Maharashtra

Jalna

CC/96/2011

Sunita Audambar bagade - Complainant(s)

Versus

Assistant Engineer, MSEDC, - Opp.Party(s)

23 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/96/2011
 
1. Sunita Audambar bagade
R/o Nutan Vasahat,Ambad.
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Assistant Engineer, MSEDC,
Ambad,Tq.Ambad,
Jalna
Maharashtra
2. 2} Junior Engineer,Rural Division,
Ambad,Tq.Ambad,
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
प्रतिनिधी ए.एम.बागडे
......for the Complainant
 Adv.G.R.Kad., Advocate for the Opp. Party 0
 Adv.G.R.Kad, Advocate for the Opp. Party 0
ORDER

 

 (घोषित दि. 23.01.2012 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया सदस्‍या)
 
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून वीज पुरवठा घेतला असुन गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या वाढीव वीज बिला विरुध्‍द अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांचा वीज वापर अत्‍यंत कमी असून गेल्‍या अनेक वर्षापासून त्‍यांचा वीज वापर 50 युनिटच्‍या वर झाला नाही. दिनांक 10.01.2011 रोजी गैरअर्जदार यांनी त्‍यांना 38,020/- रुपयाचे बिल दिले. हे बिल चुकीचे असल्‍यामुळे त्‍यांनी ते दुरुस्‍त करण्‍याबाबत गैरअर्जदार यांच्‍याकडे अनेक वेळेस तक्रार केली पण गैरअर्जदार यांनी त्‍यांची दखल घेतली नसल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. गैरअर्जदार हे नियमितपणे बिल देत नाही. तसेच वीज बिलावर मीटरचा फोटो देत नाहीत. गैरअर्जदार यांनी दिलेले  चुकीचे वीज बिल भरण्‍याचा तगादा लावला असून ते न भरल्‍यास वीज पुरवठा खंडीत करण्‍याची धमकी देत आहेत. गैरअर्जदार यांना सुधारीत वीज बिल देण्‍याची व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्‍याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्‍या प्रती, गैरअर्जदार यांच्‍याकडे केलेल्‍या तक्रारीच्‍या प्रती जोडल्‍या आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार नोव्‍हेंबर 2010 मध्‍ये अर्जदारास 6933 युनिट वीज वापराचे बिल देण्‍यात आले. त्‍यामध्‍ये जुन्‍या मीटरचा वीज वापर व नवीन मीटरमधील वीज वापराची नोंद असून ते योग्‍य असल्‍याचे म्‍हटले आहे. सदरील बिल हे 38 महिन्‍याचे असून ते विभागून देण्‍यात आलेले आहे व त्‍यातून अर्जदाराने भरलेल्‍या रकमेची वजावट देखील करण्‍यात आलेली आहे. अर्जदारास देण्‍यात आलेल्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्‍याचे सांगून तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी दिनांक 27.09.2007 रोजी वीज पुरवठा घेतला असून अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 520010112722 असा आहे. अर्जदाराकडे लावण्‍यात आलेल्‍या मीटरचा क्रमांक 9000000540 असा असल्‍याचे बिलावरुन दिसून येते. गैरअर्जदार यांच्‍या तर्फे मंचात दाखल करण्‍यात आलेल्‍या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्‍यावर असे दिसून येते की, गैरअर्जदार यांनी अर्जदारास सुरुवातीपासूनच सरासरीवर अधारीत 50 युनिट वीज वापराची आकारणी केली आहे. सदरील सरासरीवर अधारीत 50 युनिट वीज वापराची आकारणी ही सप्‍टेंबर 2007 ते ऑक्‍टोबर 2010 या काळापर्यंत करण्‍यात आलेली सी.पी.एल. वरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या मीटरचे रिडींग न घेताच सतत तीन वर्षापर्यंत सरासरीवर अधारीत बिल दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार यांनी आपल्‍या जवाबात अर्जदाराचे जुने मीटर बदलून त्‍या ठिकाणी 11246767 या क्रमांकाचे मीटर बसविले असल्‍याचे म्‍हटले आहे. पण सदरील मीटर केंव्‍हा बदलले आहे याबाबत खुलासा केलेला नाही. तसेच मीटर बदली अहवाल देखील मंचात दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी नोव्‍हेंबर 2010 मध्‍ये मागील रिडींग 2 व चालू रिडींग 3552 त्‍याच प्रमाणे जुन्‍या मीटरचे रिडींग 3383 असे धरुन अर्जदारास एकूण 6933 युनिट वीज वापराचे बिल आकारले आहे. गैरअर्जदार यांनी जुन्‍या मीटरचे अंतिम रिडींग किंवा मीटर बदली अहवाल दिलेला नसल्‍यामुळे व जुन्‍या मीटर वरील 3383 युनिट वीज वापर अर्जदाराने केला असल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नसल्‍यामुळे सदरील वीज वापर अमान्‍य करण्‍यात येत आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदारास नोव्‍हेंबर 2010 नंतर मीटर वरील नोंदी प्रमाणे बिल आकारणी केल्‍याचे दिसून येते व ती योग्‍य असल्‍याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.  
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले नोव्‍हेंबर 2010 व त्‍यापुढील सर्व वीज बिले रद्द करण्‍यात येत आहे.     
  2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नोव्‍हेंबर 2010 चे (3552-2) 3550 युनिट वीज बिल आकारावे.
  3. गैरअर्जदार यांनी डिसेंबर 2010 व त्‍यापुढील सर्व बिले मीटर वरील नोंदी प्रमाणे आकारुन अर्जदारास 30 दिवसाच्‍या आत द्यावे व त्‍यामध्‍ये कोणतेही व्‍याज व दंड आकारु नये.
  4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे सतत 3 वर्ष वीज वापराचे रिडींग न घेता बिल आकाराणी केल्‍यामुळे सेवेतील त्रुटी म्‍हणून 1,000/- रुपये नुकसान भरपाई, 30 दिवसाच्‍या आत द्यावी.
  5. खर्चा बद्दल आदेश नाही.
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.