जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/178. प्रकरण दाखल तारीख - 04/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 22/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. विजय वामनराव पाटील वय 28 वर्षे, धंदा व्यापार रा. द्वारा 47, निवा कूंज, एकता नगर तरोडा (बु) नांदेड अर्जदार विरुध्द. 1. मेसर्स अरविंद सूंडगे पाटील अकार्ड सिस्टम, माणीक नगर, तरोडा (बु) ता.जि.नांदेड गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, ल्यूमिनस, सारसीलीकॉन सिस्टम प्रा.लि.कंपनी सार घाऊस wz 106/101 राजोरी गार्डन, एक्स.नवी दिल्ली-27. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.शिवराज पाटील गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी सेवेची ञूटी दिली व त्यांनी दिलेले ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच हे खराब झाले व वॉरंटीच्या ठराविक मूदतीत त्यांनी योग्य ती सेवा उपलब्ध करुन दिली नाही म्हणून त्यांनी ही तक्रार नोंदविली आहे. गैरअर्जदार यांचेकडून अर्जदार यांनी दि.7.2.2008 रोजीला ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच रु.16000/- विकत घेतले होते. यानंतर नादूरुस्त बॅटरी जानेवारी 2009 मध्ये गैरअर्जदार घेऊन गेले व नंतर त्यांनी ती बॅटरी दि.31.7.2009 रोजीला म्हणजे उशिराने दिली. त्यामूळे त्यांना उन्हाळयात प्रखर उष्णता व अंधाराचा ञास सहन करावा लागला व यासाठी ते आजारी पडले. सदरील प्रकरणामूळे त्यांना शारीरिक व मानसिक ञास झाला व ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच योग्य न दिल्यामूळे त्यांची फसवणूक झाली म्हणून गैरअर्जदारावर योग्य ती कारवाई करुन न्याय मिळावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार हे विक्रेते आहेत. जो संच कंपनीने बनविलेला आहे तो जशास तसा ते विकतात म्हणून त्यात त्यांनी कोणतीही ञूटी केलेंली नसून, ञूटी असेल तर ल्यूमिनस कंपनीची आहे. अर्जदाराने त्यांना या बददल लेखी नोटीस दिली नाही किंवा कळविले नाही. अर्जदार हा सरळ हाताने मंचासमोर आलेला नाही. पॅरा नंबर 1 बरोबर असून पॅरा नंबर 2,3,4,5 हे खोटे आहेत असे म्हटले आहे. अर्जदार हे गैरअर्जदाराकडे आलेच नाहीत त्यांनी तोंडी किंवा लेखी तक्रार दिली नाही म्हणून त्यांनी ञूटीची सेवा दिली असे म्हणता येणार नाही. वैद्यकीय खर्चाचा कोणताही पूरावा मंचासमोर नाही. याअर्थी प्रस्तूत तक्रार ही अपरिपक्व आहे म्हणून ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे त्यांचे अधिकृत प्रतिनीधी मार्फत हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे दिलेले आहे. गैरअर्जदार कंपनी ही ल्यूमिनस सार सिलीकॉन सिस्टीम प्रा.लि. या नांवाने होती आता ती ल्यूमिनस कंपनीचे या नांवाने ओळखली जाते. अर्जदार यांना तक्रार देण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द तक्रार नाही. त्यांनी त्यांचेकडे तक्रारही केलेली नाही किंवा नोटीसही पाठविलेली नाही. सेवा देण्यासाठी कंपनी जितकी जबाबदार आहे तितकाच जबाबदारी डिलरची आहे. गैरअर्जदार आजही वॉरंटी प्रमाणे अटी व नियमानुसार सर्व कारवाई करण्यास तयार आहेत. प्रस्तूत तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांचा कोणताही संबंध नाही. तसेच अर्जदारानी कोणतीही नूकसान भरपाई मागितलेली नाही. म्हणून त्यांचे अर्ज फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- दि.7.2.2008 ला लूमनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच रु.16000/- किंमतीस विकत घेतल्या बददलचे बिल नंबर 217 अर्जदाराने दाखल केलेले असून या संबंधी कंपनीचे मॉडेल रु.16000/- ला 18 महिन्याची गॅरंटी लिहून दिलेली आहे. गैरअर्जदाराचा आक्षेप आहे की, अर्जदार हे डिलरकडे आपली तक्रार घेऊन आलेलेच नाहीत व गैरअर्जदार क्र.2 म्हणतात की कंपनीकडे त्यांनी लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. त्यामूळे ही अपरिपक्व अशी तक्रार आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले लेखी म्हणण्यात असे स्पष्ट म्हटलेले आहे की, दोषास कंपनी जरी जबाबदारी असली तरी सेवा देण्यामध्ये कंपनी सोबत विक्रेता तेवढाच जबाबदार आहे. अर्जदार यांनी दि.7.2.2008 ला ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच विकत घेतल्यावर त्यांची तक्रार अर्जाप्रमाणे त्यांची बॅटरी खराब झाली व ती बॅटरी जानेवारी 2009 मध्हये गैरअर्जदार यांना दिली व ती बॅटरी दि.31.7.2009 ला दूरुस्त करुन दिली. बॅटरी बदलून दिली ही गोष्ट बरोबर जरी असली तरी केव्हा नेली व केव्हा दिली या बददलचे पूरावे या प्रकरणात नाहीत. बॅटरी नवीन बदलून दिली म्हणजे त्यात दोष होता. अर्जदार म्हणतात आता इन्व्हरर्टर संचामध्ये दोष आहे व तो नक्की केव्हा खराब झाली यांची तारीख नाही तरी तो वॉरंटी मध्ये आहे व गैरअर्जदार क्र.2 अटी व नियमाप्रमाणे व वॉरंटीतील गॅरंटी प्रमाणे आजही योग्य ती कारवाई करण्यास तयार आहेत. म्हणजे दूरुस्त करुन किंवा बदलून देण्यास तयार आहेत. खरेदीची दिनांक पाहिली असता ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच विकत घेऊन बराच काळ लोटला आहे यांचा अर्थ इन्व्हरर्टर अर्जदाराने वापरले आहे. म्हणून ते आता नवीन बदलून देणे योग्य होणार नाही तर वॉरंटी मध्ये अर्जदाराचे इन्व्हरर्टर गैरअरर्जदार क्र.2 यांनी दूरुस्त करुन देणे आवश्यक जरी असले तरी यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांनी योग्य ती मध्यस्थी करुन व पाठपूरावा करुन ते दूरुस्त करुन घेतले पाहिजे. मागे बॅटरी बददल कार्यवाही झाली म्हणजे अर्जदार तक्रार घेऊन गेले. यांचा अर्थ तक्रार अपिरपक्व आहे असे म्हणता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकञित व संयूक्तीकरित्या अर्जदार यांना विकलेला ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच HUPI 800 VA Shl:-B3SL5LI556370907 हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत विनामोबदला दूरुस्त करुन ल्यूमिनस कंपनीचे इन्व्हरर्टर संच (इन्व्हरर्टर व बॅटरी) योग्यरित्या चालू राहील असे करुन दयावेत व यापूढील राहीलेली वॉरंटीचा काळ पूढील काळासाठी लागू राहील. 3. मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्हणून रु,1,000/- मजूर करण्यात येतो. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |