Maharashtra

Thane

CC/07/298

Shri Hemchandra Nagesh Naik - Complainant(s)

Versus

ASIAN INSTITUTE OF MEDICAL SCIENCES - Opp.Party(s)

Adv G A Shaikh

27 Feb 2017

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/07/298
 
1. Shri Hemchandra Nagesh Naik
A-03, KANAK KUTIR CHS LTD.PANCHAYAT WELL, SARASWAT COLONY, DOMBIVALY (E) THANE .
...........Complainant(s)
Versus
1. ASIAN INSTITUTE OF MEDICAL SCIENCES
ASIAN INSTITUTE OF MEDICAL SCIENCES.,PLOT NO P-72, MILAP NAGAR, MIDC, DOMBIVALI (E) .
2. Mr.SHILESH KULKARNI, ADMINISTRATIVE OFFICER, ASIAN INSTITUTE OF MEDICAL SCIENCES.
PLOT NO P-72, MILAP NAGAR, MIDC, DOMBIVALI (E).
3. DR.V.M.SHETTY, DOCTOR INCHARGE, ASIAN INSTITUTE OF MEDICAL SCIENCES.
PLOT NO P-72, MILAP NAGAR, MIDC, DOMBIVALI (E).
THANE.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Feb 2017
Final Order / Judgement

Dated the 27 Feb 2017

न्‍यायनिर्णय       

           द्वारा- सौ.स्‍नेहा एस.म्‍हात्रे...................मा.अध्यक्षा.       

1.         तक्रारदार वर नमुद पत्‍यावर डोंबिवली येथे रहातात, तसेच ते मेल नर्स म्‍हणून खाजगी हॉस्पिटलमध्‍ये नोकरी करीत होते.  सामनेवाले नं.1 हे AIMS Hospital, Dombivli (E) चे ऑफीसर इन चार्ज आहेत. सामनेवाले नं.2 हे ऑडमिनीस्‍ट्रेटिव्‍ह ऑफीसर व सामनेवाले नं.3 हे ऑथोपेडिक सर्जन (AIMS treatment) आहेत.     

2.    तक्रारदार म्‍हणतात, तक्रारदार यांची ता.02.09.1997 रोजी भाटीया हॉस्पिटल येथे (THR of right side cemented) उजव्‍या भागाची टोटल हिप रिप्‍लेसमेंट सर्जरी झाली होती.  त्‍यानंतर ता.14.01.1998 रोजी तक्रारदार यांच्‍या डाव्‍या बाजुची (Un-cemented THR) सर्जरी झाली.  त्‍यानंतर पुन्‍हा सन-2005 मध्‍ये (ता.28.01.2005) Removal of Right Hip replacement (Removal of prosthesis) साठी भाटीया हॉस्पिटल येथे सर्जरी झाली.  तक्रारदार यांच्‍या Right Side Hip येथे Infection झाले होते, व ते पुर्ण शरिरात पसरण्‍याची शक्‍यता असल्‍याने तक्रारदार यांना सदर सर्जरी करावी लागली होती, त्‍यानंतर ता.15.01.2007 ते ता.18.01.2007 या कालावधीत तक्रारदार सामनेवाले यांच्‍या हॉस्पिटल (AIMS) मध्‍ये गळू व ताप यावरील उपचारासाठी दाखल झाले.  तक्रारदार यांनी तेव्‍हा AIMS मध्‍ये तक्रारदार यांच्‍या Right Hip replacement (Revision) Operation Treatment बद्दल सामनेवालेकडे चौकशी केली, तेव्‍हा त्‍यांना सदर Operation साठी सामनेवाले यांनी रक्‍कम रु.2,00,000/- खर्च (Revision RHR) येईल व त्‍यामध्‍ये हॉस्पिटलमध्‍ये रहाणे, व सर्व औषधोपचार, इतर मेडिकल मटेरियल इत्‍यादि खर्चांचा समावेश (Package) असेल असे सांगितले.  तसेच एकाच छताखाली तक्रारदार यांना सर्व सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील व तक्रारदार यांचे ऑपरेशन देखील यशस्‍वीरित्‍या पार पाडले जाईल असे आश्‍वासन सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना दिल्‍याने तक्रारदार ता.16 फेब्रुवारी-2007 ते 26 फेब्रुवारी-2007 या कालावधीत सामनेवाले यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये त्‍याकामी (Revision RHR) दाखल झाले.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे एकूण रु.2,00,000/- रकमेपैंकी रु.1,40,000/- ही रक्‍कम ता.05 फेब्रुवारी-2007 रोजी (रु.1,00,000/-), व ता.16 फेब्रुवारी-2007 (रु.40,000/-) अदा केली. (Exh-A) तक्रारदार म्‍हणतात, सामनेवाले यांनी तक्रारदार यांची Revision RHR Surgery करण्‍यापुर्वी Bone Scanning किंवा Transverse lesson of bone हया Test करुन तक्रारदार सदर Revision RHR सर्जरी सहन करण्‍यासाठी व पुर्वीच्‍या ऑपरेशनच्‍या जागी Prosthesis बसविण्‍यासाठी सक्षम आहेत अथवा कसे? याची वर नमुद केल्‍याप्रमाणे Test करुन सदर Operation पुर्वी शहानिशा करणे गरजेचे होते. (It is condition precedent of Revision RHR) परंतु सामनेवाले यांनी ती केली नाही. 

3.    तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे ता.18.01.2007 रोजी केलेल्‍या तक्रारदार यांच्‍या एक्‍स-रे रिपोर्ट नुसार There is Shortning of right leg असा उल्‍लेख होता, तसेच तक्रारदार यांच्‍या  ESR व  2 D Echo test नुसार तक्रारदार यांच्‍या हृदयात रक्‍ताच्‍या गुठळया (Blockages in the heart) होत्‍या व AIMS च्‍या तज्ञांनी 15 दिवस उशिराने तक्रारदार यांचे ऑप्रेशन करण्‍याचा सल्‍ला सामनेवाले यांना देऊनही, सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या Revision THR चे ऑपरेशन ता.18.02.2007 रोजी केले व ते यशस्‍वी न झाल्‍याने तक्रारदार यांना अपंगत्‍व प्राप्‍त झाले, व त्‍यांना काठी घेऊन पाच मिनीटांपेक्षा जास्‍त चालणेही अशक्‍य झाले.  तसेच तक्रारदार यांच्‍या दिलेल्‍या डिसचार्ज कार्डमध्‍ये व तक्रारीतील सामनेवाले यांनी निवेदन केलेल्‍या बाबींमध्‍ये फरक आढळल्‍याने व प्रस्‍तुत Revision THR Right side ची सर्जरी झाल्‍याने तक्रारदार यांच्‍या समस्‍या अधिक वाढल्‍याचे नमुद करुन तक्रारदार यांना प्रस्‍तुत तक्रार सामनेवाले विरुध्‍द दाखल करुन तक्रारीत नमुद केल्‍यानुसार मागण्‍या केल्‍या आहेत.   

4.     सामनेवाले यांनी कैफीयत दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रार फेटाळण्‍याची मागणी केली आहे. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदार यांना प्रथम सामनेवाले यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये (Skin boiling) च्‍या उपचारासाठी ता.15.01.2007 ते ता.18.01.2007 रोजी दाखल करण्‍यात आले असुन त्‍याचा प्रस्‍तुत तक्रारींशी काहीही संबंध नाही केवळ सामनेवाले यांना मानसिक त्रास देण्‍यासाठी व सामनेवाले यांचेकडून पैसे कमविण्‍यासाठी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार केल्‍याचे सामनेवाले यांनी नमुद केले आहे, व तक्रारीतील सर्व आरोप फेटाळून तक्रारदार यांची प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍याची मागणी सामनेवाले यांनी केली आहे.  त्‍यानंतर उभयपक्षांनी पुरावा शपथपत्र, व लेखी युक्‍तीवाद दाखल केले असुन मंचाने तक्रारीच्‍या निराकरणार्थ खालील मुदयांचा विचार केला.

          मुद्दे                                                                                            निष्‍कर्ष

1.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा

  दिल्‍याचे तक्रारदार यांनी सिध्‍द केले आहे का ?.....................................होय.

2.तक्रारीत काय आदेश ?...............................................तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.

5.कारण मिमांसा

Definition-

            Hip revision surgery, which is also known as revision total hip arthroplasty, is a procedure in which the surgeon removes a previously implanted artificial hip joint, or prosthesis, and replaces it with a new prosthesis, Hip revision surgery may also involve the use of bone grafts.  The bon graft may be an autograft, which means that the bone is taken from another site in the patient’s own body; or an allograft, which means that the bone tissue comes from another donor.

मुद्दा-क्र.1 व 2- तक्रारदार यांच्‍या Right Side Hip चे सन-1997 मध्‍ये (ता.02.09.2007) रोजी (Cemented Total Hip Replacement  Right Side) सर्जरी भाटीया येथे झाली.  त्‍यानंतर ता.14.01.1998 रोजी तक्रारदार यांच्‍या डाव्‍या बाजुची (Un-cemented THR) सर्जरी झाली, त्‍यानंतर पुन्‍हा ता.28.01.2005 रोजी Removal of Right Hip Replacement (Removal of prosthesis) ची भाटीया येथे सर्जरी झाली, सदर सर्जरी त्‍या भागातील इनफेक्‍शन पुर्ण शरिरात पसरु नये म्‍हणून करणे गरजेचे होते, तसेच त्‍यानंतर तक्रारदार सामनेवाले यांचेकडे गळू व तापावर उपचाराबाबत ता.15.01.2007 ते ता.18.01.2007 या बाबी सामनेवाले यांनी कैफीयतीत मान्‍य केल्‍या आहेत.  त्‍यानंतर ता.18.01.2007 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा एक्‍स-रे घेतला, त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे उल्‍लेख आहे.  एक्‍स-रे रिपोर्ट ता.18.01.2007 (तक्रार परिच्‍छेद-6 व Exh-“B”)....

       “Fragments of bone cement are noted and Metallic wire rings are seen around the upper shaft of the right femur.” It also mentions that there is shortening of right leg. 

            ता.18 जानेवारी-2007 रोजीच्‍या X-Ray Report मध्‍ये वरीलप्रमाणे उल्‍लेख असल्‍याने तक्रारदार यांच्‍या Revision Right Hip Replacement  (Revision THR) नुसार सामनेवाले यांनी तक्रारदार यांची मेडिकल हिस्‍ट्री लक्षात घेऊन तसेच सदर ऑपरेशनपुर्वी करावयाच्‍या Bone Scaning व Transverse lesson of bone या Test (Condition Precedent) करुन तक्रारदार यांच्‍या संबंधीत भागातील Hip bones ची तसेच Muscle व Tissues च्‍या सक्षमते बाबत ची टेस्‍ट करणे आवश्‍यक होते.  त्‍यावरुन सामनेवाले यांना तक्रारदार यांच्‍या Revision of THR Surgery मध्‍ये तक्रारदार यांच्‍या सदर शस्‍त्रक्रिया करण्‍याच्‍या भागातील Bones, Tissues Muscles इत्‍यादिला कुठे व किती प्रमाणात Infection आहे.  सदर भागाचे Muscles Tissues तसेच Bones सदर सर्जरीमुळे बसविण्‍यात येणारे Prosthesis बसवून घेण्‍यास सक्षम आहेत कि नाही याबाबतची माहिती सामनेवाले यांना प्राप्‍त झाली असती, Bone Scan Test  का करतात व Prosthesis म्‍हणजे काय याचा खुलासा खालील प्रमाणे

Why is bone scan performed?

Bone scan may reveal bone problems associated with the following conditions-

  • arthritis
  • avascular necrosis (when bone tissue dies cule to lack of blood supply)
  • Cancer that has spread to the bone form other parts of the body
  • Fibrous dysplasia (a condition that causes abnormal scar like tissue to grow in place of normal bone
  • Fractures
  • Infection involve in the bone
  • Paget’s disease of the bone (a disease that causes weak, deformed bones)

Prosthesis- means as artificial body part such as arm, foot or tooth 

      That replaces a missing part.

       तसचे रिव्‍हीजन हिप रिप्‍लेसमेंट सर्जरीमध्‍ये प्रथम करावयाच्‍या हिप रिप्‍लेसमेंट सर्जरी पेक्षा जास्‍त धोका असल्‍याने सामनेवाले यांनी वर नमुद टेस्‍ट करणे आवश्‍यक होते, परंतु सामनेवाले यांनी त्‍याबाबतची खबरदारी घेतली नाही, व तक्रारदार यांची ESR Test झाली असतांना त्‍यामध्‍ये नॉर्मल व्‍यक्‍तीचे ESR Figure 10 ते 15 पर्यंत असते. परंतु तक्रारदार यांचा ESR- 74 इतका होता तो पुन्‍हा नॉर्मल करण्‍यासाठी ऑपरेशनपुर्वी सामनेवाले यांनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक होते.  ते सामनेवाले यांनी केल्‍याचे दिसुन येत नाही.  तक्रारदार यांच्‍या ECG Test मध्‍ये तक्रारदार यांना Heart Blockages असल्‍याने AIMS च्‍या तज्ञांनी तक्रारदार यांना सदर Blockages प्रथम काढून टाकून त्‍यानंतर ऑपरेशन (Revision of THR) करण्‍याचा सल्‍ला दिला होता. अथवा तक्रारदार यांचे ऑपरेशन 15 दिवसांनंतर करण्‍याचे सामनेवाले यांना सुचविले होते, व त्‍याबाबतचे Observations in Case papers AIMS च्‍या तज्ञांनी सामनेवाले यांना दिले होते.  परंतु सामनेवाले यांनी सदर बाब जाणुनबूजून मंचासमोर आणलेली नाही, तसेच तक्रारदार यांचेवर सदर Revision of THR सर्जरी करण्‍यासाठी आलेले डॉ.शेट्टी हे THR सर्जरीमध्‍ये निष्‍णात असल्‍याचा कोणताही पुरावा सामनेवाले यांनी सादर केलेला नाही.  ते केवळ अर्थोपेडिक सर्जन असल्‍याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या वर नमुद केल्‍याप्रमाणे प्रि-ऑपरेशन टेस्‍ट, बोन्‍स स्‍कॅनिंग व ट्रान्‍सव्‍हर्स लेसन ऑफ बोन या टेस्‍ट (Condition Precedent) म्‍हणून करुन घेणे अशा प्रकारच्‍या Revision of THR Surgery मध्‍ये आवश्‍यक असुनही केल्‍या नाहीत, तसेच तक्रारदार यांना हार्ट ब्‍लॉकेजेसचा त्रास असल्‍याचे माहित होऊनही तसेच तक्रारदारांचा ESR पुन्‍हा सामान्‍य होण्‍याची वाट न पहाता तक्रारदार यांच्‍या सर्जरीचे वेळापत्रक पुढे न ढकलता सामनेवाले यांनी ता.18.02.2007 रोजी तक्रारदार यांच्‍यावर वर नमुद केल्‍याप्रमाणे Revision of THR Surgery ची घाई केली,

यावरुन सामनेवाले यांचा निष्‍काळजीपणा सिध्‍द होतो.  तक्रारदारांच्‍या सदर भागाचे मसल्‍स व टिश्‍युज सदर सर्जरीसाठी सक्षम आहेत किंवा कसे हे सामनेवाले यांनी वर नमुद टेस्‍टव्‍दारे पडताळून पाहिले असते तर तक्रारदार यांची सदर सर्जरी यशस्‍वीरित्‍या पार पडली असती, व तक्रारदार यांना सर्जरी नंतरही काठी घेऊन चालण्‍याची वेळ आली नसती.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्‍या एक्‍स-रे रिपोर्टमध्‍ये तक्रारदार यांचा पाय अखुड झाल्‍याचे नमुद केले असल्‍याचे मान्‍य केले आहे, There is Shortning of the right leg. With the right greater trochanter abutting against the iliac bone (pg.15) व तक्रारदार यांच्‍या सदर भागात इन्‍फेक्‍शन असल्‍याचे देखील सामनेवाले यांना ज्ञात होते.  अशा प्रसंगी ऑपरेशनपुर्वी वर नमुद Bone Scaning Test  Transverse lesson of bone या Test न करता थेट तक्रारदार यांच्‍यावर सामनेवाले यानी Revision of THR Surgery केल्‍याने तक्रारदार यांची तब्‍बेत अधिक खालावली त्‍यांना 5 मिनिटांपेक्षा अधिक काळ काठी घेऊनही चालणे कठीण झाले, तसेच तक्रारदार यांना पुन्‍हा तक्रारदार यांच्‍या सदर भागावर सामनेवाले यांनी केलेली सर्जरी अयशस्‍वी झाल्‍याने के.ई.एम. हॉस्पिटलमध्‍ये सप्‍टेंबर-2007 दाखल होऊन Revision of THR Surgery पुन्‍हा करुन घ्‍यावी लागली, त्‍यासाठी रक्‍कम रु.2,50,000/- तक्रारदार यांचे प्रतिज्ञापत्र (Exh-2) तक्रारदार यांना खर्च आला, तसेच तक्रारदार यांची AIMS मधील सर्जरी अयशस्‍वी झाल्‍याने तक्रारदार यांना सदर सर्जरी नंतर मेल नर्स म्‍हणून ते खाजगी हॉस्पिटलमध्‍ये पुर्वी करीत असलेल्‍या कामास मुकावे लागले.  तसेच तक्रारदार यांचे नोकरीमधुन मिळणारे उत्‍पन्‍न बंद झाले, यामुळे तक्रारदार यांना मोठया प्रमाणात आर्थिक तसेच मानसिक नुकसान सोसावे लागले, सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांच्‍या ऑपरेशनसाठी हिप रिप्‍लेसमेंट सर्जरीबाबत त्‍या क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींची नियुक्‍ती करणे तसेच सदर ऑपरेशनसाठी लागणा-या इतर सोई सुविधा जसे ब्‍लड बॉटल्‍स, अर्जन्‍ट मेडिसिन्‍स, बोन ग्राफटींगसाठी बोन अँरेंजमेंट करुन ठेवणे इत्‍यादि उपलब्‍ध करुन देणे हे सामनेवाले नं.1 व 2 यांचे कर्तव्‍य त्‍यांनी पार पाडल्‍याचे दिसुन येत नाही.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर हॉस्पिटलमधुन डिस्‍चार्ज करतांना त्‍यावर नमुद केलेली माहिती, व सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेल्‍या ट्रीटमेंट बद्दलची कैफीयत व लेखी युक्‍तीवाद इत्‍यादि मधील माहिती विसंगत आहे. तसेच काही महत्‍वाच्‍या नोंदी जसे ई.सी.जी. बाबतची नोंद इत्‍यादि सामनेवाले यांनी सदर डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये नमुद केलेल्‍या नाहीत. सामनेवाले म्‍हणतात त्‍यांनी तक्रारदार यांची सदर सर्जरी खालील कारणास्‍तव केली नाही. “It was noticed that there was no muscle attachment and only the fiberous tissues were present which did not permitted to proceed further for operations” परंतु तक्रारदार यांनी तक्रारीच्‍या पान क्रमांक-18 (Exh-D) वर सादर केलेल्‍या तक्रारदार यांच्‍या AIMS Hospital च्‍या Discharge Card वर Treatment Details मध्‍ये Arthrolysis right hip joint was done on Dt.18.02.2007 असे नमुद आहे, व Operation details मध्‍ये Right THR done under Spinal Anesthesia by Dr. V.M. Shetty on Dt. 18.02.2007 असा उल्‍लेख आहे. Discharge Card मध्‍ये तक्रारदार यांच्‍या ECG बाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.  यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती ऑपरेशनपुर्वी Pre- operation Test Bone Scan & Transverse Lesson Test घ्‍यावयाच्‍या खबरदा-या न घेणे Discharge Card वरील काही महत्‍वाच्‍या माहिती न लिहीणे, Discharge Card नुसार तक्रारदार यांचे ऑपरेशन केले असतांना ते केलेले नाही, व केवळ टाके घालून सदर ऑपरेशन चा भाग पुन्‍हा बंद केला इत्‍यादि बाबी सामनेवाले सिध्‍द करु न शकल्‍याने, तसेच Pre- operation व Post Operation नंतर घ्‍यावयाची खबरदारी सामनेवाले यांनी घेतलेली नसल्‍याने, म्‍हणजेच तक्रारदार यांचे ऑपरेशन झाल्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा पोस्‍ट ऑपरेशन एक्‍स-रे काढणे गरजेचे होते, परंतु सामनेवाले यांनी त्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.  सामनेवाले नं.3 यांच्‍याकडे तक्रारदार सदर सर्जरी झाल्‍या नंतर दोन वेळा तपासणीसाठी गेले, परंतु सामनेवाले नं.3 यांनी तक्रारदार यांचे सदर सर्जरी बाबतचे सुरुवातीपासुनचे केसपपर्स जपून ठेवणे आवश्‍यक असुनही ते ठेवले नाहीत, व तक्रारदार यांना सदर सर्जरी नंतर पुढे भविष्‍यात कोणती खबरदारी अथवा उपचार घ्‍यावयास हवे याबाबतचा योग्‍य सल्‍ला सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिला नाही.

सामनेवाले यांनी डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये तक्रारदार यांच्‍यावर Revision of THR Surgery केल्‍याचे नमुद केले आहे.  परंतु ता.20.02.2007 रोजी तक्रारदार यांची सदर शस्‍त्रक्रीया झाली नाही असे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सांगितले.  यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होते.

प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले नं.3 यांनी त्‍यांच्‍या पुरावा शपथपत्रासोबत डॉ.वारके यांचे प्रतिज्ञापत्र (Affidavit of expert witness) ता.13.10.2010 रोजीचे जोडले आहे.  परंतु त्‍यामध्‍ये केवळ सामनेवाले नं.3 यांनी सांगितल्‍याप्रमाणे डॉ.वारके यांनी लिहून दिले असल्‍याचे नाकारता येत नाही.  कारण सदर प्रतिज्ञापत्रात डॉ.वारके यांनी, सदर प्रकरणाच्‍या कागदपत्रांचे अवलोकन करुन सदर प्रतिज्ञापत्र(Expert opinion) देण्‍यात येत आहे असा कुठेही सदर प्रतिज्ञापत्रात उल्‍लेख केलेला नाही. डॉ.वारके यांनी दिलेले सदर प्रतिज्ञापत्रातील Observations हे Primary Surgery बाबत असुन Secondary/ Revision  Surgery बाबत नाहीत.  तसेच जरी सदर कागदपत्रांवर Affidavit of expert witness असा उल्‍लेख असला तरी, सामनेवाले यांनी तो डॉ.वारके यांचेकडून शपथेवर (On oath) लिहून घेतलेला नाही.  त्‍यामुळे डॉ.वारके यांचे सदर प्रतिज्ञापत्र कायदयाच्‍या दृष्‍टीने वैध (Valid) नाही, त्‍यामुळे सदर प्रतिज्ञापत्रामध्‍ये दिलेला मजकूर सदर तक्रारीवरील अंतिम आदेश पारित करतांना विचारात घेता येणार नाही.

वर नमुद कारण मिमांसेनुसार सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिली हे सिध्‍द होते.  म्‍हणून सामनेवाले नं.1 ते 3 यांचेकडून तक्रारदार आर्थिक नुकसानभरपाई तसेच मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मिळण्‍यास पात्र आहेत. सबब, तक्रारदार यांना वर नमुद केल्‍याप्रमाणे आर्थिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना रक्‍कम रु.5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्‍यांत दयावेत असे आदेश सामनेवाले नं.1 ते 3 यांना देण्‍यात येतात.  तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर ऑपरेशन बाबत घेतलेली रक्‍कम परत केल्‍याचे व केवळ रक्‍कम रु.32,656/- इतकी रक्‍कम मटेरिअल इत्‍यादिसाठीच्‍या खर्चाबाबत आकारल्‍याचा युक्‍तीवाद केला आहे.  परंतु सदर रक्‍कम सामनेवाले तक्रारदाराकडून विविध प्रकारचे खर्च दाखवून त्‍याबाबतचे पुरावे सादर न करता आकारु शकत नाही.  सबब, सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या सदर रक्‍कम रु.32,656/- (अक्षरी रुपये बत्‍तीस हजार सहाशे छपन्‍न) तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्‍यांत परत करावी असे आदेश सामनेवाले यांना देण्‍यात येतात. तक्रारदार यांना सामनेवाले यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार वकीलामार्फत दाखल करण्‍यासाठी झालेल्‍या न्‍यायिक खर्चाबाबत, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना न्‍यायिक खर्चापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार) दयावेत.

उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .           

                        - अंतिम आदेश -

1. तक्रार क्रमांक-298/2007 अंशतः मंजुर करण्‍यात येते.

2. सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.

3. सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना आदेश पारित

   तारखेपासुन दोन महिन्‍यांत रक्‍कम रु.5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख मात्र) कारण

   मिमांसेमध्‍ये नमुद कारणांस्‍तव आर्थिक नुकसानभरपाईपोटी व मानसिक त्रासाच्‍या नुकसान

   भरपाईपोटी दयावेत. 

4. सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या रक्‍कम रु.32,656/- (अक्षरी रुपये

   बत्‍तीस हजार सहाशे छपन्‍न) तक्रारदार यांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्‍यांत

   दयावेत.

5. सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना न्‍यायिक

   खर्चापोटी रक्‍कम रु.30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार) आदेश पारित तारखेपासुन दोन

   महिन्‍यांत दयावेत.

6. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

7. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

ता.27.02.2017

जरवा/

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.