Maharashtra

Nanded

CC/09/149

Sk Shaahjad Sk Ahemad - Complainant(s)

Versus

Assis.Eng.MSEDC. - Opp.Party(s)

Adv.Md.Ameer Khan Khalilzai

05 Oct 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/149
1. Sk Shaahjad Sk Ahemad R/o Kajja Mohalla -Khandhar.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Assis.Eng.MSEDC. Branch Ambadkar Statue,khandhar.NandedMaharastra2. Dy.Eng.MSEDC.LimitedViduata Bhavan,New Mondha,Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 05 Oct 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2009/149.
                          प्रकरण दाखल तारीख - 04/07/2009
                          प्रकरण निकाल तारीख 05/10/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
              मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
              मा.श्रीमती सुजाता पाटणकर            - सदस्‍या
 
शेख शहजाद पि. शेख अहेमद
वय, 38 वर्षे, धंदा व्‍यापार
रा. काजी मोहल्‍ला बडी दर्गा रोड,
कंधार ता. कंधार जि.नांदेड                               अर्जदार
विरुध्‍द.
1.   सहायक अभिंयता,
महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित,
शाखा आंबेडकर पुतळयाजवळ, कंधार.
2.   कार्यकारी अभिंयता,                               गैरअर्जदार महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित,
विदयूत भवन, नविन मोंढा, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड. हाजी महंमद
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील   - अड.विवेक नांदेडकर.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या )
 
              गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची थोडक्‍यात हकीकत अशी की, अर्जदार हा कंधार येथील राहणारा असून त्‍यांचेकडे गैरअर्जदार यांचे विज मिटर क्र.562010106590 चे घेतलेले आहे. अर्जदार हे नेहमी आलेले विज देयक वेळेत भरीत होते. त्‍यांनी जून 2009पर्यतचे विज देयक गैरअर्जदार क्र.1 कडे जमा केलेले आहेत.अर्जदार हा 15 वर्षापासून व्‍यापार करतो. अर्जदाराचे मामाचे मूलीचे लग्‍न दि.28.06.2009 रोजी कंधार येथे होते सर्व घरातील मंडळी लग्‍नासाठी गेले होते त्‍यावेळेस दि.27.06.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे भरारी पथक अर्जदाराच्‍या घरी आले व त्‍यांनी अर्जदारास कोणतीही कल्‍पना न देता अर्जदाराच्‍या माघारी वरील मिटर पंचनामा न करता काढून नेले व अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केला. त्‍यामूळे अर्जदार हा दि.29.06.2009 रोजी गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात गेला असता त्‍यांस रु.4,000/- चे रु.2175/- चे बिले दिली व सदरील रक्‍कम पूर्ण भरल्‍याशिवाय विज पूरवठा पूर्ववत होत नाही असे सांगितले. अर्जदाराने रु.4000/- जमा केले पण रु.2175/- भरणेसाठी दि.05.07.2009 पर्यत गैरअर्जदार क्र.1 यांनी मूदत दिली व दि.30.06.2009 रोजी अर्जदाराचा विज पूरवठा चालू केला. गैरअर्जदार यांनी केलेल्‍या कृतीमूळे अर्जदाराची बदनामी झाली व न भरुन येणारे नूकसान झाले.  गैरअर्जदार यांनी जे मिटर अर्जदाराला दिलेले आहे ते बाहेर लावलेले आहे त्‍यामूळे अर्जदारावर त्‍यांची जबाबदारी नाही. अर्जदाराचे मिटर हे काहीही दोष नसताना घेऊन गेलेले आहेत त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांस ञूटीची सेवा दिलेली आहे.त्‍यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, रु.4000/- व रु.2175/- चे बिले रदद करावेत तसेच रु.25/- रिकनेक्‍शन चार्जेस रदद करावे. मिटर बंद केल्‍यामूळे अर्जदारास नूकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- मिळावेत,अर्जाचा खर्च रु.2,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. तक्रार दाखल करणेस अर्जदाराला कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराला गैरअज्रदाराने सेवा पूरविण्‍यामध्‍ये कोणतीही ञूटी केलेली नाही. सदर प्रकरण हे विज कायदा 2003 च्‍या कलम 168 प्रमाणे वैयक्‍तीक पदनामाने दाखल करता येत नाही.  अर्जदाराला जे बिल देण्‍यात आलेले आहे ते विज कायदा 2003 कलम 135 प्रमाणे विज चोरी बददलचे आहे व दूसरे बिल विज कायदा 2003 चे कलम 152 प्रमाणे तडजोडीचे बिल आहे. यापैकी अर्जदाराने तडजोडीचे बिल भरले आहे पण मूळ बिल भरलेले नाही.अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक नाहीत कारण कार्यालयीन अभिलेखानुसार शेख सनाजाद शेख अहेमद हे ग्राहक आहेत. जून 2009पर्यतचे बिल भरले हे म्‍हणणे खरे नाही. अर्जदार व्‍यापारी आहेत हे त्‍यांना माहीत नाही. गैरअर्जदार अर्जदाराच्‍या घरी गेले त्‍यावेळेस घरात कोणीही नव्‍हते हे म्‍हणणे खोटे आहे कारण त्‍यावेळेस अर्जदाराचे प्रतिनीधी महमंद नैयाज अहेमद हे हजर होते. पंचनामा अर्जदाराच्‍या माघारी केला व मिटर घेऊन गेले हे म्‍हणणे खोटे आहे. अर्जदाराने सदर रक्‍कम स्‍वयंस्‍फूर्तीने जमा केलेली आहे. मिटर मध्‍ये जी खराबी आहे ती फक्‍त अर्जदारच करु शकते इतर व्‍यक्‍ती नाही. अर्जदाराची बदनामी झाले हे म्‍हणणे खोटे आहे व त्‍यामूळे त्‍यांचे रु.50,000/- चे नूकसान झाले हे म्‍हणणे खोटे आहे. गैरअर्जदारानी अर्जदाराच्‍या मिटरची पाहणी केली तेव्‍हा असे आढळले की, विजेचा मंजूर भार 0.10 किलो वॅट असताना जोडलेली विज 1 किलो वॅट शक्‍तीची वापरली जात होती. जे की अनाधिकृत होते.  विदयूत संचाची पाहणी केली व टॉंग टेस्‍टरने त्‍यांची तपासणी केली ेअसता त्‍यामध्‍ये दोष आढळला. गैरअर्जदार यांच्‍या खांब्‍यावरुन येणारी जी. आय. वायरची पाहणी केली जी की, गच्‍चीवरील लोंखंडी तारांना बांधली होती व त्‍यांला छेद देऊन सर्व्‍हीस वायरमधील आऊटगोईग न्‍युट्रल वायरला छेद दिला होता. त्‍यामूळे अर्जदाराने विज चोरी केली हे सिध्‍द झाले. त्‍यामूळे अर्जदाराला दिलेली दोन्‍ही बिले ही विज कायदा 2003 कलम 152 नुसार दिलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदाराच्‍या सेवेत कोणतीही ञूटी नाही म्‍हणून अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
                   अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
                  मूददे                                  उत्‍तर
 1.       अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ?            होय.
 2.       गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
          कमतरता केली आहे काय ?                        नाही.
 3.      काय आदेश ?                       अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून  विज पूरवठा घेतलेला आहे या बाबतचे विज देयक अर्जदार यांनी या अर्जासोबत या अर्जाचे कामी दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे असे या मंचाचे मत आहे म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2 ः-
              गैरअर्जदार यांच्‍या कर्मचा-यानी अर्जदार यांचे घरास दि.27.06.2009 रोजी भेट दिली असता अर्जदार विज चोरी करत असल्‍याचे सदर लोकांचे निदर्शनास आले वरुन दि.27.06.2009 रोजी गैरअर्जदार यांच्‍या कर्मचा-यांनी अर्जदार यांचे मिटर जप्‍ती पंचनामा करुन जप्‍त केलेले आहे. त्‍यावेळेचा स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्ट, पंचनामा, मिटर जप्‍ती पंचनामा गैरअर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्टवर   अर्जदार यांचे घरातील उपस्थित व्‍यक्‍ती महमंद नैयाज अहेमद यांची सही आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन केले त्‍यावेळेला अर्जदार यांचे घरामध्‍ये पंचनामा करतेवेळी व्‍यक्‍ती उपस्थित होती ही बाब स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी त्‍यांचे अर्जामध्‍ये अर्जदाराच्‍या मामाच्‍या मूलीचे लग्‍न दि.28.06.2009 रोजी असल्‍याने घरात कोणीही उपस्थित नव्‍हते असे म्‍हटलेले आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या पञिकेचे अवलोकन केले असता अर्जदार यांच्‍या नातेवाईकाचे लग्‍न दि.28.06.2009 रोजी सकाळी 10.05 मिनिटांनी असल्‍याचे नमूद केलेले आहे. अर्जदार हे कंधार येथेच राहत आहेत व अर्जदारांच्‍या नातेवाईकाचे लग्‍न देखील कंधार येथेच होते. अर्जदार यांच्‍या अर्जातील कथनानुसार अर्जदार हे दि.27.06.2009 रोजी कपडे घेण्‍यासाठी घरी आले असताना शेजा-याकडून गैरअर्जदार यांनी विदयूत पूरवठा खंडीत केल्‍याचे समजले. या अर्जदार यांच्‍या कथनास कोणताही अर्थ उरत नाही. अर्जदाराच्‍या  घरातील प्रतिनीधीची स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्ट वर सही आहे सदरची बाब अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी लेखी म्‍हणणे दिल्‍यानंतर कोणत्‍याही प्रकारे नाकारलेली नाही अगर तसे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना महाराष्‍ट्र इलेक्‍ट्रीसिटी अक्‍ट 2003 कलम 135 अन्‍वये विज चोरीचे बिल रक्‍कम रु.4000/- दिलेले आहे ते अर्जदार यांनी भरलेले आहे. म्‍हणजेच अर्जदार यांना विज चोरीची घटना मान्‍यच आहे. अर्जदार यांनी रक्‍कम रु.4000/- भरल्‍यानंतर अर्जदार यांना विज कनेक्‍शन जोडून देण्‍यात आलेले आहे. त्‍यांचे रिकन्‍केशन चार्जेस रु.25/- गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून भरुन घेतलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विज चोरी बाबतचे प्रोव्‍हीजनल बिल असेंसमेट चे रक्‍कम रु.2175/- चे बिल दिलेले आहे. त्‍याबाबतची असेंसमेट शिट गैरअर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दाखल केलेली आहे. सदर असेंसमेट शिट वरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिलेले रक्‍कम रु.2175/- चे प्रोव्‍हीजनल बिल असेंसमेंट हे योग्‍य असेच आहे.  गैरअर्जदार यांच्‍या भरारी पथकाने दि.27.06.2009 रोजी अर्जदार यांचे घरास भेट दिली असता अर्जदार हे बेकायदेशीर पणे विज चोरी करीत असल्‍याचे निदर्शनास आले वरुन गैरअर्जदार यांनी महाराष्‍ट्र विज कायदा 2003 कलम 135 प्रमाणे व महाराष्‍ट्र विज कायदा 2003 चे कलम 152 अन्‍वये  कारवाई केलेली आहे व गैरअर्जदार यांनी दिलेले तडजोडीचे बिल अर्जदार यांनी भरलेले आहे. यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
 
              गैरअर्जदार यांनी लेखी म्‍हणणे व शपथपञ दिल्‍यानंतर अर्जदार यांनी त्‍यांचे म्‍हणणेमधील कथन नाकारलेले नाही अगर त्‍यांचे प्रतिउत्‍तर या अर्जाचे कामी दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञे अर्जदार यांनी नाकारलेली नाहीत अगर त्‍याबाबत शपथपञ अगर इतर कागदपञ या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेले नाहीत. स्‍पॉट इन्‍सपेक्‍शन रिपोर्ट वर सही करणारी व्‍यक्‍ती ही अर्जदार यांचे घरातील नाही असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी दि.29.06.2009 रोजी गैरअर्जदार यांना एक अर्ज दिलेला आहे.सदर अर्जामध्‍ये अर्जदार यांनी रक्‍कम रु.3100/- स्विकारुन उरलेली रक्‍कम भरणेस एक महिन्‍याची मूदत मिळावी अशी मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. म्‍हणजेच अर्जदाराला दि.27.06.2009 रोजीची घटना एक प्रकारे मान्‍यच असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.
 
                   अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेली कागदपञे, आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ व गैरअर्जदार यांचेतर्फे केलेला यूक्‍तीवाद या सर्वाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.
                        आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपल खर्च सोसावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील     श्रीमती सुजाता पाटणकर    श्री.सतीश सामते     
           अध्‍यक्ष                                 सदस्‍या                          सदस्‍य
 
 
 
 
जे.यू.पारवेकर,
लघूलेखक