Maharashtra

Thane

CC/08/36

Mr. Sanjeev Kumar - Complainant(s)

Versus

Ashapura Habitats Pvt. Ltd. - Opp.Party(s)

17 Jul 2010

ORDER


.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
Complaint Case No. CC/08/36
1. Mr. Sanjeev Kumar Clariant Colony Flat No. 4 Kolset Road, Sandoz Baugh.(W)ThaneMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Ashapura Habitats Pvt. Ltd. Sanghvi Group of Co. 1st floor Veetrag Chambers 46 C.P.Street Fort 1Mumbai.Maharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 17 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार क्रमांक – 36/2008

तक्रार दाखल दिनांक – 22/01/2008

निकालपञ दिनांक – 01/07/2010

कालावधी - 02वर्ष 05 महिने 11 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर

श्री. संजीव कुमार

क्‍लेरियंट कॉलनी, फ्लॅट नं. 4,

कोलसेत रोड, संनडोढ बाग,

ठाणे (पश्चिम). .. तक्रारदार

विरूध्‍द

    आशापुरा हेबिटेटस प्रा. लि.,

    सांघवी ग्रुप ऑफ कं., 1ला मजला,

    विटराज चेंम्‍बर्स, 46, सी.पी.स्‍ट्रीट,

    फोर्ट, मुंबई 400 001. .. सामनेवाला

समक्ष - मा. श्रीमती. शशिकला श. पाटील – अध्‍यक्षा

मा. श्रीमती भावना पिसाळ - सदस्‍या

मा. श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

उपस्थितीः- .‍क तर्फे वकिल श्रीमती. पुनम माखिजानी

वि.प तर्फे वकिल श्री. .के.महाजन

आदेश

(पारित दिः 01/07/2010 )

मा. श्री.पी.एन.शिरसाट – सदस्‍य यांचे आदेशानुसार

1. तक्रारदाराने हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्‍वये दाखल केली असुन त्‍यातील कथन संक्षिप्‍तपणे खालीलप्रमाणेः-

तक्रारदाराने चौकशी केल्‍यानुसार व विरुध्‍द पक्षकाराचे आश्‍वासनानुसार तक्रारदाराने विरुध्‍द पक्षकार बांधत असलेल्‍या घोडबंदर रोड, ठाणे(पश्चिम) येथील संघवी हिल्‍स मधील ''सप्‍तगिरी'' नांवाच्‍या इमारतीमध्‍ये 506 नंबरची सदनिका 5वा माळा ''सी'' विंग मधील 790 चौरस फुट क्षेत्रफळ आकाराची सदनिका रु.12,64,000/- मध्‍ये घेण्‍यासाठी उभयतामध्‍ये व्‍यवहार सौदा पक्‍का झाला. त्‍या प्रित्‍यर्थ तक्रारदाराने प्रथमतः रु.51,000/- दिनांक 04/08/2006 नुसार सदनिका बुकींग करण्‍याचा सौदा केला. सदनिकेचे पंजिकरण करण्‍यासंबंधी दिनांक 14/07/2007 रोजी विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास बोलविले परंतु पंजिकृत करारनामा न करता सदनिका विक्री सौदा रद्द ठरविला व त्‍याची घेतलेली रक्‍कम रु.51,000/- परत केली. परंतु तक्रारदाराने ति रक्‍कम न स्‍वि‍कारता दि.26/12/2007 रोजी रु.51,000/- विरुध्‍द पक्षकारास परत केली, व त्‍यासंबंधी दिनांक 28/12/2007 रोजी ई-मेल पाठविला.

सदनिका सौदा रद्द करण्‍याचे कारण सदरची जागा खाजगी वनवि‍भागासाठी राखीव असल्‍यामुळे सब-रजिष्‍ट्रार ऑफ अशुरन्‍सेस ठाणे यांचे

.. 2 ..

आदेशानुसार सदरच्‍या जागेचे (योजनेचे) कोणतेही पंजिकरण होणार नाही, असे सांगितल्‍यामुळे 18 मह‍िने वाया गेले. तक्रारदार मध्‍यमवर्गिय उत्‍पन्‍न गटातील असल्‍यामुळे व घराच्‍या किमती प्रचंड प्रमाणात वाढत असल्‍यामुळे या सदनिकेची तृतिय पक्षिय व्‍यक्तिस विक्री करुन जादा फायदा करावयाचा दुष्‍ट हेतु असावा असे दिसते कारण सदरच्‍या इमारतीमधील काही ग्रा‍हकास विरुध्‍द पक्षकाराने फर्निचर बनविण्‍यासाठी ताबा दिला आहे त्‍या प्रित्‍यर्थ तक्रारदाराने सत्‍यप्रतिज्ञापत्र दाखल केले आहे व विरुध्‍द पक्षकार सदरच्‍या सदनिकेमध्‍ये तृतिय पक्षिय करार करण्‍याचे घाटत असल्‍यामुळे तक्रारदाराने हि तक्रार दाखल केली असुन सदनिकेचा ताबा घेण्‍यासंबंधी तक्रार दाखल केली. असुन तक्रारीचे कारण सतत घडत आहे. तक्रारीचे ठिकाण ठाणे येथे असल्‍यामुळे व सदरची तक्रार आर्थिक व भौगोलिक अधिकार क्षेत्राच्‍या आत येत असल्‍यामुळे हि तक्रार चालविण्‍याचा व निर्णयीत करण्‍याचा या मंचाला पुर्ण अधिकार आहे. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणेः-

1.विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये त्रृटी, न्‍युनता, बेजबाबदारपणा तसेच अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला असे घोषीत करावे.

2.विरुध्‍द पक्षकाराने सप्‍तगिरी इमारतीमधील सदनिका नं.C-506 चा पंजिकृत करारनामा करुन द्यावा.

3.विक्री करारनामा केल्‍यानंतर तक्रारदारास बाकीची राहिलेली रक्‍कम देण्‍याची (कर्ज घेण्‍यासाठी) पुरेपुर वेळ घ्‍यावा.

4.सप्‍तगिरी इमारतीमधील सदनिका नं. C-506 चा ताबा तक्रारदारास द्यावा.

5.विरुध्‍द पक्षकाराने इमारत पुर्णत्‍वाचे प्रमाणपत्र, ताबा प्रमाणपत्र व सहकारी गृहनिर्माण संस्‍था पंज‍िकृत करुन द्यावी.

6.तक्रार प्रलंबीत काळात विरुध्‍द पक्षकाराने तृतिय पक्षिय करार करु नये.

7.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.1,00,000/- मानसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी.

8.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.50,000/- न्‍यायिक खर्च द्यावा.

9.अन्‍य इतर हु‍कुम तक्रारदाराचे लाभात व्‍हावेत.

तक्रारदाराने तक्रारीसोबत ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 13(3) अन्‍वये अंतरिम आदेश व्‍हावा अशी विनंती केली त्‍यावर मंचाने खालील आदेश पारीत केला.

ORDER dt.22/01/2008

Heard Advocate Smt. Poonam for Complainant. Perused the documents and affidavit. Opponents are hereby refrained from creating any third party interest in flat no.506 in building of 'C' wing of Saptagiri area. Also issue show cause notice to respondents.


 

2. वरील तक्रारीची मंचाची नोटिस निशाणी 6 7 नुसार विरुध्‍दपक्षकारास पाठविली विरुध्‍द पक्षकाराने निशाणी 8 वर दाखल केले.

.. 3 ..

निशाणी 9 वर लेखी जबाब दाखल करण्‍यासाठी वेळ मिळण्‍याची विनंती केली. निशाणी 10 वर मंचाने खालील आदेश पारीत केला.

ORDER dt. 09/06/2008

The application is allowed subject to cost of Rs.700/- Opponent is directed to deposit the cost amount with Forum on or before next date and file WS next dt.07/‍07/2008 न‍िशाणी 11 वर रक्‍कम जमा केली. निशाणी 12 वर लेखी जबाब दाखल. निशाणी 13 वर प्रत‍िज्ञापत्र दाखल. निशाणी 14 वर कागदपत्रे दाखल. निशाणी 15 वर तक्रारदाराचे प्रत्‍युत्‍तरावर प्रतिज्ञापत्र दाखल निशाणी 16 वर लेखी युक्‍तीवाद दाखल. निशाणी 17 वर दाव्‍याबद्दल पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल. निशाणी 18 वर विरुध्‍द पक्षकाराने कागदपत्रे दाखल केले त्‍याबद्दल उत्‍तर दाखल निशाणी 19 वर विरुध्‍द पक्षकाराने लेखी युक्‍तीवादाबद्दल वेळ मिळण्‍याची विनंती. निशाणी 20 वर विरुध्‍द पक्षकाराने पुरसीस दाखल न‍िशाणी 21 वर विरुध्‍द पक्षकाराचे लेखी युक्‍तीवाद दाखल. निशाणी 22 वर विरुध्‍द पक्षकाराचे दाखल केले त्‍‍याचे उत्‍तर दाखल व निशाणी 24 वर लेखी युक्‍तीवादा संबंधी पुरसीस दाखल.

विरुध्‍द पक्षकाराचे लेखी जबाबातील व लेखी युक्‍तीवादातील कथन खालील प्रमाणेः-तक्रार खालील प्राथमिक मुद्दयावर रद्दबातल ठरविण्‍याच्‍या लायकीची आहे. तक्रारदाराने कोणताही ग्राह‍क वाद तक्रारीत दाखल केला नाही. कलम 2(1)(d) नुसार तक्रारदार ग्रा‍हक या संज्ञेत मोडत नाहीत. विरुध्‍द पक्षकाराने कलम 2(1)(g) नुसार कोणती त्रृटी, न्‍युनता किंवा बेजबाबदारपणा केला हे तक्रारदार सिध्‍द करु शकले नाही ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 2(1)(R) नुसार विरुध्‍द पक्षकाराने अनुचित व्‍यापारी प्रथांचा अवलंब केला हे तक्रारदार सिध्‍द करु शकले नाहीत. तक्रार हि मुदतीच्‍या सिमेच्‍या बाहेर आहे. 2 वर्षाच्‍या मर्यादेपलिकडे दाखल केली. विरुध्‍द पक्षकाराचे कार्यालय, मुंबई येथे असल्‍यामुळे या तक्रारीला भौगोलिक कार्यक्षेत्राच्‍या बाहेर आहे. त्‍यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. तक्रारदाराने महत्‍वाचे मुद्दे मंचापासुन दडवुन ठेवले आहेत. विरुध्‍द पक्षाकर बांधत असलेली नियोजित जागा खाजगी वन खात्‍याची आहे. आवश्‍यक ते पक्षकार तक्रारीमध्‍ये समाविष्‍ट केले नाही त्‍यामुळे तक्रार रद्दबातल ठरविण्‍याच्‍या लायकीची आहे. सदनिकेची किंमत रु.12,64,000/- ठरविलेली असतांना तक्रारदाराने फक्‍त रु.51,000/- दिले बाकीची रक्‍कम दिली नाही. विरुध्‍द पक्षकाराने कोणतेही खोटे आश्‍वासन दिले नाही. तक्रारदाराची कोणतीही प्रार्थना मान्‍य करण्‍याच्‍या लायकीची नाही. म्‍हणुन तक्रार रद्दबातल ठरावी व त्‍यांची किंमत विरुध्‍द पक्षकारास द्यावी.

या तक्रारीसंबंधी तक्रारदाराने खालील कागदपत्रे दाखल केली. प्रतिज्ञापत्र, सदनिका विकत घेण्‍यासंबंधी प्रारंभिक/प्राथम‍िक रकमेची पावती दिनांक 11/‍07/‍2007 चे पत्र तसेच दिनांक 14/12/2007 दिनांक 26/12/2007 व ई-मेल दिनांक 28/12/2007 ला दिला. वकिलपत्र, अंतरीम आदेशाचा अर्ज व त्‍यासंबंधी प्रतिज्ञापत्र, प्रत्‍युत्‍तर व लेखी युकितवाद तसेच विरुध्‍द पक्षकाराने


 

.. 4 ..

दाखल केलेले कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, लेखी जबाब व लेखी युक्‍तीवाद इत्‍यादी या तक्रारीसंबंधी सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्‍यायिक प्रक्रिये खालील 2 मुद्दे उपस्थ‍ित होतात ते येणेप्रमाणेः-

)विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये त्रृटी, न्‍युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्‍द करु शकले काय? उत्‍तर – होय.

)तक्रारदार हे मानसिक नुकसानीपोटी भरपाई मिळण्‍यास तथा न्‍यायिक खर्च मिळण्‍यास पात्र ठरतात काय? उत्‍तर - होय.

कारण मिमांसा

) स्‍पष्टिकरणाचा मुद्दा - विरुध्‍द पक्षकाराने आश्‍वासन दि‍ल्‍यानुसार तक्रारदाराने त्‍यांच्‍या कमाईचे व घामाचे पैसे विरुध्‍द पक्षकार बांधत असलेली इमारत घोडबंदर रोड ठाणे(पश्चिम) येथील ''संघवी हिल्‍स'' मधिल ''सप्‍तगिरी'' नावाच्‍या इमारतीमध्‍ये तक्रारदाराने 506 नंबरची सदनिका सी-विंग, 5वा माळा 790 चौरस फुट क्षेत्रफळ आकाराची सदनिका रु.12,64,000/- एवढया किंमतीस विकत घेण्‍याचा सौदा पक्‍का झाला व त्‍या प्रित्‍यर्थ तक्रारदाराने रु.51,000/- विरुध्‍द पक्षकारास दिले व त्‍याप्रमाणे प्राथमिक व प्रारंभिक बुकीग पक्‍के केले. वरील व्‍यवहारावरुन उभयतामध्‍ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्‍ट्रक्‍ट होता व आहे. तसेच उभयतामध्‍ये आर्थिक व्‍यवहार झाला असल्‍यामुळे कन्सिडरेशनही झाले होते व आहे. त्‍या अर्थी विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदाराकडुन बाकीची रक्‍कम वसुल करुन सदनिकेचा ताबा देणे, ताबा प्रमाणपत्र बांधकाम पुर्णत्‍वाचे प्रमाणपत्र देणे महाराष्‍ट्र मालकी हक्‍क सदनिका कायदा 1962 नुसारही त्‍यांचे कायदेशीर कर्तव्‍य होते व आहे ते कर्तव्‍य विरुध्‍द पक्षकाराने पार पाडले नाही. कर्तव्‍यामध्‍ये कसुर केला आहे नंतर सदरच्‍या जागेवर खाजगी वन कायद्या(योजना) आहे व सब रजिष्‍ट्रार ऑफ अशुरन्‍सेस ठाणे यांनी सदरच्‍या जागेचे पंजिकरण करण्‍यास तयार नाही असे तोकडे कारण सांगितले. नंतर सदरची इमारत बांधुन पुर्ण झाली व काही ग्राहकास फार्निचर बनविनण्‍यासाठी सदनिकेचा ताबा दिला हे तक्रारदाराने प्रतिज्ञापत्रासह पुरावा दाखल केला आहे. नंतरच्‍या काळात सदनिकेच्‍या क‍िमती प्रचंड प्रमाणात वाढल्‍या असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षकाराची जास्‍त रक्‍कम मिळण्‍यासाठी उद्देश असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षकाराने पाठविलेली रु.50,000/-ची रक्‍कम तक्रारदाराने विरुध्‍द पक्षकारास परत पाठविली, त्‍यामुळे तक्रारीचे कारण सतत घडत आहे. हे स्‍पष्‍टपणे सिध्‍द होते. तसेच सदर प्रकरण दि. 31/01/2009 रोजी लोक न्‍यायालयात आपापसात तडजोडी साठी ठेवले होते. परंतु आपसात तडजोड होऊ शकली नाही सबब विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये त्रृटी, न्‍युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे स्‍पष्‍ट होते विरुध्‍द पक्षकराची वरील कृति हि नैसर्गिक न्‍यायाच्‍या दृष्टिनेही अन्‍यायकारक आहे. विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदाराकडुन बाकीची राहिलेली रक्‍कम स्विकारुन सदनिकेचा ताबा तक्रारदारास देणे न्‍यायोचित व विधीयुक्‍त होते व आहे. परंतु


 


 

.. 5 ..

सदनिकेचा ताबा न देता अनुचित व्‍यापारी प्रथाचा अवलंब केला हेही सिध्‍द होते असे या मंचास वाटते.

)स्‍पष्टिकरणाचा मुद्दा - तक्रारदार मध्‍यमवर्गीय उत्‍पन्‍न गटातील नागरीक आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या घामाच्‍या कमाईचे पैसे विरुध्‍द पक्षकारास बांधत असलेली इमारत 'सप्‍तगिरी' मध्‍ये 506 नंबरची सदनिका सी विंग 5 वा माळा, 790 चौरस फुट क्षेत्रफळ आकाराची सदनिका रु.12,64,000/- एवढया रकमेस विरुध्‍द पक्षकाराने आश्‍वासन दिल्‍यानुसार तक्रारदाराने रु.51,000/- विरुध्‍द पक्षकारास दिले व बाकिची रक्‍कम विरुध्‍द पक्षकास बँकेतुन व्‍याजाने रक्‍कम काढुन देणार होते. परंतु व्‍यवहार रद्द करुन वरील रक्‍कम तक्रारदारास परत केली त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला व होत आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने वरील रक्‍कम विरुध्‍द पक्षाकरास परत केली. त क्रारदाराने वरील रक्‍कम न स्विकारता विरुध्‍द पक्षकारास परत केली. वरील कारणास्‍तव विरुध्‍द पक्षकार तक्रारदाराची सदनिकेचा ताबा मागणी पुर्ण करण्‍यास जबाबदार ठरतात त्‍याप्रित्‍यर्थ हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

    1. तक्रार क्र. 36/2008 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

    2.विरुध्‍द पक्षकाराने सप्‍तगिरी नावाच्‍या इमारतीमधील सदनिका नं.506, 5 वा माळा, सी.विंग 790 चौरस फुट क्षेत्रफळ आकाराची सदनिका बाकीची रक्‍कम तक्रारदाराकडुन घेऊन त्‍याचा ताबा द्यावा व त्‍यासंबंधी ताबा प्रमाणपत्र, इमारत पुर्णत्‍वाचे प्रमापत्र व सहकारी संस्‍था पंजिकृत करुन द्यावे.

    3.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.10,000/-(रु.दहा हजार फक्‍त) मा‍नसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी.

    4.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.5,000/-(रु.पाच हजार फक्‍त) न्‍यायीक खर्च द्यावा.

    5. वरील आदेशाची तामिली सही शिक्‍कयाची प्रत मिळाल्‍या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्‍पर करावी.

    6.वरील आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास त्‍वरीत द्यावी.

    दिनांक – 01/07/2010

    ठिकान - ठाणे


 

     

(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील)

    सदस्‍य सदस्‍या अध्‍यक्षा

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे