Maharashtra

Jalna

CC/127/2014

Sudhakar Himmatrao Kasture - Complainant(s)

Versus

Assistant Engineer ,MSEDCL - Opp.Party(s)

S.Rahmet Ali

21 Nov 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/127/2014
 
1. Sudhakar Himmatrao Kasture
R/o Sillod, Tq. Bhokardan
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Assistant Engineer ,MSEDCL
MSEDCL,Bhokardan
Jalna
Maharashtra
2. 2) Executive Engineer,MSEDCL
MSEDCL,NO.1 Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 
For the Complainant:S.Rahmet Ali, Advocate
For the Opp. Party:
Adv.G.R.Kad
 
ORDER

आदेश नि. 01 वर

 

प्रस्‍तुत तक्रार तक्रारदारांनी गैरअर्जदार विद्युत वितरण कंपनीने अवाजवी देयक दिले म्‍हणून केलेली आहे व त्‍या अंतर्गत अंतरिम अर्ज देखील केलेला आहे.

मंचाने अंतरिम आदेशासाठी दाखलपूर्व नोटीस पाठवल्‍यावर गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी विद्युत पुरवठा व्‍यापारी कारणासाठी घेतलेला आहे. त्‍यामुळे तो गैरअर्जदारांचा ग्राहक होवू शकत नाही व मंचाला प्रस्‍तुत तक्रार चालवण्‍याचे अधिकार क्षेत्र नाही.

तक्रारदारांनी त्‍यानंतर तक्रारीत “आपल्‍या उपजीविकेसाठी व हॉटेल व्‍यवसायासाठी” अशी दुरुस्‍ती करण्‍याची मागणी केली. तक्रारदारांचा वरील अर्ज मंचाने नैसर्गिक न्‍यायाला अनुसरुन मंजूर केला.

तक्रारदारांची तक्रार व गैरअर्जदारांचे म्‍हणणे यांचे वाचन केले दोन ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदारांनी मूळ तक्रारीत वीज पुरवठा कोणत्‍या कारणासाठी घेतला होता याचा काहीही उल्‍लेख केलेला नाही. दुरुस्‍त तक्रारी नंतर त्‍यांनी आपल्‍या उपजीविकेसाठी व हॉटेल व्‍यवसायासाठी विद्युत पुरवठा घेतल्‍याचे म्‍हटले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेली विद्युत देयके बघता त्‍यात “Commercial Connection” देण्‍यात आल्‍याचे व मंजूर बील वीज भार 3.00 K.W असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. तक्रारदारांनी देखील त्‍याच्‍या दुरुस्‍त तक्रारीत हॉटेल व्‍यवसायासाठी विद्युत पुरवठा घेतल्‍याचे म्‍हटले आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने U.P.Power Corporation V/s. Anis Ahemad या महत्‍वपूर्ण न्‍यायनिर्णयात

“Consumer Complaints can not be entertained for commercial power connection” असे मत व्‍यक्‍त केले आहे.

अशा परिस्थितीत तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (d)  नुसार ग्राहक या संज्ञेत बसत नाही त्‍यामुळे मंचाला ही तक्रार चालवण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही असा निष्‍कर्ष मंच काढत आहे व तक्रारदारांची तक्रार व अंतरिम अर्ज प्राथमिक अवस्‍थेत फेटाळत आहे. 

 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.