Maharashtra

Nagpur

CC/6/2018

SHRI. ANILKUMAR THAKURDAS SAWAL - Complainant(s)

Versus

ASHUTOSH AUTOMOBILES, THROUGH THE OWNER / MARKETING MANAGER - Opp.Party(s)

ADV. A. T. SAWAL

03 May 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/6/2018
( Date of Filing : 03 Jan 2018 )
 
1. SHRI. ANILKUMAR THAKURDAS SAWAL
PLOT NO. 694, SNEH VILA, NEAR CHITNIS PARK, MAHAL, NAGPUR-440032
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ASHUTOSH AUTOMOBILES, THROUGH THE OWNER / MARKETING MANAGER
240, C.A. ROAD, T SCARE, EAST WARDHAMAN NAGAR, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. S.R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. A. T. SAWAL, Advocate
For the Opp. Party:
Dated : 03 May 2019
Final Order / Judgement

 

-निकालपत्र-

 (पारीत दिनांक- 03 मे, 2019)

     (मा. सदस्‍य श्री सु.रा.आजने  यांच्‍या आदेशान्‍वये )         

01.     तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विरुध्‍द अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याने ग्राहक मंचा समक्ष दाखल केली आहे.

02.   तक्रारीचा थोडक्‍यात तपशिल खालील प्रमाणे-

    तक्रारकर्ता हे व्‍यवसायाने वकील असून ते उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहतात. त्‍यांनी स्‍वतःचे उपयोगासाठी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेत्‍या कडून “MAESTRO EDGE”  ही गाडी रुपये-69,839.40 पैसे एवढया किमतीत विकत घेतली असून  त्‍याचा नोंदणी क्रं- MH-49-AW-5176 असा आहे. तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे वापरातील जुनी गाडी विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांना दिल्‍याने तेवढी रक्‍कम समायोजित करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्ता यांना प्रत्‍यक्षात रुपये-64,839.40 पैसे एवढया रकमेची पावती क्रं-VSR-10102017-35 दिनांक-10.10.2017 रोजीची दिली.

    तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांना विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे कडून नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांचे कडून वाहनाचा विमा काढल्‍या बद्दलची पावती प्राप्‍त झाली त्‍यावेळी तक्रारकर्ता यांचे असे निर्दशनास आले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी त्‍यांचे कडून विम्‍या करीता रुपये-220/- तसेच गहाण शुल्‍क रुपये-500/- जॉयराईड चॉर्जेस रुपये-1075/-, किरकोळ खर्च रुपये-1076/- व गुडलाईफ मिसलेनियस रुपये-175/- अशा प्रकारे एकूण रुपये-3046/- जास्‍तीचे घेतले. तक्रारकर्ता यांनी स्‍वतः विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांचेशी संपर्क साधला व गाडी खरेदीपोटी वसुल केलेली जास्‍तीची रक्‍कम परत मिळण्‍या बाबत विनंती केली परंतु ती रक्‍कम देण्‍यास नकार देण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारकर्ता यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना दिनांक-22.10.2017 रोजी रितसर नोटीस पाठविली व नोटीस प्रमाणे रक्‍कम रुपये-3046/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- भरपाईची रक्‍कम मागितली. तक्रारकर्ता यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचेकडे दोनदा तक्रारी करुनही त्‍यावर कोणतीही कार्यवाही करण्‍यात आली नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रकारे मागणी केलेली आहे-

 (01) विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांना आदेशित करण्‍यात यावे की, तक्रारकर्ता यांचे कडून गाडी खरेदीपोटी जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम रुपये-3046/- दिनांक-30.09.2017 पासून ते प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-24 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्ता यांना परत करावी.

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- तक्रारकर्ता यांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी, तक्रारकर्ता यांना  तक्रारखर्च व नोटीस  खर्च म्‍हणून रुपये-5000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.      विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेता यांना या न्‍यायमंचाचे    मार्फतीने नि.क्रं 5 प्रमाणे रजि.पोस्‍टाने नोटीस पाठविली. सदर नोटीस        विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांना मिळाल्‍या बाबत पोस्‍टाचा ट्रॅक रिपोर्ट नि.क्रं-9-ए वर दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 हे ग्राहक मंचा समक्ष उपस्थित न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने प्रकरणात दिनांक-19.05.2018 रोजी पारीत केला.

 

04.     विरुध्‍दपक्ष क्रं -2 हे ग्राहक मंचा समक्ष उपस्थित होऊन त्‍यांनी लेखी उत्‍तर नि.क्रं 14 वर दाखल केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार  विरुध्‍दपक्ष क्रं 2 ही एक नोंदणीकृत कंपनी आहे व तिचे नोंदणीकृत कार्यालय दिल्‍ली येथे आहे तर शाखा ही नागपूर येथे आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 ही कंपनी दोन चाकी वाहन आणि सुटे भाग याचे निर्माता, वितरक आणि विपणनचा व्‍यवसाय करते. विरुध्‍दपक्ष क्रं-1 हे, विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 यांचे मध्‍ये करार करण्‍यात आला त्‍यानुसार विरुध्‍दपक्ष क्रं-1 हे संबधित ग्राहकास उपयुक्‍त सेवा पुरविण्‍या बाबत सर्वस्‍वी जबाबदार असतील आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीला निश्‍चयपूर्ण सांगितले होते की, ते तक्रारकर्ता यांचेशी होणारा वाद सोडवतील. अधिकृत करारा प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 हे कोणत्‍याही बाबतीत विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे एजंट नाहीत आणि एकदा विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी निर्मित केलेले वाहन व सुटे भाग, विरुध्‍दपक्ष क्रं-1 यांना विक्री केल्‍या नंतर, विरुध्‍दपक्ष क्रं -2 कंपनीचा, विरुध्‍दपक्ष क्रं-1 विक्रेता यांचे  विक्री व्‍यवहारावर कोणतेही निर्बंध नाही आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांची सर्वस्‍वी जबाबदारी आहे, त्‍यामुळे एखाद्दा व्‍यवहारात विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांनी जास्‍त किम्‍मत घेऊन वाहनाची विक्री केल्‍यास, विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीची या प्रकरणात कोणतीही भूमीका नाही. ग्राहक आणि विक्रेता यांचे मध्‍ये वाहनाचे विक्रीचा किंवा सुटया भागाचे विक्रीचा व्‍यवहार असतो. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनी विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली.

 

05.      तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत दस्‍तऐवज यादी क्रं 2 अनुसार अक्रं 1 ते 06 प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये   विरुध्‍दपक्ष क्रं 1 तर्फे तक्रारकर्ता यांचे नावे निर्गमित केलेले वाहन विक्रीचे देयक, वाहनाचे विम्‍याची प्रत, तक्रारकर्ता यांनी दोन्‍ही विरुध्‍दपक्षांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, रजि. पावत्‍या, रजि.पोच, अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे.

 

06.      विरुध्‍दपक्ष  क्रं-2 यांनी  लेखी युक्‍तीवाद व  सोबत त्‍यांच्‍यात आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांचे मध्‍ये झालेल्‍या कराराची प्रत, तक्रारकर्ता यांचे नोटीसला त्‍यांनी दिलेले उत्‍तर अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

07     तक्रारकर्ता यांचा  मौखीक युक्‍तीवाद ऐकला.  तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनी तर्फे वकील श्री अतुल चांडक यांचा मौखीक  युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

08.    तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनी यांचे कथन, प्रकरणात उपलब्‍ध असलेले दस्‍तऐवज यावरुन आम्‍ही खालील मुद्दे विचारात घेतलेत आणि त्‍यावर खालील कारणांसाठी निष्‍कर्ष नोंदविलेले आहेत.             

               मुद्दे                                                                   उत्‍तर.            

 1.  त.क. हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक होतात काय?                         होय.

     

 2.   वि.प. क्रं1  यांनी त.क. सोबत अनुचित व्‍यापारी

    प्रथेचा अवलंब केला आहे काय?                                       होय.  

              

3.  काय आदेश?                                                           अंतिम   आदेशा नुसार

कारणमिमांसा

   मुद्दा क्रं.-1 व 2  बाबत

09.        तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्मित वाहन हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांचे कडून विकत घेतल्‍या बाबत बिलाची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. सबब तक्रारकर्ता हे विरुध्‍दपक्ष  क्रं-1 विक्रेता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी यांचे ग्राहक असल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते.

 

 10.      तक्रारकर्ता यांची संक्षीप्‍त तक्रार अशी आहे की, त्‍यांना विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे कडून नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांचे कडून वाहनाचा विमा काढल्‍या बद्दलची पावती प्राप्‍त झाली, त्‍यावेळी त्‍यांचे असे निर्दशनास आले की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी, त्‍यांचे कडून विम्‍या करीता रुपये-220/- तसेच गहाण शुल्‍क रुपये-500/- जॉयराईड चॉर्जेस रुपये-1075/-, किरकोळ खर्च रुपये-1076/- व गुडलाईफ मिसलेनियस रुपये-175/- अशा प्रकारे एकूण रुपये-3046/- जास्‍तीचे घेतले व त्‍या संबधात त्‍यांना शारिरीक व मानसिक त्रास झाला तसेच नोटीस द्दावी लागली आणि शेवटी ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करावी लागली.

 

11.       तक्रारकर्ता यांचे तक्रारी संबधात विरुध्‍दपक्ष क्रं 2 वाहन निर्माता कंपनी यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्ता यांचे कडून वाहन विक्रीचे व्‍यवहारात, विरुध्‍दपक्ष क्रं 1 जे, विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत, त्‍यांनी जी जास्‍तीची रक्‍कम वसुल केली, त्‍या जास्‍तीचे वसुल केलेल्‍या रकमेशी, विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा कोणताही संबध नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 ही कंपनी दोन चाकी वाहन आणि सुटे भाग याचे निर्माता, वितरक आणि विपणनचा व्‍यवसाय करते. विरुध्‍दपक्ष क्रं-1 हे, विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 यांचे    मध्‍ये करार करण्‍यात आला असून त्‍या अनुसार विरुध्‍दपक्ष क्रं-1 हे संबधित ग्राहकास उपयुक्‍त सेवा पुरविण्‍या बाबत सर्वस्‍वी जबाबदार असतील. अधिकृत  करारा प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1  वाहन विक्रेता हे कोणत्‍याही बाबतीत विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे एजंट नाहीत आणि एकदा विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीने निर्मित केलेले वाहन व सुटे भाग, विरुध्‍दपक्ष क्रं-1 यांना विक्री केल्‍या नंतर, विरुध्‍दपक्ष क्रं -2 कंपनीचा, विरुध्‍दपक्ष क्रं-1 विक्रेता यांचे  विक्री व्‍यवहारावर कोणतेही निर्बंध नाही आणि त्‍या संबधात जी काही जबाबदारी आहे ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांची सर्वस्‍वी असल्‍याचे नमुद केले आहे.

 

12.      विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांना प्रस्‍तुत ग्राहक मंचाचे मार्फतीने रजि.पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते शेवट पर्यंत मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत व त्‍यांनी तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनी यांचे त्‍यांचे  विरुध्‍द केलेली विधाने खोडून काढलेली नाहीत वा कोणतेही दस्‍तऐवज सुध्‍दा दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्ता यांची तक्रार सत्‍यापनावर आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-2 निर्माता कंपनीने सुध्‍दा आपल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्ता यांचे वाहन विक्रीचे व्‍यवहारात त्‍यांचे कडून जी जास्‍तीची रक्‍कम विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता यांनी वसुल केलेली आहे त्‍या संबधात कोणतेही भाष्‍य केलेले नाही फक्‍त या व्‍यवहारात त्‍यांची कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्ता यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं 1) वाहन विक्रेता यांना, वाहन विक्रीचे व्‍यवहारात त्‍यांचे कडून जास्‍तीची वसुल केलेल्‍या रकमे संबधात रजि.पोस्‍टाने दिनांक-22.10.2017 रोजी जी नोटीस पाठविली त्‍याची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांचे दिनांक-22.10.2017 रोजीचे नोटीसला, विरुध्‍दपक्ष क्रं-1 वाहन विक्रेता यांचे वकील एस.आर.तिवारी यांनी जे दिनांक-28.12.2017 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने त.क. यांना उत्‍तर पाठविले होते, त्‍या उत्‍तराची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी अभिलेखावर दाखल केली, सदर नोटीसचे उत्‍तरातील परिच्‍छेद क्रं-5 मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं -1 वाहन विक्रेता यांचे वकील यांनी असे भाष्‍य केलेले आहे की, “ Thus, my client refunded the amount of Rs.-3050/- through cheque detailed above which is in your hand and as per the request of my client you may deposit and encash the same earliest. You are therefore advised to not to indulge in any such activities as contemplated in your notice, as the good mind prevails.”    विरुध्‍दपक्ष क्रं-1 वाहन विक्रेता यांना मंचाची नोटीस मिळाल्‍यानंतरही ते मंचा समक्ष उपस्थित झाले नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍यात आले. तक्रारकर्ता यांचे तक्रारी प्रमाणे त्‍यांचे कडून विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी जास्‍तीची घेतलेली रक्‍कम आज पर्यंत परत केलेली नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी नोटीस मिळूनही कोणताही बचाव घेतलेला नाही वा तक्रारकर्ता यांची त्‍यांचे विरुध्‍दची विपरीत विधाने खोडून काढलेली नाहीत. ज्‍याअर्थी विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांचे वकीलांनी नोटीसला दिलेल्‍या उत्‍तरात वि.प.क्रं 1 यांनी तक्रारकर्ता यांचे कडून जास्‍तीची घेतलेली रक्‍कम रुपये-3050/- धनादेशाव्‍दारे देण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याची बाब नमुद केलेली आहे, त्‍याअर्थी तक्रारकर्ता यांचे कडून वाहन विक्रीचे वेळी, विरुध्‍दपक्ष क्रं-1 वाहन विक्रेता यांनी जास्‍तीची रक्‍कम रुपये-3050/- वसुल केल्‍याची बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांना मान्‍य आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता यांचे तक्रारीतील विधानाला बळकटी प्राप्‍त होते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे वकीलांनी तक्रारकर्ता यांना पाठविलेल्‍या नोटीसचे उत्‍तरात त्‍यांनी तक्रारकर्ता यांचे कडून वाहन विक्रीचे व्‍यवहारात जास्‍तीची रक्‍कम रुपये-3050/- वसुल केल्‍याची बाब मान्‍य केलेली असल्‍याने प्रकरणात जास्‍त खोलात जाण्‍याची गरज मंचाला वाटत नाही. सबब मुद्दा क्रं 1 व 2 ला आम्‍ही होकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं-3 बाबत-

 

13.       उपरोक्‍त नमुद केल्‍या नुसार विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांनी तक्रारकर्ता यांचे कडून वाहन विक्रीचे व्‍यवहारात जास्‍तीची रक्‍कम रुपये-3046/- वसुल करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून तक्रारकर्ता यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांचे विरुध्‍द मंजूर होण्‍यास पात्र आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता हे, विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांचे कडून, वाहन विक्रीचे व्‍यवहारात जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम रुपये-3046/- वाहन खरेदी दिनांक-30.09.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज मंजूर करणे या प्रकरणा मध्‍ये योग्‍य व वाजवी आहे असे आमचे मत आहे. त्‍याच बरोबर तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-3000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे कडून मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे, असे आमचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-2) वाहन निर्माता कंपनी यांनी, तक्रारकर्ता यांना, कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही वा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-2) वाहन निर्माता कंपनी विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.            

 

 14.      वरील सर्व वस्‍तुस्थितीचा सर्वकष विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                     ::आदेश::

  1. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांनी, तक्रारकर्ता यांना, त्‍यांचे कडून  वाहन विक्रीचे व्‍यवहारात जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम रुपये-3046/- (अक्षरी रुपये तीन हजार शेहचाळीस फक्‍त) परत करावी आणि सदर रकमेवर वाहन खरेदी दिनांक-30.09.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्ता यांना द्दावे.
  3.  तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांनी तक्रारकर्ता यांना द्दावेत.
  4.       सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता यांनी निकालपत्राची  प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
  5.    विरुध्‍दपक्ष क्रं-2) वाहन निर्माता कंपनी यांचे विरुध्‍दची तक्रार खर्चाविना खारीज करण्‍यात येते.
  6.      सर्व पक्षकारांना निकालपत्राची प्रमाणित प्रत निःशुल्‍क उपलब्‍ध करुन    द्दावी.
  7.    तक्रारकर्ता यांना “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.      

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
[HON'BLE MR. S.R. AJANE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.