निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18.12.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 23.12.2010 तक्रार निकाल दिनांकः- 28.04.2010 कालावधी 4 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. लक्ष्मण पिता संतराम पैजने अर्जदार वय 70 वर्षे धंदा व्यापार रा.सोनपेठ , ( अड. सचीन बुरसे ) ता.सोनपेठ जि. परभणी. n विरुध्द 1 सहायक अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड ( अड.गणेश सेलूकर ) गंगाखेड ता.गंगाखेड.जि.परभणी
2 कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड सोनपेठ ता.सोनपेठ जि.परभणी ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या -------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. ) नवीन वीज कनेकशन दिले नाही म्हणून प्रस्तूतची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने सोनपेठ येथे राजाराम हजारे यांच्याकडून खरेदी केलेल्या प्लॉटमध्ये नवीन घर बांधल्यावर त्या घरात वीज कनेकशन घेण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिनांक 23.04.2010 रोजी अवाश्यक ती कागदपत्रे व डिपॉझीट भरुन अर्ज केला होता. त्यानंतर चार दिवसानी गैरअर्जदार क्रमांक 2 यानी अर्जदारास असे सांगितले की, तुम्ही खरेदी केलेल्या प्लॉट मालकाकडे आमची थकबाकी असल्यामुळे तुम्हाला वीज जोडणी देता येणार नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 याना राजाराम हजारे यांच्या थकबाकीसह माझा कसलाही संबंध नाही असा खुलासा केला असताना देखील गैरअर्जदारानी दाद दिली नाही त्यानंतर अर्जदाराने दिनांक 25.08.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे त्याबाबत तक्रार केली त्यानीही गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या सारखेच उत्तर दिले. अर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदारानी जाणुनबुजून अर्जदाराची अडवणूक करुन त्याचे घरात वीज जोडणी देण्याचे नाकारले आहे व सेवा त्रूटी करुन मानसिक त्रास दिला आहे म्हणून त्याची कायदेशीर दाद मागण्यासाठी प्रस्तूतची तक्रार दाखल करुन अर्जदारास वीज जोडणी दयावी म्हणून गैरअर्जदाराना आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 5 लगत गैरअर्जदाराकडे वीज पुरवठयाकरीता केलेल्या अर्जाची स्थळप्रत, नगर परीषद दाखला, स्टॅप पेपरवरील शपथपत्र , प्लॉटचा खरेदी दस्त, इण्डेक्सचा उतारा, अधिक्षक अभियंता यांच्याकडे पाठवलेला लेखी अर्ज वगैरे एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यानी एकत्रीतरित्या दिनांक 18.03.2011 रोजी आपले लेखी म्हणने (नि. 12 ) दाखल केले आहे. त्यानी तक्रार अर्जातील त्यांचे विरुध्द केलेली सर्व विधाने साफ नाकारली आहेत. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने राजाराम बापूराव हजारे याच्या मालकीच्या खरेदी केलेल्या प्लॉटमध्ये घर बांधलेले आसले तरी संबधीत हजारे यांच्याकडे वीज कंपनीची थकबाकी असल्यामुळे ती पूर्ण भरल्याखेरीज अर्जदाराला नियमाप्रमाणे वीज कनेकशन देता येणार नाही. त्या संदर्भात दिनांक 25.08.2010 रोजी अर्जदारास लेखी कळविले आहे याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही. अर्जदारास ग्राहक संरक्षण कायदयाखाली त्यांचेविरुध्द तक्रार करण्याचे कार्यक्षत्र येत नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. प्रकरणाच्या अंतीम सुनावणीचे नेमलेल्या तारखेस अर्जदारातर्फे अड. लेखी युक्तिवाद दिला गैरअर्जदारातर्फे मंचासमोर कोणी हजर नव्हते त्यामुळे मेरीटवर अंतिम निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदारानी मागणी केलेले नवीन घरगुती वापराचे वीज कनेकशन मंजूर करण्याचे बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदारानी सोनपेठ येथील राजाराम बापू हजारे यांच्या मालकीचा प्लॉट खरेदी केला होता त्या रजिष्टर खरेदी पत्राची कॉपी पुराव्यात ( नि.5/4) दाखल केलेले आहे. अर्जदाराने त्या प्लॉटमध्ये स्वतःचे मालकीचे नवीन घर बांधलेले आहे. त्याचा घर क्रमांक 3/51/2 आहे. या दोन्हीही अडमिटेड फॅक्टस आहेत. अर्जदाराने नवीन घरात वीज पुरवठा घेण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिनांक 23.04.2010 रोजी डिपॉझीट भरुन अर्ज केला होता.त्या अ-1 फॉर्मची छायाप्रत ही पुराव्यात (नि. 5/1) दाखल केली आहे. याखेरीज नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी आवश्यक असणारी इतर कागदपत्रे जी गैरअर्जदाराकडे दिलेली होती त्याच्याही छायाप्रती नि. 5 लगत दाखल केलेल्या आहेत. त्यानंतर वास्तविक गैरअर्जदारानी नवीन वीज जोडणी देण्यास काहीच हरकत नव्हती मात्र ती न देता अर्जदाराने ज्या प्लॉटमध्ये घर बांधलेले आहे त्या प्लॉट मालकाकडे वीज कंपनीची थकबाकी आहे व ती थकबाकी भरल्याखेरीज अर्जदारास वीज देता येणार नाही. या कारणास्तव आजपर्यंत अर्जदाराची अडवणूक करुन त्याला वीज कनेकशन देण्यापासून वंचीत ठेवलेले आहे. ही गैरअर्जदाराची कृती निश्चीतपणे बेकायदेशीर असून गैरअर्जदाराकडून याबाबतीत सेवा त्रूटी झालेली आहे याबदल कोणतीही शंका उरत नाही कारण राजाराम हजारे याच्या थकबाकीशी अर्जदाराचा कसलाही सुतराम संबध नसताना गैरअर्जदारानी केलेली अडवणूक बेकायदेशीर आहे. अशाच प्रकारच्या प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने हरीयाणा स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड विरुध्द हनुमान राईस मिल नि.ता.20.08.2010 या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, नवे घर खरेदी करणा-या ग्राहकांकडून अधी थकलेले बील फेडण्याची मागणी वीज महामंडळाला करता येणार नाही . याखेरीज रिपोर्टेड केस 2004 (2) सी.पी.आर पान 556 ( दिल्ली ) तसेच रिपोर्टेड केस 2003 (2) सी.पी.जे. पान 463 मध्येही मा. राज्य आयोगानी वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे. शिवाय 2002 (1) सी.पी.आर. पान 304 आणि रिपोर्टेड केस 2003 (1) सी.पी.आर पान 168 यामध्येही वरीष्ट न्यायालयाने व्यक्त केलेली मते प्रस्तूत प्रकरणाला तंतोंतंत लागू पडतात सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत. . आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदारानी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराने त्याच्या मालकीच्या सोनपेठ येथील घर क्रमांक 3/51/2 मध्ये मागणी केलेले नवीन वीज कनेकशन देण्याचे बाबतीत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेवून नवीन वीज जोडणी दयावी... 3 या खेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 2000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- अर्जदारास आदेश मुदतीत रोख द्यावा. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |