ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1432/2009
दाखल दिनांक. 17/09/2009
अंतीम आदेश दि. 26/03 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
1. डॉ.भिका रामदास बडगुजर, तक्रारदार
उ.व. 69, धंदा – डॉक्टर, (अॅड.राजेंद्र व्ही.निकम)
2. सौ.संगिता भिका बडगुजर,
उ.व. 64, धंदा – घरकाम,
रा. न्यु. प्लॉट, अमळनेर,जि.जळगांव
विरुध्द
1. आशापुरी नागरी सहकारी पत. मर्या.. सामनेवाला
अमळनेर,ता.अमळनेर,जि.जळगांव, (कोणीही नाही)
व इतर 12.
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे, अध्यक्ष – प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, तक्रारदार व त्यांचे वकील तक्रार दाखल केल्यानंतर व दि. 20/10/2009 रोजी, सामनेवाल्यांना मंचाने काढलेली नोटीस बजावणी साठी तक्रारदारांनी स्टेप्स घेतलेल्या नाहीत. दि.24/12/2013 रोजीचा रोजनामा शिट तक्रारदार वकील हजर असल्याचे दर्शविते, पंरतू त्यांनी सामनेवाले यांच्या बाबतीत कोणतीही स्टेप्स घेतलेली नाही. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे वकीलांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्यांची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. प्रस्तुत केसच्या फॅक्टस विचारात घेता उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसण्याचा आदेश न्यायसंगत ठरेल. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 26/03/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, जळगाव