जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 344/2008. प्रकरण दाखल तारीख - 18/10/2008 प्रकरण निकाल तारीख - 15/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. प्रमोद हानंमतराव देशंपाडे वय, 50 वर्षे, धंदा, - रा. भोकर ता. भोकर जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत कनिष्ठ अभिंयता, भोकर ता.भोकर जि. नांदेड. गैरअर्जदार 2. सहायक अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. भोकर ता. भोकर 3. कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. भोकर ता. भोकर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.चंद्रकांत पत्की. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत व त्यांनी सन 1991-92 मध्ये शेतीला पाणी असल्याकारणाने गैरअर्जदार यांचेकडून विज पूरवठा घेतला होता परंतु पूढे कालांतराने विहीरीचे पाणी अपूरे पडल्यामूळे उत्पन्नही नीघत नव्हते त्यामूळे दि.29.03.2004 रोजी कृषी संजीवनी योजने अंतर्गत सर्व थकीत रक्कम भरल्यानंतर गैरअर्जदार यांना एक लेखी पञ लिहून त्यांचा विज पुरवठा बंद करणेसाठी कळविले होते. विज पूरवठा दि.01.08.2003 पासून तोडला गेला होता. आता यापूढे त्यांना विजेची गरज नसल्याकारणाने तो कायमचा बंद करण्यात यावा असे कळविले होते असे असताना दि.19.07.2006 रोजी त्यांना गैरअर्जदाराने विज बिल दिले. तक्रार केल्यानंतर यापूढे असे होणार नाही असे गैरअर्जदाराने आश्वासन दिले परंतु यानंतरही गैरअर्जदारांनी जबरदस्ती केल्याने दि.23.05.2008 रोेजी गैरअर्जदाराचे कनिष्ठ अभिंयता यांचेकडे लेखी स्वरुपात दि.31.03.2004 व दि.07.08.2008 रोजीच्या अर्जाचा खुलासा केला असता कनिष्ठ अभिंयत्याने संबंधीत भागातील लाईनमन यांचा अहवाल मागविला असता त्यावर लाईनमन श्री. खंडागळे यांनी विहीरीस पाणी नसल्याने दि.23.03.2004 पासून येथे मोटार, इलेक्ट्रीक वायर, बोर्ड वगैरे साहित्य नाही असा अहवाल दिला आहे तो तक्रारीत दाखल केला आहे. असे असतानाही गैरअर्जदाराने दि.07.06.2008 रोजी दंडेलशाहीने रु.11,930/- भरण्यास अर्जदाराला भाग पाडले. अर्जदाराची मागणी आहे की, ही भरलेली रक्कम त्यांना 18 टक्के व्याजासह वापस करावी तसेच विज पूरवठा अनामत म्हणून घेतलेली रक्कम तीही वापस मिळावी, तसेच मानसिक ञास व नूकसान भरपाईपोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना नोटीस तामील होऊनही ते गैरहजर राहीले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. त्यांनी दाखल केलेले कागदपञ बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदारानी दि.31.03.2004 रोजी ग्राहक क्र.55301001740/7 या ग्राहक क्रंमाकाचा गैरअर्जदार यांना लिहीलेला अर्ज या अर्जात अर्जदारानी कृषी संजीवनी योजने अंतर्गत दि.31.03.2004 रोजी पूर्ण रक्कम भरली आहे असा उल्लेख करुन विहीरीला अपूरे पाणी असल्यामूळे विज पुरवठा बंद करणेसाठी कळविले होते. सध्या दि.01.08.2003 पासून विज पूरवठा डिसकनेक्ट आहे तो आता परमन्ट डिसकनेक्ट करावा ज्यावेळेस विज पूरवठा पाहिजे असेल तेव्हा मी लेखी स्वरुपात अर्ज करेल येणा-या विज बिलास मी जिम्मेदार राहणार नाही असा अर्ज दिलेला आहे तो अर्ज सहायक अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचे कार्यालयात दि.31.3.2004 रोजी मिळाल्याची नोंद आहे. यानंतर दि.07.08.2006 रोजी परत एक अर्ज गैरअर्जदार यांचे नांवाने दिलेला आहे. व यातही विज पूरवठा कायमचा बंद करण्यावीषयी विनंती केली आहे ते ही पञ विज कंपनी यांना मिळाल्याची नोंद त्यावर आहे. अर्जदार यांनी अजून एक पञ दि.23.05.2008 रोजी गैरअर्जदार यांना दिले त्यांत त्यांने विज पूरवठा कायमचा बंद करण्यावीषयीचा उल्लेख केलेला आहे. यावर गैरअर्जदाराने रिपोर्ट मागितला असता लाईनमनचा दि.29.03.2004 चा रिपोर्ट यात मोटार इलेक्ट्रीक वायर वगैरे काहीही नाही असा अहवाल दिलेला आहे. यावर श्री. के.एम.खंडागळे लाईनमन यांची सही आहे. सोबत दि.31.03.2004 रोजीचा अर्ज ही दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी दि.06.03.2008 रोजी सहायक अभिंयता यांना पञ पाठवून रु.11,930/- चे अंतीम बिल कृषी कनेक्शन 1740 साठी अर्जदाराने भरले आहे व जागेवर मिटर वायर वगैरे काहीही नाही त्यामूळे विज पूरवठा कायमचा खंडीत केला आहे असे समजावा असे पञ दिलेले आहे. अर्जदार यांनी 2004 पासून गैरअर्जदारांना विज पूरवठा कायमचा बंद करण्यावीषयी अर्ज दिलेले असताना गैरअर्जदारांनी त्यावर कार्यवाही का केली नाही ? परत 2006 मध्ये देखील त्यांनी कारवाई केली नाही ? 2004 पासून जर विज कनेक्शन बंद असेल तर ते चालू होते असाही पूरावा गैरअर्जदारांनी दिला नाही व एकदम 2008 मध्ये म्हणजे चार वर्षानंतर त्यांना बिलाची आठवण झाली व त्यांनी अर्जदारास बिल दिले व ते वसूलही केले. गैरअर्जदार यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली असतानाही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही यांचा अर्थ अर्जदारानी केलेली तक्रार त्यांना मान्य आहे व त्यांचेकडून घडलेली चूक ही जवळपास त्यांना कबूल आहे असा अर्थ का घेऊ नये ? गैरअर्जदार हे सफाई देत नसतील तर तो फायदा अर्जदार यांना का मिळू नये ? उपलब्ध कागदपञावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदाराकडून विज बिल जबरदस्तीने वसूल करण्यात आलेले आहे व हे बिल गैरअर्जदारांच्या चूकीमूळे दिल्या गेलेले आहे. दि.07.06.2008 रोजी रक्कम अदा केल्या बरोबर गैरअर्जदाराचे विरुध्द अर्जदार यांनी न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचा प्रकार येथे स्पष्ट दिसून येतो. म्हणून अर्जदार यांनी भरलेली रक्कम मिळण्यास ते पाञ आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचेकडून विज रक्कमेपोटी घेतलेली रक्कम रु.11,930/- व त्यावर दिल्याच्या दिनांकापासून म्हणजे दि.07.06.2008 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदाराला दयावेत. तसेच त्यांनी कृषी कनेक्शनसाठी दिलेले डिपॉझीट ते ही अर्जदारास वापस करावे. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |