Maharashtra

Nagpur

EA/11/2018

GORAKSHNATH SUDAMJI KOTANGALE - Complainant(s)

Versus

ASHIRVAD GALAXI LAND DEVELOPERS & CONTRACTORS THROUGH SECRETARY - Opp.Party(s)

ADV. B. L. MESHRAM

22 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/11/2018
( Date of Filing : 09 Jan 2018 )
In
Complaint Case No. CC/290/2016
 
1. GORAKSHNATH SUDAMJI KOTANGALE
R/O. GANESHPUR, BHANDARA
NAGPUR
MAHARASHTRA
...........Appellant(s)
Versus
1. ASHIRVAD GALAXI LAND DEVELOPERS & CONTRACTORS THROUGH SECRETARY
PLOT NO. 4, UTTAM APRT., GURUDEO NAGAR, BEHIND BHARAT PETROL PUMP, NANDANVAN, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
2. PRASHANT S. MASKE, SECRETARY, ASHIRVAD GALAXI LAND DEVELOPERS & CONTRACTORS THROUGH SECRETARY
PLOT NO. 4, UTTAM APARTMENT, GURUDEV NAGAR, BEHIND BHARAT PETROL PUMP, NANDANVAN, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:ADV. B. L. MESHRAM, Advocate
For the Respondent:
Dated : 22 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.       प्रस्‍तुत दरखास्‍त गैरअर्जदार यांचे विरुध्‍द त्‍याने मंचाच्‍या आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986  चे कलम 25 अंतर्गत दाखल करण्‍यात आली आहे.
  2.      अर्जदाराने गैरअर्जदार विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रमांक 290/2016 मंचात दाखल केली होती. त्‍या तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक 06.10.2017 ला आदेश पारित करुन विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याकडून रुपये 1,40,000/- भूखंडाचे विक्रीपोटी घेतलेली रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह दि. 06.09.2014 पासून रक्‍कमेच्‍या अदायगी पावेतो परत करावे. तसेच विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/-द्यावा असा आदेश पारित करण्‍यात आला होता.   
  3.       अर्जदार यांनी गैरअर्जदार प्रशांत मस्‍के यांच्‍या नांवे असलेल्‍या जवाहर कॉ-ऑप. हाऊसिंग सोसायटी मर्यादित, गुरुदेव नगर, नंदनवन, नागपूर येथील प्‍लॉट क्रं. 4 मधील IA & IB  या  एन.आय.टी.च्‍या योजने अंतर्गत खसरा क्रं. 596, सिटी सर्व्‍हे नं. 101, शिट क्रं. 286, कार्पोरेशन घर क्रं. 1630/A/4, वार्ड क्रं. 20, येथील यांच्‍या मालकीची स्‍थावर अचल मालमत्‍ते मधून जप्‍त करण्‍याकरिता व जिल्‍हा दंडाधिकारी, नागपूर यांच्‍याकडे आदेशाप्रमाणे रक्‍कमेची वसुली करण्‍याकरिता पाठविण्‍यात यावे.  
  4.      विरुध्‍द पक्ष/गैरअर्जदार यांनी मुळ तक्रारीतील आदेशाचे पालन न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने/अर्जदाराने  दि. 20.01.2018 रोजी दरखास्‍त प्रकरण कलम 25 अंतर्गत दाखल केले.  त्‍याप्रमाणे गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना मंचामार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे दि. 17.07.2018 रोजी त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला होता. 
  5.       या मंचाद्वारे दिनांक 06.10.2017 रोजी पारित झालेल्‍या आदेशाची अंमलबजावणी करण्‍याकरिता गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे वसुली करण्‍याकरिता जिल्‍हाधिकारी यांना  खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येते.  

               सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराचा दरखास्‍त अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
  2. जिल्‍हा दंडाधिकारी यांनी गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे रक्‍कम रुपये 1,40,000/- व त्‍यावर दि.06.09.2014 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने व्‍याजसह रक्‍कम वसूल करुन अर्जदार/तक्रारकर्त्‍यास द्यावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- वसूल करुन तक्रारकर्त्‍यास द्यावा.  

अथवा

जिल्‍हा दंडाधिकारी यांना उपरोक्‍त रक्‍कम वसुल करण्‍याकरिता आवश्‍यकता भासल्‍यास गैरअर्जदार क्रं. 2 प्रशांत मस्‍के यांच्‍या नांवे असलेली जवाहर कॉ-ऑप. हाऊसिंग सोसायटी मर्यादित, गुरुदेव नगर, नंदनवन, नागपूर येथील प्‍लॉट क्रं. 4 मधील IA & IB या एन.आय.टी.च्‍या योजने अंतर्गत  असलेला खसरा क्रं. 596, सिटी सर्व्‍हे नं. 101, शिट क्रं. 286, कार्पोरेशन घर क्रं. 1630/A/4, वार्ड क्रं. 20, येथील संपत्‍ती मधून उपरोक्‍त आदेशित रक्‍कम वसूल करुन अर्जदार/तक्रारकर्त्‍यास द्यावी अथवा या मंचाच्‍या कार्यालयात जमा करावी.  

  1. जिल्‍हा दंडाधिकारी नागपूर यांनी सदरच्‍या आदेशाप्रमाणे वसुली संबंधी योग्‍य ती कार्यवाही करुन त्‍याचा अहवाल जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांच्‍याकडे पाठवावा.
  2. प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मंचाचे आदेशाप्रमाणे रक्‍कम वसुलीकरिता जिल्‍हा दंडाधिकारी, नागपूर यांच्‍याकडे विहित नमुन्‍यातील वसुलीचे प्रमाणपत्र पाठवावे. 
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.