जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/258 प्रकरण दाखल तारीख - 16/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/12/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.मिंलिंद पि.रामराव भालेराव, (वारस मयत – लक्ष्मीबाई रामराव भालेराव) वय वर्षे 33, धंदा शेती, रा. आंबेडकर, लोहा ता. लोहा जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. सहायक अभियंता,म.रा. विद्युत वितरण कं.मर्या.लोहा, गैरअर्जदार ग्रामीण विभाग,नांदेड. 2. कार्यकारी अभियंता, म.रा.विद्युत वितरण कं.मर्या, लोहा,ता.लोहा जि.नांदेड. कार्यालय – अण्णाभाऊ साठे चौक,नवा मोंढा,नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.एम.गायकवाड. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्हि.व्हि.नांदेड. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख, सदस्या) 1. अर्जदार हा आंबेडकरनगर लोहा जि.नांदेड येथील रहीवाशी असून त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून विज जोडणी घेतली सदरील विज जोडणी त्यांचे आई लक्ष्मीबाई रामराव भालेराव यांचे नावावर आहे. सदर विज जोडणी घरगूती वापराचे असून त्याचे बिल दरमहा रु.120 ते 250 दरम्यान येते. दि.13/05/2010 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या आईच्या नांवे असलेल्या मिटरचे विज देयक दि.01/05/2010 ते 28/06/2010 या कालावधीतील बिल रु.56,090/- असे दिले. या संदर्भात अर्जदाराच्या आईने दि.14/05/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना अर्ज देऊन विनंती केली व मिटर तपासून सुरळीत चालु असल्याची खात्री करुन घ्यावी, अशी मागणी केली, हे अचानक आलेले बिल अर्जदारास मानसीक त्रास देऊन गेले व त्यामध्ये त्यांची आई मृत झाली म्हणुन अर्जदाराने त्यांच्या घरात असलेले मिटर ग्राहक क्र.562020172507 चा विद्यूत पुरवठा अर्जदाराच्या नांवे करुन द्यावा व मानसिक त्रासाबद्यल अर्जदारास रु.20,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा लोहा ता.लोहा जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांचे घरातील विज मिटर हे त्यांच्या आईच्या नांवाने होते दि.05/05/2010 ते 28/06/2010 या कालावधीतील बिल रु.56,090/- आल्यामूळे अर्जदारास खुप आश्चर्य वाटले. म्हणुन त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला व विद्यूत मिटर त्यांचे नांवावर बदल न झाल्यामूळे अर्जदारास ग्राहक मंचात तक्रार घेऊन यावे लागले. दि.31/07/2010 ते दि.31/08/2010 या कालावधीत सदरच्या मिटरचे बिल रु.40,640/- आले व त्या अवास्तव बिलाचा विचार करुन अर्जदाराची आई दि.16/08/2010 रोजी मृत्यु पावली, कुठलीही पुर्व सुचना न देता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे कर्मचारी दि.23/09/2010 रोजी विद्यूत पुरवठा खंडीत केला दि.20/08/2010 रोजी अर्जदाराने एक अर्ज दिला व ही बिलाची दिलेली रक्कम ही घरगुती स्वरुपाची आहे व याबद्यल विनंती केली. दि.27/09/2010 रोजी त्यांच्या कार्यालयात पुन्हा रितसर अर्ज करुन ज्या मिटरच्या बाबत दिलेली चुक बिलाची विचार करुन विद्यूत पुरवठा पुर्ववत चालू करण्याची विनंती केली व गैरअर्जदाराच्या या कृतीमूळे अर्जदारास त्यांच्या कुटूंबास खुप त्रास झाला म्हणुन अर्जदाराने रु.20,000/- नुकसान भरपाई मागीतली आहे. अर्जासोबत अर्जदाराने शपथपत्र दाखल केले आहे तसेच दि.14/05/2010 रोजी गैरअर्जदारांना दिलेला अर्ज तसेच दि.27/09/2010 या तारखांना गैरअर्जदारांना दिलेला अर्ज रु.56,090/- चे विज बिल रु.40,640/- चे विज बिल दि.22/05/2010 चे विज बिल भरल्याची पावती दि.22/05/2010 चे बिल भरल्याची दुसरी पावती दि.08/03/2010 व दि.10/05/2010 चे विद्युत देयक व त्यांची आईचे मृत्य प्रमाणपत्र दाखल केले आहे. 2. गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले ज्यामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदार हे त्यांचे ग्राहक नसल्यामुळे हे प्रकरण चालविण्यास अधिकार नाही. सदरील मिटरचा विद्युत पुरवठा हा विज बिल थकबाकी असल्यामुळे खंडीत करण्यात आला होता. अर्जदाराने विज बिला बाबत काहीही मांडलेले नाही फक्त विज पुरवठा जोडुन मागणे आणी विद्युत पुरवठा हस्तांरीत करण्यासाठी योग्य मार्गाने न येता ग्राहक मंचाकडे प्रकरण दाखल करुन मिटर अर्जदाराच्या नांवे मागणी करुन अर्जदार दबाव तंत्राचा वापर करुन आपली मागणी मान्य करु इच्छित आहेत तसेच अर्जदार हा गैरअर्जदाराचा थकबाकीदार आहेत. म्हणून अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्च देऊन खारीज करण्यात यावा. गैरअर्जदार यांनी शपथपत्र सादर केले आहे तसेच अर्जदार यांनी दाखल केलेला तक्रार अर्जातील मीटरचा स्पॉट इन्शपेक्शन रिपोर्ट व त्यांचेकडे असलेली थकबाकी व त्यांना देण्यात आलेली स्लॅब बेनिफीट याबद्यलचे कागदपत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्र तपासता खालील मुद्ये उपस्थित होतात. 3. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय? होय. 2. अर्जदार हे त्यांनी केलेली मागणी गैरअर्जदार यांच्याकडुन पुर्ण करुन घेण्यास पात्र आहेत काय? नाही. 3. काय आदेश.? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – 4. अर्जदार हे वापरत असलेली विज जोडणी ही गैरअर्जदार यांच्याकडुन घेतली आहे, याबद्यल अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये वाद नाही म्हणुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. मुद्या क्र. 2 – 5. अर्जदार वापरत असलेले विज मिटर हे त्यांच्या आईच्या नांवाने आहे हे अर्जदारासही मान्य आहे व ही गोष्ट गैरअर्जदार यांनी कागदपत्रासहीत समोर आणलेली आहे. अर्जदार यांनी केवळ 1-2 बिल त्यांनी भरलेल्या पावत्या मंचासमोर दाखल केलेले आहे पण त्यापुर्वीचे किती थकीत होते याबद्यल कुठेही उहापोह नाही. अर्जदाराने आपल्या विनंती मध्ये मिटर त्यांच्या नांवाने करुन देण्यात यावे व विद्युत पुरवठा चालु करुन देण्यात यावे तसेच रु.20,000/- नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाची विनंती आहे पण त्याच वेळेस अर्जदार आपले कर्तव्य विसरल्या सारखे वाटते विज वापर केल्यानंतर विज बिल भरावे लागते याबद्यल कुठेही अर्जदाराकडुन कृत्य झालेले दिसत नाही. अर्जदाराने मिटर त्यांच्या नांवाने करुन मागीतले आहे पण त्याच वेळेस मिटर त्यांच्या आईच्या नांवावर होते व तो एकटाच वारस आहे काय की अजून कोणी वारस आहेत याबद्यल कुठलीही माहीती अर्जदाराने मंचासमोर आणलेली नाही तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेले स्पॉट इन्शपेक्शननुसार ज्यावेळी इन्स्पेक्शन करण्यासाठी गैरअर्जदाराचे प्रतीनीधी त्यांच्या जागेवर गेले त्या वेळेस तपासणीच्या वेळेस Consumer/Representative च्या समोर सिध्दार्थ भालेराव असे नांव आहे. म्हणजेच अर्जदार यांना एक भाऊ आहे असेही सिध्द होते. त्यामुळे मिटर फक्त अर्जदाराच्या नांवाने कसे केले जाईल याबद्यल अर्जदाराने त्याचे कुटूंबातील सदस्यांचे संमतीपत्र ऐनवेळी दाखल केले आहे.अर्जदार आपल्या तक्रारी असेही म्हटले की, कुठलीही पुर्व सुचना न देता अर्जदाराचा विद्युत पुरवठा अचानक खंडीत केला व त्या ठिकाणी स्पॉट इन्सपेक्शन झालेले आहे, याबद्यले कागदपत्र गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहे तसेच त्यांना बिलामध्ये स्लॅब बेनिफीट देण्यात आलेला होता, याबद्यलचे कागदपत्र गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहे. म्हणुन अर्जदारास जर मिटर त्यांच्या नांवावर करुन देण्याची गरज वाटते त्यासाठी योग्य मार्ग आहे त्याबद्यलची फी भरुन गैरअर्जदाराशी संपर्क साधणे आवश्यक असते. अर्जदार यांना एक भाऊ आहे त्यामुळे मिटर फक्त अर्जदाराच्या नांवाने होऊ शकत नाही त्यासाठी गैरअर्जदार यांच्या नियमाप्रमाणे त्यांना योग्य कागदपत्रांची पुर्तता करावी लागते तसेच गैरअर्जदार यांनी दिलेले विद्युत देयक हे कसे चुक आहे त्याबद्यलही त्यांनी सखोल उहापोह करणे आवश्यक आहे,ते या प्रकरणांत कुठेही केलेले नाही.म्हणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या नियमाप्रमाणे मिटर त्यांच्या नांवाने होण्यासाठी त्यांच्या नियमानुसार फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे व तो भरुन देऊन त्यांनी मिटर त्यांच्या नांवावर करुन घ्यावे,या निर्णयापर्यंत हे मंच आलेले आहे.अर्जदाराने मागणी केलेली रु.20,000/- ची रक्कम कशाच्या आधारावर केलेली आहे याबद्यल कुठलाही उल्लेख नसल्यामुळे व प्रथम दर्शनी अर्जदाराचे कुठलेही नुकसान झाले असे वाटत नसल्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई देता येत नाही. 6. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या कार्यालयीन नियमाप्रमाणे मिटरचे नांव बदलण्याच्या पध्दतीचा अवलंब करावा. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |