डिसेंबर 2010 ते 31 जानेवारी 2011 मध्‍ये चालू रिडींग 7574 व मागील रिडींग 7574 असे दर्शवुन 81920/- रुपयांचे बिल दिलेले आहे.ज्‍यावर परत करेक्‍शन करुन 16200 केलेले आहे त्‍यानंतर 31 जानेवारी 2011 ते 28 फेब्रुवारी 2011 च्‍या देयकावर सुध्‍दा रिडींग 7574 व मागील रिडींग 7574 असे दर्शवुन 33130/- रुपायांचे  बिल दिलेले आहे आणि शेवटी 17/03/2011 रोजी दिलेले इन्‍स्‍पेक्‍शन प्रोव्हिजनल बिलामध्‍ये चालू रिडींग 43191  व मागील रिडींग 7574 व त्‍याचा डिफरंस 35617 युनिट कन्‍झमशन असे दाखवुन नेट प्रोव्हिजनल बिल रु. 2,56,210/- चे दिलेले आहे.यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने मिटरचे रिडींग न घेताच बिले दिलेली असावे किंवा मिटरवर अधिक भार टाकल्‍यामुळे मिटर सदोष झालेले असावे किंवा मिटर रिडींग घेण्‍यास उपलब्‍ध करुन दिले नव्‍हते त्‍यामुळे  अशा रिडींग्‍स घेतल्‍या गेलेल्‍या दिसतात जानेवारी 2008 ते एप्रिल 2010 म्‍हणजेच जवळ पास 28 महिने मिटर रिडींग बरोबर घेतलेली नसतांना आणि बिलावर आर.एन.ए. फॉल्‍टी असे रिमार्क येत असतांना सुध्‍दा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कोठल्‍याही प्रकारची तक्रार दिल्‍याचे आढळत नाही किंवा तसे केल्‍यास ते मंचासमोर दाखल केलेले नाही तसेच मे 2010 चे बिल पाहता असे दिसते की, मिटर रिडींग 18633 वरुन उलट 1998 वर आलेले आहे असे होवुन सुध्‍दा अर्जदाराने त्‍याबद्दल गैरअर्जदाराकडे तक्रार दिली नाही किंवा आपले मिटर फॉल्‍टी आहे का असे तपासून पाहण्‍याचा गैरअर्जदाराकडे कोणताही अर्ज केलेला नाही व तसे केलेले असल्‍यास तसा पुरावा मंचासमोर आलेला नाही तसेच जुन 2010 पासून फेब्रुवारी 2011 पर्यंत मिटर रिडींग परत 7574 व मागील रिडींग 7574 दाखवली गेलेली आहे त्‍याबाबत देखील अर्जदाराने कोठलीही तक्रार केल्‍याचे दिसत नाही मात्र 28/02/2011 चे देयका मध्‍ये बिल 81920 चे करेक्‍शन करुन 16200 केलेले दिसते यावरुन अर्जदाराचाच निष्‍काळजीपणा दिसतो व अर्जदाराचा अप्रामाणिक हेतु दिसून येतो व अर्जदार प्रामाणिकपणे मंचासमोर आलेला दिसून येत नाही.व तसेच अर्जदाराने प्रोव्हिजनल बिलापोटी गैरअर्जदाराकडे भरणा केलेली रक्‍कमे एवढया विजेचा वापर केला नाही असे आपल्‍या अर्जात कोठेही म्‍हंटले नाही. तसेच अर्जदाराने माहे फेब्रुवारी 2008 सप्‍टेंबर 2008 ऑक्‍टोबर 2008 नोव्‍हेंबर 2008 डिसेंबर 2008 जानेवारी 2009 एप्रिल 2009 मे 2009 या महिन्‍यात बिलाची कोठलीही रक्‍कम भरलेली नाही तसेच अर्जदाराने बिल भरल्‍याची रसीद मंचासमोर दाखल केलेली नाही, म्‍हणून मंचास अर्जदाराने जानेवारी 2008 पासून प्रत्‍येक महिन्‍यात किती रक्‍कम भरली व किती बाकी आहे व किती युनिटसाठी भरली यांचा बोध होत नाही, व याबाबतचा खुलासा गैरअर्जदाराने देखील केलेला नाही. त्‍यामुळे मंचास असे वाटते की,गैरअर्जदाराने दिलेले प्रोव्हिजनल बिल रु. 2,56,210/- हे  चुकीचे असले तरी ते बिल गैरअर्जदाराने अर्जदारास प्रोव्हिजनल दिलले आहे व ते अंतिम नाही,म्‍हणून गैरअर्जदारानी दिलेल्‍या प्रोव्हिजनल बिल मिटर रिडींग पाहता योग्‍यच आहे असे आढळून येते. व दिलेले रु. 2,56,210/- गैरअर्जदाराने अर्जदारास परत करण्‍याबाबत सांगणे मंचास योग्‍य वाटत नाही. व अर्जदार आपली तक्रार सिध्‍द करण्‍यास असमर्थ ठरला आहे.म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.

         दे                         

1          अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येत आहे.

2          तक्रारीचा खर्च ज्‍याचा त्‍यांनी सोसावा.

3     पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.

 

 

  श्री.आर.एच.बिलोलीकर.                           श्री. पी.पी.निटूरकर

            मा.सदस्                                                                        मा.अध्यक्ष

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.P.P.Niturkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.