::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :-29/10/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार गैरअर्जदाराकडून विज पुरवठा घेत होता. अर्जदाराचे विज ग्राहक क्रं. 450020036708 असा आहे. अर्जदाराचे देयक त्याचे विज वापराचे जास्त असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराला मि�टर टेस्टींग करीता अर्ज दिले व त्या अर्जाच्या अनुषंगाने गैरअर्जदाराने दि. 07/07/12 रोजी मि�टर काढून दुसरे मि�टर लावले व काढलेले मि�टर टेस्टींगसाठी पाठविले. त्याच्याऐवजी अर्जदाराकडे नविन मि�टर लावण्यात आले ते मि�टर सुध्दा फास्ट होते. जुने मिटरची रिपोर्ट दि. 26/07/12 ला अर्जदाराला देण्यात आली त्या रिपोर्ट नुसार जुने मि�टर 100 टक्के ओके होता. अर्जदाराने पुढे असे कथन केले आरहे कि, दि. 10/08/13 रोजी नविन मि�टर काढून दुसरे मि�टर लावण्यात आले ते सुध्दा बंद होते. म्हणून अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराकडे वरील मि�टरबाबत लेखी अर्ज दिला. गैरअर्जदाराने त्या अर्जदाराच्या अर्जावर कोणतीही दखल घेतली नसल्याने अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार टेस्ट केलेले मि�टर अर्जदाराला लावून दयावे व मे- 12 पासून ते दि. 19/08/13 पर्यंत गैरअर्जदाराने अर्जदाराला विज देयक दुरुस्ती करुन दयावे तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक, मानसिक तसेच तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मि�ळावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्र. 8 वर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदाराला नाकबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, मे, जुन, जुलै मध्ये जास्त उन्हाळा राहत असल्यामुळे वातानुकुलित यंञ व कुलर इत्यादी उपकरणे थंड करण्याकरीता जास्त वापरात येतात म्हणून अर्जदाराला त्या कालावधीमध्ये विज देयक जास्त आले आहे. गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे अर्जदाराच्या विज मि�टरची तपासणी केली व ते मि�टर संपूर्ण निर्दोष आढळून आले. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेले देयक विज वापरानुसार आहे म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार गैरअर्जदाराकडुन विज पुरवठा घेत होता. अर्जदाराचे विज ग्राहक क्रं. 450020036708 असा आहे. ही दोन्ही पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराचे देयक त्याचे विज वापराचे जास्त असल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराला मि�टर टेस्टींग करीता अर्ज दिले व त्या अर्जाच्या अनुषंगाने गैरअर्जदाराने दि. 7/7/12 रोजी मि�टर काढून दुसरे मि�टर लावले व काढलेले मि�टर टेस्टींगसाठी पाठविले. त्याच्याऐवजी अर्जदाराकडे नविन मि�टर लावण्यात आले ते मि�टर सुध्दा फास्ट होते. जुने मिटरची रिपोर्ट दि. 26/07/12 ला अर्जदाराला देण्यातआली त्या रिपोर्ट नुसार जुने मि�टर 100 टक्के ओके होते. दि. 10/08/13 रोजी नविन मि�टर काढून दुसरे मि�टर लावण्यात आले ते सुध्दा बंद होते. म्हणून अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराकडे वरील मि�टरबाबत लेखी अर्ज दिला. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रं. 3 वर दस्त क्रं. अ- 1 ते अ- 10 तसेच नि. क्रं. 19 वर दाखल दस्ताऐवज अ- 1 ते अ- 6 वरुन सिध्द होत आहे याउलट गैरअर्जदाराने त्याच्या बचावाकरीता कोणताही ठळक पुरावा मंचासमक्ष सादर केला नाही सबब गैरअर्जदाराचे बचाव कथन मंचाच्या मताप्रमाणे ग्राहय धरता येत नाही. गैरअर्जदाराने दि. 10/08/13 रोजी लावलेले दुसरे मि�टर बंद पडले तरी सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराला विज वापरापेक्षा जास्त विज देयक दिले म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
//अंतीम आदेश//
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराने टेस्ट केलेला मि�टर अर्जदाराला बदलवून दयावे व मे – 12 पासून दि. 19/08/13 पर्यंतचे देयक अर्जदाराला त्याचे विज वापरानुसार आदेशाची प्रत मि�ळाल्यापासून 45 दिवसाचे आत दुरुस्ती करुन दयावे.
3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 29/10/2014