जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 28/2011
तक्रार दाखल दिनांक – 09/02/2011
तक्रार निकाली दिनांक – 30/10/2012
सुनंदा राजाराम सोनवणे. ----- तक्रारदार
उ.वय.45, धंदा-घरकाम,
मु.पो.अष्टाणे,ता.साक्री,जि.धुळे.
विरुध्द
सहाय्यक भविष्य निधी आयुक्त. ----- विरुध्दपक्ष
एम.आय.डी.सी.सातपूर,नाशिक.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.बी.पाटील.)
(विरुध्दपक्ष तर्फे – प्रतिनिधी श्री.एम.बी.राव.)
--------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
--------------------------------------------------------------------------
(1) अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके – विरुध्दपक्ष हे तक्रारदारांच्या मयत पतीच्या निधना नंतर त्यांचे नांवे पेंशन अदा करीत नाहीत व सेवेत त्रृटी केली म्हणुन तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांच्या पतीचे दि.30-06-2010 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यु नंतर तक्रारदारांची वि धवा पेंशन विरुध्दपक्ष हे अदा करीत नाहीत व पतीचा मृत्यु दाखला सादर करुनही त्यांच्या पतीचे खात्यावरच जीवंतपणाची पेंशन जमा करीत आहेत. त्यांचे निधना नंतर पी पी ओ 58582 नुसार दरमहा रु.513/- पेंशन तसेच भांडवल परतावा रक्कम रु.1,02,500/- मिळणे बाबत प्रस्ताव विरुध्दपक्षाकडे दि.21-08-2010 रोजी सादर केला आहे. तरीही तक्रारदारांचे मयत पतीचे नांवेच पेंशन जमा होत आहे.
(3) सदर रक्कमे बाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. माहिती अधिकारान्वयेही विचारणा केली. दि.19-11-2010 रोजी लेखी पत्रान्वये मागणी केली. परंतु विरुध्दपक्ष यांनी जुलै 2010 पासून विधवा फॅमिली पेंशन दरमहा पाठविली नाही व माहिती अर्जास उत्तरही दिले नाही. विरुध्दपक्षाने सदोष सेवा दिली त्यामुळे तक्रारदारास मानसिक,आर्थिक त्रास होत आहे. त्यामुळे तक्रारदारांना प्रस्तुत तक्रार अर्ज या न्यायमंचात दाखल करावा लागला आहे. म्हणून तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून मयत पतीचे विधवा पेंशन फरक रु.513/- व भांडवल परतावा रु.1,02,500/- व्याजासह मिळणेसाठी तसेच मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- मिळावेत,खर्चाचे रु.3,000/- मिळावेत अशी शेवटी विनंती केली आहे. परंतु त्यानंतर तक्रारदारांनी दि.30-10-12 रोजी सदर प्रकरणात शपथपत्र दाखल केले असून, त्याद्वारे असे कथन केले आहे की, विरुध्दपक्ष यांनी वादातील रक्कम त्यांना अदा केली आहे.
मात्र तक्रारदारास सदर प्रकरणी जो आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास झाला त्यापोटी विरुध्दपक्ष यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळावी अशी त्यांची विनंती आहे.
(4) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ शपथपत्र तसेच नि.नं.3 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार एकूण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत.
(5) विरुध्दपक्ष त्यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री.एम.बी.राव, इनफोर्समेंट ऑफीसर यांचेमार्फत प्रकरणात हजर झाले असून, त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.नं. 7 वर दाखल करून, सदस्य व विधवा पेंशन बाबतचे विवेचन केले आहे. बँकेतील पेंशन रकमेच्या वसुली बाबत कथन केले आहे आणि पेंशन सुरु केल्याचे कथन केले आहे. तसेच तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे.
(6) तक्रारदार यांची तक्रार, विरुध्दपक्षांचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता तसेच तक्रारदारांचे विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खलील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी केली आहे काय ? | ः होय, अंशतः |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(7) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी, विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या मयत पतीची पेंशन त्यांचे नांवे करणेसाठी सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. परंतु तक्रारदारांनी दि.30-10-12 रोजी प्रकरणात दाखल केलेल्या शपथपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता, हे स्पष्ट होते की त्यांची विरुध्दपक्ष यांचे विरुध्द जी मुख्य तक्रार होती तीचे निवारण झाले असून तक्रारीस कारण राहिलेले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांचे नांवे विधवा पेंशन रक्कम देण्यास विलंब केला व तक्रारदारांनी या न्यायमंचात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचे नांवे विधवा पेंशन सुरु केली या अर्थाने, विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत अंशतः त्रृटी आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(8) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रसापोटी रु.5,000/- तसेच पत्र, प्रोसिडींगचा खर्च, टायपिंग, झेरॉक्स वगैरेसाठी रु.3,000/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावेत अशी विनंती केली आहे. परंतु तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(9) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(ब) विरुध्दपक्ष यांनी, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी 2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः 30-10-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.