(घोषित दिनांक 13/01/2011 द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) विज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांचे वडिल कचरु डहाळे यांच्या नावाने त्यांनी ग्राहक क्रमांक 49317001717 द्वारे स्वत:च्या राहत्या घरी गैरअर्जदार विज वितरण कंपनीकडून विज जोडणी घेतलेली आहे. दिनांक 28/5/2008 रोजी गैरअर्जदार विज वितरण कंपनीने त्यांना विज चोरी केलेली नसताना विज चोरी बद्दल रु 6,244/- चे देयक दिले. विज वितरण कंपनी विज चोरीची तक्रार दाखल करेल या भितीने विज वितरण कंपनीने दिलेले देयक त्याने भरले. वास्तविक त्याने विज चोरी केलेली नव्हती. विज विजरण कंपनीने घटनेचा कोणताही पंचनामा केलेला नाही आणि विज चोरी बाबत त्यांना कोणतीही कल्पना न देता रु 6,244/- चे विज चोरीचे देयक दिले. त्यानंतर विज वितरण कंपनीने जुने मिटर काढून त्या ठिकाणी नविन इलेक्ट्रॉनिक मिटर बसविले. सदर मिटरच्या अनुषंगाने त्यांना कांही महिने नियमीत देयक मिळाले परंतु मे ते ऑगष्ट या कालावधीमध्ये मिटर फॉल्टी असल्याचे नमूद करुन देयक देण्यात आले. सप्टेबर महिन्याच्या देयकामध्ये विज वितरण कंपनीने त्याचा विज वापर 455 युनिट दाखविला. वास्तविक त्या महिन्यात त्याने 455 युनीट विजेचा वापर केलेला नव्हता. त्यानंतर विज कंपनीने नोव्हेंबर महिन्याच्या देयकामध्ये त्याचा विज वापर 133 युनीट दर्शवून रक्कम रु 3220/- चे देयक दिले. सदर देयक चुकीचे असून त्याच्याकडे बसविलेले इलेक्ट्रॉनिक मिटर नादुरुस्त आहे. अशा प्रकारे विज वितरण कंपनीने चुकीची देयके दिले म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, नोव्हेंबर 2009 मध्ये विज वितरण कंपनीने दिलेले रक्कम रु 3,220/- चे देयक बेकायदेशिर असल्याचे घोषित करावे आणि विज चोरीच्या आरोपावरुन त्याच्याकडून घेतलेली रक्कम रु 6,244/- विज वितरण कंपनीकडून वसूल करावे आणि त्याच्याकडील इलेक्ट्रॅनिक मिटर बदलून देण्याचे आदेश द्यावेत व नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार विज वितरण कंपनीला मंचातर्फे पाठविलेली नोटीस मिळूनही ते गैरहजर असल्यामुळे त्यांच्या विरुध्द ही तक्रार एकतर्फा चालविण्यात आली. तक्रारदाराच्या कैफीयतीवरुन खालील मुद्दे उपस्थितीत होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदारांनी तक्रारदारास विज चोरीबद्दल आणि नाही नोव्हेंबर 2009 मध्ये दिलेले देयक चुकीचे असल्याचे तक्रारदार सिध्द करु शकतो काय? 2. विज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय? नाही 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 :- युक्तिवादाच्या वेळी तक्रारदाराच्या वतीने कोणीही हजर नाही. विज वितरण कंपनीने तक्रारदारास नोव्हेंबर 2009 मधील विज वापराबद्दल दिनांक 7/12/2009 रोजी रक्कम रु 3,220/- चे देयक (निशानी क्रमांक 2/3) दिले होते. सदर देयक पाहता विज वितरण कंपनीने तक्रारदाराला प्रत्यक्ष मिटर रिडींगनुसार हे देयक दिल्याचे दिसते. त्याचप्रमाणे दिनांक 12/11/2009, 12/10/2009 रोजी दिलेली देयके देखील प्रत्यक्ष मिटर रिडींग नुसारच दिलेली असून दिनांक 8/5/2009, 6/6/2009, 6/7/2009, 6/8/2009 आणि 8/9/2009 ही देयक फॉल्टी असल्याचे नमूद करुन देण्यात आलेली असली तरी तक्रारदाराच्या मिटर मधील रिडींग दिनांक 30/9/2009 उपलब्ध झाल्यानंतर त्याने एप्रिल 2009 ते ऑगस्ट 2009 या कालावधीमध्ये भरलेल्या देयकाची रक्कम समायोजित करुन तक्रारदाराला विज वितरण कंपनीने दिनांक 12/10/2009 रोजीचे देयक रक्कम रु 2,690/- दिलेले आहे. त्यामुळे दिनांक 12/10/2009 रोजीच्या देयकामध्ये दर्शविलेला विज वापर 455 युनीट हा चुकीचा असल्याचे दिसून येत नाही. याशिवाय विज वितरण कंपनीने तक्रारदाराला विज चोरीच्या अनुषंगाने दिनांक 28/5/2008 रोजी दिलेले देयक रक्कम रु 6,244/- हे देखील चुकीचे असल्याचे म्हणता येणार नाही कारण सदर देयक तक्रारदाराने भरलेले असून जर तक्रारदाराने विज चोरी केलेली नसेल तर त्याने सदरचे देयक भरणे आवश्यक नव्हते. त्याने सदर देयकाचा भरणा करुन विज चोरीचा आरोप एक प्रकारे मान्य केलेला आहे त्यामुळे सदर देयकाच्या वैधतेबाबत आक्षेप नोंदविण्याचा तक्रारदाराचा अधिकार संपलेला आहे. विज वितरण कंपनीने तक्रारदारास वेळोवेळी दिलेली देयके चुकीचे असल्याचे सिध्द करण्यास तक्रारदार असमर्थ ठरलेला आहे. तक्रारदाराने त्याच्याकडे जे मिटर बसविलेले आहे ते नादुरुस्त असल्याचे सिध्द करणारा कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराच्या सेवेत कोणत्याही प्रकारे त्रुटी नाही असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात येते. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. तक्रारीचा खर्च तक्रारदाराने सोसावा. 3. संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |