ग्राहक तक्रार क्र. 98/2014
दाखल तारीख : 09/05/2014
निकाल तारीख : 18/06/2015
कालावधी: 01 वर्षे 01 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. तानाजी चांगदेव मुंढे,
वय - 38 वर्षे, धंदा – शेती,
रा.वडगाव (ज), ता. कळंब जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
दुरक्षेत्र येरमाळा ता. कळंब जि. उस्मानाबाद.
2. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
विभागीय कार्यालय कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.
3. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
ताजमहल टॉकीज शेजारी उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस..मुंढे.
विरुध्द पक्षकार क्र.1 ते 3 विरुध्द नो से आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
अ. 1) विरुध्द पक्षकार (विप) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी चुकीचे व जास्तीचे विज देयक तक्रारकर्ता (तक) यांना देऊन सेवेत त्रूटी केलेली आहे. म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दिली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे, तक्र हा मौजे वडगांव ता.कळंब जि.उस्मानाबाद येथील रहिवाशी असून आपले घरात वापरासाठी त्यांने विप यांचेकडून विज पूरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्र.606910711798 असा आहे. तक यांने विज जोडणी घेतल्यापासून बिलाचा भरणा विप कडे नियमिपणे केला आहे. तथापि, विप यांनी अचानक तक कडचे मिटर बदलले व पूर्वी वापरलेले जूने मिटर तक चे घरी बसवले. सदर मिटरवर 7347 एवढे यूनिट विज वापराची नोंद होती. त्यामुळे दि.31.10.2013 ते दि.30.11.2013 या कालावधीसाठी तक चा विज वापर 7087 यूनिट दाखवून बिल रु.90,590/- असे अवाजवी व चुकीचे विप यांनी दिले. तक चे तक्रारीनुसार विप क्र.1 यांनी प्रत्यक्ष घरास भेट देऊन पाहणी अहवाल तयार केला व 7347 पूर्वीचे रिंडीग असल्यामुळे त्या पूढील रिडींग साठी बिल आकारावे असा शेरा मारला. तथापि, विप यांनी दि.7.2.2014 रोजी पून्हा चुकीचे व अवास्तव रु.93,500/-बिल तक यांना दिले आहे. अशा प्रकारे अवास्तव बिल देऊन विप विज जोडणी तोडण्याची धमकी देत आहेत. तक्रारदार यांचे घरी एक टयूब, एक बल्ब व एक टी.व्ही. एवढी विज उपकरणे असून सरासरी विज वापर दरमहा 30-40 यूनिट एवढा आहे. अवास्तव बिल देऊन विप यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. ते बिल दूरुस्त करण्याचा विप यांना आदेश दयावा तसेच नुकसान भरपाई व तकारीचा खर्च मिळावा म्हणून ही तक्रार तक यांनी दि.9.6.2014 रोजी दाखल केली आहे.
3) तक्रारी सोबत तक ने ऑगस्ट 2013 चे बिल, ऑक्टोबर 2013 चे बिल, दि.2.1.2014 चा स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट, नोव्हेबर 2013 चे बिल, जानेवारी 2014 चे बिल, इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत.
ब) विप यांना नोटीस बजावल्यानंतर ते मंचामध्ये हजर झाले. मात्र मुदतीमध्ये त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. मात्र विप यांनी लेखी यूक्तीवाद दाखल केला आहे. तक यांची तक्रार विप यांनी अमान्य केली आहे. मात्र विप यांनी म्हटले आहे की, जे रु.99,590/- हे चुकीचे बिल देण्यात आले होते ते मार्च 2014 मध्ये कमी करण्यात आलेले आहे. विप हे चुकीचे बिल देऊन तक ची विज जोडणी तोडण्याची धमकी देतात हे नाकबूल केले आहे. विप यांनी चुकीचे बिल रु.90,320/- कमी केले असताना सुध्दा तक हा वापराप्रमाणे बिल भरत नाही व तो थकबाकी मध्ये आहे असे विप यांचे म्हणणे आहे.
क) तक ची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व विप चा बचाव यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुददे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषासपात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :-
1. ज्या बिलाबद्दल तक्रार आहे ते नोव्हेंबर 2013 चे बिल आहे. ते बिल तक ने हजर केले आहे. ऑक्टोबर 2013 च्या बिलाचे अवलोन केले असता असे दिसून येते की, मागील रिंडीग 287 व चालू रिंडीग 361 होती. त्या महिन्याचा वापर 74 यूनिट होता. या पूर्वीच्या 11 महिन्यामध्ये विज वापर हा पूढीलप्रमाणे आहे. 37,72,38,32,37,39,39,31,34,42 व 38. तक चे म्हणणे आहे की, त्यांचे घरी 1 टयूब, 1 बल्ब व एक टी.व्ही. एवढीच विद्यूत उपकरणे आहेत. त्या दृष्टीने वापर पाहिला तर साधारणपणे 60-70 यूनिट होऊ शकतो. नोव्हेंबर 2013 चे बिलामध्ये मागील रिडींग 361 व चालू रिंडीग 7448 दाखवले असून वापर 7087 यूनिट व बिल रु.90,360/- दिलेले आहे.
2. दि.2.1.2014 चा इन्स्पेक्शन रिपोर्ट हे स्पष्ट करतो की, एक बल्ब, एक टयूब, व एक टि.व्ही. एवढाच विज वापर घरामध्ये होता. 7347 यूनिट यापासून पूढील रिंडीग चे बिल आकारण्यात यावे असा अभिंयत्याने रिपोर्ट दिलेला आहे. विप यांचे सुध्दा अंतिमतः असे म्हणणे आहे की, चुकून जास्तीचे बिल तक ला देण्यात आले व आज विप यांनी ते मान्य केलेले आहे. सदरचे बिल देऊन विप यांनी सेवेत त्रूटी केली आहे. त्यामुळे तक अनुतोषास पात्र आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी नोव्हेंबर 2013 चे दिलेले बिल रद्द करुन प्रत्यक्ष वापराप्रमाणे बिल द्यावे.
3) विप यांनी त्यापूढील बिल तक ला प्रत्यक्ष वापराप्रमाणे द्यावे.
4) विप यांनी तक यांस तक्रारीचा खर्च रु.1000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावा.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
6) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
7) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.