Maharashtra

Nagpur

CC/667/2021

ANIL DAYARAMJI UIKEY - Complainant(s)

Versus

ASHTALAXMI REALITIES PVT LTD THROUGH ITS MANAGAGINE DIRECTOR SUSHIL PARASRAM KHOBRAGADE - Opp.Party(s)

ADV AKASH TIWARI

16 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/667/2021
( Date of Filing : 24 Nov 2021 )
 
1. ANIL DAYARAMJI UIKEY
AKOT TALUKA AKOT DIST AKOLA PERMANANT ADD. NEAR HP GAS GODOWN YEOTA ROAD BASERA COLONY MALKAPUR TALUKA AKOLA
AKOLA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ASHTALAXMI REALITIES PVT LTD THROUGH ITS MANAGAGINE DIRECTOR SUSHIL PARASRAM KHOBRAGADE
4TH FLOOR BHIVAPURKAR CHAMBERS OPP YASHWANT STADIUM, DHANTOLI NAGPUR 440012
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV AKASH TIWARI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हा "अष्‍टलक्ष्‍मी रिअल इस्‍टेट प्रा.लि." या नावाने व्‍यवसाय करीत असून त्‍याचा कार्पोरेट आय.डी.नं.  CIN U 45400MH2008PTC185760 असा आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या गणराया सिटी फेज 1, मौजा – चिकना, खसरा क्रं. 160/2, प.ह.नं. 40, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 51, एकूण क्षेत्रफळ 4828.01 स्‍के.फीट, हा रुपये 19,21,923/- मध्‍ये विकत घेण्‍याकरिता  दिनांक 05.09.2015 रोजी विक्रीचा करारनामा केला होता. तक्रारकर्त्‍याने दि. 09.03.2020 रोजी रुपये 1,20,000/-  स्‍टॅम्‍प डयुटी चार्जेस आणि रुपये 1,73,530/- विकसन शुल्‍क म्‍हणून अदा केले होते.  अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला रुपये 22,15,453/- अदा केले असल्‍याबाबतचे बॅंकचे खाते उतारा व पावती जोडलेली आहे.  त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  दि. 20.01.2021 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्त्‍यास सब रजिस्‍टार कार्यालयात दि. 08.02.2021 रोजी विक्रीपत्र नोंदवून घेण्‍याकरिता उपस्थितीत राहण्‍याकरिता पत्र पाठविले होते.  तक्रारकर्ता हा दि. 08.02.2021 रोजी सब रजिस्‍टार कार्यालयात विक्रीपत्र नोंदणी करुन घेण्‍याकरिता उपस्थितीत असतांना काही कारणास्‍तव सदरचे विक्रीपत्र नोंदवून न देता पुढील तारीख दि. 22.02.2021 रोजी नोंदवून देईल असे  कळविले. परंतु पुन्‍हा दि. 21.02.2021 रोजी दूरध्‍वनीवरुन कळविले की, दि.22.02.2021 रोजी विक्रीपत्र होऊ शकत नसल्‍याने विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता पुढील तारीख कळविण्‍यात येईल. त्‍यानंतर त.क.ने अनेक वेळा वि.प.ला विनंती करुन देखील आजपर्यंत विक्रीपत्र करुन दिलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 01.03.2021 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती, परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे कायदेशीररित्‍या विक्रीपत्र नोंदवून जागेचा प्रत्‍यक्ष ताबा देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍यास कायदेशीर किंवा तांत्रिक दृष्‍टया अडचण असल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून भूखंड विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आणि  शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांना आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द दि. 21.03.2022 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 होय

  1.  

व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय?                       होय

  1.  

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या गणराया सिटी फेज 1, मौजा – चिकना, खसरा क्रं. 160/2, प.ह.नं. 40, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 51, एकूण क्षेत्रफळ 4828.01 स्‍के.फीट, हा रुपये 19,21,923/- मध्‍ये विकत घेण्‍याकरिता दिनांक 05.09.2015 रोजी विक्रीचा करारनामा केला होता हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे करारनामाप्रमाणे भूखंड खरेदी पोटी असलेली संपूर्ण रक्‍कम अदा केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने सब रजिस्‍टार कार्यालयात कायदेशीर विक्रीपत्र नोंदणीकरिता रुपये 1,20,000/-  स्‍टॅम्‍प डयुटी चार्जेस दि. 09.03.2020 रोजी भरले आणि विकसन शुल्‍क म्‍हणून रुपये 1,73,530/- अदा केले होते,  अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला एकूण रक्‍कम रुपये 22,15,453/- अदा केले असल्‍याबाबतचे बॅंकचे खाते उतारा व दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडापोटी असलेली संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारुन सब रजिस्‍ट्रार कार्यालयात नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता बोलविल्‍यानंतर देखील विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा अनेक वेळा भूखंडाचे कायदेशीर विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाला विनंती करुन सुध्‍दा आजपर्यंत विक्रीपत्र करुन दिलेले नाही अथवा तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम देखील परत केली नाही, ही विरुध्‍द पक्षाची दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती  असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. 

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे गणराया सिटी फेज 1, मौजा – चिकना, खसरा क्रं. 160/2, प.ह.नं. 40, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 51, एकूण क्षेत्रफळ 4828.01 स्‍के.फीट, चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन जागेचा प्रत्‍यक्ष ताबा द्यावा. तसेच सदरच्‍या भूखंड विक्रीपत्र नोंदणीचा खर्च विरुध्‍द पक्षाने सोसावा.                                                                                                                                                                                                                                      किंवा

उपरोक्‍त भूखंडाचे कायदेशीररित्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे    

शक्‍य नसल्‍यास किंवा कोणत्‍याही प्रकारची अडचण असल्‍यास विरुध्‍द पक्षाने वादातीत भूखंडापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 22,15,453/- व त्‍यावर दि. 01.03.2021 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला द्यावी.  

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.