Maharashtra

Nagpur

EA/60/2017

Shri. Krishnarao Pandurang Bande - Complainant(s)

Versus

Ashtavinayak Planners &Developers Private Ltd - Opp.Party(s)

Adv.Abhijit Khare

22 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/60/2017
( Date of Filing : 03 Apr 2017 )
In
Complaint Case No. CC/14/392
 
1. Shri. Krishnarao Pandurang Bande
10/ b-2 Mangal Appt Khare Town, Dharmpeth Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Ashtavinayak Planners &Developers Private Ltd
5th floor, Laxmi Sada, Near Sai Mandir, Chatrapati Nagar Square, Wardha Road Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 22 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- मा. सुभाष रा. आजने, मा. सदस्‍य)

  1. प्रस्‍तुत दरखास्‍त गैरअर्जदार यांचे विरुध्‍द त्‍याने मंचाचे आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २५ अंतर्गत दाखल करण्‍यात आली आहे.
  2. अर्जदाराने गैरअर्जदार  विरुध्‍द ग्राहक तक्रार ३९२/२०१४ मंचात दाखल केली होती. त्‍या तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक २७/०७/२०१६ ला आदेश पारीत करुन तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करतांना विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेशीत केले होते की,
  1. विरुध्‍द पक्ष यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रुपये २,६६,१००/- जानेवारी २०११ पासुन प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजासह परत करावी.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये १५,०००/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये ५,०००/- द्यावे.
  1. मंचाने तक्रार क्रमांक ३९२/२०१४ मध्‍ये दिनांक २७/७/२०१६ रोजी पारित केलेल्‍या आदेशाचे पालन दिलेल्‍या ३० दिवसाचे मुदतीत गैरअर्जदाराने केले नाही आणि मंचाचे आदेशाची अवमानना केली त्‍यामुळे अर्जदारास प्रस्‍तुत दरखास्‍त मंचासमोर दाखल करावी लागली.
  2. अर्जदाराने सदर दरखास्‍त अर्ज सादर करुन दिनांक २७/७/२०१६ रोजीच्‍या मंचाच्‍या आदेशाप्रमाणे रक्‍कम रुपये  २,६६,१००/- जानेवारी २०११ पासुन  द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजासह रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत परत करावे तसेच आदेशीत झालेल्‍या मानसिक, शारीरिक ञासापोटी व तक्रार खर्च देण्‍याकरीता गैरअर्जदार विरुध्‍द वसुली प्रमाणपञ देण्‍याची मागणी केली.
  1. अर्जदाराची दरखास्‍त दाखल झाल्‍यानंतर गैरअर्जदाराला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली व ती प्राप्‍त होऊनही गैरअर्जदार यांनी आपला जबाब मा. मंचासमोर सादर केला नाही.  करीता मा. मंचाने गैरअर्जदार विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २१/०५/२०१८ रोजी पारित केला. त्‍यामुळे गैरअर्जदाराने मंचाचे आदेशाचे पालन केले नसल्‍याचे सिद्ध होते.
  2. प्रस्‍तुत दरखास्‍त प्रकरणातील मुळ ग्राहक तक्रार क्रमांक ३९२/२०१४ मधील दिनांक २७/७/२०१६ रोजीचे आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम २५ नूसार मंजूर होण्‍यास पाञ आहे. जमिन महसुलीच्‍या थकीत रकमेचा वसुली पद्धतीने ( Recovery of Arrears of Land Revenue) गैरअर्जदाराची चल/अंचल संपत्‍ती जप्‍ती करुन आदेशीत रक्‍कम जिल्‍हाधिकारी, नागपूर यांनी अर्जदारास मिळवून देणे क्रमप्राप्‍त  आहे. अर्जदाराची दरखास्‍त ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम २५ नूसार मंजूर करुन खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. अर्जदाराची दरखास्‍त पुढील निर्देशासह मंजूर करण्‍यात येते.
  2. प्रबंधक यांनी आदेशाची प्रत व मुळ तक्रारीतील अंतिम आदेशाची प्रत (Operative Part) वसुली दाखल्‍यासह जिल्‍हाधिकारी, नागपूर यांना वसुली करीता पाठवावी.
  3. जिल्‍हाधिकारी नागपूर किंवा त्‍यांनी नेमलेले अधिकारी यांनी जमिन महसुलीच्‍या थकीत रकमेचा वसुली पद्धतीने ( Recovery of Arrears of Land Revenue) दिलेल्‍या वसुली दाखल्‍यानूसार रुपये २,६६,१००/- जानेवारी २०११ पासून द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याजासह प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये ५,०००/- गैरअर्जदार कडुन वसुल करुन अर्जदारास द्यावे.
  4. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.