निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 27.01.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 10.02.2010 तक्रार निकाल दिनांकः- 04.09.2010 कालावधी 6 महिने 24दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अखील अहमद अब्दुल अर्जदार वय 47 वर्षे धंदा शेती रा.गवळी गल्ली, ( अड शिरीष वेलणकर ) जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी. -- विरुध्द 1 कार्यकारी अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड ( अड.सचीन देशपांडे ) परभणी विभाग जिंतूर रोड,परभणी 2 सहायक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड उपविभाग जिंतूर ता. जिंतूर जि.परभणी ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती सुजाता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घेवूनही अर्जदाराला विद्युत पुरवठा दिला नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा जिंतूर येथील रहिवासी जिंतूर औंढा रोडवर गट क्रमांक 121/1 मध्ये त्याची शेतजमीन आहे व शेतीमध्ये शेती विजपंपासाठी विद्युत पुरवठा घेण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अर्ज दाखल केला. गैरअर्जदाराने शेतीची कागदपत्रे बघून दिनांक 21.07.2007 रोजी रुपये 7661/- चे कोटेशन अर्जदारास बनवून दिले व ते भरण्यास सांगितले. अर्जदाराने त्याच दिवशी सदरची रक्कम गैरअर्जदाराकडे जमा केली व त्यानंतर गैरअर्जदाराने सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता डिसेंबर 2007 मध्ये केली. त्यानंतर आजतागायत अर्जदारास विद्युत पुरवठा देण्यात आलेला नाही त्यामुळे अर्जदाराच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले व जवळपास रुपये 50,000/- चे नुकसान झाले. गैरअर्जदाराने अर्जदारास वीजपुरवठा न देवून त्रूटीची सेवा दिली आहे म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व 3 अश्वशक्तीचा वीजपुरवठा गट क्रमांक 121/1 ला दयावा 2 वर्षात शेतीचे झालेल नुकसान रुपये 50,000/- दयावे व मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- व दाव्याचा खर्च रुपये 2500/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात कोटेशन पावती, टेस्टरिपोर्ट, कॅपॅसिटर चे टेस्ट सर्टीफीकेट, अंडरटेकींगची कॉपी, नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखलकेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसपाठविल्यावर नेमलेली दिनांक 08.06.2010 रोजी लेखी म्हणणे (नि.14) सादर केले आहे. लेखी निवेदनामध्ये तक्रार अर्जातील वीजपुरवठा हा माहे जानेवारी 2008 मध्ये देण्यात येइल असे सांगितल्याचे. अमान्य केले आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास असे सांगितले होते की, विद्युत पुरवठा घेण्यासाठी ग्राहकांची यादी असते व त्या यादीतील क्रमांकानुसार विद्युतपुरवठा देण्यात येइल अशी माहिती अर्जदाराला देण्यात आली होती. गैरअर्जदारांच्या कामकाजाच्या पध्दतीनुसार विद्युत जोडणीसाठी ते काही सामान गैरअर्जदार श्री. मगर याना देतात बाकी उर्वरीत सामानासह श्री. मगर ग्राहकांना विद्युत जोडणी करुन देतात परंतू सामानाच्या कमतरतेमुळे विद्युत पुरवठा घेणा-या ब-याच ग्राहकांची यादी शिल्लक आहे व सदरील अर्जदाराचा यादीतील क्रमांक अजून आलेला नाही. डिसेंबर 2007 मध्ये ज्यानी विज जोडणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे दाखल केलेली आहेत अजून त्याना विजपुरवठा मिळालेला नाही. अर्जदाराला त्याच्या अनुक्रमाकाप्रमाणे विद्युत पुरवठा दिला जाइल. गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही त्रूटीची सेवा दिली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र नि. 15 दाखल केले आहे. अर्जदार व गैरअर्जदारांच्या वकिलांचा युक्तीवाद व तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदारास विज पुरवठा न देवून गेरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 - अर्जदाराने वीज जोडणी घेण्यासाठी गैरअर्जदाराकडे रुपये 7661/- जमा केले आहेत हे नि. 4/1 वरील फर्म कोटेशन/ डिमांड नोट व नि. 4/2 वरील पावतीवरुन सिध्द होते. तसेच तक्रारीत नि. 4/3 वर इलेक्ट्रीकल कॉट्रक्टरचा टेस्ट रिपोर्ट ही दाखल केलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे कोटेशनची रक्कम दिनांक 21.07.2007 रोजी जमा केल्याचे नि. 4/2 वरील पावतीवरुन सिध्द होते. अर्जदाराने गेरअर्जदाराच्या कागदपत्राची पूर्तता डिसेंबर 2007 पर्यंत केलेली होती हे नि. 4/3 वरील इलक्ट्रीकल कॉट्रक्टर स टेस्ट रिपोर्ट नि. 4/4 वरील टेस्ट सर्टीफीकेट ऑफ कॅपॅसिटर नि. 4/5 वरील अंडर टेकींग यावरुन सिध्द होते. अर्जदाराने यानंतर दिनांक 08.05.2008 रोजी रजिस्टर पोस्टाने गैरअर्जदाराकडे तात्काळ वीज जोडणी करुन देण्यासाठी विनंती अर्ज पाठवला ( नि.4/6) व त्यानंतर दिनांक 16.10.2008 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदारास नोटीस पाठवली ( नि.4/7) म्हणजेच अर्जदाराने विज जोडणीसाठी गैरअर्जदाराकडे वेळोवेळी पाठपुरावा केला हे सिध्द होते. परंतू गैरअर्जदाराने त्यास काहीही उत्तर दिले नाही. गैरअर्जदार त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने त्याच्याकडे आवश्यक ते सर्व कागदपत्र डिसेंबर 2007 मध्ये दाखल केल्याचे मान्य करतो मात्र जानेवारी 2008 मध्ये अर्जदारास वीज जोडणी मिळेल असे सांगितल्याचे अमान्य करतो व गेरअर्जदाराकडे वीज जोडणीची मागणी केलेल्या ग्राहकांची यादी असते व यादीतील क्रमांकानुसारच ग्राहकांना वीज जोडणी देण्यात येते असे शपथेवर सांगितले आहे मात्र गेरअर्जदाराने त्याच्याकडील ग्राहकांची प्रतिक्षा यादी तक्रारीत दाखल केलेली नाही व त्यातील अर्जदाराचा प्रतिक्षा क्रमांक कितवा हेही सांगितलेले नाही. त्यामुळे गेरअर्जदाराकडे वीज जोडणीसाठी ग्राहकांची प्रतिक्षा यादी आहे व डिसेंबर 2007 मध्ये आवश्यकत त्या कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे वीज पुरवठयाची मागणी केलेल्या कुठल्याही ग्राहकाला गैरअर्जदाराने वीज जोडणी दिलेली नाही हे गैरअर्जदाराने सिध्द केलेले नाही म्हणून अर्जदाराला डिसेंबर 2007 मध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही गैरअर्जदाराने वीज जोडणी न देवून त्रूटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते. तसेच अर्जदाराने त्याच्या तक्रारीत गैरअर्जदाराने 2 वर्षे वीज पुरवठा दिला नसल्यामुळे अर्जदाराने शेतीत जवळपास रुपये 50,000/- च्या उत्पन्नाचे नुकसान झाले आहे व ती नुकसान भरपाई आपणास मिळावी अशी मागणी केली आहे परंतू त्याबाबत कोणताही ठोस पुरावा तक्रारीत दाखल नाही त्यामुळे अर्जदाराची रुपये 50,000/- च्या नुकसान भरपाईची मागणी मान्य करता येणार नाही. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. . आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येतो. 2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत अर्जदारास जिंतूर येथील त्याच्या गट क्रमांक 121/1 अ या शेत जमिनीत 3 अश्वशक्तीचा विज पुरवठा दयावा 3 या खेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 1500/- अर्जदारास आदेश मुदतीत रोख द्यावा. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |