::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, अधि.कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 04.03.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये असे कथन आहे कि, अर्जदाराने दि.20/09/2010 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 कडून मुंबई येथिल शोरुम मधून BMW कंपनीचे मॉडेल BMW 320 D सहा अॅटोमॅटीक ट्रान्समिशन स्पीड आणि कॅटूलिक कन्व्हर्ट असलेली कार विकत घेतली. अर्जदाराने पुढे असे कथन केले कि, सदर कार सर्व्हिसिंग करीता कंपनीचे अॅथॉराईज्ड सेंटर मध्ये दयायचे होते, परंतु चंद्रपूर येथे कोणतेही सर्व्हिसिंग सेंटर नसल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्यासंदर्भात चंद्रपूरच्या जवळ असलेल्या सर्व्हिसिंग सेंटर बाबत माहीती मिळण्याबाबत गैरअर्जदार क्रं. 1 शी संपर्क साधला. अर्जदाराने आपल्या तक्रारीत पुढे असे कथन केले कि, दि. 18/07/2011 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 ला ईमेल व्दारे अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरची माहीती मिळण्याबाबत ईमेल व्दारे तक्रार दाखल केली व त्यानंतर अर्जदाराच्या गाडीचे इंजिन सिझ झाले (बसले) म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 चे हैद्राबाद स्थित अधिकृत सर्व्हिसिंग सेंटर वर सदर गाडी दुरुस्तीसाठी पाठविली त्यामुळे त्यादरम्यान अर्जदाराला टोयोटा कंपनीची कार दि. 11/06/2011 रोजी फॉर्च्युनर बुक करावी लागली. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराने कंपनीची कार नादुरुस्त असल्याने अर्जदाराचे नुकसान झाले व त्या कार बाबत गैरअर्जदाराने न्युनतापूर्ण सेवा दिली त्यामुळे अर्जदाराला आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावे लागले आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदार व त्यांच्या वकीलांचा तक्रार स्विकृत करण्यासाठी युक्तीवाद ऐकला.
अर्जदाराच्या तक्रारीचे व दस्ताऐवजाचे अवलोकन करतांना मंचाला असे दिसून आले कि, अर्जदाराने सदर गाडी मुंबई येथून खरेदी केलेली आहे व गैरअर्जदाराचे व्यवस्थापक गुडगाव येथे तसेच त्याचे अॅथॉराईज्ड ऐजन्ट नागपूरला असल्यामुळे सदर तक्रार करण्याचे कारण चंद्रपूर मध्ये निर्माण झालेले नाही.
3. अर्जदाराची तक्रार व त्यांचा युक्तीवाद ऐकून मंचाच्या मताप्रमाणे अर्जदाराची तक्रार दाखल करण्याचे कारण नागपूर येथे निर्माण झाले असून सदर तक्रार हया मंचाच्या अधिकार क्षेञाबाहेर असल्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतीम आदेश //
1. सदर तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
2. अर्जदाराला, मुख्य तक्रार अर्ज व दस्तऐवजाची प्रत सोडून
उर्वरित प्रति देण्यात याव्या.
3. अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 04/03/2014