Complaint Case No. CC/401/2021 | ( Date of Filing : 28 Jul 2021 ) |
| | 1. SHRI. UTPAL SATNARAYAN UMATHE | R/O. GOLABAR CHOWK, PATVI GALLI, NAGPUR-440002 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. ARYA CONSTRUCTION SOLUTION THROUGH PROPRIETOR SHRI. GAGAN VIJAYKUMAR SONWANE | FLAT NO.103, VAISHNAV-3 APARTMENT, NEW SUBHEDAR LAY-OUT, NEAR PNB BANK A.T.M. NAGPUR-440024 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष हा आर्या कन्स्ट्रक्शन सोल्युशनचा मालक असून ते इमारत बांधकामाकरिता लागणारे आवश्यक सामुग्री उदा. सिमेंट, लोहा, गिट्टी, विटा व रेती इत्यादी साहित्य ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवितात. तक्रारकर्त्याला त्याच्या मालकिचे रेशीम बाग येथील भूखंडावर बांधकाम करावयाचे होते, त्याकरिता त्याने विरुध्द पक्षाकडून बांधकामाकरिता प्रति बॅग रुपये 280/- प्रमाणे 170 सिमेंट बॅग रक्कम रुपये 47,600/- मध्ये विकत घेण्याचे ठरविले आणि त्याकरिता विरुध्द पक्षाला नगद स्वरुपात रुपये 10,000/- दिले व इंडियन बॅंक, शाखा-वर्धमान, नागपूर या बॅंकेचा दि. 29.02.2020 रोजीचा धनादेश क्रं. 446917 अन्वये रुपये 20,000/- अदा केले असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटच्या 50 बॅग व दि. 30.03.2020 ला 10 बॅग पुरविल्या. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडे रुपये 17,600/- एवढया रक्कमेची मागणी केली तेव्हा तक्रारकर्त्याने दि. 03.03.2020 रोजीचा धनादेश क्रं. 446918 अन्वये रुपये 17,600/- अदा केले. अशा प्रकारे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला 170 सिमेंट बॅग पोटी एकूण रक्कम रुपये 47,600/- अदा केले.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, काही दिवसाचा कालावधी गेल्यानंतर सुध्दा विरुध्द पक्षाने उर्वरित सिमेंट बॅंग तक्रारकर्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी पुरविल्या नाही त्यामुळे तक्रारकर्त्याचे घराचे बांधकाम बंद झाले व त्याचे नुकसान झाले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला 110 सिमेंटच्या बॅग न पुरविल्यामुळे त्याने 110 सिमेंटच्या बॅगच्या रक्कमेची मागणी केली त्यावेळी वि.प.ने दि. 16.03.2020 ला 110 सिमेंट बॅग पोटी कॅनरा बॅंक, हुडकेश्वर शाखेचा रुपये 30,800/- चा धनादेश क्रं. 394189 दिला, परंतु सदरचा धनादेश अपु-या रक्कमे अभावी अनादरित झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रत्यक्ष भेट घेऊन रक्कमेची मागणी करुन ही रक्कम दिली न दिल्यामुळे दि. 29.06.2020 ला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती. परंतु विरुध्द पक्षाने त्याची ही दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला न पुरविलेल्या 110 सिमेंट बॅगची किंमत द.सा.द.शे.24 टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्षाला आयोगा मार्फत दि. 16.01.2022 रोजीच्या दैनिक भास्कर या वृत्तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर ही विरुध्द पक्ष आयोगा समक्ष हजर झाले नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.10.06.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले असता व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून घर बांधकामाकरिता 170 सिमेंट बॅग खरेदीकरिता रक्कम रुपये 47,600/- दिले होते हे विरुध्द पक्ष यांनी लिहून दिलेले नि.क्रं. 2 (2 व 3) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्याला वेळेत 110 सिमेंट बॅग न पुरविल्यामुळे तक्रारकर्त्याने 110 सिमेंट बॅगच्या रक्कमेची मागणी केली असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कॅनरा बॅंक, हुडकेश्वर शाखेचा दि. 16.03.2020 रोजीचा रुपये 30,800/- चा धनादेश क्रं. 394189 दिला, परंतु सदरचा धनादेश अपु-या रक्कमे अभावी अनादरित झाला हे नि.क्रं. 2 (4 ते 6) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून 170 सिमेंट बॅग पुरविण्याकरिता संपूर्ण रक्कम घेऊन निव्वळ 60 सिमेंट बॅग पुरविल्या व उर्वरित 110 सिमेंट बॅग पुरविल्या नाही व उर्वरित असलेले 110 सिमेंट बॅंगची रक्कम ही परत केली नाही ही विरुध्द पक्षाची दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे स्पष्टपणे दिसून येते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला न पुरविलेल्या 110 सिमेंट बॅगची किंमत रुपये 30,800/- व त्यावर दि. 16.03.2020 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याजासह रक्कम तक्रारकर्त्याला द्यावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |