जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –182/2010 तक्रार दाखल तारीख –03/01/2011
दत्तात्रय पि. कृष्णाजी पवार
वय 65 वर्ष, धंदा शेती ...तक्रारदार
विरुध्द
सहायक अभिंयता,
महाराष्ट राज्य विघुत महावितरण कंपनी लि. ...सामनेवाला
उपविभागीय कार्यालय, पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.जी.काकडे
सामनेवाले तर्फे :- अँड.डी.बी.बागल
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा अंमळनेर ता. पाटोदा येथील रहिवासी असून तक्रारदाराने दि.31.01.1988 रोजी अनुक्रमाक 28182 कोटेशन नंबर 5636201 अन्वये रु.640/- ची शेती पंपासाठी डिमांड भरुन गट नंबर 320 मध्ये विज पुरवठा मिळण्यासाठी रितसार अर्ज केला होता. त्यानंतर तक्रार सामनेवाला यांचेकडे वारंवार प्रत्यक्ष भेटत राहिले परंतु कनेक्शनदेण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे सामनेवाला यांनी दिली. तक्रारदार दि.14.05.2010 रोजी विज कनेक्शनसाठी प्रत्यक्ष भेटले असता तुम्हास नवीन कोटेशन भरावे लागेल व त्यासाठी रुद्.50/- भरुन कोटेशन घ्यावे असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दि.22.04.2010 रोजी पावती नंबर 8497093 द्वारे रु.50/- नवीन कोटेशनपोटी भरणा केले. नवीन कोटेशन भरणा करुनही तक्रारदारास कनेक्शन दिले नाही म्हणून तक्रारदाराने सामनेवाला यांनरा दि.23.11.2010 रोजी आरपीएडी ने कायदेशीर नोटीस देऊ केली व त्यात त्यांनी माझे शेतीचे आर्थिक नुकसान होत असल्याबददल मागणी नमुद केली. तक्रारदाराने विज कायदयातील सुधारित तरतुदीनुसार कनेक्शन देण्यास विलंब केल्यास प्रतिदिन रु..1,000/- दंडास सामनेवाला पात्र असतील असे म्हटले आहे. तक्रारदाराने आपल्या मागणीत विज कोटेशन भरुन घेतले असल्याने कनेक्शन न दिल्यामुळे शेतीचे उत्पन्न रु.85,000/- चे नुकसान झज्ञले. मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नोटीस खर्चापोटी रु.1,000/- खर्चापोटी रु.3,000/- असे एकूण रु.98000/- व त्यावर 18 टक्के व्याज यांची मागणी केली आहे. तसेच तक्रारदाराने विज कायदा 2003 च्या तरतुदीनुसार सेवा देण्यास विलंब केल्यामुळे प्रतिदिन रु.1,000/- दंड देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पृष्टयर्थ एकूण सात कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दि.02.04.2011 रोजी दाखल केले असून तक्रारदार प्रथम डिमांड भरल्यापासून म्हणजे दि.31.01.1988 पासुन आजपावेतो सामनेवाला यांचेकडे 22 वर्षात एकदाही कनेक्शन मागण्यासाठी आलेले नाहीत.त्यामुळे तक्रार मुदतबाहय असल्यामुळे या न्यायमंचात चालविण्याचा अधिकार नाही म्हणून सदर तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे.
तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी म्हणणे व दोघाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास डिमांड भरुन त्यांची कोणतीही ज्येष्ठता सिनियरिटी यादी न सांभाळल्यामुळे व न्यायमंचाने सदर ज्येष्ठता सिनियरिटी यादी दाखल करण्याचे आदेश देऊनही त्यांनी ती यादी दाखल केली नाही म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदारास विज पुरवठा न देऊन व त्यांची ज्येष्ठता यादी अघयावत न ठेऊन सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत तक्रारदारास कोणतीही वेगळी डिमांड न भरुन घेता नवीन शेती पंपाचे विज पुरवठा जोडून दयावा.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 चे पालन मुदतीत न केल्यास तक्रारदारास प्रतिदिन कनेक्शन देईपर्यतच्या विलंब काळातील रु.1,000/- देण्यास जबाबदार राहतील.
4. खर्चाबददल आदेश नाही.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20(3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड