निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/09/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 30/09/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/03/2012 कालावधी 05 महिने. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. श्री.श्रीराम पिता.लक्ष्मणराव रामपुरीकर. अर्जदार वय वर्ष.धंदा.शेती व व्यापार. अड.जे.एन.घुगे. रा.मोठ्या मारुतीजवळ, जिंतूर,ता.जिंतूर.जि.परभणी. विरुध्द 1 सहाय्यक अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्यादित. अड.एस.एस.देशपांडे. (महावितरण) जिंतूर उपविभाग,परभणी रोड.जिंतूर. ता.जिंतूर जि.परभणी. 2 कार्यकारी अभियंता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्यादित. (महावितरण) जिंतूर रोड,परभणी ता.जि.परभणी. 3 अधिक्षक अभियंता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्यादित. (महावितरण) विद्युत भवन,जिंतूर रोड.परभणी.ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार याने ग्राहक क्रमांक 540010363262 अन्वये गैरअर्जदाराकडून विज पुरवठा घेतला होता.अर्जदारास ऑक्टोबर 2007 पर्यंत वाजवी व योग्य बील येत होती, परंतु नोव्हेंबर 2007 पासून अवाजवी व चुकीचे विद्युत बील येणे चालू झाले.अर्जदार यास ऑक्टोबर 2007, नोव्हेंबर 2007, डिसेंबर 2007, जानेवारी 2008, फेब्रुवारी 2008, मार्च 2008, एप्रील 2008, मे 2008, जून 2008, जुलै 2008 आदी महिन्याचे क्रमशः 151, 176, 224, 157, 109, 133, 158, 158 युनीटची अवाजवी विद्युत बील आलेली आहेत. तसेच जानेवारी 2009, फेब्रुवारी 2009, मार्च 2009 या महिण्या मध्ये 158 युनीट प्रतिमहा या प्रमाणे विद्युत देयक दिली. पुढे एप्रील 2009 ला 394 जून 2009 ला तब्बल 4433 युनीटचे देण्यात आले व तसेच अवाजवी बील देणे आता पर्यंत चालू आहे. अर्जदारास मागच्या महिन्यात रक्कम रु.78,000/- चे अवाजवी विद्युत देयक देण्यात आले. म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन माहे ऑक्टोबर 2007 ते माहे ऑगस्ट 2011 पर्यंत दिलेली विद्युत देयक रद्द करण्यात यावीत. तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 90,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.8/1 व नि.8/2 वर दाखल केले आहे. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना तामील झाल्यानंतर मंचाने संधी देवुनही नेमल्या तारखेस लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरोधात No W.S. आदेश पारीत करण्यात आला. निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराने ठोसरित्या शाबीत केले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरोधात No W.S. चा आदेश पारीत करण्यात आला.त्यामुळे अर्जदाराने आवश्यक ते सर्व कागदपत्र मंचासमोर दाखल करुन त्याचे म्हणणे मंचासमोर ठोसरित्या शाबीत करण्याची जबाबदारी अर्जदारावर होती अर्जदाराने फक्त अंतरिम आदेश मिळवीण्यासाठी एकच विद्युत देयक मंचासमोर दाखल केले आहे.त्यानंतर मंचाने सुचना देवुनही आवश्यक कागदपत्र मंचासमोर दाखल करण्याची तसदी अर्जदाराने घेतलेली नाही.असे खेदाने म्हणावे लागेल.आवश्यक कागदपत्रा अभावी योग्य निर्णय घेता येणार नाही.असे मंचाचे मत असल्यामुळे आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |