Maharashtra

Nagpur

CC/11/346

Devrao Bhaiyyaji Bhandekar - Complainant(s)

Versus

Ashok Layland - Opp.Party(s)

Adv. S.S.Thamke

25 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/346
 
1. Devrao Bhaiyyaji Bhandekar
Tukumb, Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Ashok Layland
Office- 1, S.V.Patel Road, Gundi Chennai
Chennai 600032
Tamil Nadu
2. Div. Manager, Ashol Layland
Poonam Plaza, Palm Road, Civil Lines,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. S.S.Thamke, Advocate for the Complainant 1
 Adv.B.B.Sharma, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 25/04/2012)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत मंचात दि.28.06.2011 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल करुन मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या नुकसान भरपाईपोटी `.60,000/- दि.14.03.2011 पासुन 18 टक्‍के व्‍याजासह, मानसिक, शारीरिक त्रासाकरीता `.50,000/- नोटीस व तक्रारीचा खर्च असे एकत्रित `.1,16,500/- व्‍याजासह मागणी केलेली आहे.
 
                  प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 व्‍दारे उत्‍पादीत ट्रक क्र.एमएच-34/एबी-1600 हा विरुध्‍द पक्षाकडून विकत घेऊन परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे नोंदणी केली होती. तक्रारकर्त्‍यानुसार ट्रक वारंटीच्‍या अटी शर्तींनुसार खरेदी तारखेपासुन 18 महिने किंवा 15000 किलामीटर यापैकी जे अगोदर असेल तेवढया काळाची वारंटी असुन ट्रकमधे तांत्रीक बिघाड झाल्‍यास तो कंपनीच्‍या अधिकृत विक्रेत्‍याकडून दुरुस्‍ती करुन देण्‍याची हमी दिली होती. दि.14.03.2011 रोजी सदर ट्रक अमरावतीवरुन अंदाजे 40 किलोमीटरवर बंद पडला, तक्रारकर्त्‍याचे तक्रारीवर विरुध्‍द पक्षाचे अभियंत्‍याने पंप खराब असल्‍यामुळे तो काढून दुरुस्‍ती करीता घेऊन गेला व दुस-या दिवशी पंप लावून देण्‍याचे आश्‍वासन दिले परंतु तसे न होता दि.19.03.2011 रोजी ट्रकमधील बिघाड दुरुस्‍त करुन देण्‍यांत आला व त्‍याचे प्रमाणपत्र दि.20.03.2011 रोजी मिळाले. जेव्‍हा की, जर ट्रक बंद पडला तर 48 तासात दुरुस्‍त करुन देण्‍याची हमी विरुध्‍द पक्षाने दिली होती असे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे. तक्रारकर्त्‍याचा ट्रक विरुध्‍द पक्षाने योग्‍य सेवा न पुरविल्‍यामुळे सदर ट्रक दि.14.03.2011 ते 19.03.2011 पर्यंत बंद राहीला व विरुध्‍द पक्षाने वारंटीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला असुन त्‍यांचे सेवेत त्रुटी आहे. तक्रारकर्त्‍याचे मागणी प्रमाणे सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने त्‍यांना दाद दिली नाही.
 
3.          तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ 8 दस्‍तावेज दाखल केले ते अनुक्रमे पृ.क्र.11 ते 22 वर आहेत. त्‍यामधे ट्रक खरीदीचे बिल, नोंदणी दाखला, वारंटीचे हमीपत्र ट्रक दुरुस्‍ती प्रमाणपत्र, ट्रकव्‍दारे मिळत असलेले उत्‍पन्‍नाची बिल, वकीलाची नोटीस व त्‍याचे उत्‍तर संलग्‍नीत आहे.
4.          मंचाने विरुध्‍द पक्षास नोटीस बजावला असता ते मंचात हजर झाले असुन त्‍यांचे म्‍हणणे खालिल प्रमाणे...
            विरुध्‍द पक्षाने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.2,3 व 4 मान्‍य केला, तसेच म्‍हटले की, सदर ट्रक दि.14.03.2011 रोजी बंद पडला व त्‍यांचे अधिकृत सेवाकेंद्र बालाजी ऑटो ऍग्रो यांचे अभियंत्‍याने मोक्‍यावर ट्रकची तपासणी केली, बॉश कंपनीचा फ्युअल इंजेक्‍शन पंप काढून दुरुस्‍ती करीता कंपनीचे विक्रेते मे. वोरा ब्रदर्स, अमरावती यांचेकडे पाठविले व दि.19.03.2011 रोजी बिघाड दुरुस्‍त केला. व दि.15.03.2011 ते 19.03.2011 पर्यंत तक्रारकर्त्‍यास शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला हे मान्‍य केले व इतर म्‍हणणे नाकारले. आपल्‍या विशेष कथनात विरुध्‍द पक्षाने म्‍हटले आहे की, खरेदी केलेला ट्रक हा स्‍वतःचे वापराकरीता खरेदी केला नसुन व्‍यावसायीक कारणाकरीता खरेदी केला आहे व तसा वापर करुन नफा कमवीत आहे. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक या संज्ञेत मोडत नसल्‍यामुळे तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने कथन केल्‍याप्रमाणे 4 तासांच्‍या सेवेबाबत व एक्‍ल्‍यूजन-टी ऍन्‍ड सी. नं.4 बाबत स्‍पष्‍टीकरण केले व विरुध्‍द पक्षाने वारंटी बाबतचे स्‍पष्‍टीकरण केले व तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली.
 
5.          मंचाने दोन्‍ही पक्षांचे विव्‍दान वकीलांचा युक्तिवाद ऐकला तसेच सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
 
6.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीत स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, ते देवनिल इंन्‍डेन घुग्‍गुस जिल्‍हा चंद्रपुरचे मालक असुन त्‍याचा वाहतुकीचा व्‍यवसाय आहे व इंन्‍डेन गॅस सिलेंन्‍डर वाहतुकीचा कॉन्‍ट्रक्‍ट आहे व त्‍याच कारणाकरीता त्‍यांनी ट्रक खरेदी केलेला आहे. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या विशेष बयाणात आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेला ट्रक हा स्‍वतःचे वापराकरीता खरेदी केला नसुन व्‍यावसायीक कारणाकरीता खरेदी केला असुन ते व्‍यवसाय करुन नफा कमवित असल्‍यामुळे तक्रारकर्ता ग्राहक या संज्ञेत मोडत नाही, त्‍यामुळे सदर तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत वाहनाच्‍या वारंटीचा मुद्दा उपस्थित केला. ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1) डी नुसार तक्रारकर्ता खरेदी केलेल्‍या वस्‍तुचा वापर हा व्‍यावसायीक कारणासाठी व अतिरिक्‍त नफा कमविण्‍याकरीता करीत असेल तर तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक ठरत नाही. मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने 2011 सीटीजे-121 (सीपी) ‘बिर्ला टेक्‍नॉलाजी लि. –विरुध्‍द – न्‍युट्रल ग्‍लास ऍन्‍ड अलाईड इंडस्टि्रज या निकालपत्रात सदर तक्रारीप्रमाणेच वारंटीचा मुद्दा व व्‍यावसायीक कारणाचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्‍यात खालिल प्रमाणे प्रमाणीत करण्‍यांत आले व सदर निकालपत्र या तक्रारीस लागू पडते, असे मंचाचे मत आहे.
      “If the goods are purchased for the commercial purpose of earning more profits then there can be no   disputes that even the service offered along with them have to be for the same purpose”.
 
7.          वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, तक्रारकर्ता ग्राहक या संज्ञेत मोडत नसल्‍यामुळे सदर वाद हा ग्राहक वाद या सदरात मोडत नाही, त्‍यामुळे सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र नसल्‍यामुळे तक्रार खारिज करणे मंचास संयुक्तिक वाटते, तक्रारकर्त्‍यास आवश्‍यक वाटत असल्‍यास त्‍याने योग्‍य दिवाणी न्‍यायालयासमोर दाद मागावी. करीता खालिल प्रमाणे आदेश पारित करण्‍यांत येतो.
 
              -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारिज करण्‍यांत येते.
2.    दोन्‍ही पक्षाने तक्रारीचा खर्च स्‍वतः वहन करावा.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.